विंटर गार्डन, ऑकलंड भाग २/४

Submitted by दिनेश. on 6 March, 2012 - 23:54

होली है !!!!!!!!

१)

२)

३)

४)

५)

६)

७)

८)

९)

१०)

११)

१२)

१३)

१४)

१५)

१६)

१७)

१८)

१९)

२०)

२१)

गुलमोहर: 

रंग रंग के फुल खिले है....... फुल खिले है गुलशन गुलशन Happy
मस्तच प्रचि Happy

ते प्रचि १३ मध्ये काय आहे? फुल कि फळं ?
प्रचि १४ मधली परात झक्कास Happy

प्रचि १३ पाहुन आंब्याची आठवण झाली.

गुढीपाडव्याला मुहुर्ताचा आंबा कापायचाय. पण अजुन बराच अवधी आहे Sad

मोनाली, तेवढी शुद्ध नव्हती ना मला !>>> हेही खरे म्हणा. Happy

१३ मधले कोकोचे झाड आहे. ती कोकोची फळे (आता तू कल्पना करु शकतोस, कि राणीच्या बागेत त्या झाडाला फळे लागली असती तर ) पण त्या बियांना चव नसते.
बांबूच्या टोपलीत, केळीची पाने टाकून त्या बिया ७ दिवस आंबवल्या, तर त्यांना तो चॉकलेटचा स्वाद येतो.
१४, मधे आहे ते खर्‍या कमळाचे पान ! मीटरभर व्यास असतो त्याचा.

अत्यंत अत्यंत अत्यंत सुंदर...... Happy

दिनेशदा या रंगात निसर्गाची किमया आहे की, मानवाची..?

आ हा हा - काय सुंदर सुंदर फुले व त्यांचे सुंदर सुंदर फोटो........
प्र चि ४, ५, ६ व २१ हे फुक्सिया प्रकारतले आहेत - यो रॉक्सने जे नुकतेच फोटो टाकले आहेत - त्यात आहेत या प्रकाराची फुले. ( रंगीबेरंगी www.maayboli.com/node/33233)
प्र चि १७ बाल्सम वाटतंय.
बाकीचे जाणकार सांगतीलच.

रंगांची उधळण सुंदरच. १६ मधलं फूल कसलं देखणं दिसतंय.

हे कमळाचं पान होय! ही कमळं मॉरीशसमधली आहेत. तुम्ही म्हणता तसं प्रचंड मोठं वाढतं हे पान. त्यावर एखादा पक्षी आरामात बसू शकतो. याला मॉरीशसच्या बोटॅनिकल गार्डनमध्ये काढलेल्या फोटोंचा झब्बु :

हे कमळांचं तळं. कमळंही दिसताहेत.

lotus.jpg

आणि ही पानं जवळून. नुकती फुटलेली पानं आत वळलेली असतात. मग वाढून प्रचंड वाढतात. तेव्हा ती मोठ्या थाळ्यांसारखी दिसतात. मग त्यांना छिद्र पडत पडत ती पाण्यात विरून जातात.

lotus1.jpg

मामे, लबाड आहेस. एवढे चांगले फोटो का दडवून ठेवतेस ?

हे म्हणजे खरे कमळ. कारण या कमळात रात्री भुंगा (आपला नाही, खराखुरा)
बंदीवान असतो. हे कमळ पहिल्या दिवशी पांढरे आणि दुसर्‍या दिवशी गुलाबी होते.

आणि १६ नंबर तर ग्रेटच आहे. फार वेगळे डोके लढवलेय या झाडाने !

<<<<हे म्हणजे खरे कमळ. कारण या कमळात रात्री भुंगा (आपला नाही, खराखुरा)>>>> Proud

दिनेशदा, रंगपंचमी आवडली!

हे म्हणजे खरे कमळ. कारण या कमळात रात्री भुंगा (आपला नाही, खराखुरा)
बंदीवान असतो. >>> Lol

हे कमळ पहिल्या दिवशी पांढरे आणि दुसर्‍या दिवशी गुलाबी होते. >>> माझ्या फोटोत दोन्ही कमळं आहेत. इथे स्पष्ट दिसत नाहीत पण फोटो तुमच्या कॉम्प्युवर सेव्ह करून मोठा करून बघा. एक गुलाबी आणि एक पांढरं कमळ आहे.

आणि १६ नंबर तर ग्रेटच आहे. फार वेगळे डोके लढवलेय या झाडाने !
>>>> संत्र सोलून द्या प्लीज दिनेशदा. काहीतरी इंटरेस्टिंग कहाणी असणार.

त्या बोटॅनिकल गार्डनमध्ये तर गाईडनं सांगितलं की लहान मुलंही या पानावर उभं राहू शकतं. पण आता आपलं मूल कोण त्या पानावर ठेवणार? म्हणून ती दंतकथा तशीच राहिलीये. Happy

मामी, फूलांमधला मुख्य भाग असतो तो स्त्रीकेसर, पूंकेसर, बिजांडकोष वगैरे.
भोवतालच्या पाकळ्या या नंतर तयार होत गेल्या. त्या पाकळ्या म्हणजे, रंग बदललेली
पानेच असतात. त्यांचे मुख्य काम किटकांना किंवा पक्ष्यांना आकर्षित करणे.

बहुतांशी झाडात, मधे हे मुख्य अवयव आणि सभोवताली गोलाकार पाकळ्या अशी रचना असते. पण या झाडाने मात्र एखाद्या पक्ष्याची नक्कल केलीय. पंख, मान वगैरे (पुढे मागे चोच पण तयार करेल हे झाड) शिवाय देठ लांब आणि लवचिक, त्यामूळे
तो भाग, झाडापासून वेगळा दिसतोय.

वॉव, दिनेशदा ..... रंजक माहिती. खरंच पक्षासारखंच दिसतय ते. मला त्यातली लय खूप आवडली.

Pages