१) प्रथम कैर्यांचा सुगंध घेत घेत कैर्यांची साले सुरीने काढा. छोट्या कैर्या असल्यास त्याचे दोन भाग करून कोय काढून टाका. बाठेवाल्या असल्यास तशाच किसण्यासाठी ठेवा, किसुन झाल्यावर बाठे टाकता येतात.
२) आता कापलेल्या कैर्या किसून घ्या. ही प्रक्रिया करताना तोंडाला पाणी सुटणे, लहान मुलांनी मध्येच कैर्या पळवणे असे प्रकार होऊ शकतात. अगदीच अनावर झाल्यास एखादा तुकडा तोंडात टाका.
३) किसामध्ये मिठ, मसाला, साखर टाकुन एक चमचा कच्च्या तेलाची धार सोडा (कच्च्या तेलाची म्हणजे न तापवता वगैरे). हा किस हाताने एकजीव करा म्हणजे तुमच्या हाताची चवही त्याला येईल. पण न राहवून बोटे तोंडात जाणार नाहीत याची काळजी घ्या धिर असेल तर थोडा वेळ मुरवत ठेवा म्हणजे पाणी सुटेल आणि रसाळ लज्जतदार, मसालेदार कोशिंबीर तयार होईल.
हा मी अधीरपणाने न मुरवाता काढलेला तयार कोशिंबीरीचा फोटो.
अधीरपणाने काढण्याचे कारण ह्या फोटोवरून समजेलच आमची बच्चेकंपनी मुरायच्या अधीच तुटून पडली होती कोशिंबीरीवर.
विशेष टिप म्हणजे मुलांना आधी सांगूच नका हा प्रकार करणार आहात नाहीतर तुमच्या पाककृतीत मध्ये मध्ये अडथळे येतील मुलेच काय काही मोठी माणसेही अडथळा आणतात घाई करुन.
जर साखर मिठाचे प्रमाण कमी वाटले तर नंतर थोडे टाकावे.
मसाला असला तरी हा प्रकार मुले आवडीने खातात.
तेल आवडत नसल्यास नाही टाकले तरी चालेल.
लाल तिखट असल्यास पाव चमचा पुरे.
मला वाचतानाच तोंपासु झाले...
मला वाचतानाच तोंपासु झाले...
आता कधी करतेय असे झाले.
छान
छान
मस्त्.आंबटगोड चव..
मस्त्.आंबटगोड चव..
छान आहे हा प्रकार. आता
छान आहे हा प्रकार. आता आमच्याकडचा आंब्याचा पण सिझन संपला !
फोटो पाहूनच लाळ टपकली आम्ही
फोटो पाहूनच लाळ टपकली
आम्ही साखर नाही घालत ह्यात.... मे महिन्याच्या सुट्टीत आजोळी जायचो तेव्हा सकाळी दूध पिऊन झाल्यावर आमराईत जाऊन प्रत्येकी एक अशी कैरी तोडून आणायची आणि हे लोणचं आपलं आपलं ताजं ताजं करायचं आणि न्याहरीला मऊभाताबरोबर ओरपायचं असा रोजचा कार्यक्रम असायचा. चवीला म्हणून बहिणीचं, भावाचं लोणचं घेऊन चाखून बघायचं आणि मग तू जास्त घेतलंस, माझं लोणचं संपवलंस असं भांडत भांडत लोणच्याची खुमारी वाढवायची... मस्त दिवस होते ते!
फोटो पाहूनच लाळ टपकली<<
फोटो पाहूनच लाळ टपकली<< +१
मस्त अगदी तोंपासु
स्लर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्
स्लर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्प
तोंपासु!!!!!
तोंपासु!!!!!
अम्म्म्म्म्म्म्म्म...... मस्त
अम्म्म्म्म्म्म्म्म...... मस्त आंबट चिंबट चव ... फोटो बघुनच.... लागला
मसाला म्हणजे कुठला मसाला? लोणच्याचा का? की नुसते लाल तिखट??
साधना तुझ्याकडे पण खायला येते
साधना तुझ्याकडे पण खायला येते ग.
सुलेखा, रानडुक्कर, मयुरी,टोकुरिका धन्यवाद.
दिनेशदा काय हे ?
मंजुडी
अरुंधती धन्स. लाजो अग रोजच्या
अरुंधती धन्स.
