मदत हवी आहे: युकेमधे वास्तव्य

Submitted by गमभन on 5 March, 2012 - 12:12

नमस्कार मंडळी,

मी एका आयटी कंपनीत काम करीत आहे. मला onsite साठी Watford, Hertfordshire, UK येथे जावे लागणार आहे.

मला खालील बाबींसाठी मदत हवी आहे

१. घरभाडे (मी bachelor आहे. वरील ठिकाणी रुम शेयर करुन राहणार आहे.), रुम शोधण्यासाठी मदत / वेबसाईट इ. माहिती. शक्यतो भारतीय रूममेट
२. युकेमधील transportation cost, माध्यम यांची माहिती
३. जेवण्याचा खर्च (Vegetarian)
४. राहणीमानाचा खर्च
५. एकंदर प्रति महिना खर्च
६. टॅक्स?
७. फोन, नेट इ. खर्च
८. भारतातून काय काय आणावे लागेल?

मी पहिल्यांदाच देशाबाहेर जाणार आहे, तरी इतर काही गोष्टी मिसल्या असतील तर मला मार्गदर्शन करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१. तुम्ही किती महिन्यांसाठी येत आहात?
भागीदारीत घर शोधण्यासाठी स्पेअररूम.को.यूके चांगले आहे. मी वापरले आहे. वॉटफर्ड लंडनच्या जवळ असल्याने (खरे तर म२५ च्या आत म्हणजे लंडनातच) भाडे जरा जास्त असेल. साधारण £५०० पर्यंतची तरतूद भाड्यासाठी करावी. कमी लागले तर उत्तमच. साधारणतः एका महिन्याचे भाडे आगाऊ घेतात.
२. या भागात ट्रेन, बस वगैरे पब्लिक ट्रान्सपोर्ट चांगला आहे. तरी शक्य झाल्यास कामाच्या ठिकाणापासून जवळचे घर बघावे. जवळ जरुरीच्या वस्तूंपुरती दुकाने आहेत का पाहून घ्यावे. म्हणजे नंतर ओझी वहात तंगडतोड होत नाही.
३. स्वयंपाक स्वतःच करावा लागेल! जवळ वेम्ब्लीभागात भारतीय पद्धतीचा शिधा मिळेल. जेवणाच्या खर्चासाठी महिना £३०० ची तरी तरतूद करावी.
४. बाकी खर्च म्हणजे वीज, पाणी, इंटरनेट वगैरे बिले भागीदारीत साधारण महिना £५० पर्यंत जातात.
५. थोडक्यात एकंदर प्रतिमहिना खर्च £८०० च्या घरात जातो.
६. टॅक्स ...? तो कापूनच पगार मिळतो.
७. फोन (मोबाइल) वापरण्यावर आहे. बेसिक £१० प्रति महिना.
८. कपडे, पादत्राणे इ दैनंदिन गरजेच्या वस्तू. गरज भासल्यास एक छोटा प्रेशर कुकर.

युके मधलं आयुष्य इथे पण थोडी माहिती आहे गमभन, तसेच यु.के. मधल्या मायबोलीकरांच्या गप्पा या धाग्यावर गप्पांसाठी किंवा प्रश्न विचारण्यासाठी लोकं सापडतील.

गमभन, मॄदुला ने व्यवस्थित माहिती दिली आहेच..
एकटेच आहात तर राहण्यासाठी 'स्टुडीओ अपार्ट्मेंट' पण स्वस्त ऑप्शन आहे.
तुमच ऑफिस Leavesden पार्क च्या एरियात आहे का? असेल तर Watford वरुन शट्ल बसेस आहेत.
भारतातुन बाकी बेसिक मेडिसिन्स पण सोबत ठेवा.
इथे सध्या थंडी आहे त्यानुसार गरम कपडे सोबत लागतील

तुमचे वॉटफर्ड मध्ये कुठे आहे ऑफिस? मी गेली ९ वर्षे वॉटफर्ड मध्ये काम करते आहे.
वॉटफर्ड हा बराचसा पाकिस्तानी भाग आहे. भारतिय आणि भारतियसद्रुश सगळ्या गोष्टी इकडे मिळतात. भारत-पाकिस्तान वैर वगैरे भारताबाहेर फार नसते Happy त्यामुळे त्रास होणार नाही काहीही. फक्त भारतातुन आल्या आल्या कल्चर शॉक बसु शकतो Happy
रहाण्यासाठी लाँग टर्म येणार असाल तर हेमेल हेम्पस्टेड/ अ‍ॅप्स्ली वगैरे भागात घर/खोली बघा, किमती कमी आहेत. साधारण २ bhk बेताच्या अवस्थेतल्या फ्लॅटला 700£ प्रती महिना पडतात. शेअर केल्यावर अजुन कमी पडतिल.
शॉर्ट टर्म साठी रुम शेअर वॉटफर्ड मध्येच, ऑफिसच्या जवळपास बघु शकता. इंडस्ट्रिअल एरियात ऑफिस असेल तर दुसरे गाव, जिकडे जाण्यासाठी रात्री उशिरापर्यंत बस वगैरे आहेत, निवडा.
कुठलीही मदत लागली तर मला संपर्क करा. माझे बरेच कलिग्ज या भागात रहातात.

