विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन - प्रकरण 7
ईश्वरवाद्यांची ‘अंधश्रद्धा’ आणि बुद्धिवाद्यांचा ‘डोळसपणा’
ज्ञान तपस्वी प्रा. अद्वयानंद गळतगे ब्लॉग वरून
बुद्धिवाद्यांच्या दृष्टीने कोणत्याही गोष्टीवर पुराव्याशिवाय विश्वास ठेवणे ही अंधश्रद्धा ठरते. पुराव्याशिवाय केले जाणारे सर्व व्यवहार हेही बुद्दिवाद्यांच्या दृष्टीने अंधश्रद्धेत मोडतात, हे अर्थातच निराळे सांगण्याची आवश्यकता नाही. स्वाभाविकच बुद्धिवादी कोणताही व्यवहार पुराव्याशिवाय करीत नाहीत, असे मानणे चुकीचे ठरणार नाही.
या दृष्टीने पाहिले तर खरे बुद्धिवादी या जगात फक्त संन्यासी किंवा अध्यात्मवादी ठरतात. कारण प्रपंच दुखःदायक आहे याविषयी इतके पुरावे आहेत की त्याच्याकडे डोळेझाक करून प्रपंचात पडणे ही स्वतःच्या बुद्धिशी प्रतारणा आहे, हे ओळखून ते प्रपंचात पडत नाहीत. आणि पडले तरी ते प्रपंचाविषयी उदासीन राहून अनासक्त वृत्तीने जगतात. पण या लोकांना कोणी बुद्धिवादी म्हणत नाहीत आणि ज्यांना बुद्धिवादी म्हणतात, ते तर प्रपंचाचा त्याग करायला कधीच सांगत नाहीत, उलट प्रपंचात पडून त्यातील सुखांचा आंधळेपणाने ( म्हणजे प्रपंचातील दुःखाकडे डोळेझाक करून) उपभोग घ्यायला सांगतात. साहजिकच, ज्याला बुद्धिवाद म्हणून संबोधण्यात येते, तो खऱ्या अर्थाने बुद्धिवाद नाही, हे उघड आहे. तसेच ज्याला ‘डोळसपणा’ म्हणतात, तो खऱ्या अर्थाने अध्यात्मवाद्यांजवळ आहे, तथाकथित बुद्धिवाद्यांजवळ नाही हे ही उघड आहे[1].
कदाचित प्रपंचात पडून मर्यादित अर्थाने बुद्धिवादी बनून जगावे असे बुद्धिवाद्यांना म्हणायचे असावे. पण या मर्यादित अर्थाने तरी बुद्धिवादी बनून जगता येते का? म्हणजे पुराव्याशिवाय व्यवहार करायचा नाही, असे ठरवून प्रपंचात जगता येते काय? पुराव्याशिवाय कोणताही व्यवहार करणे हा धोका आहे, या दृष्टीकोनाला ‘संशयवाद’ म्हणतात. म्हणून प्रश्न असा आहे की संशयवादी बनून जीवन जगता येते काय?
याप्रश्नाच्या उत्तरासाठी प्रपंचात पडण्याचेच उदाहरण घेऊ. ज्या मुलीशी (किंवा मुलाशी) आपण लग्न करायचे ठरवतो, त्या मुलीमुळे (अगर मुलामुळे) आपण प्रपंचात सुखी होऊ काय, याविषयी आपण कधी पुरावे शोधतो काय? (पुरावे सापडतात काय हा प्रश्न बाजूला ठेवू) उलट या बाबतीत पुरावे शोधणे किंवा संशयीवृत्तीने (धोका आहे असे समजून) लग्न करणे हाच निर्बुद्धपणा आहे, असे आपण मानतो. कारण प्रेमात पडणे हे बुद्धिवादाचे (चिकित्सकपणाचे, संशयवृत्तीचे) काम नसून भावनेचे (आंधळेपणाचे) काम आहे असे आपण मानतो. प्रेम आंधळे असते (किंवा आंधळे प्रेम खरे असते) हा आपला याविषयीचा सिद्धांत प्रसिद्धच आहे! अशा रितीने मनुष्याला ज्याच्या शिवाय प्रपंचात जगताच येत नाही, त्या प्रेमासारख्या महत्वाच्या विषयातच बुद्धिवाद (संशयवाद) निरुपयोगीच नव्हे, तर अडचणीचा ठरतो.[2]
हीच गोष्ट नित्याच्या व्यवहाराच्या बाबतीतही खरी आहे. आपण आपले नेहमीचे जे जीवन जगतो, ते जवळ जवळ पुर्णपणे श्रद्धेने जगतो (या श्रद्धेचे समर्थन आपण 99टक्के अपघात होत नाहीत किंवा घटस्फोट घ्यावा लागत नाही, या आपल्या अनुभवाच्या आधारे केले तरी ती शेवटी श्रद्धाच असते) अशा रितीने पुराव्याशिवाय विश्वास ठेऊन चालण्याच्या या आपल्या वागणुकीला कोणी अंधश्रद्धा म्हटले तर मात्र आपण हा आरोप तात्काळ ठोकरून लावू. पण पुरावे नसताना जीवन जगण्याचे जीवनातील असंख्य गोष्टींवर विश्वास ठेवण्याचे, हे आपले धोरण ईश्वरावर ‘पुरावे नसताना’ विश्वास ठेवण्याच्या धोरणाहून तात्विक दृष्ट्या यत्किंचितही भिन्न नाही.
