एक समस्या सत्यशोधनाची !
अर्ध्या भरलेल्या कांचपात्राचे उदाहरण आशावादी आणि निराशावादी दृष्टिकोण स्पष्ट करतांना दिले जाते त्यामुळे सर्वपरिचित आहे. या उदाहरणात आशावादी आणि निराशावादी या दोघांनाही कांचपात्र निम्मे भरलेले आणि निम्मे रिकामे असल्याचे मान्य आहे.
माझ्यापुढे असलेली समस्या अगदी वेगळी आहे. माझ्या समोर काचेच्या पेटीत ठेवलेले कांचपात्र बव्हंशी पाण्याने भरलेले आहे. काचपात्रावरील प्रकाश सर्वत्र सारखा नाही. पेटीची आणि काचपात्राची पारदर्शकताही सर्वत्र एकसारखी नाही. काचपेटीच्या आतील काचपात्र नेमके किती भरलेले आहे याचा शोध मला घ्यायचा आहे. यासाठी इतरांची मदत घेण्याचा प्रयत्नही मी चालविला आहे. मतमतांतरे असणारच हे मी गृहित धरले आहे. फक्त ती साधार असावीत असे मला वाटते. कांहीजण कारणांसह त्यांचा याबाबतचा अंदाज देत आहेत. पण अनुभव असा येतो आहे की कोणतीही योग्य कारणमिमांसा न देता 'काचपात्र पूर्ण रिकामे आहे' असे सांगणार्यांनी एकच गलका उडवून दिला आहे. त्याकडे दुर्लक्ष करणे अशक्य इतका तो वाढला आहे. त्याचा प्रतिवाद करण्याचा कांहीजण प्रयत्न करीत आहेत. पण मग एक प्रतिक्रीया म्हणून 'कांचपात्र पूर्ण भरलेले आहे' असा पवित्रा एखादा घेतो आहे. त्यामुळे 'काचपात्र पूर्ण रिकामे आहे' म्हणणार्यांना आणखीच चेव येतो आहे. या सर्वांचा परिणाम म्हणजे मूळ उद्देश बाजूला पडून नुसता गलकाच ऐकू येतो आहे.
वर मांडलेली समस्या रूपकात्मक आहे. मायबोलीवरील एका लेखाची गत सध्या वर दिलेल्या समस्येसारखी झाली आहे. पुर्वीही कांही तत्सम लेखांची अवस्था अशीच केली गेली आहे आणि हे जाणून बुजून केले जाते आहे.
यावर मला सुचलेला एक मार्ग म्हणजे
कोणत्याही लिखाणावर [प्रतिसादास अनुमति / प्रतिसादाची अपेक्षा नाही ] असे पर्याय प्रशासकांनी उपलब्ध करून द्यावेत. माझी प्रशासनाला तशी जाहीर विनंति या लेखाद्वारे मी करतो आहे.
त्यातून कोणास उस्फुर्त प्रतिसाद द्यायचा असेल तर तो विचारपूस मध्ये देईल. लेखक त्या प्रतिसादात काही तथ्य असेल तर त्याच्याशी संवाद करील. पोरकट, बेजबाबदार आणि तथ्यहीन प्रतिसाद डिलीट करील. त्यामुळे तथ्यहीन द्वंद्व चालू राहाणार नाही.
प्रशासनाने असा पर्याय उपलब्ध करून द्यावा अशी पुन्हा एकदा आग्रहाची विनंति करतो.
एक समस्या सत्यशोधनाची .
Submitted by दामोदरसुत on 8 March, 2012 - 00:39
गुलमोहर:
शेअर करा
दामोदरसुत, आपण काय म्हणता ते
दामोदरसुत,
आपण काय म्हणता ते लक्षात येतंय. इथे व्यक्त झालेल्या प्रतिसादांवर लेखकाचे काहीच नियंत्रण नसते. याउलट आपण स्वत:चा स्वतंत्र ब्लॉग लिहिलात तर तेथल्या प्रतिक्रिया आपल्याला नियंत्रित करता येतील.
मात्र ब्लॉगवर वाचकसंख्या मर्यादित राहण्याचा संभव आहे. याला एक उपाय म्हणजे इथे हिंदुत्व असा वेगळा ग्रुप उघडणे आणि त्यातले धागे केवळ सदस्यांनाच पहाता येतील अशी सोय करणे. कोणी उपटसुंभ घुसलाच तर त्याचे संदेश उडवणे प्रशासकांना शक्य आहेच.
