जाफ्फा केक :
२ कप सेल्फ रेसिंग फ्लार (२ कप मैदा + दीड टीस्पून बेकिंग पावडर)
७० ग्रॅम बटर
२ अंडी (हलकी फेटुन)
१/२ कप साखर
१/२ कप चॉकलेट चिप्स (डार्क किंवा मिल्क चॉकलेट)
१/२ कप संत्र्याचा ज्युस/रस
३/४ कप दूध
१टी स्पून संत्र्याची साल किसुन (झेस्ट) / संत्रा इसेन्स
चॉकसॉस (ऐच्छिक):
१/२ कप चॉक चिप्स,
१/४ कप क्रिम,
संत्र्याची साल किसुन (झेस्ट) / संत्रा इसेन्स (ऐच्छिक).
१. सर्वप्रथम ओव्हन २०० डि सेंटीग्रेडला तापत ठेवा. मफिन/कपकेक ट्रे मधे पेपर केसेस ठेवा. किंवा छोट्या केक टीन्स ला बटर आणि मैदा लावुन तयार ठेवा.
२. मोठ्या बोल मधे से रे फ्लार किंवा मैदा+बेपा मिश्रण २ वेळा चाळून घ्या. यात बटर घालुन हाताने चोळून घ्या.
३. यात साखर, फेटलेली अंडी, संत्र्याचा रस, दूध, चॉक चिप्स, किसलेली संत्र्याची साल/इसेन्स एक एक करुन घाला आणि स्पॅच्युला/स्पॅट्युला किंवा लाकडी चमच्याने नीट मिक्स करुन घ्या. खुप जास्त फेटायची गरज नाही.
४. हे मिश्रण तयार केक तीन्स्/पेपर कप मधे घाला आणि १५-२० मिनीटे बेक करा.
५. केक तयार आहेत का हे लोकरीची सुई, स्क्युअर टोचुन खात्री करुन घ्या आणि ओव्हन मधुन बाहेर काढुन थंड
व्ह्यायला ठेवा.
६. आता एकीकडे चॉक सॉस बनवा. हिटप्रुफ बोल मधे चॉक चिप्स काढुन घ्या. क्रिम एका पातेल्यात ओतुन गरम करायला ठेवा. जस्त वरती हलके बुदबुदे दिसायला लागले की आच बंद करा आणि हे गरम क्रिम चॉक चिप्स वर ओता. चमच्याने ढवळत रहा. गरम क्रिमच्या हीट मुळे चॉक चिप्स वितळतील आणि चॉक सॉस तयार होइइल. यात आवडत असेल तर किसलेली संत्र्याची साल / इसेन्स घाला.
७. थंड झालेल्या केक्सच्या टॉप्स ना एक एक करुन या सॉस मधे बुडवा आणि बाजुला ठेवा. थोड्याच वेळात चॉक सॉस सेट होइल. आणि मग जाफ्फा मिनी केक्स खायला तय्यार
१. चॉक सॉस करण्यापूर्वी केक पूर्ण थंड झाले आहेत ना याची खात्री करुन घ्या.
२. चॉक सॉस न करता नुसतेच मेल्टेड चॉकलेट वापरले तरी चालेल.
२. सजावटीसाठी जाफ्फा बॉल्स/चॉक बॉल्स / किंवा नुसती आयसिंग शुगर आणि किसलेली संत्र्याची साल वापरता येइल.
४. मुळ रेसिपी मधे ६० ग्रॅम बटर आणि १/२ कप दूध वापरले आहे परंतु या प्रमाणाने पहिल्यांदा केलेले केक जरा कोरडे वाटले म्हणुन या वेळेस मी बटर थोडे जास्त आणि दूध ३/४ कप वापरले. केक टॉप्स मस्त क्रिस्पी आणि केक्स आतुन चांगले सॉफ्ट झालेत.
वाह!
वाह!
लाजो मस्तच रेसिपी. फोटोपण
लाजो मस्तच रेसिपी. फोटोपण किलिंग
या विकेंडला नक्की ट्राय करेन.
लाजो, मस्त एकदम. फोटो तर
लाजो, मस्त एकदम. फोटो तर क्लासच. जाफ्फा नाव का आहे ?
लाजोजी ईज बॅक!!! मस्तच!
लाजोजी ईज बॅक!!! मस्तच!
मस्त
मस्त
आताच खावेसे वाटताहेत (कुणी
आताच खावेसे वाटताहेत (कुणी बनवून दिले तर )
असे फोटो देऊन लोकांचे कामातील
असे फोटो देऊन लोकांचे कामातील लक्ष काढून घेतल्याबद्दल प्रशासक आता यापुढे दंड आकारणार आहेत म्हणे, काळजी घ्या
मस्त
मस्त
हा केक बिन अंड्याचा पण बनवता
हा केक बिन अंड्याचा पण बनवता येत असेल ना ?