पण ईश्वरावर पुरावे नसताना विश्वास ठेवण्याचे धोरण असे जे वर म्हटले आहे ते मुळात खरे नाही कारण ईश्वरांचा वा अनेक देव-देवतांचा आपापल्या परीने अनुभव आल्याशिवाय लोक त्यांच्यावर विश्वास ठेवत नाहीत ही वस्तुस्थिती आहे.
आणि तरी त्यांच्या विश्वासाला अंधश्रद्धा म्हणून संबोधण्यात येते आणि वर उल्लेख केलेल्या पुराव्याशिवाय जीवनातील हरघडी असंख्य गोष्टींवर विश्वास ठेवण्याच्या प्रकाराला मात्र अंधश्रद्धा समजण्यात येत नाही हा कुठला न्याय?
याशिवाय आणखी काही महत्वाच्या बाबी –
v ‘अंधश्रद्धा निर्मूलनवादी’ न्याय
v आमचे भांडण बुद्धिवाद्यांशी नाही तर बुद्धिवादाशी आहे.
v जीवनात बुद्धिनिष्ठ जीवन जगावे असे म्हटले जाते, त्याचा नेमका अर्थ काय?
v काहीजण अतींद्रिय विज्ञानाचे पुरावे नाकारणे आडमुठेपणाचे आहे हे ओळखून ते स्वीकारतात
v ईश्वराचा रोग होऊ नये म्हणून ज्यांनी बुद्धिवादाची लस टोचून घेतली आहे, त्यांना तो रोग होणारच नाही.
v तार्किक दृष्ट्या ईश्वर सिद्ध होत नाही.
संपुर्ण प्रकरण इथे वाचा.
टीप - प्रा. गळतगे कर्नाटक राज्यात निपाणी पासून २३ किमी दूर त्यांच्या शेतात - भोज नामक खेड्य़ात राहातात. त्यांचा संगणकाशी थेट संपर्क नाही. त्यांना संगणकावरील लेखन इतरांकडून समजून घ्यावे लागते. तसे असले तरी प्रा. गळतगे यांनी इथे मांडलेल्या विचारांवर लेखन करून प्रकाश टाकला तर तो मी जरूर सादर करेन. त्यांचे वय (८१) व तब्बेत यामुळे ते केंव्हा घडेल त्याबद्दल मी सध्या काही आश्वासन देऊ शकत नाही मात्र त्यांच्यापर्यंत विचार पोहोचण्यासाठी जरूर प्रयत्न करीन. याची खात्री बाळगा.
[1] . सुखाकडे (मग ते कितीही अल्प असेना का) डोळेझाक करणे हाच आंधळेपणा आहे, मिळेल त्या सुखाचा उपभोग घेणे हाच डोळसपणा आहे, असे बुद्धिवादी म्हणतील. पण (भौतिक) सुख आणि बुद्धिवाद यात विरोध आहे ते कसे ते पुढे दाखवून दिले आहे.
[2] पति पत्नी मधील प्रेम जितके आंधळे(दोषांकडे जितका कानाडोळा) तितका प्रपंच सुखाचा, जितकी संशयी वृत्ती(दोषांची चिकित्सा) अधिक तितका तो दुःखाचा. अशा रितीने बुद्धिवादाचे (संशयवादाचे) आणि प्रापंचिक सुखाचे प्रमाण व्यस्त आहे.
छान
छान
वावा. उत्तम,
वावा. उत्तम,
कडेगाव प्रकरण वाचलं. तिथं
कडेगाव प्रकरण वाचलं. तिथं अभिप्राय दिलाय.. सबब पुन्हा अशा कुठल्याही लिखाणावर वेगळा अभिप्राय देण्याची आवश्यकता वाटत नाही.. पण खालील परिस्थितीत लेखाचा नक्की विचार करता येईल.
आधी बुद्धीवाद्यांना विरोध करणा-यांना अध्यात्म तरी नीट समजलेय का हे स्पष्ट व्हायला हवे. अध्यात्मात विज्ञान असते... मान्य ! फक्त ते प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रित्या सिद्ध झाले कि झालं. सिद्ध झालं नाही तरी शक्यता नाकारली जात नाही. तर अस्तित्व सिद्ध झालेलं नसल्याने ती वैज्ञानिक गोष्ट म्हणून ग्राह्य धरली जात नाही.
एखाद्याला ईश्वराची प्राप्ती झाली. त्यासाठी तो ज्या काही प्रोसेसमधून गेला ती प्रोसेस त्याने नीट लिहून ठेवली, आणि इतरांनी ती प्रोसेस काटेकोरपणे पाळली असता ईश्वराची प्राप्ती झाली तर ते विज्ञान ठरते. त्यासाठी लागणारा डेटा, प्रयोग, प्रयोगातून आढळणा-या चुका. त्या चुकांची दुरूस्ती आणि फायनली एक निर्दोष पद्धत याला सायंटिफिक अॅप्रोच असं म्हटलं जातं. हे एक उदाहरण आहे. भलतेच फाटे फोडत बसू नये.. आशय समजून घ्यावा. एकदा ही व्याख्या असेल तर त्याविरूद्ध आगपा़खड करणे हे अरण्यरूदन होय.
