माझ्या बहिणीचा कर्करोग तिच्या शरिरात हळुहळू पसरायला सुरवात झाली आणि तिला त्याच्या वेदना देखील व्हायला लागल्या आहेत. पेनकिलर जर घेतलेले असले तरच तिला त्या वेदना सुसह्य होतात नाहीतर तळमळत पडत रहावे लागते. पुण्यात रुबी इथे तिने ३ वर्षांपुर्वी 'हरसेप्टीस' नावाची केमोथेरपीची ७ इन्जेक्शने घेतली होती पण ती अयशस्वी ठरलीत. परत कर्करोगाने अंग बाहेर काढले. सुदैवाने ताईचा मुलगा आता पुण्यात बर्यापैकी स्थायिक झाला आहे. त्याची बायको आणि तो दोघेही कमावतात. मला ताईला तिथेच ठेवायचे आहे. इथे एक विचारायचे आहे की शेवटच्या जाण्याच्या त्या काही महिन्यात तिला फार वेदना होऊ नये. तळमळत तिने जगाचा निरोप घेऊ नये. म्हणून पुण्यात काही खास दवाखाने म्हणा वा रग्णांची काळजी घेणार्या संस्था म्हणा, आहेत का? मला त्यांचे पत्ते/फोन नंबर मिळाल्यास मी त्यांच्याशी संपर्क करेन. धन्यवाद.
बहिणीचा कर्करोग
Submitted by हर्ट on 26 March, 2012 - 04:39
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बी.... काळजी घे
बी.... काळजी घे रे.......!!
तू किती आस्थेने विचार करतो आहेस...!! तुझ्या सारखा भाऊ सगळ्यांना मिळो ...!!
तुझ्या ताईला नक्कीच आराम मिळेल !
बेफिकीर....... तुमच्या पोस्टमधली तळमळ बघून खूप छान वाटलं !!
बी, तुमच्या ताईला आराम मिळो,
बी, तुमच्या ताईला आराम मिळो, हीच देवाकडे प्रार्थना !
सिप्ला सेंटर खरंच चांगले
सिप्ला सेंटर खरंच चांगले आहे.
तुझ्या ताईला आराम मिळो हीच प्रार्थना!
बी, वाचून वाईट वाटलं. तुझी
बी,
वाचून वाईट वाटलं. तुझी मानसिक अवस्था समजू शकते. तुझ्या ताईला वेदना होउ नयेत व आराम मिळावा हीच देवाकडे प्रार्थना !
अॅलोपॅथी उपचारा च्या जोडीला
अॅलोपॅथी उपचारा च्या जोडीला आयुर्वेदिक उपचार करावा अस वाटत असेल तर मी http://www.sdfholistic.com/Cancer.html डॉ. व्यंकटेश जोशींच नाव सुचवेन दादर,विलेपार्ले, अंधेरी, बोरीवली व ठाणे पैकी जे तुम्हाला सोईच पडेल तिथे अपॉइण्टमेण्ट घ्या. फोन नं. वेबसाइट वर आहेतच
माझ्या वडलांना किडनी विकारात त्यांच्या औषधाचा खूप फायदा झालाय. विना डायलिसिस क्रिटिनीन लेव्हल ३-४ दरम्यान आहे. हिमोग्लोबिन वाढत वाढत १० ते ११ आलय, दहा किलो वजन भरुन निघालय. एकंदरीत गेले सहा सात महिने घेत आहेत ते औषध लागू पडलय.
शुभकामनां सह
श्रीकांत
जर आपल्याला योग्य वाटले व
जर आपल्याला योग्य वाटले व संकोच (जो मानू नयेत) वाटला नाही तर अवश्य माझ्याकडे ठेवावेत>> बेफिकिर खरचं मलाही अगदी अशोकजींसारखेच म्हणायचे आहे. धन्यवाद! माझ्या ताईच्या मुलाने पुण्यातच घर घेतले. त्यामुळे आता रहाणाचा तिला प्रश्न नाही. घर डीसे. मधे मिळणार आहे. मी तिला आज ह्या धाग्याचा सारांश सांगितला. तिला फार बरे वाटले हे सर्व ऐकून.
