पेढ्यासाठी:
२५० ग्रॅ. रिकोटा चीज
१/४ कप साखर
वेलदोड्याची पूड आवडीनुसार
दोन चिमूट बेकिंगपावडर
मलाईसाठी :
एक छोटा डबा मास्करपोने चीज ( mascarpone cheese )
चवीनुसार एक-दोन चमचे साखर
केशर
वेलदोडा पावडर आवडीनुसार
सजावटीसाठी बदाम,पिस्ते किंवा साखरेची फुलं,मणी इत्यादी.
अवन १८० डिग्री से. किंवा ३५० फॅ ला तापायला ठेवावा.
एका भांड्यात रिकोटा चीज, साखर, वेलचीपूड आणि बेकिंगपावडर एकत्र करुन घ्यावे.
मफिन पॅनमध्ये एकेक मोठा चमचा मिश्रण घालून अवनमध्ये ३० ते ३५ मिनिटे बेक करावे.
पेढे बाजूने सोनेरी तांबूस दिसू लागले की सुरी घालून पाहावी. ती कोरडी बाहेर आली तर पेढे तयार आहेत.
आता हे पेढे गार करत ठेवावे ( फ्रीजमध्ये नव्हे. )
मलाई बनवण्यासाठी एका भांड्यात मास्करपोने चीज, आवडीनुसार एखाददोन चमचे साखर ( मी थोडे अगोडच ठेवले होते. ) वेलचीपूड, केशर असे सगळे एकत्र ढवळून घ्यावे.
पेढे गार झाले की त्यावर हे मलाईचे मिश्रण लावावे.
वरुन बदाम-पिस्त्याचे काप किंवा दुसरी आवडीची सजावट करावी.
मलाईबहार तयार आहे
मला बंगाली मिठाई अतिप्रिय आहे. मध्ये नेटवर रिकोटा चीजच्या रसगुल्ल्याची रेसिपी मिळाली पण केल्यावर लक्षात आलं की हा प्रकार रसगुल्ल्यासारखा लागत नाही. मग विचार केला ह्याची रसमलाई करुन अपेक्षाभंग होण्यापेक्षा बंगाली मिठाईचाच वेगळा प्रकार करता येईल. त्यातून तयार झाली ही मिठाई 'मलाईबहार'
बेक केलेले असल्यामुळे काही पेढे तांबूस होतात पण त्याने चवीत काहीही फरक पडत नाही. उलट ते छानच लागतात.
मास्करपोने चीज गोडसर सायीसारखे लागते. ते ह्या रेसिपीसाठी वापरायची कल्पना सुचली. ही कॄती करुन उरले तर सायीसारखे भाज्या, डिप्स ह्यात वापरता येते.
करायला एकदम सोपा, झटपट आणि तोंडात विरघळणारा हा पदार्थ करुन बघाच.
हा रिकोटा चीजचा रसगुल्ला नव्हे. बंगाली मिठाईचाच हायब्रिड प्रकार म्हणायला हरकत नाही.
भारतातल्या लोकांनी घरी करायच्या फंदात पडू नये. त्यापेक्षा हलवायाकडून बंगाली मिठाई आणून चापावी
यमी.
यमी.
तोंपासु हलवायाकडून बंगाली
तोंपासु![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हलवायाकडून बंगाली मिठाई आणून चापावी <<<<<<<अनुमोदन
कसलं तोंपासू आहे हे..!!
कसलं तोंपासू आहे हे..!!:)
वा! काय दिसते आहे.
वा! काय दिसते आहे.
मस्त फोटो अगो. रिकोटा बहुतेक
मस्त फोटो अगो. रिकोटा बहुतेक मिळेल इथे पण मास्करपोने मिळेल का?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दुकानातून आयतीच मिठाई आणून चापावी तू म्हणाल्याप्रमाणे
अरे व्वा अगो मस्त वाटतेय
अरे व्वा अगो मस्त वाटतेय रेसिपी, होळी च्या निमित्याने नक्की करुन बघेन.. फोटो ही तोंपासु![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खत्तरनाक ! एखाद्या तिखटजाळ
खत्तरनाक ! एखाद्या तिखटजाळ पदार्थाबरोबर काँबिनेशन म्हणून करून बघण्यात येईल![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
टीपा मस्त आहेत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
क्लास!
क्लास!
खतरनाक दिसतय. मास्करपोने
खतरनाक दिसतय. मास्करपोने चीजची मलई मालपुवा किंवा शाही टुकडा की काय ब्रेडचा प्रकार आहे त्यात पण भारी लागेल. सहीये उद्या करेन शक्य झाल्यास. होळी आहे ना उदा ?
सहीच आहे रेसिपी. नक्की
सहीच आहे रेसिपी. नक्की करणार.
फोटो एकदम खंग्री आहे.