लाजो अग रोजच्या वापरातला मसाला. मिरची पुड असेल तर कमी टाकायची.
नाव वाचूनच तोंपासु झाले.. आणी
नाव वाचूनच तोंपासु झाले..
आणी मग फोटो- किलिंग..
रेसिपी..खूप मस्त...
निषेधार्ह धागा आहे असली
निषेधार्ह धागा आहे
असली चित्रे पाहून समाजात हिंसाचार बोकाळू शकतो
तोंड चाळवणे व तडफडवणे या कलम १०२ व २०२ खाली आपल्याला रुपये पाचशेचा दंड ठोठावण्यात येत आहे
ओके जागू आमचा आंब्याचा
ओके जागू आमचा आंब्याचा सिझन संपला पण कधी कधी एशियन शॉप्समधे थायलंड वगैरेहून आलेल्या कैर्या मिळतात... आंबट नसतात एव्हढ्या पण तरीही... करून बघेन
डब्बल पोस्ट
डब्बल पोस्ट
बाहेरुन नुस्ते नाव वाचुनच
बाहेरुन नुस्ते नाव वाचुनच
जागुतै.. दुष्ट आहेस
जागुतै.. दुष्ट आहेस अगदी..
किती तो दुसर्यांवर अत्याचार करावा म्हणते मी...
पहिला फोटो बघुनच मी गार.. तोंपासु कैर्या
वर्षु, चातक धन्यवाद. बेफीकीर
वर्षु, चातक धन्यवाद.
बेफीकीर वकिलाच्या बायकोकडूनच काय दंड मागताय
लाजो अग आंबट नसतील तर साखर कमी घालायची.
चिउ :स्मितः गरम हो.
देशात नसल्याचा सगळ्यात मोठा
देशात नसल्याचा सगळ्यात मोठा त्रास मला होतो तो एकदा कैर्या बाजारात यायला लागल्या की.....आणि मग पुढे हापूस पहिल्या पावसाची सर निघून जाईपर्यंत दिसेनासा होईस्तो..त्यामुळे या अत्यंत सुंदर रेसिपीसाठी स्वतःचाच निषेध करायला हवा...बघुया आता आपल्या स्टाइलच्या कैर्या आंबे खायला कधी मिळणारेत ते...
मस्त रेसिपी एकदम बालपणात घेऊन जाणारी....
जागु मस्तच तोंपासु
जागु मस्तच तोंपासु
नुतन धन्स. वेळकाढू तुमची
नुतन धन्स.
वेळकाढू तुमची इच्छा लवकरच पुरी होवो. धन्स.
मंजू, आम्ही पण लहानपणी सेम
मंजू, आम्ही पण लहानपणी सेम असंच करायचो.
खरंच पाणी सुटलं तोंडाला
खरंच पाणी सुटलं तोंडाला
चटकदार पाककृती चटकदार लेखन
चटकदार पाककृती चटकदार लेखन मस्त ! अगदी तोंपासु
तोंपासु! जागुतै नेहमीप्रमाणे
तोंपासु! जागुतै नेहमीप्रमाणे रॉक्स!
आजच कै री आणायला हव्वीच
आजच कै री आणायला हव्वीच जागूली, मस्त कोशि. आम्ही पण लहान्पणी कैरी बारीक चिरून ति.मि. घालून खायचो.. :लाळ टपकणारी भावली:
ललिता, जयश्री, अवल, वत्सला,
ललिता, जयश्री, अवल, वत्सला, अनघा धन्यवाद.
कैरी म्हणजे बालपणीची आठवणच नाही का सगळ्यांची.
तिकडे भरवाँ करेला करताना थोडे
तिकडे भरवाँ करेला करताना थोडे कैरीचे तुकडे नकळत बाजुला काढले गेलेच. मग मीठ, तिखट घालून थोडे मुरवले आनि दिवसभर एक एक फोडीचा चट्टा-मट्टा केला.
आजच ही रेशिपी केल्या जाइल
आजच ही रेशिपी केल्या जाइल
निंबे सुकवून पण मस्त लागतात,
निंबे सुकवून पण मस्त लागतात, अर्धवट सुकलेले एकदम तोपासु.
प्रित फोटो पण टाक ग इथे.
Pages