सगळ्या मित्रांचे प्रतिसाद वाचले. तुमच्या भरभरुन शुभेच्छांबद्दल सहस्त्रशः धन्यवाद.
बी, आजकाल कोणीही कुणाचे नसते.
बी, आजकाल कोणीही कुणाचे नसते. या गोष्टीचा अनुभव पदोपदी येत असतो. पण तुमच्या सारखा भाऊ तुमच्या बहिणीला मिळाला. हे तिचे भाग्य थोर!.......
तुमची बहिण मनाने खुप खचली आहे का? मला महित आहे असे विचारणे बरोबर नाही, पण आजुबाजुला असे काहि पेंशट पाहीले कि काहि खुप खचलेत तर काहिनी हे आजारपण स्विकारले आहे. तुम्ही तुमच्या बहिणीला बोलते करा....... तिची काय ईच्छा आहे हे समजुन घ्या. तिच्या काय आवडी निवडी आहेत त्या प्रमाणे करा. तिला कुणाची कंपनी आवडते. त्याला तिच्याबरोबर राहावयास सांगा. शक्यतो घरीच ठेवा. दवा़खाने, संस्था यांची माणसे काळजी घेतील, पण त्याबरोबर आपले आवडते माणुस बरोबर असेल तर पेशंटला बराच मानसीक आधार मिळेल. अशा आधाराची आवशक्यता अधीक भासते. मुख्य म्हणजे तो पेशंट आहे असे त्याला सतत जाणुन देउ नका. घरातले वातावरण नेहमी सारखे ठेवा. हसत खेळत ठेवा. कुणाचा वाढदिवस, सणवार आले तर अवश्य करा. आपल्याकडे बरीच लोक भेटायला येतात. आले कि खुप गंभीर पणे आणी फक्त आजारपणावरच बोलतात. तेव्हा येणार्यांना असे न बोलण्याची विनंती करावी.
अजुन काय लिहीणार? तुमच्या ताईला आराम मिळावा हीच प्रार्थना!
मी वर लिहीले कि कुणी कुणाचे नसते... पण बेफिकीर सारखी माणसे ही या जगात आहेत तर!!!!!!!!!
बी काय लिहू कळत नाहीये. पण
बी काय लिहू कळत नाहीये. पण तुझं कौतूक जरूर वाटतय. तू तुला मूर्ख वगैरे म्ह्णणार्यांकडे दुर्लक्ष कर. तुझ्या ताईला आराम मिळो हीच प्रार्थना. विद्या म्हणते तशी ताई मनाने खचली असेल तर तिला जास्तीतजास्त मानसीक बळ कसं मिळेल ते बघ. बोलणं खूप सोपं आहे आणि करणं खूप कठीण. मला याचा चांगलाच अनुभव आहे. पण तरी जितकी आनंदी मनस्थिती तितका कमी त्रास असच सगळे डॉ. पण सांगतात. काळ्जी घे ताई ची आणि तुझी पण.
बी -तुमच्या ताईच्या वेदना कमी
बी -तुमच्या ताईच्या वेदना कमी होवोत व त्यांना आराम पडो ही देवापाशी मी व माझी पत्नी प्रार्थना करतो . आजच्या आमच्या शुभंकरोतीत आम्ही हेच मागितले.
तुमच्या ताईला आराम पडो ही
तुमच्या ताईला आराम पडो ही देवापाशी प्रार्थना ..
