चीनमधे कोणे एके काळी एका भिकार्याने कोंबडी चोरली . कोंबडीचा मालक पाठलाग करत असल्याने घाबरुन त्याने कोंबडी नदीकिनारी चिखलात लपवली.संध्याकाळी त्याने शेकोती पेटविली. कुटलीहि साधने नसल्याने त्याने चिखलाने लडबड्लेली कोंबडी जाळावर शिजवली. हे पहीले बेगर चिकन. असे म्हणतात की त्याच वेळी चालालेल्या चीनच्या राजाला ही त्याचा मोह आवरला नाही आणी तो त्या भिकार्याबरोबर चिकन खायला बसला. त्यामुळे त्याला राजेशाही चिकन असेही नाव पडले.
१ कि चीकन.
१०० मिलि राइस वाइन किंवा ब्रँडी
दालचीनी, ओवा, जिरे, मिठ , पांढरी मिरीची पावडर, आल्याचा रस
स्टफींग करता
८/१० काळे मश्रुम्स ( शिटाके)
२/३ कप्स सरसो
१ चमचाकुठलेही तेल
५० ग्रा कुटलाही खीमा
१ जुडी कांदा पात
लाल मिरची
आपल्याला आवडणारा मसाला
५० ग्रा भाजलेले मांस ( ऑप्शनल) डुक्कर, क्रॅब इ
३०० मिली व्हाइट वाइन
क्रस्ट करता
३ मोठी कमळाची पाने
चिनी माती ( पर्यायी घरी करताना आटा सुद्धा वापरता येतो)
१. चिकन स्वछ् करा. फॅट काधुन टाका.
२. आले रसाने साफ करा
३. एका मोठ्या बाउअलमधे वाइन, दालचीनी , चविप्रमाणे मीठ आणी पेपर घ्या
४. ह्या मिश्रणाने सर्व बाजुने चिकन मरीनेट करा आणी मिश्रणात बुदवुन ठेवा. मिश्रण फ्रीजमधे ५/६ तास ठेवा.
५. मश्रुम्स गरम पाण्यात अर्धा तास ठेवा. ते मउ पडल्यावर त्याचे मोठे तुकडे करा
६. सरसो ( मुस्तर्द ग्रीन्स मिळतात) बारीक चीरुन घ्या
७. कढइत तेल गरम करुन त्यात कांदा पर्तुन घ्या, त्यात खिमा, सरसो मश्रुम्स आणी व्हाइट वाइन घालुन आवश्यक चवीप्रमाणे मीठ घाला आणी बाजुला ठेवा
८. मरीनेटेड चिकन घ्या आणी वरील स्टफींगने चीकन स्टुफ्फ करा.
९. कमळपाने ओव्हनमधे ठेवुन मउ करा.
१०. चिकन कमळपानात गुंडाळा. दोर्याने बांधा
११. २ इंच चिकन मातीचा लेप द्या. थोडावेळ सुकल्यावर अतीशय मंद आचेवर ५/६ तास भाजा.
पर्यायाने चीनी माती ऐवजी कमळ पानांवर पार्च्मेंट पेपर बांधुन घ्या आणी घट्ट मैद्याचा त्यावर पाव इंचाचा लेप द्या.
१२. रोस्टीग पॅन मधे चिकन ठेवुन साधारणतः २७५ मधे ४ तास ठेवा
१३. प्रकरण गार झाल्यावर चिनि मातीचे अंडे फोडा कींवा आट्याचे तोडा आणी आतील चिकन बाहेर काढा
१४ त्याचा इतका सुरेख आरोमा पसरतो. चिकन तर इतके छान टेंडर असते की बोन धरल्यावर बोन वेगळे बाहेर पडते.
१५. चिकन आणी स्टफींग वेगळे करा आणी हव्या त्या सॉस बरोबर खा
हुश्श्श .. फोटो फोटो असा आरडा अओरडा करु नये..टकतो पण जरा वेळ लागेल
प्रथम हाँगकाँग मधे एका चीनी मित्रा बरोबर. नंतर सिंगापुर, मलाय मधे बर्याच वेळा. मित्रंबरोबर करण्याचे हि यशस्वी प्रयोग.