नक्की काय करणार आहेस हे ठरव
नक्की काय करणार आहेस हे ठरव सिंडे
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
छान दिसतेय मिठाई !! उरलेल्या
छान दिसतेय मिठाई !!
उरलेल्या मास्करपोने चीजसाठी: पाउंड केक आडवा कापावा तीन सेक्शन्स मधे. प्रत्येक सेक्शन वर आधी मास्करपोने चीज पसरावं त्यावर मिक्स्ड बेरीज चा एक थर, वरून केक असे लेयर्स लावावेत. अफलातून लागतं.दिसतंही छान आणी पार्टी साठी हिट्ट आयटम.
होळी आहे म्हणजे मालपुवाच
होळी आहे म्हणजे मालपुवाच करणार![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त रेसिपी, अगो. सजावटपण छान
मस्त रेसिपी, अगो.
सजावटपण छान केली आहेस.
वा वा! झकास पाककृती!
वा वा! झकास पाककृती! रिकोटाचीजाचे बेक्ड गोळे आटवलेल्या दुधात टाकून रसमलई केली आहे, पण मास्कारपोने वापरून मलाईबहार करण्याचा विचार सुचला नाही. अगो, धन्यवाद!
मस्त रेसिपी, आज करावीच ट्राय.
मस्त रेसिपी, आज करावीच ट्राय. प्रॅडीची आयडिया पण भारी
खुप छान आहे रेसीपी!!
खुप छान आहे रेसीपी!!
व्वा! काय जबरी प्रकार आहे! हा
व्वा! काय जबरी प्रकार आहे!![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
हा प्रकार चापायला परदेशवारीच करावी लागेल!
सजावटीसाठी मला साखरेची फुलं नकोत. बदाम पिस्ताच हवा!!
काय मस्त पदार्थ आहे.
काय मस्त पदार्थ आहे.
कातिल!!! मस्त पाकृ सुंदर
कातिल!!!
मस्त पाकृ
सुंदर सजावट आणि तोंपासु फोटो ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अभी बनानेकोच मांगता![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आता पुढच्या फेब मध्ये अगो, ते
आता पुढच्या फेब मध्ये अगो, ते बेक करताना बदामाच्या आकाराच्या साच्यात ठेव आणी गुलाबी रंग घाल आणि दिलबहार असं नाव दे.
वॅलेंटाइन ट्रीट होईल!
बंगाली मिठाई मला पण फार
बंगाली मिठाई मला पण फार आवडतात.
अगो, फोटो फारच टेंपटिंग आलाय. रिकोटा चीजचा कुठलाच पदार्थ मला जमला नाहीये. बघु हा कसा होतोय.
भारी दिसतोय. सोप्पाही वाटतोय
भारी दिसतोय. सोप्पाही वाटतोय करायला.
आज पुपोचा प्लॅन घाटला.(हो
आज पुपोचा प्लॅन घाटला.(हो घाटलाच). एवीतेवी बंगाली प्रकारच खाल्ले जातात. तरीपण
नाहीतर हाच केला असता..
तेव्हढाच आमार स्वामी खुश..
मी एकदा पुपोत रिकोटा चीज
मी एकदा पुपोत रिकोटा चीज घालून पोळ्या केल्या... छान लागत होत्या.. दोन्ही प्रांत खुश.
अर्धे सारण + अर्धे रीकोटा चीज एकत्र केले. चीज अर्थात बेक करून मग मिक्स केले.
त्याप्रमाणात गूळ वाढवला...
काय दिसतीये मिठाई!
काय दिसतीये मिठाई! ऑस्सम!
आमच्याकडच्या सगळ्या गोडखाऊंना खूप आवडेल.
आणखी एक आयडिया, रिकोटा चीज
आणखी एक आयडिया, रिकोटा चीज बदामी आकारात साखर न टाकता बेक करून ते थंड झाल्यावर मग त्यावर साखरेचा पाक टाकून (किंवा त्या पाकात डूबवून) फ्रीजमध्ये गारेगार मरून मग मास्क्पोनीत चीजमध्ये लाल रंग टाकून डिझाईन बनवू शकतो. मध्ये पुन्हा गुलाबी फुल.. खल्लास!
खुप मस्तं. हे स्वप्रयोगातून
खुप मस्तं. हे स्वप्रयोगातून केलयं म्हणून अजुन कौतुक![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अगो, हे बघ लगेच सामान आणून
अगो, हे बघ लगेच सामान आणून केली मिठाई. मस्त लागतेय. मला बंगाली मिठाया आवडत नाहीत. पण मला पण आवडली. लेकाने पण यमी यमी करुन खाल्ली. तुझ्या मिठाईसारखी सुबक सुंदर नाही दिसतेय पण चवीला खरच भारी झालीये![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सह्हीच गं सिंडरेला एकदम
सह्हीच गं सिंडरेला
एकदम तोंपासु ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages