ट्री हाऊस इंटरनॅशनल स्कूल बद्दल माहिती हवी आहे

Submitted by निंबुडा on 29 February, 2012 - 05:19

राजस सध्या प्लेग्रूप (प्रायव्हेट प्लेग्रूप) मध्ये आहे. सध्या तरी ज्या प्लेग्रूप मध्ये आहे तिथेच नर्सरीसाठी कंटिन्यू करूया असे ठरवितो आहोत. साईड बाय साईड कल्याणमधल्या शाळांची माहिती काढणे चालू केले आहे (बोर्ड कुठले, फी स्ट्रक्चर काय, स्कूल बस ची फॅसिलिटी वै. वै.).

ट्री हाऊस इंटरनॅशनल स्कूल च्या प्रीस्कूल्स ची चेन खूप फेमस आहे असे ऐकले आहे. प्रीस्कूल च्या यशानंतर त्यांनी आता प्रायमरी आणि हायस्कूल या प्रांतातही शाळांचा विस्तार करायला सुरुवात केल्याचे दिसते.

कल्याण मध्ये त्यांनी नुकतेच नवीन बिल्डिंगचे बांधकाम चालू केले आहे. अर्धी शाळा बनून तयार आहे. आम्ही स्वतः जाऊन शाळा बघून आलो. आम्हाला एरीया + क्लासरूम्स + लॉकॅलिटी इ. च्या अनुषंगाने शाळा बरी वाटली. पण त्यांच्या एकंदरीत शिक्षण पद्धतीचा कुणाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष (नातेवाईकांत) काही अनुभव आहे का?

शाळेमध्ये ICSE & IGCSE असे दोन्ही बोर्ड आहेत. पैकी IGCSE ला 7th standard (grade) पर्यंत व ICSE ला 2nd standard (grade) पर्यंत अफिलिएशन मिळाले आहे असे तिथल्या एका मॅडमनी सांगितले. सरकार एकाच वर्षी सगळ्या इयत्तांना अफिलिएशन देत नाही. टप्प्याटप्य्याने देते असे त्या म्हणाल्या. याबाबतीत कुणाला काही माहिती आहे का? मला ICSE बोर्ड मध्ये इंटरेस्ट आहे. त्यामुळे मी येत्या २-३ वर्षांत ह्या शाळेच्या २री नंतरच्या इयत्तांना ग्रांट मिळेल ना या विषयी साशंक आहे. मी मागे कुठतरी असे ऐकले किंवा वाचले होते की ICSE बोर्ड च्या एका शाळेने एका इयत्तेनंतरचे अफिलिएशन न मिळाल्याने त्या इयत्तेच्या मुलांना त्यांच्याच SSC बोर्डाच्या पुढील इयत्तांमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी पालकांना भाग पाडले. Uhoh

KG च्या अ‍ॅडमिशन्स साठी लहान मुलांचे व पालकांचे इंटरव्ह्यूज सगळ्याच शाळा घेत आहेत असे दिसले. मी तर ऐकले होते की कोर्टाने दिलेल्या निकालाप्रमाणे असे इंटरव्ह्यूज घेणे अवैध आहे. Uhoh मी स्वतः या इंटरव्ह्यू नामक अग्निदिव्याला घाबरले आहे. इतक्या लहान मुलाला इंटरव्ह्यू साठी कसे तयार करून घ्यायचे हा मला पडलेला प्रश्न आहे. ते टाळायचे असेल तर नर्सरी पासूनच स्कूलिंग चालू करण्याचा ऑप्शन आहे. तसे करावे का? राजस भारी चंचल आहे. त्याला येत सर्व असते पण आपण विचारू तेव्हा उत्तरे देईलच, पोएट्री म्हणून दाखवेलच याची खात्री नाही. शिवाय इंटरव्ह्यू वै. प्रकाराला त्याला सामोरे जावू द्यायलाही मन तयार होत नाही. Sad नर्सरी च्या अ‍ॅडमिशन साठी इंटरव्ह्यू ची भानगड नाहीये आणि नर्सरीनंतर तीच मुले KG ला ट्रान्स्फर केली जातात. त्यांचा नर्सरीचा वर्षभराच्या डेव्हलपमेंट्स चा आढावा शाळा घेत राहणार आणि त्या रेकॉर्ड्स च्या आधारे KG ची अ‍ॅडमिशन पक्की होणार असे ट्री हाऊस इंटरनॅशनल स्कूल मध्ये कळले. म्हणजे निदान एकाच दिवशीच्या फक्त १०-१५ मिनिटांच्या इंटरव्ह्यू वर KG ची अ‍ॅडमिशन होणार नाही हा मला दिलासा वाटतोय.

