रहस्यमय कादंबरी मायबोलीवर क्रमश: येत आहे..
बोगोर बुदुर भाग १
http://www.maayboli.com/node/33713
बोगोर बुदुर भाग २
http://www.maayboli.com/node/33715
बोगोर बुदुर भाग ३
http://www.maayboli.com/node/33716
बोगोर बुदुर भाग 4
http://www.maayboli.com/node/33727
बोगोर बुदुर .. भाग ५
http://www.maayboli.com/node/33728
बोगोर बुदुर भाग ६
http://www.maayboli.com/node/33730
माझ्या दोन कथा मायबोली वर आहेत. वाचुन अभिप्राय द्यावा ही विनंती. लिंकस खालील प्रमाणे, कथा “सवत माझी लाडकी”
http://www.maayboli.com/node/33497
कथा विश्वास
http://www.maayboli.com/node/33369
--१३--
समीर वेषभुषा बदलण्यात पारंगत होता. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो टपोरी वेष करुन नालासोपाराला गेला. कात्रीच्या चाळीच्या आजुबाजुला त्याने चॊकशा केल्या. शेवटी त्याला एक देशी दारुचा बार दिसला. आत जाउन तो जरा जोरातच एका टेबलावर बसला. नवखा माणुस पाहील्यावर शांतता पसरली.
" काय राव वाट चुकला काय? " टेबलावर ग्लास आपटत मालकाने विचारले.
" नाही वाट शोधत आलोय "
" अस्स पण इकडच्या वाटा जरा डेंजरस आहेत " मालक कुत्सितपणे बोलला
समीरने मालकाचा टेबलावर असलेला हात जोरात पिरगळल. मालकाने बोंबडी ठोकली. ४/५ गिर्हाइक समीरच्या अंगावर धावुन येताच समीरने खीशातुन रामपुरि मालकाच्या गळ्याला लावला
" शेळपटांनो या ! ह्याला अडवा करतो. आणी मग भडव्यांनो तुमच्याकडे बगतो. आयला पाहुण्याशी वागायची ही काय तर्हा? "
मालकाचा हात सोडुन त्याला खुर्चीत कोंबत समीर म्हणला
" आणी अकलेच्या कांद्या तु या शेराशी पंगा घेतोस? "
मालक अजुन हातच चोळत होता
" बोल तो कात्री कुठाय? हराम माझे २५००० घेउन पळाला आहे. "
" काहीतरी चुकतय साहेब." मालक आता साहेब नावावर आला होता
"कात्रीने कुणाचे पैसे कधी बुडवले नाहीत. ऊलट त्यानेच बऱ्याच जणांना मदत केली आहे. "
" म्हणजे बरे पैसे मिळवायचा का?"
" असे प्रश्न इथे कुणी विचारत नाही"
" मग माझे पैसे कसे बुडवले. तीन दिवसापुर्वी देतो म्हणला आणी अजुन थोबाड दाखवत नाही "
" कसे दाखवणार ? पोलीसांनी त्याला उचलला नव्ह "
" काय भानगड केली?"
" काय त्याचा मालकाच्या भानगडी आणी हा गेलाय सतराच्या भावात "
समीर अर्धा पाउण तास गप्पा मारुन बाहेर पडला. बऱ्यापैकी अंधार पडला होता.
--१४--
चाळीत शिरुन त्याने तारीची खोली शोधली. कुलुप तर त्याच्यापुढे टीकतच नसे. आत शिरुन त्याने दार आतुन लावुन घेतले. खिशातुन टॉर्च काढुन त्या प्रकाशात तो शोधु लागला. खोलीत कुबट वास येत होता. भांडी अस्ताव्यस्त पसरलेली होती. कपड्यांचे बोळे इकडे तिकडे पसरले होते. गादी वरचे शीट खालीच पडले होते. गादीखाली ३/४ खास अश्लील मासिके होती.
समीरला गादीत काहीतरी कडक लागले. समीरने गादी उलटी केली. मागचा भाग चाकुने उघडला. गादीत दोन लाख रुपये लपवले होते. म्हणजे तारीला पैशाची कमतरता नव्हतीच. पण इतकी रक्कम आली कोठुन हा प्रश्न होताच. समीरने ते पैसे सरळ खिशात घातले. अशा कृत्यात तो पापपुण्य मानत नव्हता.
