त्रिशंकू वर एक त्रीतीयांशांचा उपाय?

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

नजिकच्या निवडणुकांतून एक त्रिशंकू लोकसभा (hung assembly) निर्माण होण्याची शक्यात बहुदा जवळ जवळ सर्वांनाच अपेक्षित आहे. नेमकी त्याच पार्श्वभूमीवर राजीव श्रिनीवासनचा हा लेख अतिशय उत्कृष्ट वाटला. मुख्ख्य म्हणजे अतिशय संतुलित, अभ्यासपूर्ण आणि नेमक्या मुद्द्यांवर बोट ठेवणारा लेख वाटतो.
http://election.rediff.com/column/2009/apr/08/-a-winning-strategy-for-th...

तुम्ही कुठल्याही पक्षाला मत द्या. पण लेखात उल्लेखलेल्या त्या "एक त्रितीयांश" मतदारांवर खरच पुढील देशाचे सरकार अवलंबून असेल काय आणि असलेच तर भा.ज.पा या वेळी त्या एक त्रितीयांशाच्या बळावर त्रिशंकू परिस्थीतीला मात देवू शकेल हा याचे उत्तर नजीकच्या काळातच मिळेल.

वैयक्तीकः प्रमोद महाजन आज हयात असते तर वर लेखात सूचित केलेल्या, प्रसारमाध्यमांचा पक्षासाठी योग्य वापर करण्याच्या त्यांच्या खास गुणवत्तेचा पक्षाला निश्चीत फायदा झाला असता!

अडवाणी आणि मनमोहन यांच्यात थेट चर्चा/संवाद (sort of american presidential debate style) होण्याची लक्षणे नाहीत. काँग्रेस त्यापासून दूर का पळते आहे हे त्यांन्नाच माहीत. पण अशी चर्चा झालीच तर मला वाटतं त्याचा सर्वाधिक फायदा "काठावर" बसलेल्या मतदारांना होईल!

आशा करूयात की आपल्या लोकशाहीत अजूनही अशा राष्ट्रीय चर्चा अन संवादाला स्थान राहील.

प्रकार: 

छान लेख
~~~~~~~~~~~~~~~~~~
वादग्रस्त बना.... निर्विवाद बनु नका!!!!

<>
मी हे पूर्वीच लिहीले होते. मला सांगण्यात आले की 'ते तसले अमेरिकेतल् इकडे चालत नाही. उगाच शहाणपणा शिकवू नका!'

आता तुम्हाला काय सांगतात बघू!