श्रद्धा जपा, पण आमच्यावर अन्याय होतोय असे गळे काढू नयेत. विमान उडवताना ते अध्यात्मशक्तीच्या जोरावर उडवता येत नाही. तसे उडवता येत असेल तर भरपूर रिसर्च करावा आणि अध्यात्मशक्तीच्या जोरावर उड्डाणाचे अध्यात्म लिहून ठेवावे. त्याला देखील विज्ञान मान्यताच देईल. म्हणजेच विज्ञान अध्यात्माच्या विरोधात नसून सिद्ध होत असलेल्या प्रत्येक गोष्टीला मान्यता देते हे समजून येईल.. मग ते मंत्रशक्तीने असो, अध्यात्माने असो वा जादूटोण्याने असो.
बटण दाबल्यावर ज्याप्रमाणे प्रत्येकाला दिवा लावता येतो, तसंच अमूक एक मंत्र म्हटल्याने उजेड होत असेल , आणि प्रत्येकाच्या बाबतीत हे घडत असेल तर वेगळ्या पुराव्यांची गरज नसते.
बुद्धीवाद्यांना विरोध हे ढोंग आहे आणि ते चांगले शिक्षण घेऊन, विज्ञानाने लागलेले शोध वापरून, आयुष्य त्याच वातावरणात घालवून उपभोग घेतलेले लोक करत असतील तर त्याचा कडक भाषेत निषेध करायला हवा. एकतर जे आयुष्य आजवर उपभोगलं ते ढोंग होतं किंवा आता जे सांगताय ते तरी.. माफ करा या भाषेबद्दल !
मित्रा गागारिन
मित्रा गागारिन जी,
बुद्धीवाद्यांना विरोध हे ढोंग आहे आणि ते चांगले शिक्षण घेऊन, विज्ञानाने लागलेले शोध वापरून, आयुष्य त्याच वातावरणात घालवून उपभोग घेतलेले लोक करत असतील तर त्याचा कडक भाषेत निषेध करायला हवा.
आपले विचार वाचले.
प्रा. गळतगे यांनी आधीच म्हटले आहे कीआमचे भांडण बुद्धिवाद्यांशी नाही तर बुद्धिवादाशी आहे.
विज्ञानामुळे जीवनात सुखसोई व प्रगती झाली व होते. याबद्दल प्रा. गळतगे यांचे ही दुमत असायचे कारण नाही. ते म्हणतात, "बुद्धिवाद्यांनी कसे वागावे, काय करावे, काय करू नये, हे सांगण्याचा अधिकार आम्हाला नाही. त्यांनी आपल्याला समजलेला बुद्धिवाद खुशाल जगावा. पण आपला बुद्धिवाद ज्या विज्ञानवर आधारल्याचा दावा ते करतात त्या विज्ञानाचा त्याला कितपत आधार मिळतो किंवा तो मिळतो काय हे तपासण्याचा अधिकार सर्व विज्ञानवाद्यांना आहे..कारण विज्ञानवाद हा काही बुद्धिवाद्यांचा मक्ता नाही. या वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्यांचा हा दावा फोल असल्याचे विज्ञान आणि बुद्धिवाद या ग्रंथातील अनेक प्रकरणातून सप्रमाण दाखवून दिलेआहे. (विज्ञानाचा जन्म बुद्धिवादा विरुद्ध बंड करून झाला असल्याची इतिहासाची साक्ष असल्याने विज्ञान व बुद्धिवाद यातून विस्तव जात नसल्याचे त्या लेखातून दाखवले आहे)
आता विज्ञानानेच मनुष्य डोळस बनतो. हे सर्वमान्य आहे. पण विज्ञानावर बुद्धिवाद आधारलेला नसल्याने किंवा त्याची बुद्धिवादाला कसलीच पुष्टी मिळत नसल्याने बुद्धिवाद कसा डोळस कसा ठरतो हे बुद्धिवाद्यांनी सिद्ध करून दाखवले पाहिजे.तरच बुद्धिवाद डोळस आहे हे मान्य करता येईल.पण त्यांनी ते कोठे सिद्ध केल्याचे आढळून येत नाही. केवळ बुद्धिवादाचा विज्ञानाच्या आधारे ते पुरस्कार करताना आढळतात पण तो विज्ञानाचा पुरस्कार ठरतो. बुद्धिवादाचा पुरस्कार ठरत नाही. पण बुद्धिवाद्यांनी आम्ही विज्ञानाचे पुरस्कर्ते आहोत. विज्ञान नाही.हे तुणतुणे वाजवत राहिल्याने ते विज्ञानवादी असल्याचा बोलबाला मात्र होतो.पण त्यामुळे ते विज्ञानवादी आहेत हे तर सिद्ध होत नाहीच पण विज्ञानवाद सुद्धायालोकांच्या बुद्धिवादाप्रमाणे अडमुठा आहे कि काय अशी शंका विज्ञानाची खरी ओळख नसलेल्यांना मनामधे निर्माण होते.आणि विज्ञानवादी दृष्टी समाजात रुजवण्याच्या सेवेच्या नावाखाली सत्यान्वेष ही खरी वैज्ञानिक दृष्टी आहे. तिची हानी करण्याची "सेवा" मात्र त्यांच्या हातून बुद्धिपुरस्सर घडत असल्याचे जाणत्या लोकांना उघड्या डोळ्यांनी पहावे लागते....
माफ करा काका.. तुमच्याबद्दल
माफ करा काका..