आ.न.,
-गा.पै.
There are 3 sides always. My
There are 3 sides always. My side, your side and right side !
प्रत्येकालाच आपली बाजु बरोबर वाटत असते, यावर उपाय एकच की ज्या मतांमुळे, विचारांमुळे दुही वाढेल आणि बाह्य शक्तींना त्याचा फायदा मिळेल ती मते, ते विचार चूक आणि ज्यायोगे सर्वजण मिळून प्रगती करू शकतो ते बरोबर.
सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः |
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित दु:खमाप्नुयात |
दामोदरसुत, सत्याचा शोधच
दामोदरसुत, सत्याचा शोधच घ्यायचा असेल तर तो स्वतंत्रपणे घ्या. त्यासाठी
इतर सर्व संदर्भ शोधा. येऊ शकतील ते आक्षेप स्वतःच घ्या व त्यांचे निराकरण स्वतःच करा.
आणि मग इथे सर्व संदर्भ देत लिखाण करा. येणार्या प्रत्येक प्रतिवादाला, वैचारिक रितीने, पुर्ण संदर्भासहीत उत्तरे द्यायची तयारी ठेवा...
किंवा स्वतःची खात्री असेल, तर इतरांना पटवून द्यायचा प्रयत्न करु नका.
दिनेशदा +१ शिवाय एकदा सत्याचा
दिनेशदा +१
शिवाय एकदा सत्याचा शोध सुरु केला की मग सापडलेले सत्य आपल्याला अगदी कटू वाटणारेही असू शकते ही शक्यता मनात ठेवावी.
दामोदरसुत, महेश, दिनेशदा,
दामोदरसुत, महेश, दिनेशदा, विजय - +१
दामोदरसुत - प्रश्न पटला. तुमचे उत्तर पूर्णपणे नाही पटले.
<<पोरकट, बेजबाबदार आणि तथ्यहीन प्रतिसाद डिलीट करील>> पेक्षा वर्गीकरण करणे मला रुचेल.
महेश - <<विचारांमुळे दुही वाढेल>> म्हणून विचार बाजूस सारणे किंवा चूक ठरवणे योग्य असे वाटत नाही.
दिनेशदा, माझे मत - इतरांना पटवून द्यायचा प्रयत्न हवा, हट्ट नको.
दामोदरसूत १०० % अनुमोदन
दामोदरसूत
१०० % अनुमोदन !!
मी तर यापूढे जाऊन अस म्हणेन की, मबो वरील काही मंडळी सत्य
शोधनापेक्ष्या सत्य घटने बद्द्लच शंका उपस्थित करतात ज्या मूळे चर्चेचा फोकसच बदलतो.
हे सर्व जाणून बूजून केले जाते यात शंकाच नाही.
अश्या व्रुत्तीचा बंदोबस्त होणे आवश्यक झाले आहे.
दामोदरसुत सध्या मी निष्क्रीय
दामोदरसुत सध्या मी निष्क्रीय आहे त्यामुळे संदर्भ समजले नाहीत.
तुमची समस्या समजली. पण वयाने ज्येष्ठ असल्याने मनुष्यस्वभाव, समाज, निरनिराळ्या विचारधारा, मतमतांतरे यांबाबतचे मार्गदर्शन आपण इतरांना जास्त चांगल्या त-हेने करू शकाल. उद्या मी एखादा लेख लिहून तुमच्या विचारांना न पटणारे लिखाण केले तर तुम्ही त्याचा प्रतिवाद कराल कि नाही ? पण तुमच्याच म्हणण्याप्रमाणे मला तुमचे लिखाण पटले नाही तर उडवून टाकायची सुविधा असेल. अशा चर्चेला चर्चा म्हणता येईल का ? हा काही लोकशाही मार्ग वाटत नाही. ही आपल्याला न पटणा-या विचारांची गळचेपी झाली.
विचारात दम असेल तर संख्या महत्वाची ठरत नाही. तसच समोरच्यांच्या विचारांना स्वतः आदरपूर्वक असहमती दर्शवल्याशिवाय त्यांच्यावर नैतिक दडपण येत नाही.
