कोस्टल कर्नाटका - मुरुडेश्वर

Submitted by डॅफोडिल्स on 3 February, 2011 - 00:52

मुरुडेश्वराच्या मंदिराची गोष्ट इथे आहे

मुरुडेश्वराचे हे मंदीर कंडुकागिरी नावाच्या टेकडीवर आहे. ह्या टेकडीच्या तिन्ही बाजूंना अरबीसमुद्र आहे. ह्या मंदिराच्या प्रवेशद्वाराची ही २० मजली गोपुरं अडिचशे फुट उंच असून त्याला राज गोपुरा असे म्हणतात. जगातल्या सर्वात उंच अश्या ह्या गोपुरात वर जाण्यासाठी लिफ्ट आहे. श्री. आर. एन. शेट्टी नामक उद्यजकांनी हे बांधकाम करवून घेतले आहे. तसेच ह्या मुरुडेश्वर मंदिराचा विकास आणि कंडुका हिल वरील मोठ्ठ्या शंकराचेही काम करवून घेतले आहे.

गोपुराच्या प्रमुख द्वाराजवळ खर्‍या हत्तींच्या उंचीचे खरे वाटतील असे दोन मोठ्ठे हत्ती आहेत.

राज गोपुराचा फोटो

अजून एक

मुरुडेश्वराच्या मंदिरात गणपती, कार्तिकेय यांची छोटी मंदिरे आहेत आणि मुख्य म्रिदेश लिंग (मुरुडेश्वर) आहे.

मुरुडेश्वर मंदीर सुर्योदयाच्या वेळी

मंदिराच्या मागिल बाजुस टेकडीवर जगातील सर्वात उंच (१२३ फुट/ ३७ मिटर्स) अशी शिवशंकराची मूर्ती आहे. ही अतिशय देखणी सुबक, प्रमाणबद्ध मूर्ती बनवण्याचे काम दोन वर्षे सुरु होते.

अतीभव्य शिवशंकर

शंकरा समोर उभा असलेला रावण आणि गुराख्याचा मुलगा

टेकडी वरून

अजुन एक

टेकडीवर इतर ठिकाणीही अश्या मूर्ती आहेत.

अर्जूनाचा रथ

नुकतिच मासेमारी करून आलेली छोटी होडी

फ्रेश कॅच चमचमणारे बांगडे Happy

खेकड्याचे घर

खूप जवळून

खेकड्याचा फोटो काढायला त्याच्या मागे धावत होते. तर त्या बोटवाल्या काकांच्या मुलाने पटकन खेकडा पकडला.. नको नको म्हणत असताना त्याच्या नांग्याही तोडून टाकल्या. Sad म्हणे हा आता काढा फोटो.

आर एन एस रोसॉर्ट जवळ सनसेट

संपूर्ण बिच, मुरुडेश्वर मंदीर, दोड्डा इश्वरा आणि आर एन एस.

ह्या मोठ्ठ्या ईश्वराला बघून मी वाळूत काढलेले शिवशंकराचे चित्र.
दोन्हीचा एकत्र फोटो घेण्याचा प्रयन्त केला पण अतिशय उन असल्याने काय होतंय ते समजतच नव्हतं

इथे अजून फोटो आहेत. ओम नमः शिवाय !

माझ्या लेकाने बनवलेला किल्ला Happy

गुलमोहर: 

सही. .. माझा पहीला नंबर.. Happy
तोषांनी सांगीतलेला सुर्यदेव आणि त्याचा रथाचा फोटो कुठे आहे ?
मावळत्या सुर्याच्या पार्श्वभुमीवर त्याचा खुप छान फोटो येतो.

मस्तच. अप्रतिम.
मंदिरावरची कलाकुसर, हत्ती, गोपूर, शंकराची मूर्ती, अर्जुनरथ, रावण आणि गुराख्याचा मुलगा, खेकड्याचे घर,सनसेट, आणि तू काढलेले शंकराचे चित्र सर्व आणि सर्वच सुंदर.

सगळ्यांना धन्स Happy

त्या सूर्याच्या जवळ दोन्ही दिवशी एक वोल्व्हो बस उभी केलेली होती. कुठूनही फोटो काढला तरी ती आलिच. Sad

आणि हा रथाचा फोटो टाकलाय ना तिथे मासेमारिच्या बोटीच्या आधी Happy

अर्जुनाचा रथ नव्हे सुर्यदेवाच्या रथाचा फोटो कुठे आहे ? असे मी विचारत होतो. Happy

सर्व फोटो खूप छान आहेत . माबो साठी उपलब्ध केल्याबद्दल धन्यवाद . रावण आणी गुराख्याचा पोरगा याबाबत जास्त माहिती मिळाली तर खूपच बरे होईल. तसेच मुरूडेश्वरला कसे जाता येईल याविषयी थॉडे सविस्तर.

दक्षे धन्स Happy

देवराम ,

http://www.maayboli.com/node/23087 ह्या लिन्क वर आहे ना रावणाची गोष्ट
http://www.maayboli.com/node/22683 आणि इथे आहे बाकीची माहिती. Happy

सतिश Uhoh असा कुठे रथ आहे सूर्याचा ? मी तर टेकडीला प्रदक्षिणा करून पण आले. फक्त मोठ्ठा सूर्य दिसला.

बरोबर तोच सुर्यरथ आहे. मावळतीच्या सुर्याच्या पार्श्वभुमीवर त्याचा खुप चांगला फोटो घेता येतो. मी मोबाइल्वर काढलेला फोटो इथे अपलोड करतोय.
IMG_1217.JPG

भ्या Sad हे दिसतच नाही ... इथे उंच कंपाऊंड बांधलंय ना.. हे बघ
सहाफूटांपेक्षा नक्कीच उंच भिंत आहे. आत्ता तु सांगितल्यावर मला ह्या फोटोत घोड्यांचे कान दिसत आहेत Proud