तुमच्याबद्दल आदर बाळगून माझी सर्व मते तुमच्या निरनिराळ्या थ्रेडवर लिहीलेली आहेत. तुम्ही त्यातून गैरसोयीच्या मुद्यांना वगळून एखादंच वाक्य उचलून असंबद्ध स्पष्टीकरण देता. ते देतांना देखील इथल्या सदस्याचे वाय मिसळपाव वर आणि तिथल्या सदस्याचे एखादेच वाक्य मायबोलीवर देता. मागचा पुढचा संदर्भ न देण्यामागचे कारण स्पष्ट करू शकाल का ?
महत्वाही गोष्ट म्हणजे प्रा. गळतगे यांचा ग्रंथ म्हणजे प्रमाण ग्रंथ नव्हे. आमच्या पुढे प्रा गळतगे यांचे लिखाण नसून फक्त विं.क. शशिकांत ओक यांचे लिखाण आहे. त्यातून काही सिद्ध झाले आहे असा दावा तुम्ही करू शकाल काय ?
याऊलट तुमच्या लिखाणातून विज्ञानवादी हे बुद्धीवादी नव्हेत किंवा उलटपक्षी... अशी नवीन थिअरी तुम्हाला मांडायची आहे. काय उपयोग हवाई दलातल्या विमानांचं उदाहरण द्यायची ? शक्य असल्यास त्याचं उत्तर द्यावे. आपल्याकडून अनेक उत्तरे मिळालेली नाहीत. ती मिळतील अशी अपेक्षा नाही.
धन्यवाद सर. कळावे लोभ असावा.
मित्रा , १) हा धागा प्रा.
मित्रा ,
१) हा धागा प्रा. गळतगे यांच्या पुस्तकातील प्रकरणाचा आहे. त्यात काय आहे याची झलक देणारा आहे. त्यात माझे विचार येणे अपेक्षित नाही
२)आपल्याला त्यांचे विचार प्रमाण म्हणून मान्य नसतील तर नसतील. निदान आपण ते समजून घेतलेत की यांचे व आपले नाही पटत. ठीक.
३) विस्कळीत धाग्यांतून नेमके उचलून त्यावर प्रतिक्रिया देतो...
ठीक आहे अनेक ठिकाणी काही समान उल्लेख येतात त्यांना उत्तरे देताना असा विस्कळीतपणा आपल्यासारख्याला जाणवला असे आपण नमूद करता, यापुढे शक्य झाल्यास त्यावर लक्ष ठेऊन असेन.
विज्ञान अध्यात्माच्या विरोधात नसून सिद्ध होत असलेल्या प्रत्येक गोष्टीला मान्यता देते हे समजून येईल.. मग ते मंत्रशक्तीने असो, अध्यात्माने असो वा जादूटोण्याने असो.
बटण दाबल्यावर ज्याप्रमाणे प्रत्येकाला दिवा लावता येतो, तसंच अमूक एक मंत्र म्हटल्याने उजेड होत असेल
प्रा. गळतगे म्हणतात की विज्ञान अध्यात्माच्या विरोधात नाही आपण नेमके तेच म्हणता आहात, फक्त परिमाणे वेगळी असल्याने ते आपणासारखांना मान्य होत नाही.
उदा. आपण म्हणता तसा मंत्राने किवा जपाने मानसिक समाधान मिळते. पण उजेड पाडता येत नाही
ते समाधान दिव्याची बटणे दाबून मिळणार नाही. कारण उजेड व मानसिक समाधान या भिन्न गोष्टी भिन्न प्रकारे उपलब्ध होतात. पाणी मीटर मधे व कापड लिटर मधे मोजता येत नाही. आपण मात्र त्याचे एकाच तराजूने विशिष्ठ मापन करता येईल अशा यातऱ्हेने उपलब्ध हव्यात तर विज्ञान मानेल असा असा बुद्धिवादी तर्क लाऊन पहाता आहात...
काय उपयोग हवाई दलातल्या विमानांचं उदाहरण द्यायची ? शक्य असल्यास त्याचं उत्तर द्यावे. आपल्याकडून अनेक उत्तरे मिळालेली नाहीत. ती मिळतील अशी अपेक्षा नाही.
जेंव्हा गरज पडेल तेंव्हा हवाईदलातील प्रमाणांचा योग्य वापर करेन. निदान या धाग्याच्या ठिकाणी आपल्याला मी निराश केले नसावे अशी अपेक्षा...
आपण गळतगे यांचे कथन व ब्लॉग वाचता याचा मला आनंद आहे.
युगा, एक शंका आहे. >>
युगा,
एक शंका आहे.
>> एखाद्याला ईश्वराची प्राप्ती झाली. त्यासाठी तो ज्या काही प्रोसेसमधून गेला ती प्रोसेस त्याने नीट लिहून ठेवली,
>> आणि इतरांनी ती प्रोसेस काटेकोरपणे पाळली असता ईश्वराची प्राप्ती झाली तर ते विज्ञान ठरते.
अशी माहिती आणि प्रोसेस उपलब्ध आहे. याकरिता गुरूंना शरण जावं लागतं आणि मी कोण आहे हा प्रश्न करावा लागतो.
मात्र काटेकोरपणा म्हणजे नक्की काय? हा प्रश्न उद्भावाण्याच्म कारण सांगतो. विज्ञान मूलत: इंद्रियगामी विषयांच्या संदर्भातलं शास्त्र आहे. याउलट अध्यात्म हे इंद्रियातीत अनुभूतींचं शास्त्र आहे. या दोघांची लागू करण्याची क्षेत्रे (अॅप्लिकेशान फील्ड्स) वेगवेगळी आहेत. मग एकाच्या चौकटीत दुसरं कसं बसणार?
