१) कोलीम साफ करा म्हणजे त्यात जर काही इतर मासे किंवा समुद्रातील इतर जिन्नस मिक्स झाल असेल तर ते काढा. एका कॉटनच्या फ़डक्यात किंवा पिठ चाळायच्या चाळणीत धुवुन घ्या.
२) आता एका भांड्यात वरील तेल सोडून सगळ जिन्नस एकत्र करून घ्या. पाणी वगैरे टाकण्याची गरज नसते कारण कोलीम ओलाच असतो. धुतल्यामुळे अजुन ओलसर होतो.
३) पॅन गॅसवर चांगला तापवून घ्या. तापला की त्यात तेल सोडा व तेल गरम झाले की गॅस मंद करून डायरेक्ट पॅनमध्येच हाताने वड्या थापा. पण हे अतिशय सावधानतेने करा. गॅस मंद करायला विसरू नका नाहीतर तेल हातावर उडेल. जर जमत नसेल तर सरळ चमच्याने टाकून त्या पसरा.
४) वड्या थापल्या की गॅस मिडीयम करा व ५-७ मिनिटे शिजू द्या.
५) नंतर वड्या उलटा बाजूने थोडे तेल सोडा व पुन्हा ५ मिनिटे शिजू द्या. करता करता इतका खमंग वास सुटातो की झाल्या झाल्या एखादी वडी मटकावली जातेच.
६) ह्या आहेत तयार कोलीमाच्या वड्या. भाकरीबरोबर अधिक रुचकर लागतात.
सगळ्यात आधी हा प्रश्न असेल की कोलिम म्हणजे काय ? तर कोलिम म्हणजे कोलंबीची पहिली स्टेप. कोलिमला रेफा असेही नाव आहे. अगदी कोलंबीचा आकारही दिसत नाही त्याला. ह्याच नुसत्या कोलीमाच्या मिठ लावून वड्या थापुन वाळवतात व त्याही भाजून तळुन खातात त्या वड्यांना पेंडी म्हणतात.
ह्या वड्या मसाल्या ऐवजी मिरची चिरुन घालूनही करतात. पण लहान मुले व म्हातार्या माणसांना मिरच्या लागु नयेत म्हणून मी मसालाच घालते.
खाडीत मिळणारा कोलिम हा काळा असतो तर समुद्रातील राखाडी पांढरट असतो. वरील समुद्रातील आहे.
कोलिम हा नुसता कांद्यावर सुकाही केला जातो. तोही भाकरीबरोबर रुचकर लागतो.
कोलीमाच्या स्टेप खाली देते.
१) कोलिम
२) जरा कोलंबीचा आकार आला की जवळा
३) बाळसे धरले की करंदी किंवा आंबाड
४) कोलंबी
५) मोठी कोलंबी किंवा करपाली पण करपाली ह्या काळ्या असतात.
कोलिम नाही मिळाले तर बोन लेस
कोलिम नाही मिळाले तर बोन लेस मासे मिक्सर मधुन काढुन पुढिल क्रुती केली तर चालेल का की काहीच्याकाही बनेल
बाकी तो पा सु कधी येऊ खायला?
बाकी तो पा सु
कधी येऊ खायला?
मस्त दिसताय्त वड्या नाव
मस्त दिसताय्त वड्या
नाव वाचल्यावर 'कोलिम म्हणजे काय???' असा विचारच करत होते... तर खाली तु उत्तर दिल्लच आहेस
प्रिती ह्याच दिवसांत मिळतो ये
प्रिती ह्याच दिवसांत मिळतो ये लवकर.
बोनलेस माश्यांना कोलिमची चव नाही येणार पण वेगळा प्रकार म्हणून करू शकतेस.
लाजो धन्स.
कोणते कलम लावावे? समाजाच्या
कोणते कलम लावावे?
समाजाच्या भूकभावना भडकावणे - कलम ००७
दंड - माबोच्या किमान दहा सदस्यांना ( त्यात मी असेन) जेवायला बोलावणे
दंड न भरल्यास - पुढील सहा महिने कोणतीही पाककृती देता येणार नाही
स्पर्धेसाठी शुभेच्छा
अवांतर - वड्यांसोबत मिरच्या आणि टोमॅटो ठेवण्याचे काही कारण आहे का? एक तर वडी खायला मिळेना आणि सजावट करतायत वर
ह घ्या
छान. हा तूम्ही किनार्यालगत
छान. हा तूम्ही किनार्यालगत राहता म्हणून मिळत असणार. आमच्याकडे कधी आणल्याचे आठवत नाही. (यापेक्षा जरा मोठा आणतात.)
अश्याच वड्या शिंपल्यातील मास्टांच्या पण करतात.
बेफी आहो जेवणात सलाड लागेल ना
बेफी आहो जेवणात सलाड लागेल ना म्हणून टोमॅटो व पांढरा कांदा आणि मसाला स्पर्धा म्हणजे तिखट मिरची पाहीजेच.
कधी येताय जेवायला ?
हो आमच्याकडे अजुन
हो आमच्याकडे अजुन कालवांच्याही अशा वड्या करतात दिनेशदा.