मूर्ख वगैरे>>>.. माझ्या अमेरिकन गाईड ने मला सांगितलेली गोष्ट इथे नक्की सांगावीशी वाटते..ते म्हणाले " काही गोष्टी परत कधीच करता येत नाही.. ती वेळ/ चान्स एकदाच मिळतो .. तेव्हा जे आतून मनातून वाटतंय ते नक्की करा.. विचार करण्यात वेळ घालवू नये अशा वेळेस.. कारण ती व्यक्ती तर निघून जाईल पण स्वतःच मन खात राहील.. त्या जानिवेसकट उर्वरित आयुष्य काढता येणार आहे का ..उत्तर 'नाही' असं येत असेल तर ह्या क्षणी चालायला लाग.. " ह्या एका सल्ल्यासाठी मी त्यांची नेहमी करता ऋणी आहे कारण मला एकदाच चान्स मिळाला
बी, तुमच्या ताईला आराम मिळो
बी, तुमच्या ताईला आराम मिळो ही देवाकडे प्रार्थना..
धन्यवाद माझ्या सर्व सर्व
धन्यवाद माझ्या सर्व सर्व मित्रांचे. मागे जेंव्हा पहिल्यांदा ताईच्या आजाराबद्दल मी इथे लिहिले होते तेंव्हा अनेक मित्रांनी शुभेच्छा दिल्या होत्या ताईला. त्याला आता ३ वर्ष झालीत. तुमच्या शुभेच्छांनी माझ्या ताईची वृद्धी वाढली असे मी मानतो. आता ह्या नवीन शुभेच्छांनी परत ताईला ह्यातून सुखकर मार्ग मिळो. तिचे सगळे स्वप्न साकार होवोत. ती ह्या वेदनातून, ह्या आजारातून बाहेर पडो.
रेव्यू.. thats so kind of you indeed. thanks a lot.
तुमच्या ताईला लवकर आराम
तुमच्या ताईला लवकर आराम पडो... तुम्हीही स्वतःला योग्य वाटेल तेच करालच... शुभेच्छा !!
कॅन्सरवर नॅचरल उपचाराची एक
कॅन्सरवर नॅचरल उपचाराची एक सुरेख साइट आहे,ती सर्वांनी वाचावी.बीला पण मी ही साईट पाठ्वली आहे.www.healing cancer naturally.com/budwig protocol.html.ही ती साईट आहे.त्यातल्या ज्या सब साइट्स आहेत त्याही वाचाव्यात्.त्यात आपण किती चुकीचा आहार घेत आहोत, व गंभीर आजार टाळण्यासाठी काय केले पाहिजेत अश्या सोप्या सुचनाही आहेत.
समई हो ती साईट खरच फार फार
समई हो ती साईट खरच फार फार छान आहे. सर्वांनी वाचावी अशी. धन्यवाद समई.
माझ्या चुलत भावाला ७
माझ्या चुलत भावाला ७ वर्षापूर्वी याच सर्वातुन जावे लागले होते.
तेव्हा आम्ही शशी कपूर चे फाऊन्डेशन आहे केअर इन्डिया नावाचे त्यांची मदत घेतली होती..
त्याचे डॉ स्वतः घरी येउन जायचे ..औषधे द्यायचे.. पेशण्ट शी गप्पा मारुन त्यांची काही ईच्छा असेल तर पूर्ण करायचे.. खूप चांगला अनुभव होता..त्याचा शेवट त्या मानाने खूपच शांत आणि वेदना रहित झाला.
तर त्यांचे डिटेल्स..
केअर इन्डिया
ऑफिस पुण्यात भवानी पेठेत आहे
तेव्हा तरी आमच्या कडे एक डॉ आहुजा म्हणुन यायचे..आता कोण आहेत बघावे लागेल
26442861 / CareIndia Bhavani Peth
26441808 : Satseva
हे नंबर आहेत.. सत्सेवा त्यांचेच आहे..
फोन करुन बघा..तुम्हाला शुभेच्छा!!
बी,तुमच्या ताईला लवकर आराम
बी,तुमच्या ताईला लवकर आराम पडो ही देवाकडे प्रार्थना.
बी, काय लिहू कळत नाहिये. जे
बी, काय लिहू कळत नाहिये. जे काही घडत जाईल त्याला धीराने सामोरे जा इतकंच म्हणेन. ताईच्या वेदना कमी होवोत.