सर्वात महत्वाचे म्हणजे मत न देणारे वाचक सुजाण असतात याचा इथे विसर का पडावा ? लोक आपले मत बनवत असतात. कुणी कितीही आदळआपट केली तरी चांगल्या विचारांना अव्यक्त +१ मिळत असतातच. एखाद्या संस्थेत शिकवली जाणारी विचारसरणी कुणी जशीच्या तशी स्विकारतो आणि समाजात असणारे निरनिराळे प्रवाह, उपप्रवाह यांची कुठलीच दखल न घेता ती सार्वजनिकपणे (भाबडेपणे) मांडू पाहतो तेव्हां वरीलप्रमाणे मनःस्थिती होत असावी हे माझे वैयक्तिक मत आहे.
चांगला शेतकरी जमिनीचा अंदाज घेतल्याशिवाय बी बियाणं कुठलं आणि कधी पेरायचं याचा निर्णय घेत नाही. वेळप्रसंगी मशागत तितकीच महत्वाची असते.
राहता राहीलं सत्य
तर सत्याचे प्रकार
एक माझं सत्य
दुसरं तुमचं सत्य
तिसरं त्यांचं सत्य
आणि इच्छा असलीच तर
निखळ सत्य
शेवटच्या प्रकारालाच सत्य म्हणत असतील याची शाश्वती नाही. त्यामुळे कुणीही सत्यशोधनाचे दावे केले तरी इतरांकडून संशयाने पाहीलं जाईल यात नवल ते काय ? ते पटवून द्यायची जबाबदारी ही संशोधकाचीच ! त्यासाठी आवश्यक असलेला संयम अंगी बाणवता न आल्यास सगळ्या मोहीमेवर पाणी पडण्याची शक्यता जास्त.
दिनेशदा १००% अनुमोदन. मुळात
दिनेशदा १००% अनुमोदन.
मुळात आपण जे लिहितो त्याचा आपला अभ्यास १००% असणं महत्वाच. मग आपण इतरांचं शंकासमाधान्/म्हणण खोडुन काढणं वगैरे लिलया करु शकतो. मत पटवण्याचा अट्टाहास करु नये. जो तो स्वतंत्र आहे स्वतःच मत ठरवायला. ( अशोक पाटीलजींच्या पोस्ट किंवा प्रतिक्रिया या बाबतीत माईलस्टोन आहेत)
<कोणत्याही लिखाणावर
<कोणत्याही लिखाणावर [प्रतिसादास अनुमति / प्रतिसादाची अपेक्षा नाही ] असे पर्याय प्रशासकांनी उपलब्ध करून द्यावेत. माझी प्रशासनाला तशी जाहीर विनंति या लेखाद्वारे मी करतो आहे.>
अहे की अशी सोय. लेखन पूर्ण झाल्यावर पइतक्यात प्रकाशन नको हा पर्याय निवडायचा. लेखन केल्याचे समाधान मिळेल, प्रतिक्रियांचा त्रासही नाही.
मयेकर अहो अशी सोय माबोवरच
मयेकर अहो अशी सोय माबोवरच कशाला हवी आहे, त्यासाठी कोणीही स्वतंत्र ब्लॉग काढू शकते आणि त्यामधे प्रतिक्रिया देण्याची सोयच ठेवायची नाही. सिम्पल !
वादे वादे जायते तत्वबोध:
वादे वादे जायते तत्वबोध: :p
ब्रह्मास्त्र प्राप्त झालेच तर
ब्रह्मास्त्र प्राप्त झालेच तर मयेकरांची प्रतिक्रिया उडवली जाईल असं दिसतंय
असं ब्रह्मास्त्र सगळ्यांना
असं ब्रह्मास्त्र सगळ्यांना मिळालं तर कोण कोण काय काय करेल यावर एअ धुमशान होऊन जायला पाहीजे
मयेकर, तुमचे हळू हळू झक्की
मयेकर, तुमचे हळू हळू झक्की होत आहेत (दिवा)
अवांतर प्रतिसादाबद्दल क्षमस्व
काही खालील मुद्दे.......
काही खालील मुद्दे....... स्पष्ट करावीत
१) सत्य केवळ आपलेच आहे इतरांचे नाही .....हे आपण कसे ठरवु शकाल.......?
