विंटर गार्डन, ऑकलंड भाग ३/४

Submitted by दिनेश. on 8 March, 2012 - 00:02

सख्या चला बागामधिं, रंग खेळू चला..

१)

२)

३)

४)

५)

६)

७)

८)

९)

१०)

११)

१२)

१३) किटकभक्षी घटपर्णी

१४)

१५)

१६)

१७)

१८)

१९)

२०)

२१)

२२)

२३)

२४)

२५) कमळाचे फळ, यातल्या बियांपासून मखाणे करतात.

२६) कमळाचा कळा !!

२७)

२८)

२९)

गुलमोहर: 

घटपर्णी आजपर्यंत फक्त पाठ्यपुस्तकात पाहिले होते, ते ही ब्लॅक न व्हाइट. आज कळलं खर कसं दिसत ते Happy
कमळाबद्द्ल च्या माहिती बद्द्ल धन्यवाद! २२व्या फोटोतिल फुले कोणती आहेत? खूप छान आहेत Happy

त्या घटपर्णीसाठीच तिथे किटक जोपासले होते. (फार माजल्या होत्या त्या वेली.)
फोटोत दिसताहेत ती पानेच म्हणायची. (बाजूला फुलांचा दांडोरा पण दिसतोय.)

२२ क्रमांकाचे छोटेसे झाड होते. नाव नाही माहित Sad

दिनेशदा, तिन्ही भाग पाहिले... अप्रतिम!! सही रंग आहेत एकेकाचे.
जास्ती करून बिगोनिया प्रकारातली फुलं आहेत का? पानांवरून बिगोनिया वाटताहेत.
कमळाचा कळा भारीये!
ते २७ नं चे फूल थोडे आपल्याकडच्या मे फ्लॉवर सारखे आहे नै!
आणि २४ नं गोल्डन ड्युरांटा सारखे वाटतेय. (जगाच्या पाठीवरची कुठलीही फुलं बघितली की मन नकळत आपल्याकडच्या फुलांशी असलेलं/जाणवलेलं साधर्म्य शोधायला बघतं नाही?)
सगळे फोटो आणि फुलं सुंदर!

हि रंगाची उधळणही खासच Happy

(जगाच्या पाठीवरची कुठलीही फुलं बघितली की मन नकळत आपल्याकडच्या फुलांशी असलेलं/जाणवलेलं साधर्म्य शोधायला बघतं नाही?)>>>>>शांकली Happy +१

मस्त!!!
किटकभक्षी घटपर्णी पहिल्यांदाच बघितली. कसे काम करते ते? किटक आत पडल्याबर बाहेर नाही पडू शकत का? घटपर्णी आतुन चिकट असते का?

गंधर्वा,
ज्या जमिनीत क्षारांची कमतरता आहे, खास करुन नायट्रोजनची, त्या जमिनीत
या वनस्पती वाढतात. यांच्या काठावर एखादा किटक बसला, कि त्याला आकर्षण
वाटेल असे गोड पाणी आतल्या बाजूस काठावर असते. तिकडे तो सरकला, कि आतल्या द्रवात तो पडतो. आतल्या भित्ती गुळगुळीत असल्याने त्याला बाहेर पडणे
अशक्य असते. त्यातल्या द्रवातच तो बुडतो. मग त्या द्रवातील पाचक द्रव्ये त्या
किटकाचे विघटन करतात. आणि त्याचा केवळ सांगाडा राहतो.
या वनस्पती तशा लबाडही असतात. कारण त्यांची फुले या सापळ्यांपेक्षा वेगळ्या
पातळीवर असतात. (फोटोत दिसताहेत) आणि परागीवहनांसाठी त्यांना याच किटकांची मदत होते.
कातळावर, जिथे सुपीक मातीचे थर तयर होऊ शकत नाहीत किंवा दलदलीत जिथे
पाण्यातील क्षार, वनस्पतींना शोषता येत नाहीत, तिथे या वनस्पती वाढतात.
आपल्याकडे कास पठारावर आणि व्हेनेझुएला मधल्या रोरायमा पर्वतावर अशी परिस्थिती आहे. (माझा एक सविस्तर लेख होता, यावर.)

---

शांकली / जिप्सी
मी तुलनाच सोडून दिली, कारण आपल्याच झाडांची तिथली रुपे, फार वेगळी आहेत.

वा मस्त. घटपर्णी व कमळ फळ, कळा हे फोटो तर फारच आवडले. मागच्याच आठवड्यापासुन किटकभक्षी वनस्पती हि कॉनसेप्ट मुलाल सांगायचे मनात आहे. वरील ती लिंक पण आता उपयोगी पडेल Happy
धन्यवाद.

व्वा!
कीटक भक्षी घटपर्णी.........दुधीभोपळा कोरून उलट्या तुतार्‍या /तत्सम वाद्यच केल्यासारखं वाटतंय!

दिनेश, इतकी वेगवेगळी फुले आम्हाला दाखवल्याबद्दल खूप धन्यवाद.

ते ३,६,८ मधले फुल कसले मस्त आहे - गुलाब आणि जास्वंदी यांचा संकर केल्यासारखे वाटतय. १८ आणि २२ खासच आणि २४ बघताना "चांदणे शिंपीत जाशी" ची आठवण होतेय. २५ आणि २६ - इतक्या जवळून पहिल्यांदाच पाहिले कमळाचे अंतरंग. २७ एकदम मे-फ्लॉवरचा 'कुंभ के मेलेमे (का जिजामाता उद्यान के फ्लॉवर एक्झीबिशनमे ?) बिछडा हुआ भाइ' दिसतोय. पण सगळ्यात जास्त आवडले ते २३ नंबरचे फुल - कसली चमक आहे त्याच्या रंगात!

इतकी सगळी फुले एकाच जागी
धन्यवाद दादा....
कमळाच फुल प्रथमच फळ प्रथम पाहील आणि ते असत हे आत्ताच समजल.....

माधव,
३/६/८ मऊसर पाकळ्यांची असतात आणि तिथे ती टांगलेल्या कुंड्यांमधे लावतात.
पिवळा-गुलाबी-लाल असेच रंग पण त्याच्या अनेक छटा दिसतात. पण गुलाब आणि
जास्वंदीपेक्षा फारच वेगळी.
२३ ऑर्किड आहे.
फेसबुकवर आणखी आहेतच. चौथा भागातली पण आणखी फुले तिथे रात्री ठेवतो.

व्वा! झक्कास मेजवानी. कमळाचा गडू मस्तच.
विविध रंगी, आणि विविध, आकार-प्रकारांची फुले दाखविल्याबद्दल धन्यवाद दिनेशदा.

सुंदर! सुंदर! अतिसुंदर!!! Happy

घटपर्णी बद्दल शाळेत शिकलो होतो...

कमळाचम फळ पहिल्याम्दाच बघितलं Happy

मस्त मस्त फोटो..

कमळाचे फळ पाहुन मनात आशा अंकुरली Happy

कमळाच्या कळ्याने असे राक्षसी रुप का बरे धारण केलेय????

Pages