आ.न.,
-गा.पै.
गामा पैलवानजी या दोघांची लागू
गामा पैलवानजी
या दोघांची लागू करण्याची क्षेत्रे (अॅप्लिकेशान फील्ड्स) वेगवेगळी आहेत. मग एकाच्या चौकटीत दुसरं कसं बसणार?
मी ही वरच्या प्रतिसादात त्याच बाजूने उत्तर दिले आहे...
प्रतिसादाकरिता धन्यवाद...
खरे बुद्धिवादी या जगात फक्त
खरे बुद्धिवादी या जगात फक्त संन्यासी किंवा अध्यात्मवादी ठरतात. कारण प्रपंच दुखःदायक आहे याविषयी इतके पुरावे आहेत की त्याच्याकडे डोळेझाक करून प्रपंचात पडणे ही स्वतःच्या बुद्धिशी प्रतारणा आहे, हे ओळखून ते प्रपंचात पडत नाहीत. आणि पडले तरी ते प्रपंचाविषयी उदासीन राहून अनासक्त वृत्तीने जगतात. पण या लोकांना कोणी बुद्धिवादी म्हणत नाहीत आणि ज्यांना बुद्धिवादी म्हणतात, ते तर प्रपंचाचा त्याग करायला कधीच सांगत नाहीत, उलट प्रपंचात पडून त्यातील सुखांचा आंधळेपणाने ( म्हणजे प्रपंचातील दुःखाकडे डोळेझाक करून) उपभोग घ्यायला सांगतात. >>>>>>>
वाट्टेल तसे लिहिले आहे
ज्ञान तपस्वी अद्वयानंद गळतगे कोण आहेत?
पण ईश्वरावर पुरावे नसताना
पण ईश्वरावर पुरावे नसताना विश्वास ठेवण्याचे धोरण असे जे वर म्हटले आहे ते मुळात खरे नाही कारण ईश्वरांचा वा अनेक देव-देवतांचा आपापल्या परीने अनुभव आल्याशिवाय लोक त्यांच्यावर विश्वास ठेवत नाहीत ही वस्तुस्थिती आहे.
आणि तरी त्यांच्या विश्वासाला अंधश्रद्धा म्हणून संबोधण्यात येते आणि वर उल्लेख केलेल्या पुराव्याशिवाय जीवनातील हरघडी असंख्य गोष्टींवर विश्वास ठेवण्याच्या प्रकाराला मात्र अंधश्रद्धा समजण्यात येत नाही हा कुठला न्याय?>>>>>>>
ईश्वरावर विश्वासच नाही असे लोक आहेत, त्यांच्याबद्दल आपले / गळतग्यांचे काय मत आहे ते कृपया समजावे
माफ करा चर्चा अध्यात्म वि.
माफ करा
चर्चा अध्यात्म वि. विज्ञान, ईश्वर आहे कि नाही इथे चालली आहे. मूळ परामानसशास्त्र म्हणजे विज्ञान असा गळतगेंचा दावा आहे. त्याबद्दल याच ओकसरांच्या इतर धाग्यावर सप्रमाण दाखवून दिलेले आहे कि परामानसशास्त्र हे संपूर्ण शास्त्र नव्हे. त्याकडे डोळेझाक करण्यात आलेली आहे. गळतगेंचा ग्रंथ कुणी वाचलाय इथे ? जो ग्रंथ कुणीही वाचलेला नाही त्यातले दावे सिद्ध झालेत असं ओपन फोरम मधे कसं काय लिहू शकता बुवा तुम्ही ?
नेचर / सायन्स अशा नियतकालिकात आपले संशोधन का प्रसिद्ध करत नाही हा प्रश्न टाळण्यात आलेला आहे. अशा अडचणींच्या प्रश्नांना बगल दिल्यामुळे आपली माघार. धन्यवाद.
मित्रांनो, जंजीरचा तो फेमस
मित्रांनो,
जंजीरचा तो फेमस संवाद आठवला...
भाई तुम साईन करोगे या नहीं?....
जाओ, पहले उनके सिग्नेचर लेके आओ। .... फिर जहां तुम कहो वही मैं साईन करूंगा।
......
युगा, तुम गळतगे की बात मानोगे या नहीं?
ओक जा. आधी ऩेचर आणि अन्य नियतकालिकांच्या संपादकांची मान्यता आणा.... मग ते म्हणतील ते आम्ही मान्य करू....
.....
गळतगेंचा ग्रंथ कुणी वाचलाय इथे ? जो ग्रंथ कुणीही वाचलेला नाही त्यातले दावे सिद्ध झालेत असं ओपन फोरम मधे कसं काय लिहू शकता बुवा तुम्ही ?
नेचर व अन्य मासिके गळतगे यांचे कथन मान्य करतील तेंव्हा करतील किंवा नाही पण गळतगे यांची मराठीभाषेतील तीन पुस्तके तुम्हाला स्वतंत्रपणे वाचण्यात काय आडकाठी आहे? इतरांनी गळतगेंच्या मतांना मान डोलावली तर मग मी मानेन इतकी का आपण बुद्धी गहाण ठेवली आहेत?
