१ कप कणिक (गव्हाचे पीठ),
१ कप रवा (बारीक / मधम),
१ टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल किंवा साधं तेल
चवीला मीठ,
कोमट पाणी
पास्ता हा हल्ली बर्याच घरात आठवडा पंधरा दिवसातुन होणारा पदार्थ. आमच्या घरीही लेक आणि मी पास्ता फॅन्स. अत्तापर्यंत मी नेहमी फ्रेश पास्ता विकत आणत होते पण परवा म्हंटल घरी करुन पहावा.... आणि जमला की हो कणिक, रवा हे आपल्या घरचेच चांगल्या प्रतीचे घटकपदार्थ वापरल्यामुळे पौष्टिक आणि गॅरंटीड!
करुन बघा... सोपा आहे
कृती:
१. कणिक + रवा + मीठ एका बोल मधे घ्या. मधे खळगा करुन त्यात ऑऑ/तेल घाला. हाताने जरा एकत्र करुन घ्या आणि सर्व एकत्र गोळा होईतो थोडे थोडे कोमट पाणी घाला.
२. ओट्यावर थोडे पीठ/मैदा भुरभुरुन त्यावर हा गोळा ठेवा आणि हलक्या हाताने मळा - फार घट्ट नको किंवा अगदी सैल ही नको.
३. साधारण ७-१० मिनीटे मळुन घ्या. तयार गोळा हाताला स्मुथ लागला पाहिजे.
४. हा गोळा क्लिंग रॅप्/प्लॅस्टिक रॅप मधे गुंडाळुन कमीत कमी २० मिनीटे बाजुला ठेऊन द्या. थोडावेळ जास्त राहिला तरी हरकत नाही.
प्रकार १:
५. आता या गोळ्याचे २ भाग करा. एक भाग परत रॅप मधे गुंडाळुन ठेवा. गोळा आणि परत थोड्या पीठावर हलका मळुन घ्या आणि लाटायला घ्या.
६. पोळी लाटताना लाटणे थोडे दाबुन लाटा. आणि प्रत्येकी ३ वेळा लाटल्यानम्तर पोळी अर्धी फिरवा.
७. मधुन मधुन लागेल तसे थोडे पीठ भुरभुरवा म्हणजे पोळी ओट्याला चिकटणार नाही. अश्याप्रकारे लाटत लाटत पातळ पोळी लाटुन घ्या.
८. या पोळीला १/३ भागात दुमडुन परत एकदा मधे दुमडा. प्रत्येक वेळेस दुमडताना थोडे पीठ भुरभुरवा. अशी गुंडाळी बनवुन घ्या.
९. या गुंडाळीला आता पीठ लावलेल्या सुरीने किंवा कातण्याने कापुन घ्या. अश्याच प्रकारे दुसर्या गोळ्याची पोळी लाटुन घ्या आणि तुकडे करा.
१०. पास्ताच्या पट्या अलगद उलगडुन पीठ पसरलेल्या ट्रेमधे ठेवा.
११. पातेल्यात भरपूर गरम पाणी त्यात थोडे मीठ घालुन उकळायला ठेवा. कापलेल्या पट्ट्या त्यात हलकेच सोडा.
१२. पास्ता शिजला की हलक्या हाताने पाण्यातुन काढुन निथळुन घ्या. आणि आपल्या आवडत्या सॉस बरोबर खा
हा लेकीसाठी केलेला 'चीझी पास्ता'.
प्रकार २:
जास्त वेळ नसेल तेव्हा पुढिल प्रकारे पास्ता करता येइल.
- रॅप मधुन काढलेल्या गोळ्याची साधारण पराठ्या इतकी किंवा किंचीत थोडी अजुन जाड पोळी लाटुन घ्या
- या पोळीचे धारधार सुरीने/ कातण्याने अरुंद पट्ट्या कापुन घ्या.
- आणि वरच्या स्टेप्स ९ ते १२ प्रमाणे पास्ता शिजवुन घ्या.