२) मी लिहिलेलेच बरोबर इतरांनी त्यावर टिका अथवा नकारात्मक लिहु नये ...हे कसे सोशल साईट वर ठरवणार आपण?
३) आपण भारतदेशात आहात.. जेव्हा आपण आपला लेख सार्वजनिक करतात तेव्हा तो सगळ्याच समाजाचा होतो...त्यामुळे समाजाचे सर्वच लोक आपापली प्रतिक्रिया लिहिणारच त्यावर त्याला आपण कोणत्या अधिकाराने रोखणार ?
...
.
.
इतिहासात फक्त घटना सत्य असु शकते.....त्यामागचा उद्देश काय आहे हे कोणीच स्पष्ट करु शकत नाही ... प्रत्येक अभ्यासक आपापल्या परीने त्या उद्देशाचा अर्थ लावतो.. पण नेमके सत्य काय आहे तो सुध्दा ठाम पणे सांगु शकत नाही.. उदा. गांधींनी सरदार पटेल यांना पंतप्रधान का बनवले नाही ? नानासाहेबांनी पानिपत मधुन माघार का घेतली ? इत्यादी प्रश्न हे त्या व्यक्तींबरोबरच सत्य गायब होत जाते........ अश्या ऐतिहासीक उद्देशांवर वाद विवाद केला तर काहीच हातात उरत नाही .................
घटनांवर चर्चा करावी उद्देशांवर फक्त अर्थ लावु शकतो आपण..............
UDAYONE घटनांवर चर्चा
UDAYONE
घटनांवर चर्चा करावी उद्देशांवर फक्त अर्थ लावु शकतो आपण..............
१०० % अ नु मो दन
या विषयावर अनुकूल वा प्रतिकूल
या विषयावर अनुकूल वा प्रतिकूल प्रतिसाद देणार्या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद!
>>याला एक उपाय म्हणजे इथे हिंदुत्व असा वेगळा ग्रुप उघडणे आणि त्यातले धागे केवळ सदस्यांनाच पहाता येतील अशी सोय करणे.<<
गामा पैलवान जी,
'हिंदुत्व' असा वेगळा ग्रुप करणे योग्य होणार नाही. दुसर्यांचे प्रतिकूल विचार मला जाणून घ्यायचेच नाहीत असा अर्थ येथे अनेकांनी काढलेला दिसतो. खरे तर मला तसे अभिप्रेत नाही.
कसलीही प्राथमिक माहिती देखील ज्याला नाही असा एखादा जाणून बुजून चर्चा भरकटत कोठेतरी जावी याकरिताच कांहितरी अतिरेकी विधाने प्रतिक्रीयेत करतो, मग संतापून कोणीतरी त्याचा प्रतिवाद करतो आणि चर्चा भरकटते आणि सर्व विषयच हास्यास्पद होऊन जातो. या अशा खोडसाळ लोकांना चर्चेतून वगळण्यासाठी असा पर्याय देण्याची मागणी मी केली आहे.
ज्यांना प्रतिकूल का होईना प्रतिसाद द्यायचे असतील तर ते विचारपूस मध्ये देतील. विचार करण्यायोग्य प्रतिकूल प्रतिसादांना उडविले जाणार नाही. ते इतरांनाही पहायला मिळतीलच!
'विचार करण्यायोग्य' हे कोण ठरवणार? हा प्रश्न वर उल्लेख केलेले जे खोडसाळ लोक आहेत तेच उपस्थित करतीलच! अनुभवाने असे कोण हे माहित होत असते. लेख लिहिणाराच त्यावर निर्णय घेईल.
>>प्रत्येकालाच आपली बाजु बरोबर वाटत असते, यावर उपाय एकच की ज्या मतांमुळे, विचारांमुळे दुही वाढेल आणि बाह्य शक्तींना त्याचा फायदा मिळेल ती मते, ते विचार चूक आणि ज्यायोगे सर्वजण मिळून प्रगती करू शकतो ते बरोबर.<<
महेशजी १००% सहमत. पण ही प्रगल्भता कितपत आढळते हे कांही धाग्यांवरील सर्व प्रतिसाद वाचून ठरवा?