मस्त आहे पाकृ! कमळाच्या
मस्त आहे पाकृ! कमळाच्या पानाऐवजी फॉईल चालेल का? की कमळाच्या पानांचा वेगळा स्वाद लागतो हळदीच्या पानांप्रमाणे?
फॉइल पण चालते पण कमळ पाणाचा
फॉइल पण चालते पण कमळ पाणाचा स्वाद हा अप्रतीम.
खरंच वेगळा प्रकार. मागे स्व.
खरंच वेगळा प्रकार. मागे स्व. मोहन गोखले यांनी लोकसत्तामधे लिहिल्याचे आठवतेय.
लेखनात काही लेखनाच्या त्रुटी राहिल्यात. मी त्या माझ्यापरीने सुधारल्यात. हव्या तर आपण त्या कॉपी करु शकता.
----------------------------
लागणारा वेळ:
१० तास
लागणारे जिन्नस:
चीनमधे कोणे एके काळी एका भिकार्याने कोंबडी चोरली . कोंबडीचा मालक पाठलाग करत असल्याने घाबरुन त्याने कोंबडी नदीकिनारी चिखलात लपवली. संध्याकाळी त्याने शेकोटी पेटविली. कुटलीहि साधने नसल्याने त्याने चिखलाने लडबड्लेली कोंबडी जाळावर शिजवली. हे पहीले बेगर चिकन. असे म्हणतात की त्याच वेळी चाललेल्या चीनच्या राजाला ही त्याचा मोह आवरला नाही आणी तो त्या भिकार्याबरोबर चिकन खायला बसला. त्यामुळे त्याला राजेशाही चिकन असेही नाव पडले.
१ कि चिकन.
१०० मिली राइस वाईन किंवा ब्रँडी
दालचिनी, ओवा, जिरे, मिठ , पांढर्या मिरीची पावडर, आल्याचा रस
स्टफींग करता
८/१० काळे मश्रुम्स ( शिटाके)
२/३ कप्स सरसो पाने
१ चमचा कुठलेही तेल
५० ग्रॅम कुठलाही खिमा
१ जुडी कांदा पात
लाल मिरची
आपल्याला आवडणारा मसाला
५० ग्रा भाजलेले मांस ( ऑप्शनल) डुक्कर, क्रॅब ई.
३०० मिली व्हाइट वाईन
क्रस्ट करता
३ मोठी कमळाची पाने
चिनी माती ( पर्याय : घरी करताना आटा सुद्धा वापरता येतो)
क्रमवार पाककृती:
१. चिकन स्वछ् करा. फॅट काढून टाका.
२. आल्याच्या रसाने साफ करा
३. एका मोठ्या बोलमधे वाइन, दालचिनी , चविप्रमाणे मीठ आणि मिरी घ्या
४. ह्या मिश्रणाने सर्व बाजुने चिकन मॅरीनेट करा आणि मिश्रणात बुडवुन ठेवा. मिश्रण फ्रीजमधे ५/६ तास ठेवा.
५. मश्रुम्स गरम पाण्यात अर्धा तास ठेवा. ते मऊ पडल्यावर त्याचे मोठे तुकडे करा
६. सरसो ( मस्टर्ड ग्रीन्स मिळतात) बारीक चिरुन घ्या
७. कढईत तेल गरम करुन त्यात कांदा परतून घ्या, त्यात खिमा, सरसो, मश्रुम्स आणि व्हाइट वाईन घालुन आवश्यक चवीप्रमाणे मीठ घाला आणि बाजुला ठेवा.
८. मॅरीनेटेड चिकन घ्या आणि वरील स्टफींगने चिकन स्टफ करा.
९. कमळपाने ओव्हनमधे ठेवुन मऊ करा.