हा 'बेसिल चेरी टोमेटो कॅप्सिकम पास्ता'. यात वापरलेले बेसिल, चेरी टोमेटोज आणि कॅप्सिकम घरच्या बागेतले त्यामुळे हा पास्ता अगदी फ्रेश फ्रॉम फार्म पास्ता आहे
आवडीप्रमाणे यावर पार्मजान चीझ वगैरे घालुन खावे
- इथे लिहीलय ते वाचुन खुप खटपट लागेल असं वाटतं पण करायला लागलं की पटापट होतो हा पास्ता... स्पेशली 'प्रकार २' अगदीच पटकन होतो.
- माझ्याकडे पास्ता प्रेस नाही... म्हणुन मी लाटुन केला आहे. ज्या पुस्तकातुन रेसिपी घेतली त्यात पास्ता प्रेस वापरले आहे.
- मधे जेव्हा २०-२५ मिनीटे गोळा गुंडाळुन ठेवायचा असतो तेव्हा पास्ता सॉस बनवुन ठेवता येतो... पास्ता शिजला की लकेच सॉस मधे आणि लगेच प्लेट मधे आणि लगेच पोटात
नेहेमी प्रमाणेच मस्त गं लाजो.
नेहेमी प्रमाणेच मस्त गं लाजो. अगदी अगदी पास्ता आठवड्यातून एकदा होतोच. आता नक्की असा करून बघेन.
खुपच सोप्पी पद्धत आहे
खुपच सोप्पी पद्धत आहे ही..आपल्याकडे अंजलीच्या किचन्-प्रेस मधे वेगवेगळ्या जाळ्या आहेत त्यात अशी पट्ट्या बनवणारी सुद्धा आहे.त्यातुन सहज करता येतीलसे वाटत आहे.मस्त आहे.सोर्यातुन या पट्ट्या डस्टिंग केलेल्या पेपर वर काढाव्या म्हणजे चिकटणार नाहीत.लाजो,नेहमीप्रमाणे लाजवाब पाकृ आहे.करुन पहाणार.
अतिशय सोप्पी पाकृ. आणि दिसतेय
अतिशय सोप्पी पाकृ. आणि दिसतेय ही झकास.
नक्की करुन बघेन.
पास्ता ह्या प्रकाराला नाक
पास्ता ह्या प्रकाराला नाक मुरडायची सवय होती पण ह्या घरगुती पाककृतीमुळे बनविण्याची उत्सुकता लागून राहिली आहे.
मस्त माझ्या नवर्याचा
मस्त
माझ्या नवर्याचा ब्रेकफास्ट चा प्रॉब्लेम संपला
मस्तच! मी वरणफळं/चिकोल्या या
मस्तच!
मी वरणफळं/चिकोल्या या प्रकारे करते. फक्त आपल्या नेहमीची कणिक वापरते. आता या पद्धतीने (रवा, ऑ ऑ घालुन) करुन बघते.
वा जो....तों पा सु
वा जो....तों पा सु
एकदम मस्त. माझ्या घरीही
एकदम मस्त. माझ्या घरीही पास्ताप्रेमी आहे. हा होममेड पास्ता खुप आवडेल.
वॉव लाजो.. सुपर गुड
वॉव लाजो.. सुपर गुड जॉब!!!!
हेल्दी पास्ता... मुलीला पाठवते ही रेसिपी लगेच
तुझे काम प्रचंड व्यवस्थित
तुझे काम प्रचंड व्यवस्थित आहे. _/\_
लाजो काय सुगरण आहेस गं! आणि
लाजो
काय सुगरण आहेस गं! आणि ते शीर्षकातलं यमकही भारीच! ...कवितेचं नाव वगैरे वाटतंय!
वर्षू.......तुला +१०.....मीही लेकीला पाठवतेय!
वा मस्तच! माझ्या लेकीलापण फार
वा मस्तच! माझ्या लेकीलापण फार आवडतो पास्ता
पास्ता सॉसची रेसीपी मिळेल का? मी अजुन कधी घरी बनवला नाही आहे म्हणुन सोप्पी रेसिपी मिळेल तर बरं
लाजो, दंडवत. कधी निवांत वेळ
लाजो, दंडवत. कधी निवांत वेळ असेल तेह्वा करुन पाहण्याचा विचार करते आहे
लाजो, गुणाची आहेस गं. काय काय
लाजो, गुणाची आहेस गं. काय काय बनवतेस ( आणि तेही यशस्वीपणे)
हे दिसतं तर आहे सोपं आणि हेल्दी आहे. एका ब्रेफाला करुन बघायला हरकत नाही. थँक्स !
