भरलेले वांगे... सासुबाई श्टाईल!!

Submitted by स्वाती आंजर्लेकर on 28 March, 2012 - 03:11
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

५-६ वांगी
२ मोठे कांदे बारिक चिरुन
१/२ वाटी ओले खोबरे किसुन
लाल तिखट - १ चमचा किंवा चवीनुसार कमी जास्त
हळद
आलं-लसूण पेस्ट
गरम मसाला
धणेजिरे पूड
गूळ
कोकम किंवा चिंच पाण्यात भिजवून
मीठ
सजावटीसाठी कोथिंबीर बारिक चिरुन

क्रमवार पाककृती: 

वांगी धुवुन त्याला दोन + अशा चिरा देउन थोड्या मिठाच्या पाण्यात टाकुन ठेवा. (नायतर काला काला हो जायेगा!!)
गुळ नि कोकम नायतर चिंच अगदी थोड्या पाण्यात भिजवुन घ्या!!
आता कांदा (अगदी बाSSSSSSSरिक चिरुन) ओले खोबरे, चवीनुसार (झणझणीत किंवा कमी) तिखट, हळद, आलं-लसुण पेस्ट, गरम मसाला, धणेजिरे पूड, गूळ-कोकम नि चवीनुसार मीठ घालून एकत्र करा. हातानेच करा... चमचा नक्को!! मन लाऊन अगदी व्यवस्थित चुरुन घ्या!!
नि मग हा मस्साला वांग्यात अगदी ठासून भरा!!
एका कढईत थोडे तेल घालुन वांगी त्यात ठेवा... नि अगदी मंद गॅसवर झाकण लावुन शिजवा. थोड्या वेळाने अलगद दुसर्‍या बाजुने पण शिजवुन घ्या. वरुन सजावटीसाठी कोथिंबीर बारिक चिरुन घाला नि भाकरी नायतर चपातीसोबत वाढा.
Photo-0302.jpg

वाढणी/प्रमाण: 
२-३ जणांसाठी
माहितीचा स्रोत: 
माझ्या सासुबाई!!
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मसाल्याचे वांगे - आवडती भाजी.

मी ही आधी + असा छेद द्यायचे. माझ्या साबांकडून नवीन पद्धत कळली. एका बाजूने आडवा छेद दिला की वांगे उलटे करून त्या बाजुला आधीच्या छेदाच्या काटकोनात दुसरा छेद द्यायचा. अशाने मसाला जास्तीत जास्त भरला जातो वांग्यात. Happy

अहाहा... भाकरीसोबत खायला लई भारी लागत असेल. Happy

<<मी ही आधी + असा छेद द्यायचे. माझ्या साबांकडून नवीन पद्धत कळली. एका बाजूने आडवा छेद दिला की वांगे उलटे करून त्या बाजुला आधीच्या छेदाच्या काटकोनात दुसरा छेद द्यायचा<<
Uhoh निंबुडा चित्रातुन दाखव ना कसा आकार दिसतो तो!

स्वाती, मस्त फोटो! Happy

आता तो फोटो असलेला प्रतिसाद संपादित कर, त्यात आलेली लिंक सिलेक्ट करून कॉपी किंवा कट कर, ही पाककृती संपादित कर आणि लिखाणात जिथे तो फोटो हवा तिथे जाऊन लिंक पेस्ट कर. सेव कर. पाककृतीत फोटो येईल.