बी, आपल्या व कुटुंबियांवर
बी,
आपल्या व कुटुंबियांवर आलेल्या आपत्तीस सहवेदना दर्शवितो. तुम्ही अत्यंत सेन्सिबल प्रश्न भावनाविवश न होता मांडला आहात.
वरदाताईंनी दिलेली माहिती योग्य व उपयुक्त आहे.
***
यानिमित्ताने काही मनात आले ते तुमची परवानगी गृहित धरून इथे मांडू इच्छितो.
खरे तर या प्रकारचा प्रश्न उद्भवू नयेच मुळात.
आपल्या देशात डॉक्टर हा प्राणी निदान व उपचार करण्यात इतका बुडालेला असतो, की त्याला टर्मिनल्/डिसेबल्ड(असाध्य/अपंग) केसेस(रुग्णां)मधे 'काऊन्सेलिंग'(समुपदेशन) करायला वेळच नसतो. खरं तर तुमच्या रुग्णाचे निदान 'असाध्य' असे होताच, पुढे अशी वेळ येईल की अगदी नर्कोटिक अॅनाल्जेसिक्स ही द्यावी लागू शकतील, व त्यासाठी अमुक ठिकाणी अमुक सोयी आहेत इ. व अशी माहिती तुम्हाला दिली जायला हवी होती.
पण,आपल्या देशात कोणत्याच गोष्टीचे प्रोटोकॉल्स ठरलेले नाहीत. सगळ्या डॉक्टरांनाही असली माहीती असतेच असे नाही.
तुला AIDS झाला आहे, किंवा तुम्हाला कॅन्सर आहे, व या प्रकारचा कॅन्सर झाल्यास सुमारे २ वर्षात तुम्ही तुमचे निजधामास जाणार आहात, असल्या गोष्टी पेशंटास कोणत्या प्रकारे सांगाव्यात याचा 'प्रोटोकॉल' प्रगत देशांत असतो.
कुणी मला सांगितले की मला या आजाराने अमुक वर्षांत मरण येणार, तर माझी मानसिक प्रतिक्रिया काय असते? व त्यानुसार सांगणार्याने काय करावे याच्या सुस्पष्ट 'गाईडलाईन्स'(मार्गदर्शक मुद्दे?) पाश्चात्य देशांतील वैद्यक व्यावसायिकांस या प्रोटॉकॉलमधे उपलब्ध आहेत. (On being informed I go through Denial, Anger, Sorrow, Acceptance. अश्या पायर्यातून माणूस जातो, तेव्हा त्याबद्दल काय करावे? त्याला अॅक्सेप्टन्स पर्यंत वेदनारहीतरित्या कसे पोहोचवावे? त्याचे उर्वरित आयुष्य सुखकर कसे करावे?इ.)
आपल्या देशात कदाचित १३० कोटी जीव वळवळताहेत म्हणून आपण या बाबतींत इतके उदासीन आहोत काय? की इतक्या आवश्यक मानवी गरजा कश्या हाताळाव्या या बद्दल किमान सामायिक तत्वे तयार करून आपण ती वापरात आणू शकत नाही? (श्या! मराठी गंडलं शेवटी बहुतेक.. Just because we have 130+ crors humans living here, we value human life as worthless?? Why we are so callous about simple things like formulating such simple yet vital guidelines that can be implemented everywhere for everyone, and allliviate human suffering?.. for not just net savvy maayboli users but EVERYONE?)
आता ह्या नवीन शुभेच्छांनी परत
आता ह्या नवीन शुभेच्छांनी परत ताईला ह्यातून सुखकर मार्ग मिळो. तिचे सगळे स्वप्न साकार होवोत. ती ह्या वेदनातून, ह्या आजारातून बाहेर पडो. >> हीच देवाकडे प्रार्थना..
बी, तुम्हा सर्वांना ह्या
बी, तुम्हा सर्वांना ह्या काळातून जायची देव शक्ती देवो!
Pages