असाच युक्तिवाद पुर्वी एक मित्र राजेश घासकडवी नामक व्यक्तीने केला होता, त्याची आठवण झाली...
उत्तर हो नसेल अशी अपेक्षा....
दावे सिद्ध झाले किंवा नाही हे आपण तेंव्हाच म्हणू शकता जेंव्हा आपण त्यांचे लेखन वाचाल. त्यांच्या ब्ब्लॉगवर ते उपलब्ध आहे. लिंक हवी असेल तर सांगा त्याची व्यवस्था करता येईल.
जे काही गळतगेंचं लिखाण आपण
जे काही गळतगेंचं लिखाण आपण इथं दिलेलं आहे त्याची झालेली व्यवस्थित चिरफाड हे प्रश्नाचं पुरेसं उत्तर नाही का ?
विशेषतः प्रकरण एक मध्येच गळतगेंचा अॅप्रोच कळाला. परामानसशास्त्राचा मी देखील अभ्यास केला आहे आणि म्हणूनच सोदाहरण तुमच्या प्रत्येक थ्रेडवर गळतगेंचं म्हणणं खोडून काढू शकलो. शितावरून भाताची परीक्षा या न्यायाने त्या पुस्तकासाठी पैसे का घालवू ?
उद्या तुमच्या याच पद्धतीने माझ्या पुस्तकांची अर्धवट जाहीरात कुणाकडून करवून घेऊन ही पुस्तकं का वाचत नाहीत असा प्रश्न मी विचारू शकतो का ? आपण एकदा सगळे थ्रेडस वाचून पहा. नेचर खूप लांबची गोष्ट आहे.
पुणेरी भाषेत ग्रंथाची टीका
पुणेरी भाषेत ग्रंथाची टीका करायची झाल्यास.. पण जाऊ द्या.
कडेगावच्या प्रकरणात गळतगेंच्या लिखाणातली अप्रगल्भता समोर आलेली आहे. हे प्रकरण इतक्या बकवास पद्धतीने लिहीलेलं आहे कि संताप आल्याशिवाय राहवत नाही. मुळात त्यांनी काहीही त्यात सिद्ध केलेलं नाही..
हे आजपर्यंत तीन ते चारदा वेगवेगळ्या थ्रेडवर लिहून झालेलं आहे. त्या प्रश्नांची उत्तरं अद्याप अनुत्तरीत आहेत. ...
मला गामा पैलवान यांचा
मला गामा पैलवान यांचा प्रतिसाद तंतोतंत पटला.
पण इथले वाचून मला कळत नाही की बुद्धिवाद म्हणजे नक्की काय? फक्त विज्ञाना च्या नियमांप्रमाणे जे बरोबर ठरते तेच खरे नि बाकीचे नक्कीच खोटे? बुद्धिवादी असे का म्हणत नाहीत की आमचा बुवा ईश्वरावर, मंत्र तंत्र, प्रार्थना, ध्यानधारणा इ. गोष्टींवर विश्वास नाही कारण आमच्या शास्त्रात ते बसत नाही. आम्हाला ते प्रयोग करून दाखवता येत नाहीत, प्रयोग अतिशय कठीण आहेत, ते यशस्वी होण्यासाठी खूप वेळ लागेल नि त्याचे परिणाम अतिशय वैयक्तिक पातळीवर अनुभवता येत असतील. त्यामुळे ते खरे आहे असे मानायची आमची तयारी नाही.
आम्हाला अणुविभाजनाचे यंत्र परवडत नाही, ज्यांना परवडते त्यांनी सांगितले की अणूचे आणखी त्याहून बारीक कण आहेत, ते आम्ही 'पाहिले', म्हणून ते खरे आहे! असे किती लोक आहेत त्यांनी ते प्रत्यक्ष 'पाहिले'?
समजा मला परवडेल असे यंत्र मी बनवले नि त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने सगळे केले, नि मला काही दिसले नाही, तर तुम्ही म्हणाल माझेच काहीतरी चुकले!
मग फक्त काही थोडे लोक म्हणतात म्हणून ते सगळ्यांनी ऐकायचे? मग त्यात नि देवावर किंवा कुण्या बाबावर श्रद्धा ठेवण्यात काय फरक? बर्याच लोकांनी सांगितले की तसे करून त्यांचा फायदा झाला!! तुमचा नाही झाला तर तुमचेच काहीतरी चुकतंय!
उगाच हेकटपणा करू नये. आधी समजून घ्यावे. अध्यात्मात तत्व काय नि साधने काय नि कोणती साधने महत्वाची नि कोणती नाहीत. उगाच कुठल्याहि दगडाला देव मानायचे नाही, पण शास्त्रशुद्ध कारणे समजून दगडाला देव 'मानले' तर फरक पडत नाही! आनि खरेच जमत नसेल अध्यात्ममार्ग तर नका करू. कर्मयोग गीतेत सांगितला म्हणून तो खोटा नाही - कर्म करावेच लागते हे शास्त्रीय सत्य आहे!
अहो झक्की काका आधी ते
अहो झक्की काका
आधी ते गळतगेंचे ब्लॉग्ज वाचा. परामानसशास्त्र हे शास्त्र आहे असा त्यांचा दावा आहे. असा दावा केल्यावर त्यांच्याकडून तुमच्या ज्या अपेक्षा असतील त्या पूर्ण होतात का हे पहा आधी. बाकिचे मुद्दे दुस-या बाफवर घ्या.. तिथं छान चर्चा होईल.
