गरम (भाजक्या) मसाल्याची आमटी

Submitted by _प्राची_ on 27 March, 2012 - 23:47
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

वाटणासाठी:
२ छोटे कांदे, १ लसणीचा गड्डा, २ खोबर्‍याचे तुकडे, ३-४ मीरे, २-३ लवंगा, १ पेरभर दालचीनीचा तुकडा, १ चमचा खसखस, १ चमचा बडीशेप
तेल, लाल तिखट, २-३ मोठे चमचे शिजलेली मसूर डाळ, १ बटाटा सालीसकट फोडी केलेला, मीठ
आवडत असल्यास आमसूल आणि गूळ (मी वापरले नव्हते)

क्रमवार पाककृती: 

कृती:
प्रथम कान्दे, लसूण आणि खोबर्‍याचे तुकडे भाजून घ्या. मी बार्बेक्यू च्या काडीला टोचून गॅस वर भाजले. निखार्‍यावर भाजले तर अजून छान.
फोडणीच्या छोट्या कढईत मीरे, लवंग, दालचिनी चांगला वास येईपर्यन्त भाजा. बडीशेप आणि खसखस पण वेगवेगळी खमंग भाजा.
मग कान्दे लसूण सोलून सर्व मसाला अगदी बारीक वाटून घ्या.
कढईत २ मोठे चमचे तेल गरम करा. त्यावर किमान एक चमचा लाल तिखट टाका. (आवडीप्रमाणे प्रमाण वाढवू शकता तेल आणि तिखट दोन्हीच) लगेच सालासकत बटाट्याच्या फोडी टाका. वाटलेला मसाला टाका. मस्त वास आला की थोड पाणी टाकून उकळा. शिजलेली डाळ आणि मीठ टाका. १० मिनिटे उकळू द्या.
गरम गरम भाता बरोबर लगेच खायला घ्या.

IMG_7793.JPGIMG_7815.JPGIMG_7794.JPG

वाढणी/प्रमाण: 
२-३ माणसांना पुरेल
अधिक टिपा: 

वाट्लेला मसाला थोडा वगळलात तर इतर भाज्यांना पण मस्त लागतो.

माहितीचा स्रोत: 
मावशी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ख्प्पच मस्त!!! तोंपासु. Happy मी एकदा खाल्ली आहे ही आमटी. पण कशी करायची माहित नव्हतं. आता नक्की करणार. फोटो बघून अगदी आत्ता खावीशी वाटत आहे!! Wink

सगळ्यांचे मनापासुन आभार !
आज हाच मसाला वापरून वांग, बटाटा आणि कोवळ्या शेवग्याच्या शेंगा टाकून भाजी केली आहे.
ती पण मस्त वाटते आहे.

आज ही आमटी केली. अख्खे मसूर वापरले. काल रात्री न केल्यामुळे आजपर्यंत त्याला मोड आले. पण अफाट चवदार लागतेय. तेलात किंचित काश्मिरी तिखट पोळवून घातलं. सुंदर रंग आला.

धन्यवाद दीपा!

मस्त,फार छान लागते ही आमटी. आम्ही धने, जिरे पण भाजुन घालतो ह्या आमटीत.
विशेषतःथंडी किंवा पावसाळ्याच्या दिवसात हि आमटी करतात. त्याने (गरम मसाल्याच्या रोजच्या वापराने) सर्दी वैगरे सारखे आजार होत नाहीत म्हणुन

मस्त रेसीपी ! आमच्या घरी या आमटीत धतमाल्म्प, तमालपत्र भाजून घालतात. कधी कधी मोड आलेल्या मेथ्या (चमचाभर ) घालतात! लाल मीरच्या भाजून घालतात, तेव्हा सगळ्या कॉलनीला झकास खण्क उठते!

लसुणही बार्बेक्यु स्टिकला लावुन भाजले की मसाल्याबरोबर कढईत भाजले?
बाकी फारच छान पाकृ आहे. नक्की करुन बघीन.