Submitted by तात्या अभ्यंकर on 15 March, 2012 - 12:26
एकवार पंखावरुनी.. (येथे ऐका)
सात्विकता म्हणजे काय, गोडवा म्हणजे काय मन:शांती म्हणजे काय, हे सारं सार या गाण्यातनं कळतं..
हे गाणं ऐकलं की आपण आईच्या मांडीवर डोकं ठेवून आहोत आणि आई डोक्यावर छानसं खोबरेल तेल थापते आहे अस काहीदा वाटून जातं..
'वने माळरानी राई
ठायी ठायी केले स्नेही'
...
याला म्हणतात यमन..!
'तुझ्याविना नव्हते कुणी आत अंतरात..!'
ही यमनकल्याणातली भक्ती..!
बाबूजींच्या स्वरातील आर्ततेविषयी, रसाळतेविषयी, गोडवेपणाविषयी मी काय बोलू..?
कुठे गेली आता अशी गाणी..?!
-- तात्या अभ्यंकर.
गुलमोहर:
शेअर करा
कुठे गेली आता अशी गाणी..?!
कुठे गेली आता अशी गाणी..?! >>> सीडींवर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुमच्या या लिहिण्याने प्रेरित
तुमच्या या लिहिण्याने प्रेरित होवून जुन्या सुमनताईंच्या सगळ्या कॅसेट काढल्या अन ऐकल्या-५ वेळा-विसरशील तू कारे,नाविका रे,केतकीच्या बनी तिथे, आई गं !!! काय रोमँटिक आहेत्.कुठे गेल्या त्या भावना?? अन त्या रचना अन धन्य ते मंगेश पाडगांवकर!!!
धन्स राव.
कसली कातिल गाणी पेश करताय
कसली कातिल गाणी पेश करताय तात्या. ऑफिसात बसल्या बसल्या डोळे भरुन आलेत .
मस्त गाणं. मला तुझे गीत
मस्त गाणं. मला तुझे गीत गाण्यासाठी तर भयानक आवडतं
तात्या, >>>आईच्या मांडीवर
तात्या,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>>आईच्या मांडीवर डोकं ठेवून आहोत आणि आई डोक्यावर छानसं खोबरेल तेल थापते आहे अस काहीदा वाटून जातं.>>>१००% अनुमोदन. मी जेव्हा जेव्हा हे गाणं ऐकलं आहे तेव्हा तेव्हा खरंच कुणीतरी प्रेमाने मला जवळ घेतंय असं वाटत.
>>केतकीच्या बनी
अजून एक कातिल गाण. मन शांत होतं अशा गाण्यांनी.
>>हे गाणं ऐकलं की आपण आईच्या
>>हे गाणं ऐकलं की आपण आईच्या मांडीवर डोकं ठेवून आहोत आणि आई डोक्यावर छानसं खोबरेल तेल थापते आहे अस काहीदा वाटून जातं..>> अगदी अगदी!
छान ..
छान ..
हे गाणं दरवेळी एकले की डोळे
हे गाणं दरवेळी एकले की डोळे भरून येतात... खूपच आर्तव आहे.
सकाळी सकाळी हे गाणं ऐकुन खुप
सकाळी सकाळी हे गाणं ऐकुन खुप छान वाटलं!
धन्यवाद तात्या!
तुम्ही रोज एक गाणं टाकणार आहात का? नाही टाकाच!
छान, अजुन माहिती वाचायला
छान, अजुन माहिती वाचायला नक्की आवडेल...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुम्ही रोज एक गाणं टाकणार आहात का? नाही टाकाच!
----- +१
ओय......ओय... इथे माझ्या
ओय......ओय...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
इथे माझ्या दिवसाची सुरवात होते आहे.
कातर करणारे म्हणजे काय ते कळते हे ऐकल्यावर. पण पडद्यावर पाहताना मात्र तुपट हास्य, कारुण्य काय ते नाहीच. वाट लावलीय.
तात्या, अत्यंत खराब मूड बदलू
तात्या, अत्यंत खराब मूड बदलू शकणारी जी गाणी असतात ना त्यातले हे गाणे - माझे प्रचंड आवडते. डोळे भरून येतात ऐकताना पण मनातला सल त्या पाण्याबरोबर वाहून जातो. पण का कोण जाणे सहसा या गाण्याचा उल्लेख होत नाही.
धन्यवाद तात्या. हे गाणं
धन्यवाद तात्या.
हे गाणं दरवेळी एकले की डोळे भरून येतात... खूपच आर्तव आहे.>>>+१
असेच एक धुंद गाणं जे डोळे
असेच एक धुंद गाणं जे डोळे मिटून एकावेसे वाटते.. धुंदी कळ्यांना..
हे गीत आणि 'दैवजात ..' ..
हे गीत आणि 'दैवजात ..' .. केवळ देवाघरची निर्मिती!
<<<तुम्ही रोज एक गाणं टाकणार
<<<तुम्ही रोज एक गाणं टाकणार आहात का? नाही टाक>>>१००% अनुमोदन! आता आमचे डोळे तुमच्या आय्.डी.चा शोध घेतील. कारण छान छान गाणं ऐकायला मिळणार म्हणून.
तुम्ही रोज एक गाणं टाकणार
तुम्ही रोज एक गाणं टाकणार आहात का? नाही टाकाच!>>> सहमत!
मस्त !!!! अजुन येऊ देत..
मस्त !!!! अजुन येऊ देत..
माबोकरांच्या खुल्या दिलाच्या
माबोकरांच्या खुल्या दिलाच्या रसिकतेचे खरंच कौतुक वाटते. सर्वांचे अगदी मनापासून आभार..
तात्या.