कल्याण मध्ये ICSE बोर्डाचे पोदार इंटरनॅशनल स्कूल सुद्धा आहे. एका मैत्रिणीचा भाचा तिथे शिकतोय. आता ७ व्या ग्रेड मध्ये आहे. तिच्याकडून असे कळले की शिक्षक अजिबात चांगले नाहीत. इंग्रजी माध्यमाचे शिक्षक असून त्यांची स्वतःची इंग्रजीची बोंब आहे. Uhoh शिवाय फी ही अव्वाच्या सव्वा आहे. मॅनेजमेंट बरे नाही. त्यामुळे तिच्या भाच्याला तिथून काढून SSC बोर्डाच्या दुसर्‍या एका शाळेत घालण्याचा त्यांचा विचार आहे. ट्री हाऊस इंटरनॅशनल स्कूल च्या शिक्षकांविषयी कुणाचा अनुभव काय आहे? मी तर पोदार इंटरनॅशनल स्कूल मुंबईमध्ये बर्‍यापैकी चर्चेत आहे असे ऐकले होते. मग मुंबईच्या बाहेर (कल्याण इ. ठिकाणी) त्यांच्या शाळांच्या ब्रांचेस काढताना फक्त शाळेचा विस्तार हेच एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवत असतील का? बाकी शाळेचे शिक्षक, मॅनेजमेंट इ. गेले तेल लावत! Sad असे असेल तर "ट्री हाऊस इंटरनॅशनल स्कूल च्या मुंबई ब्रांचेस मधले अनुभव कल्याण ब्रांच साठी कंपेरेबल आणि कंसिडरेबल असतील का?" हा ही एक प्रश्न आहेच. Uhoh

असो. तुमचे views, अनुभव, info शेअर करा प्लीज.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आई गं. एवढ्याश्या पिल्लांची परिक्षा आणि इंटरव्ह्यु? प्रवेशासाठी हल्ली अशी परिक्षा किंवा मुलाखत घेता येत नाही असं ऐकलं होतं मी तर. इथे तर पालकांची मुलाखत पण घेतली जात नाही. जर एखाद्या शाळेने तसं काही केलं आणि त्याबद्दल तक्रार केली गेली तर चौकशी होवून कार्यवाही होवू शकते. पण इथे केजीनंतर शाळा बदलणं किंवा प्रवेश घेणं खूप अवघड आहे कारण शाळांमध्ये रिकाम्या जागा नसतातच बहूदा.

डि.ए.व्हि. ऐरोली मध्ये कन्यारत्नाच्या प्रवेशाच्या वेळी एका डॉल हाऊसमध्ये एका वेळेस ४-५ जणांना आत घेत असत.. (पालक बाहेर ..) आणि मग वर्गात ४-५ टिचर प्रत्येकास अगदी मांडिवर बसवुन कलर, अ‍ॅनिमल्स, बर्ड याबाबत विचारीत.. आमच कन्यारत्न आत जात असताना गृपमधिल एकाने रडण्यास सुरवात केली.. त्या बरोबर बाकिच्यांनीही त्याला साथ दिली.. (आमचीही त्यांना सामिल झाली).. end result ..अ‍ॅडमिशन फर्स्ट राऊंडला न मिळता.. वेटिंग लिस्ट मधुन घ्यावे लागले.. Happy बाकी शाळा खुपच चांगली आहे.

हल्ली चांगल्या शाळांकरता भारंभार अर्ज येतात. जर शाळेत ५०-६० जागा असतील आणि हजारोंनी अर्ज आले तर शाळेला देखिल काहीतरी निकष लावावा लागतो. शिवाय फ्रँचायजी असलेल्या सगळ्याच शाळा वाईट असाही निष्कर्ष काढून फायदा नाही. शाळेतल्या शिक्षकांचा संच कसा आहे, फॅसिलिटीज आहेत ना? हे तपासून मागच्या काही वर्षांचा ट्रॅक रेकॉर्ड बघून शाळा निवडावी. बाकीचे निकष आहेतच वरती दिलेले. अजून एक म्हणजे, सीबीएससी आणि आयसीएससी शाळांच्या किंमती भरमसाठ आहेत असं नाही. सरकारी ग्रँट मिळणार्‍या शाळांपेक्षा नक्कीच जास्त आहेत पण अगदी झेपणारच नाहीत अशा नसतात.