>>शिवाय एकदा सत्याचा शोध सुरु केला की मग सापडलेले सत्य आपल्याला अगदी कटू वाटणारेही असू शकते ही शक्यता मनात ठेवावी.<<
विजय कुलकर्णीजी,
अहो 'प्रतिकूल तेच घडेल' याची तयारी ठेवूनच आशावादी दृष्टिकोन ठेवून काम करण्याची शिकवण आम्हाला आहेच. आकाशात प्रखर सूर्य दिसत असतांनाही जे जाणून बुजून अमावास्येची रात्र आहे असे म्हणताहेत त्यांच्याशी हुज्जत घालून शक्ति वाया जाऊ नये याची काळजी घेणे एवढाच उद्देश! आणि यात गैर काय आहे?
>>दामोदरसुत - प्रश्न पटला. तुमचे उत्तर पूर्णपणे नाही पटले.<<
सुसुकु जी ,
माझ्या उत्तरामागची भूमिका मी पुन्हा एकदा वर मांडली आहेच. तरी ती प्रत्येकाला पटेलच असे नाही हे मान्य!
>>मबो वरील काही मंडळी सत्यशोधनापेक्ष्या सत्य घटने बद्द्लच शंका उपस्थित करतात ज्या मूळे चर्चेचा फोकसच बदलतो. हे सर्व जाणून बूजून केले जाते यात शंकाच नाही. अश्या व्रुत्तीचा बंदोबस्त होणे आवश्यक झाले आहे.<<
विवेक नाईकजी,
आपण माझे म्हणणे नेमकेपणाने जाणलेत याबद्दल धन्यवाद! या वृत्तीचा बंदोबस्त करता येणार नाही. आपणच मार्ग काढला पाहिजे. त्यासाठी 'प्रतिसाद नको' च्या पर्यायाची मागणी मी केली आहे.
कांही प्रकारच्या लेखांसाठीच त्या पर्यायाचा उपयोग करावा लागेल. प्रशासन प्रत्येक प्रतिसाद तपासू शकणार नाही आणि त्यांनीच ते डिलिट केले तर त्यांच्यावर पक्षपाताचा आरोप सहजच होणार.
>>कुणीही सत्यशोधनाचे दावे केले तरी इतरांकडून संशयाने पाहीलं जाईल यात नवल ते काय ? ते पटवून द्यायची जबाबदारी ही संशोधकाचीच ! त्यासाठी आवश्यक असलेला संयम अंगी बाणवता न आल्यास सगळ्या मोहीमेवर पाणी पडण्याची शक्यता जास्त.<<
युरी गागारीनजी, येथील कांही लेखांवरील प्रतिक्रीयांची संख्या पहा आणि त्यातील कांही प्रतिक्रीयांचा दर्जा पहा म्हणजे मी असा पर्याय का मागतो आहे ते ध्यानी येईल अशी आशा आहे.
>>मुळात आपण जे लिहितो त्याचा आपला अभ्यास १००% असणं महत्वाच. मग आपण इतरांचं शंकासमाधान्/म्हणण खोडुन काढणं वगैरे लिलया करु शकतो. मत पटवण्याचा अट्टाहास करु नये. जो तो स्वतंत्र आहे स्वतःच मत ठरवायला. ( अशोक पाटीलजींच्या पोस्ट किंवा प्रतिक्रिया या बाबतीत माईलस्टोन आहेत)<<
मोहन की मीराजी , 'आपला अभ्यास १००% असणं महत्वाच.' मान्य.
पण ०% अभ्यास असलेल्या आणि ज्याला टक्केवारी वाढवायचीच नाही आहे त्याच्याबरोबर वितंडवाद करण्यात माझा वेळ आणि शक्ति जाऊ नये म्हणुन मी प्रयत्न केला तर ती कांहीजण म्हणतात तशी 'विचारांची गळचेपी' कशी काय होते?
>>अहे की अशी सोय. लेखन पूर्ण झाल्यावर पइतक्यात प्रकाशन नको हा पर्याय निवडायचा. लेखन केल्याचे समाधान मिळेल, प्रतिक्रियांचा त्रासही नाही.<<
भरत मयेकर जी,
लेखाचे प्रकाशन मला हवेच आहे.