बाकी बरिच माहिती मृदुला आणि माधुरीने दिलीच आहे.

ह्या भागाची काही माहिती नाहीये मला. पण जर काही व्यवस्था होउ शकली नाही तर कळवा. मी काही दिवसांसाठी सोय करू शकेन !

माझा लंडन मधील अनुभव, काही उपयोग झाल्यासः
१. घरभाडे (मी bachelor आहे. वरील ठिकाणी रुम शेयर करुन राहणार आहे.), रुम शोधण्यासाठी मदत / वेबसाईट इ. माहिती. शक्यतो भारतीय रूममेट
>> लंडन मधे बरेच गुज्जु आहेत, मी त्यांच्या कडेच पीजी म्हणुन स्वतंत्र खोली घेउन राहीलो. खर्च : ५०० पाउंड (एका वेळच्या जेवना सकट)
२. युकेमधील transportation cost, माध्यम यांची माहिती>> लंडन मधे तरी १२३ पाउंड (झोन १ ते ३). ह्यात ट्युब, बस, सगळेच आले
३. जेवण्याचा खर्च (Vegetarian) >> १०० (एका वेळेसच घर मालका कडे)
४. राहणीमानाचा खर्च >> ५० (निरव्यसनी असल्यामुळे, अन्यथा व्यसनाच्या प्रकारावर अवलंबुन)
५. एकंदर प्रति महिना खर्च >> माझा ८०० च्या आसपास
६. टॅक्स? >>वेगवेगळे स्लॅब्स असतात, तरी साधारन १०-२५%
७. फोन, नेट इ. खर्च>> GF असेल तर २०० पाउंड अन्यथा ५-१० पाउंड
८. भारतातून काय काय आणावे लागेल?>> फक्त दवा आणि दुवा. ते सोडुन बाकी सगळेच युके ला मिळते

प्रतिसादासाठी सर्वांचे आभार !!

माझे ऑफीस Croxley Green Business Park मधे आहे.

मी एकटाच येणार आहे. बहुतेक ६-८ महिन्यासाठी.
या माहितीचा मला बजेट ठरवण्यासाठी खुप फायदा झाला.

शकुन, अदिती,
काही गरज लागली तर नक्कीच संपर्क करीन.

माझ्या एका मित्राला एम बी ए करण्यासाठी लंडन ला यायचे आहे. प्रत्य्क्ष अ‍ॅड्मिशन अगोदर जुलै महिन्यातच तिथे येउन एक महिना राहुन विद्यापीठ नक्की करावे अन तिथे अ‍ॅडमिशन घ्यावी असा विचार आहे. टुरिस्ट व्हिसा वर तेथे येउन मग तिथेच विद्यार्थी म्हणुन प्रवेश मिळु शकेल का? एक महिना राहन्यासाठी पेन्शन्/लॉज/मोटेल ची माहिती कुठे मिळेल? माअहितगारांनी कृपया संपर्क करावा. धन्यवाद.

विसाविषयी मला काही माहिती नाही.
पण एक महिन्याच्या वास्तव्यासाठी या वेबसाईट्स उपयोगी पडतील.

http://www.gumtree.com/
http://www.spareroom.co.uk/

मी स्वतः गमट्री वरुनच घर शोधले होते. स्टुडंट म्हणून येणार असेल तर ह्या काही वेबसाईट:
http://www.accommodationforstudents.com/London.asp
https://www.unite-students.com/
http://www.rightmove.co.uk/student-accommodation/London.html

सेंट्रल लंडन मध्ये घर महाग पडेल आणि एका महिन्याचे वास्तव्य असल्याने घरमालक जास्त भाडे आकारेल. लंडनच्या उपनगरात वेम्बली, हॅरो, ई. मध्ये अनेक गुजु आहेत. तिथे पेइंग गेस्ट म्हणून सोय होऊ शकेल.

बोउर्न एंड (बकिंगहमशायर) ईथे कामासाठी असल्यास... साधारण कुठला भाग रहायला बरा पडेल जिथे बर्‍यापैकी आपले लोक असतील आणि बर्‍यापैकी वसाहत व शाळा असतील..?
पिन्नर फार लंब पडेल का..? कुणि मायबोलीकर या दोन ठिकाणांच्या आसपास आहेत का... सहकुटूंब अनुभव असलेले?

Back to top