तुम्ही म्हणाल तेव्हा
तुम्ही म्हणाल तेव्हा येऊ
आपल्याला काय
यायचा जायचा खर्च कैलास गायकवाड करतील संस्थेतर्फे
तुम्ही 'ह घ्या' ही दोन अक्षरे वाचलीत की नाही हे तुमच्या प्रतिसादावरून समजले नाही
मिरची टोमॅटॉमुळे अधिकच छान
मिरची टोमॅटॉमुळे अधिकच छान दिसतायत वड्या
मस्त रेसिपी ..मी तर हे
मस्त रेसिपी ..मी तर हे पहिल्यादांच पाहत आहे..पुण्यात कुठे मिळेल ????
बेफी म्हणूनच तर जेवणाच
बेफी म्हणूनच तर जेवणाच आमंत्रण दिल ना. पुन्हा एकदा धन्स.
अॅक्च्युली मी व्हेजी आहे बट
अॅक्च्युली मी व्हेजी आहे बट तों पा सु.
सहीहीहीहीहीहीहीहीहीही
माईणकर तुमच्या जोडीला
माईणकर तुमच्या जोडीला अश्विनी, दिनेशदा, दक्षिणा, सारीका आहेत धन्स.
जागू मस्त वड्या दिसतायेत,
जागू मस्त वड्या दिसतायेत, आम्च्याकडे ह्या कोलीमची भजी करतो आम्ही. साहित्य सेमच आता ह्या वड्या पण करायला हव्यात. कुरकुरीत होणार नक्कीच अशा पद्धतीने.
टोकू कुठे राहता तुम्ही ?
टोकू कुठे राहता तुम्ही ? समुद्र किनारी नक्कीच कारण इतर ठिकाणी शक्यतो नाही मिळत. खुप जणांना हा प्रकारच माहीत नाही.
ह्या बाईंना आवरा रे कोणी तरी,
ह्या बाईंना आवरा रे कोणी तरी, कोलीम संपलेत आधीच त्यात हे
मला वाटतं मावशी कोलिमाची चटणी
मला वाटतं मावशी कोलिमाची चटणी पाठवायची..पण ते काळं असायचं....ती शेवटी माहिती दिलीय ती एकदम मस्त आहे.....
मला त्या स्टेप्स माहीत नव्हत्या..सध्या छोट्या कोळंब्यापण नाही आहेत जिथे आहोत तिथ...डायरेक्ट टायगर प्रॉन्स...:)
मस्त रेसिपी....स्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्र्प.
एकदम खतरनाक ! अरे कोलीमाच्या
एकदम खतरनाक !
अरे कोलीमाच्या वड्या काय , भजे काय ? वड्या आणि भज्यांना पार बदनाम करुन टाकताय तुम्ही लोक
जागू मस्त वड्या दिसतायेत,
जागू मस्त वड्या दिसतायेत, आम्च्याकडे ह्या कोलीमची भजी करतो आम्ही>>>>>>>>>++++++१००
वॉव्..जागु.. तोंपासु... इकडे
वॉव्..जागु.. तोंपासु... इकडे मिळतात कोलामी... करून पाहीनच
असामी, श्री वेळकाढू, सृष्टी
असामी, श्री
वेळकाढू, सृष्टी धन्यवाद.
वर्षू अरे वा मग नक्की कर ग. आणि मी आधी माश्यांच्या रेसिपी मध्ये कोलिम सुका दिला आहे तोही करुन बघ तो पण रुचकर लागतो.
मस्त रेसिपी ! अर्थातच
मस्त रेसिपी ! अर्थातच नेहमीसारखीच, तोंपासु..... कोलिम मलाही माहीत नव्ह्ता. पण माझी आई करंदी वापरुन पोळे टाकायची. तुझी वरचीच रेसिपी... फक्त नुसत्या लसणाएवजी आले+लसुण पेस्ट वापरायची. वरण्+भात आणि असा करंदीचा पोळा. अहाहा...... जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
जागू, शाकाहारी वड्या करताना
जागू, शाकाहारी वड्या करताना कोलमीच्या जागी काय वापरू..?
जागुतै स्पर्धेसाठी खुप खुप
जागुतै स्पर्धेसाठी खुप खुप शुभेच्छा!!!!
आणि यात 'आले' का नाही टाकलेय....?
व्वा, फार छान स्टार्टरला
व्वा, फार छान स्टार्टरला चांगला पर्याय!
ह्या वड्या सुक्या कोलिमाच्या(जवळा) पण करता येऊ शकतात काय?
मस्त!
मस्त!
टोकू कुठे राहता तुम्ही ?
टोकू कुठे राहता तुम्ही ? समुद्र किनारी नक्कीच कारण इतर ठिकाणी शक्यतो नाही मिळत. खुप जणांना हा प्रकारच माहीत नाही.>>>>>>>>>>>>> मी समुद्रकिनारी रहात नाही हो, समुंदर और मेरा दूर दूर तक कोई संबंध नही
पण आमच्याकडे(माहेरी) बाजारासाठी मुंबईहुन येणार्या कोळणी ह्या कोलमाचे वाटे विकायला घेऊन येतात. सासरी मिळत नैत.
विद्यांक, स्वाती
विद्यांक, स्वाती धन्यवाद.
चातक पेस्ट केली असती तर आल-लसुण घातल असत. पण मी लसुण कापुन घातल. तशी काही माश्यांना आल्याची इतकी खास आवश्यकता नसते. जसे कोलिम, जवळा, खुबे, कालव. धन्स.
सारीका तू कोथिंबीरवड्या करू शकतेस ना अश्या.
टोकू नशिबवान आहेस कारण मुंबईलाही बर्याचजणांना हा प्रकार माहीत नाही
(No subject)
Pages