जंजीरचा तो फेमस संवाद
जंजीरचा तो फेमस संवाद आठवला...
भाई तुम साईन करोगे या नहीं?....
जाओ, पहले उनके सिग्नेचर लेके आओ। .... फिर जहां तुम कहो वही मैं साईन करूंगा।
---- अरे हा तर दिवार मधला संवाद आहे ना ?
उगाच हेकटपणा करू नये. आधी
उगाच हेकटपणा करू नये. आधी समजून घ्यावे. अध्यात्मात तत्व काय नि साधने काय नि कोणती साधने महत्वाची नि कोणती नाहीत. उगाच कुठल्याहि दगडाला देव मानायचे नाही, पण शास्त्रशुद्ध कारणे समजून दगडाला देव 'मानले' तर फरक पडत नाही!
------ झक्की साहेब बुद्धीवाद (विज्ञान वाद) खुप दुरची गोष्ट आहे. पण कुठल्याही वादात काही लॉजीक असायलाच हवे.
दगडाला देव माना अगर मानू नका त्याने काही फरक पडत नाही, पण हेच दगड मुलींच्या डोळ्यातुन बाहेर पडत असतील तर? अनेक वेळा या प्रकारांमधे शुद्ध हातचलाखी आहे किंवा बोगसपणा आहे हे सिद्ध झालेले आहे.
हे प्रकरण इतक्या बकवास पद्धतीने लिहीलेलं आहे कि संताप आल्याशिवाय राहवत नाही. मुळात त्यांनी काहीही त्यात सिद्ध केलेलं नाही..
------ त्यांनी काहीच सिद्ध केलेले नसेल, पण अंधश्रद्धा वाढीस हातभार लावला आहे ना?
मित्रांनो अंधस्रद्धा पसरवणार्या अशा पुस्तकांवर तुमचा कष्टाचा पैसा उगाचच वाया घालवू नका.
http://www.youtube.com/watch?
http://www.youtube.com/watch?v=2u2BT4f253k
जामोप्या... तुम्ही सुंदर लिंक
जामोप्या... तुम्ही सुंदर लिंक दिली आहे, धन्यवाद.
बराच वाद विवाद झाला आहे
बराच वाद विवाद झाला आहे .
असो !!
पण मजा आली
एक जाणवले.........दोनिही टीम्सना एक समजायला हवे की श्रद्धा/अन्धश्रद्धा, बुद्धीवाद /दैववाद हे शब्द आहेत त्यान्चा अर्थ आपाणास हवा तसा आपण लावतो नेहमी . शेवटी भावनाच प्रभावी ठरतात !!
सत्य सिद्ध झाले नाही म्हणून ते असत्य!!................आणि तुम्हाला त्यात काय कळनार म्हणा.....? असा हा वाद आसतो.
अनुभव तो अनुभव .........ज्यला याय्चाय त्यालाच येतो!!.मग तो कुठ्ला का असेना!!
ओक : गळ्तगे = तुम्ही नाहीए हे आधी ओळखा...........!!
युरी: तुला तुझी श्रद्धा जपण्याचा पूर्ण हक्क आहे ती तू कशीही जप. पण जप!!
देवाला आव्हान देताना
देवाला आव्हान देताना विज्ञानवाद्यांनी जीभ सांभाळावी.नित्य पुजापाठच तुम्हाला दुखःतुन वाचवतील.
अजुन चालुच आहे का!
अजुन चालुच आहे का!
मित्रा, ओक : गळ्तगे = तुम्ही
मित्रा,
ओक : गळ्तगे = तुम्ही नाहीए हे आधी ओळखा...........!!
आपणास त्यांची पुस्तके वाचून कळले असेल की माझी पायरी त्यांच्या पायाशी राहील.....
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
मित्रा, हे प्रकरण इतक्या
मित्रा,
हे प्रकरण इतक्या बकवास पद्धतीने लिहीलेलं आहे कि संताप आल्याशिवाय राहवत नाही.
इतके मनाला लाऊन घेऊ नये. नाही पटल तर नाही. . कसेही करून पटावे असा ओकांचा वा गळतगे यांचा दावा नाही. ....
...असा आग्रह खरा तर अंनिसवादींचा एक संस्था काढून चालू आहे. मग इतरांनी काही त्याशी विसंगत म्हटले, लिहिले तर ते लगेच बकवास असा संताप का...
जो पर्यत भानामतीची संगत होत नाही तोवर ती खोटी असे वाटते अन तो अनुभव आला तरी इतरांच्या हिणकस वागणूकीमुळे असे पीडीत लोक इतरांना सांगायला कचरतात. गळतगे यांच्या सारखे शोधक त्याचा पाठपुरावा करतात तेंव्हा त्यांना निदर्शनाला आलेली वस्तुस्थिती त्यांनी प्रमाणिकपणे सांगितली आहे. आता काहींची मानसिकता ते मानायची नसेत तर नसेल म्हणून त्यांचे शोधलेखन दुर्लक्षिता कामा नये... इतकेच...
त्याचं काये की या ओकांना
त्याचं काये की या ओकांना स्वतः शेवटला प्रतिसाद दिला की आपण जिंकलो असं वाटत असतं, असं मला वाटतं.
>>
जंजीरचा तो फेमस संवाद आठवला...
भाई तुम साईन करोगे या नहीं?....