खूपच महत्वाचा विषय आहे.
अशीच माहिती बंगलोरच्या शाळांबाबत मिळवण्याचे काम मला चालू करायचे आहे.
शालेय शुल्क आजकाल खूप असते हे जगजाहीर आहे.;) पण आमच्या पाचवीत जाणार्‍या मुलाचे शाळा शुल्क साधारणत: किती असेल (डोनेशन तर असणारच ही ऐकीव माहिती)? अमेरिकेत तो पब्लिक स्कूलमध्ये जातो त्यामुळे मला काहीही माहिती नाही. यासंदर्भात आधी काही लेखन माबोवर झाले आहे काय? असल्यास त्याच्या लिंका कश्या मिळतील?
वर उल्लेख आल्याप्रमाणे आईवडिलांची सर्टिफिकिटे तर पाहतिलच पण नात्यातल्या एका अनुभवानुसार आजीआजोबांचीही मागितली होती. आजीआजोबांचे शिक्षण शाळेच्या दृष्टीकोनातून कमी असल्याने अ‍ॅडमिशन नाकारली हे मी काही वर्षांपूर्वी ऐकले आणि आश्चर्य वाटले.

डीएव्ही ऐरोली मध्ये प्रवेश घेताना एंट्रन्स च्या दिवशी एक फीची रक्कम सांगितली होती. परगावाहून येणार म्हणून आम्ही तो डीडी बनवून घेउन गेलो. नाव लागले तर लगेच फी भरायची होती. सर्व पालकांची अशक्य धावपळ झालेली आहे ह्या डीडी प्रकरणात. अ‍ॅडमिशन प्रक्रियेच्यावेळी एका पालकाने पाल्याबरोबर शाळेत त्याला धीर द्यायला व दुसर्‍याने फोन द्वारे संपर्कात राहून हे डीडीकाढणे वगैरे काम करावे. अ‍ॅडमिशन हे जॉइंट मिशन समजूनच पार पाडावे. म्ह्णजे कमी धावपळ व उरस्फोड होइल.

नाव लागल्यावर सर्क्युलर पाहिले तर फी चक्क साडेतीन हजाराने कमी केलेली होती. म्हणजे नवा डीडी काढावाच लागला. आधीच्यावर बॅंक चार्जेस वाया गेले. असे ही होउ शकते.

चांगली हुषार मुलेही उगीच नर्वस होतात व घाबरून जातात. त्यांना सारखा धीर देणे व अरे तू नीट करशील रे. वगैरे धीर देणे करावेच लागते. त्रासाने सुकून जातात ती अगदी तेव्हा बरोबर फ्रूटी, केक,
त्यांच्या आवडीचा खाऊ ठेवावा, शाळेची मीटिन्ग झाल्यावर त्यांना गार दूध, सरबत आइस्क्रीम असे काहीतरी द्यावे म्हणजे शुगर व फ्लुइड्स रिस्टोअर होतात व पोरांना फार स्ट्रेस होत नाही. त्या दिवशी त्यांच्यावर आणिक काही दडपण आणू नये.

अशा शाळांमध्ये लाजाळु, लवकर मिक्स न होणार्‍या बाळाना प्रवेश कसा मिळेल.
येत तर असत सगळं पण सोबत आइ बाबा नाहियेत, समोर अनोळखी व्यक्ती आहेत तर सगळेच बाळं एकाच पद्धतीने कसे रिअ‍ॅक्ट होतील?
जो बोलेल तो हुशार आणि जो बोलणार नाही तो ढ?
मला हे गणित कळालेल नाहिये. कोणी समजावुन संगितल्यास बरं होइल.

zakaasrao,

ashaa shaalet ghalayachach naahee. karan jya shikshakanna kalat naahe mool baavaralay tyaa shaalet ghaloon mulancha bhaavvishw udhvast nahe karayacha. naav motha aahe result changale lagtaat he nikash shalesathi chukiche aahet. sarvaat pratham shikshak kase aahet? agadee lahan mulanna output cha compulsion karat naaheet naa he khoop mahatvacha. mothya mulanna suddha output sumaar asel tar kasa treat karataat te mahatvacha.

EQ (emotional quotiont) disturb hoil asa kahi nahi karayacha, tyaat shaala selection suddha aala.

Pages