शोधता शोधता त्याला छोट्या कपाटावर ३ ईंच उंचीची एक गणपतीची मुर्ती दिसली. मुर्ती धातुची होती. कुठला धातु हे बॅटरीच्या प्रकाशात कळणे अशक्य होते. मुर्ती वेगळीच दिसत होती. मुर्तीही समीरच्या खीशात गेली. बाकी फारसे काही दिसले नाही. दार उघडुन बाहेरचा त्याने कानोसा घेतला. आणी परत कुलुप लावुन तो चालत चालत गडीपाशी आला.
समीर घरी पोहोचला तेंव्हा रात्र चांगलीच पडली होती. तानाजीला त्याने मुर्ती फ्रेश करायला दिली आणी स्वत: फ्रेश होउन तो स्टडीत बसला. विचार करायची ती त्याची आवडती जागा होती. विविध विषयांवरील पुस्तकांनी खोली भरलेली होती. खोलीच्या बाहेरचा लाल दिवा चालु असला तर तानाजीसुद्धा आत येत नसे.
विचारात असताना तानाजी चकचकीत मुर्ती घेउन आला. तानाजीला त्याने मुर्तीचे सर्व बाजुने डिजीटल फोटो काढुन त्याच्या कंप्युटरवर अपलोड करायला सांगीतले. त्याने गुगलवर गणपतीच्या इमेजेस सर्च केल्या. त्याला कुठलाही साजेसा फोटो मिळाला नाही. कंटाळुन शेवटी तो झोपी गेला.
सकाळी त्याने जशची संचालकांची यादी चाळली. अतुल साने आणी मीना थोडानीला तो ओळखत होता. त्याने दोघांना फोन करायचे ठरवले.
" हाय मीनु!! समीर बोलतोय"
" मी स्वप्नात तर नाहीना "
" चल ग अजुन तुझी झोपायची वेळ झाली नाही."
" कैसे याद कीया ?"
" तु त्या जशच्या बोर्डवर आहेस ?"
" हो"
" कसा चालतोय कारभार?"
" मला काय माहीत? शहाने सांगितले म्हणुन मी ३० लाख गुंतवले. दरवर्षी २० लाखाच्या आसपास उत्पन्न मिळते"
" एवढे कस काय ?"
" मुझे आम खानेसे मतलब, मै पेड क्युं गिनु ?"
" हो आणी तुला गिनती येते कुठे ?"
" समीर ..."
"पण आता शहा तर नाही"
थोडावेळ गप्प मारुन त्याने फोन ठेउन दिला. इतका फायदा देणारा धंदा असावा हाचे त्याला आश्चर्य वाटत होते. त्याने सानेशी बोलायचे ठरवले.
" काय सानेसाहेब ?"
" समीर ? काय विशेष? "
" तु जशच्या बोर्डवर आहेस ? "
" हो "
" कंपनी इन्वेस्ट्मेंटवर चांगले रिटर्नस देतीय म्हणे?"
" हो मी ५० लाख गुंतवले होते आणी ४ वर्षात मला दिड कोटी तरी मिळाले आहेत. चांगला आहे"
" पण इतके रिटर्न्स देणे कसे काय परवडते ?"
" अरे कॅपीटल तसे कमी आहे. आणी इंम्पोर्ट एक्स्पोर्ट छान चालतो"
" कोण बघत सगळ ?"
" माखानी "
" जरा बघ. दुपारी भेटु. अस कर ना. १ वा लॅंड्स एंडला लंच घेउ आणी ३ वाजता जशच्या ऑफीसला जाउ"
दुपारी जशच्या ऑफीसमधे दोघे पोहोचले.
रिसेप्शनमधेच एक गणपतीची मुर्ती होती. समीरला तारीकडे सापडलेल्या मुर्तीची ती हुबेहुब प्रतीकृती होती. फक्त तारीची ३ इंच उंचीची होति तर ही अडीच फुटाची होती. माखानी त्यांची वाटच पहात होता. केबीनमधे सोनलही होती.
" काय साने ? आज कोण पाहुणा आणलात ?"
" माझा मित्र आहे . समीर पटेल . गडगंज श्रीमंती आहे. त्याला आपल्या कंपनीत गुंतवणुक करण्याची इच्छा होती. "
" काय पटेल साहेब. एकदम अचानक ?"