लाजो या व अशा क्रीएटीव्ह
लाजो या व अशा क्रीएटीव्ह गोष्टी व्यतिरिक्त तु कशी वेळ घालवते सांगशील का? _______/\_______
धन्यवाद लोक्स नक्की करुन
धन्यवाद लोक्स नक्की करुन पहा...
विदिपा, करा आणि सांगा आवडतो की नाही ते
वर्षूतै आणि मानुषीताई, धन्स लेकींनी केला पास्ता की इथे फोटो अप्लोडा
रैना, कसचं कसचं
विनार्च, सगळ्यात सोपा आणि बेसिक पास्ता सॉस म्हणजे, ऑऑ/तेल गरम करायच, त्यात बारीक चिरलेली लसूण थोडी परतवायची (खमंग नाही), आवडत असेल तर कांदा पातळ चिरुन घालायचा आणि जस्ट पारदर्शक होईपर्यंत परतायचा, त्यात क्रश्ड टॉमेटो घालायचे आणि शिजवायचे. वरतुन आवडीप्रमाणे मीठ, मीरेपूड, ड्राईड इटालियन हर्ब्ज घालायचे आणि मग तयार उकडलेला पास्ता घालायचा. यात हवे तर थोडे क्रिम / पार्मजान चीझ इ इ घालु शकतो.
व्हाईट सॉस मधे इतर भाज्यांबरोबर पास्ता घालुन - व्हे़जी पास्ता बेक करता येतं
वॉव, लाजो. भारी.
वॉव, लाजो. भारी.
मस्त रेसिपी लाजो.. वेळ मिळेल
मस्त रेसिपी लाजो.. वेळ मिळेल तेव्हा नक्की करुन बघणार..
पास्ता सॉसची रेसीपी मिळेल का? मी अजुन कधी घरी बनवला नाही आहे म्हणुन सोप्पी रेसिपी मिळेल तर बरं स्मित >> +१ लाजो.. नक्की टाक ग पास्ता सॉसची रेसिपी..
लाजो तू धन्य गो बाय
लाजो तू धन्य गो बाय ____/\____
काय काय प्रकार स्वतः ट्राय करून पाहतेस!
लाजो नक्कीनक्की.. मानुषी..
लाजो नक्कीनक्की..
मानुषी.. सेम पिंच
मोनाली अग वेळ असेल तेव्हाच
मोनाली अग वेळ असेल तेव्हाच हे असले उद्योग करु शकते... एरवी घर, नोकरी, लेक, नवरा... हे आपलं नेहमीचच
मेधा, वरती एक बेसिक रेसिपी लिहीली आहे बघ...
मामी, निंबे
__/\__ धन्य आहे तुझी
__/\__ धन्य आहे तुझी
पास्ता हा प्रकार खरं तर मला
पास्ता हा प्रकार खरं तर मला आवदत नाही, पण लाजो तू या धाग्याला जे नाव दिलयस ना त्याचं कौतुक केल्या शिवाय राहावलं नाहि वा मस्त ! चला करा फस्त !
टॉप दिसतयं करुन बघायला
टॉप दिसतयं करुन बघायला पाहिजे.
साष्टांग दंडवत आणि तोंडभरुन
साष्टांग दंडवत आणि तोंडभरुन कौतुक ग बाई तुझं!!!
शिर्षक पण मस्तये एकदम
भारी आहेस लाजो. फोटोही जबरी.
भारी आहेस लाजो. फोटोही जबरी.
अवल कवे, धनुडी, माधुरी, सायो
अवल
कवे, धनुडी, माधुरी, सायो धन्स
पास्ता प्रकार, पास्ता सॉस इ...तंत्र, मंत्र आणि पाककृती कल्पना
इथे पास्ता सॉस इ वर चर्चा बघा....
मस्तच रैना + १.
मस्तच रैना + १.
मस्त!
मस्त!
लाजू तू फारच सही आहेस गं,
लाजू तू फारच सही आहेस गं, शिवाय किती कल्पक, सुगरण आणि उत्साही पण. माझा शि. सा. न. वि.वि.
Pages