लेखाखाली 'प्रतिसाद नको' असा पर्याय हवा आहे. 'विचारपूस' मध्ये लोक प्रतिकूल प्रतिसाद देऊ शकतीलच. त्यामुळे कोणाचा प्रतिसाद उडविला गेला तरी त्यालाही प्रतिसाद दिल्याचे समाधान आणि मला लेख वाचकांपर्यंत पोचविल्याचे समाधान असे दोघांचेही समाधान साधता येईल. जे खोडसाळ पणाने लिहितात त्यांची थोडी अडचण होईल. पण त्याला नाईलाज आहे.
आकाशात प्रखर सूर्य दिसत
आकाशात प्रखर सूर्य दिसत असतांनाही जे जाणून बुजून अमावास्येची रात्र आहे असे म्हणताहेत त्यांच्याशी हुज्जत घालून शक्ति वाया जाऊ नये याची काळजी घेणे एवढाच उद्देश!
आकाशात सूर्य आहेच याची जर तुम्हाला खात्रीच आहे, तर धागा काढून पुन्हा सत्य्शोधन आणि लोकांची मते मागवा याचे प्रयोजन समजले नाही. तुमच्या घराची खिडकी उघडा मग तुम्हाला सूर्य दिसेलच...... आधी स्वतःच सूर्य आहे का, चंद्र आहे का, आकाश आहे काअसे प्रश्न विचारायचे. मग प्रतिकूल उत्तरे मिळालई की हे लोक टवाळखोर आहेत म्हणायचे.. हे कसले सत्यशोधन?
<<आकाशात प्रखर सूर्य दिसत
<<आकाशात प्रखर सूर्य
दिसत असतांनाही जे
जाणून बुजून
अमावास्येची रात्र आहे
असे म्हणताहेत
त्यांच्याशी हुज्जत घालून
शक्ति वाया जाऊ नये
याची काळजी घेणे एवढाच
उद्देश!
आकाशात सूर्य आहेच
याची जर
तुम्हाला खात्रीच आहे,
तर धागा काढून
पुन्हा सत्य्शोधन
आणि लोकांची मते
मागवा याचे प्रयोजन
समजले नाही.
तुमच्या घराची खिडकी उघडा मग
तुम्हाला सूर्य दिसेलच......
आधी स्वतःच सूर्य आहे का,
चंद्र आहे का, आकाश आहे
काअसे प्रश्न विचारायचे.
मग प्रतिकूल उत्तरे
मिळालई की हे लोक
टवाळखोर आहेत
म्हणायचे.. हे कसले
सत्यशोधन?
>>>जामोप्या, दामोदरसुत यांनी सावरकर धाग्यावरचे प्रतिसाद मनाला लावुन घेतलेले दिसतात, असो.
मी लेख लिहणार, प्रतिसाद विपुत द्या, म्हणजे इथे कोणी काहीही खरडेल की राव. ही सरळ दडपशाही आहे. दामोदरसुत प्लीज दुसरी बाजुही समजुन घ्या .
आकाशात आहे 'तो सूर्य आहे' हे
आकाशात आहे 'तो सूर्य आहे' हे एवढेच ठरवले की संशोधन संपत नाही. शास्त्रज्ञ तेथेच थांबत नसतात. सूर्य म्हणजे नेमके काय आहे? तो इतकी ऊर्जा निर्मां करतो तो कशामुळे? त्याची प्रखरता कमी जास्त कशामुळे होते? आणि इतर हजारो बाबी जाणून घेण्यासाठी अथक प्रयत्न चालूच ठेवतात. ज्यांना निव्वळ खोडसाळपणा करून यात व्यत्ययच आणायचा आहे त्यांना समजण्यापलिकडची ही गोष्ट आहे. तरीही त्यांचा येथे येऊन जो धुडगूस चाललेला असतो तो थांबविण्यासाठीच 'प्रतिसाद नको' हा पर्याय ठेवावा अशी मागणी मी प्रशासनाकडे करतो आहे. तरीही 'विचारपूस' मध्ये प्रतिसाद देता येतोच की. यात 'विचारांची गळचेपी', 'दडपशाही' आहेच कोठे? प्रतिसादाच्या नावाखालील 'धुळवड' करणारे असा आरोप करीत राहाणारच आहेत. सर्वसाधारणपणे प्रतिकूल असले तरी प्रतिसाद सर्वांना हवेच असतात. पण 'धुळवड' नको असते.