१०. चिकन कमळपानात गुंडाळा. दोर्याने बांधा
११. चिकनवर २ इंच मातीचा लेप द्या. थोडावेळ सुकल्यावर अतिशय मंद आचेवर ५/६ तास भाजा.
पर्यायाने चीनी माती ऐवजी कमळ पानांवर पार्चमेंट पेपर बांधुन घ्या आणि घट्ट मैद्याचा त्यावर पाव इंचाचा लेप द्या.
१२. रोस्टीग पॅन मधे चिकन ठेवुन साधारणतः २७५ तपमानामधे ४ तास ठेवा
१३. प्रकरण गार झाल्यावर चिनि मातीचे अंडे फोडा किंवा आट्याचे कवच तोडा आणि आतील चिकन बाहेर काढा
१४ त्याचा ईतका सुरेख आरोमा पसरतो. चिकन तर इतके छान टेंडर असते की बोन धरल्यावर बोन वेगळे बाहेर पडते.
१५. चिकन आणि स्टफींग वेगळे करा आणी हव्या त्या सॉस बरोबर खा
हुश्श्श .. फोटो फोटो असा आरडा ओरडा करु नये..टाकतो पण जरा वेळ लागेल
वाढणी/प्रमाण:
४/५ जणांना भात्/पुलाव बरोबर
अधिक टिपा:
प्रथम हाँगकाँग मधे एका चीनी मित्रा बरोबर. नंतर सिंगापुर, मलाय मधे बर्याच वेळा. मित्रांबरोबर करण्याचे हि यशस्वी प्रयोग.
माहितीचा स्रोत:
प्रथम हाँगकाँग मधे एका चीनी मित्रा बरोबर
छान आहे पाककृती. मीना
छान आहे पाककृती. मीना प्रभूंच्या चिनीमाती पुस्तकात ह्याचा उल्लेख होता.
सुपर्ब...
सुपर्ब...
मस्त आहे. आणि त्यामागची कहाणी
मस्त आहे. आणि त्यामागची कहाणी पण मस्त आहे. आणखी येऊ द्यात.
वा गोष्ट आणि रेसिपी दोन्ही
वा गोष्ट आणि रेसिपी दोन्ही छान.
अविनाश, बेगर्स चिकन हे
अविनाश,
बेगर्स चिकन हे नाव आणी ढोबळ रेसीपी काही वर्षांपुर्वी वाचनात आले होते.
आता तुझ्यामुळे त्या आठवणीना परत उजाळा मिळाला.
Masts watatey recipe. Sadhya
Masts watatey recipe. Sadhya karnar nahi pan list war nakki thewen.
आतला मसाला पाहून वाटत नाही
आतला मसाला पाहून वाटत नाही 'बेगर चिकन' असेल म्हणून. (ह. घ्या.)
वाईन, मश्रूम्स वगैरे भारी आहे मसाला. खटपट बरीच दिसतेय. कोणी करून घातली तर खाईन.
भारीये !
भारीये !
तो दुसरा फोटो एकदम टेम्प्टिंग
तो दुसरा फोटो एकदम टेम्प्टिंग आहे
भर्रीच आहे हे प्रकरण!
भर्रीच आहे हे प्रकरण!
जेम्स बाँडची एक कथा वाचताना
जेम्स बाँडची एक कथा वाचताना असल्या पाकृचा उल्लेख वाचलेला. त्याला एका हॉटेलात सेम अशीच म्हणजे मातीत लपेटून भाजलेली आणि मग बॉंडासमोर तो मातीचा गोळा फोडून आतली कोंबडी ही डिश खायला मिळालेली...
बाकी रेसिपी मस्तच...
Sadhana I think you are
Sadhana
I think you are talking about "zero minus ten" of james bond
कोंबडी खटाटोपाची आहे, पण
कोंबडी खटाटोपाची आहे, पण वेगळी पाककृती. करून बघायला हवी.
केले
केले
वा गोष्ट आणि रेसिपी दोन्ही
वा गोष्ट आणि रेसिपी दोन्ही छान.