" अहो गेले दोन तीन दिवस तुमच्या कंपनीचे नाव वृत्तपत्रात झळकतेय. मला आठवले कि साने आणी मीना तुमच्या बोर्डवर आहेत. त्यांच्याशी बोलताना मला गुंतवणुक करावीशी वाटली "
" बरोबर आहे. शहा सगळ बघत होते. ते गेल्यामुळे आता सगळच गोंधळाचे झाले आहे. आणी आता नवीन गुंतवणुक तर आम्ही बंदच केली आहे."
" सर्व?"
" हो आता कुठल विस्तार करायचा ठरल तर विचार करु. तुमचे नाव लक्शात ठेउ. " माखानी त्यांना कटवायला बघत होते.
" माखानी साहेब तुम्ही बरेच बीझी दिसताय. मला एकच सांगा रिसेप्शन मधला गणपती कुठला आहे " माखानी जरा गोंधळल्या सारखे वाटले.
" गणपती ? काही कल्पना नाही बुआ. बरेच दिवस तो आहे. "
" ठीक आहे. निघतो आता. "
माखानीनी गणपतीचा विषय का टाळावा हे त्याच्या लक्षात आले नाही.
कुणाल, सोनल व मेरी ह्या पात्रांना तर त्याला गाठायचेच होते. तारीचीही एकदा भेट घ्याअची होती. आणी शक्यतो राणेंच्या लक्षात येउ न देता करायचे होते. कुणाल ते सोनल आणी सोनल ते मेरी जाणे त्याला शक्य होते. पण कुणालला कसे गाठायचे हा तसा प्रश्नच होता. जश मधुन बाहेर पडल्यावर तो सहज राणेंच्या ऑफीसमधे डोकावला. राणे जागेवरच होते. समोर कुणीतरी तरुण होता.
" काय समीर काय खबरबात ? अरे हो तुझी ओळख करुन देतो. हा कुणाल, खबरचा वार्ताहर. आणी कुणाल हा समीर. समीर पटेल. "
" म्हणजे शहांची बातमी देणारा का काय ? "
" हो तोच तो. कुणाल, समीरची ओळख करुन देण अवघड आहे. पण तुला एकच सांगतो, कुठल्याही अडचण आली तर त्याचा दरवाजा तु कधीही ठोठवु शकतोस. कसल्याही प्रसंगातुन बाहेर काढण्याची त्याची ताकद आहे आणी हिम्मतही. :"
" या कुणालराव एकदा गप्प मारायला. बायकोसकट या. बायको नसली तर मैत्रीणीला घेउन ये "
अरे वा! लगेच ६ वा भाग
अरे वा! लगेच ६ वा भाग आला.
कथेचा वेग छान आहे आणि लिखाणही.
पण भाग छोटे होताहेत, जरा मोठे भाग टाका.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बोगोर बुदुर चा मुळ अर्थ
बोगोर बुदुर चा मुळ अर्थ सांगा...
माझा एक प्रयत्न बोगोर :
माझा एक प्रयत्न
बोगोर : समांतर नदी काठामधील जमीन वा बेट.
बुदुर : पूर्णिमा...
संदर्भ : मुंबई बेटावरच्या एका पूनवेच्या दिवशी झालेली ही घटना...
अर्थात हे माझे अनुमान आहे. बाकी कथा रंगात आलीय...
कथा आवडली.
कथा आवडली.
खूप खूप आवडत चालली आहे कथा.
खूप खूप आवडत चालली आहे कथा. मस्त वेग आहे - मागचा दूवा विसरण्यापूर्वीच नवा दूवा येतो - त्यामुळे वाचण्यातला रस टिकून राहतो.
अमी
आवडली
आवडली
६ ही भाग वाचले. मस्त
६ ही भाग वाचले. मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त.. आवडले , सगळे भाग
मस्त.. आवडले , सगळे भाग वाचले.
अजून किती भाग अन केव्हा टाकणार? शक्य तेवढ्या लवकर टाका. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान आहे ! ..
छान आहे ! ..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त आहे.
मस्त आहे.
सर्व भाग मस्त जमले आहेत. all
सर्व भाग मस्त जमले आहेत. all Vachya.
६ ही भाग एकदम वाचले. मस्त पकड
६ ही भाग एकदम वाचले. मस्त पकड घेतेय गोष्ट .....
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पु. ले.शु.
लवकर लवकर येऊद्यात पुढील भाग![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)