धुळवड एका बाजुने साजरी होत
धुळवड एका बाजुने साजरी होत नाही.. तुमचे भाटगिरी करणारे लोक डुकराचा मेंदू, गुढगा तपासा असले शब्द वापरतात तेंव्हा ती काय ज्ञानाची दिवाळी असते का? ती धुळवड नसते काय? पण आम्ही कधी त्याचा बाउ केला नाही की अॅडमिनकडे कधी तक्रार केली नाही.
स्वतःला हवे तसे भाटगिरी करणारे प्रतिसादच हवे असतील तर स्वतःच्या ब्लॉगवर लिहा. आणि कुठल्या राजकीय पक्षाची जाहिरातच करायची असेल तर मायबोलीच्या पानावर जशा जाहिराती लावलेल्या असतात, तसा एखादा पेड जाहिरातीचा ऑप्शन तुमच्यासारख्या भाटांसाठी अॅडमिनने सुरु केला पाहिजे नै का?
दामोदरसुत ,ब्लॉग हाच उत्तम
दामोदरसुत ,ब्लॉग हाच उत्तम पर्याय आहे तुम्हाला. धाग्यावर प्रतिक्रिया नकोत असे म्हणणे म्हणजे मायबोलीचा आत्माच काढुन घ्या असे म्हणणे झाले.
हिंदुत्व असा वेगळा ग्रुप
हिंदुत्व असा वेगळा ग्रुप उघडणे
अगदी अनुमोदन... हिंदुतव असा वेगळा ग्रुप काढा.
हिंदुत्ववाद्याना मुसलमान, किरिशचन, कमुनिस्ट नको असतात.
मराठे, दलित, बौद्ध याना संघीय हिंदुत्ववाले नको असतात.
त्यामुळे हिंदुत्ववाद्यांच्या बाजूला ब्राम्हण आणि वरील जाती वगळता इतर हिंदुधर्मीय उदा लिंगायत.. असे मोजकेच लोक आहेत.... या लोकानी वेगळा ग्रुप काढावा. त्याने कुणाला काही फरक पडात नाही.
बाकी, या सगळ्या इतर जाती धर्मांविरोधात आणि मतप्रणालींविरोधात लिहून हिंदुत्ववादे लोक काँग्रेसला मदतच करतच आहेत..
त्यामुळे असे धागे सार्वजनिक जरी झाले/ ठेवले तरी सामान्य जनता हिंदुत्ववाद्यांची ऋणीच राहील नै का? 
त्या धाग्यात विरोधी लोकानी
त्या धाग्यात विरोधी लोकानी कुठे टवाळी केली आहे?
त्यानी विचारलेले मूल भूत प्रश्न, तुम्हाला सत्य शोधायला उपयोगी पडतील या उद्देशाने त्यानी मांडले.. तुम्हाला यावर विचार नसेल करायचा, तर करु नका... उगाच आपली गळचेपी होत आहे, असा अक्रोश कशाला?
डॉलर, >> हिंदुत्ववाद्याना
डॉलर,
>> हिंदुत्ववाद्याना मुसलमान, किरिशचन, कमुनिस्ट नको असतात.
>> मराठे, दलित, बौद्ध याना संघीय हिंदुत्ववाले नको असतात.
हे आपलं मत झालं. त्याचा आदर करून एक सांगावंसं वाटतं की, कोण लोक नकोत त्यापेक्षा कोण लोक हवेत त्याकडे माझ्यासारख्या हिंदुत्ववाद्याचं लक्ष आहे.
आ.न.,
-गा.पै.
दामोदरसुत, तुमचा मुद्दा
दामोदरसुत, तुमचा मुद्दा कळला.
प्रश्न सत्य-असत्याचा नाही, तर एखादा धागा कोणत्या 'इंटेंन्शन'ने काढला आहे याचा आहे. माबोवर तरी 'ताकाला जाउन भांडं लपवायचे' लई प्रकार पाहिले आहेत. ते लक्षात घेउन भांडाफोड झाल्यास 'धागा खतरेमें है' ची आरोळी मारायची यावरही उपाय पाहिजेच! आता यालाच तुम्ही मूळ चर्चेचा फोकस बदलणे म्हणणार का?
शेवटी एकच- ऐतिहासिक घटनांबाबत सत्य, वस्तुस्थिती इ. गोष्टी आत्यंतिक रिलेटीव्ह आहेत.