जाओ, पहले उनके सिग्नेचर लेके आओ। .... फिर जहां तुम कहो वही मैं साईन करूंगा।
<<
अहो,
सिग्नेचरचा खंबा पोटात गेल्यावर करावी तशी बडबड करून वरून हे माझं नै, गळतगे म्हंतात वै बडबड.. असो.
जाओ,
पहले सिग्नेचर लेके आओ
फिर जहाँ चाहिये सिग्नेचर करूंगा..
जो पर्यत भानामतीची संगत होत
जो पर्यत भानामतीची संगत होत नाही तोवर ती खोटी असे वाटते अन तो अनुभव आला तरी इतरांच्या हिणकस वागणूकीमुळे असे पीडीत लोक इतरांना सांगायला कचरतात.
----- तुम्हाला स्वतःला असा काही अनुभव आलेला आहे का ? तुमच्या माहितीत असे एक तरी प्रकरण आहे का? असेल तर न कचरता लिहा, इथे तुम्हाला मदतच मिळेल.
मित्रा, तुम्हाला स्वतःला असा
मित्रा,
तुम्हाला स्वतःला असा काही अनुभव आलेला आहे का ? तुमच्या माहितीत असे एक तरी प्रकरण आहे का?
मी हो म्हटले तर काय फरक पडेल....
कारण त्या अनुभवाला खोटे ठरवणारे आपल्यासारखे ते कथन मान्य करायला तयार नसतात.
मी नाही म्हटले तर ...
मग तुम्हाला अनुभव नाही ना मग गप्प बसा. असा सल्ला आपल्यासारखे देणार.
कारण त्या अनुभवांना मान्यता देण्याचे जागतिक हक्क आपण राखून ठेवलेले आहेत. असो.
प्रा. गळतगे यांनी अनुभव आलेल्यांशी संपर्क करून त्यांना ज्ञात झालेले कथन मांडले ते आपल्या विचारांशी मेळ खात नसेल म्हणून ते म्हणतात ते खोटे असे आपण म्हणू नये इतकेच.
एका बाजूने आपल्यासारखे लोक ती अस्तित्वात नाही असे म्हणतात. तर दुसऱ्या बाजूने आपल्या मताचे लोक ती दूर केली असा ज्यांच्या मार्फत ती प्रत्ययाला येते त्यांना ठीक करून ती दूर केल्याचा दावा करतात.
त्यासाठी पिवळा फॉस्फरस आणि काही रसायने वापरून कसे विविध हात चलाखीचे खेळ केले जातात ते स्टेजवर आवर्जून सांगतात. पण जशा त्या व्यक्तिने स्टेजचा वापर न करता करामती घडवल्या त्या जशाच्यातशा करायला मात्र ते वा कर्नाटक सरकारतर्फे नियुक्त डॉ. नरसिंहैयांनी आणि त्यांच्या संघानी प्रात्याक्षिके करून दाखवली नाहीत. नव्हे अशा प्रत्येक वेळी असे कार्यकर्ते ते आमचे काम नाही असे टरकाऊन सांगून सटकतात. असा अनुभव मला व गळतगे यांना आहे.
माझ्या आधीच्या प्रतिक्रियेतून ते मी लिहिलेले आहेच. असो.
प्रश्न भानामती कोण करते याचा आहे.
या मूळ प्रश्नावरील गळतगे यांची बाजू आपण वाचलीत तर त्यांच्या व आपल्या कथनातील साम्य व फरक आपल्याला जाणवेल.पण आपल्याला ते वाचायची गरज नाही वा नको आहे असे आपले प्रतिपादन आहे. आपल्याला आणि अन्य मित्रांना विनंती करतो की आपले पुर्वआग्रह बाजूला सारून आपल्याला सत्य शोधनात वा वाचनात रस असेल तर त्यांच्या लेखनाचा आस्वाद घ्यावा.
इब्लिस | 2 April, 2012 -
इब्लिस | 2 April, 2012 - 22:32
त्याचं काये की या ओकांना स्वतः शेवटला प्रतिसाद दिला की आपण जिंकलो असं वाटत असतं, असं मला वाटतं.
पण माझा प्रतिसाद शेवटला. म्हणून "जितं मया" + विकट हास्य
पण जशा त्या व्यक्तिने स्टेजचा
पण जशा त्या व्यक्तिने स्टेजचा वापर न करता करामती घडवल्या त्या जशाच्यातशा करायला मात्र ते वा कर्नाटक सरकारतर्फे नियुक्त डॉ. नरसिंहैयांनी आणि त्यांच्या संघानी प्रात्याक्षिके करून दाखवली नाहीत.
---- त्यांनी प्रात्यक्षिके करुन दाखवली नाहीत ह्याला कारण काय असावे याचा शोध तुम्ही वा ज्ञानतपस्वींनी कधी केला आहे कां? तुम्ही लोकांनी त्यांच्याशी संवाद साधायचा प्रयत्न केला आहे का?
नव्हे अशा प्रत्येक वेळी असे कार्यकर्ते ते आमचे काम नाही असे टरकाऊन सांगून सटकतात. असा अनुभव मला व गळतगे यांना आहे.
---- काही तरी चुकते आहे... तुम्ही त्यांच्यात विश्वास निर्माण केला तर कार्यकर्ते सटकणार नाहीत आणि धैर्याने ते तुमच्या समोर प्रयोग करतील आणि भानामती अस्तित्वातच नाही हे सिद्ध करुन दाखवतील.
Pages