असे फोटो देऊन लोकांचे कामातील
असे फोटो देऊन लोकांचे कामातील लक्ष काढून घेतल्याबद्दल प्रशासक आता यापुढे दंड आकारणार आहेत म्हणे, काळजी घ्या >>
खरच अस करायला हव.
मस्त केक. लगेच उचलुन खावासा वाटतोय.
अशा फोटोनेही विचलित न होता,
अशा फोटोनेही विचलित न होता, जे प्रामाणिकपणे काम करत राहतील, त्यांना
कंपन्या खास बोनस देणार आहेत म्हणे...
लाजो, अगदी खमंग वास आला बरं का !
मस्तच! अशा फोटोनेही विचलित न
मस्तच!
अशा फोटोनेही विचलित न होता, जे प्रामाणिकपणे काम करत राहतील, त्यांना
कंपन्या खास बोनस देणार आहेत म्हणे...
लाजो, अगदी खमंग वास आला बरं का !>>>>>>>>> दिनेशदा एकदम बरोबर
लाजो अगदी तोंपासुच ग
लाजो अगदी तोंपासुच ग
आमी ढीस... भुक लागली फोटो
आमी ढीस...
भुक लागली फोटो बघुन.
अरे देवा, कसला जाचक फोटो आहे.
अरे देवा, कसला जाचक फोटो आहे. हा फोटो घरी बघितला गेला तर माझी आजची संध्याकाळ किचनमध्ये ओवनपुढे उभे राहण्यात जाईल
कालच घरी साईचे लोणी बनवले, त्याचा केकमध्ये वापर करावा असे बेत चाललेले. आज तो बेत पुरा होईल असे दिसतेय.
मस्त. एक शंका - ७० ग्राम बटर
मस्त.
एक शंका - ७० ग्राम बटर केव्हा व कसे घालायचे?
धन्यवाद मंडळी बेफि दिनेशदा
धन्यवाद मंडळी
बेफि
दिनेशदा
सांजसंध्या, बीना अंड्याचा करता येइल पण मी प्रयोग केलेला नाही.
जयु, मैद्याला बटर चोळून घ्यायचे
लाजो, उत्कृष्ट केक खूपच
लाजो, उत्कृष्ट केक
खूपच टेम्टिंग
मला एक सांग, २ कप मैद्य्या ऐवजी २ कप बारीक चाळलेली कणीक आणि २ अंड्याऐवजी १/२ किंवा एक चमचा खासो घेतला तर चालेल का?
किंवा अंड्याऐवजी आंबट दही घेऊ का १/२ वाटी?
धन्यवाद आर 
लाजो, मस्त आहे. साधना,
लाजो, मस्त आहे.
साधना, अनघा_मीरा अंड्याऐवजी १/२ कप कंडेन्सड मिल्क वापरा.
लाजो.. सुप्पर्ब!!!! अश्याच
लाजो.. सुप्पर्ब!!!! अश्याच उचलून खावेसे वाटत आहेत... टू टेंप्टिंग!!!
लाजो,केक चे नांव लाजवाब
लाजो,केक चे नांव लाजवाब आहे.तयार केक च्या दर्शनाने जीव सुखावला.करुन पहाणार्.एक उत्तम केक.
मस्तच साधना, काल केले
मस्तच

साधना, काल केले असशील(च) केक तर आज येतो संध्याकाळी
अरे तु आलास काय?? मी आज
अरे तु आलास काय??
मी आज प्रतिसाद दिलाय, त्यामुळे केक आज संध्याकाळी करण्यात येईल. तु ये रात्री
अशी स्माइली दिली गेली, नंतर हादरुन ती बदलली
)
(घाईघाईत
लाजो:- खुपच भारी ग... फोटो तर
लाजो:- खुपच भारी ग... फोटो तर एक से एक आलेत....
पुण्यात असतीस, तर ऑफिस सुटल्यावर लगेच तुझ्या घरी धावत आले असते.
मस्त तोपासु
मस्त तोपासु
मस्त दिसताहेत केक. करून बघेन
मस्त दिसताहेत केक. करून बघेन मी पण
>>घरी साईचे लोणी
>>घरी साईचे लोणी बनव>><<
हायला.... तुम्ही लोणी वगैरे घरी बनवता... इतका वेळ काढता(काढता हेच महत्वाचं...)
घरच्या लोण्याने केक अप्रतिम होतो. (आई बनवायची...)...
मस्त आहेत केक्स, लाजो.
मस्त आहेत केक्स, लाजो. बच्चेकंपनीला खुश करायचा शुअर शॉट फॉर्म्युला दिसतायत एकदम.
जाफ्फा नावाचं रहस्य काय? मला एकदम श्रीलंकेतलं जाफना आठवलं.
बेफी, दिनेशदा ....
परत एकदा धन्स जाफ्फा या
परत एकदा धन्स
जाफ्फा या नावामागचे रह्स्य -
'जाफ्फाज' या इथे मिळ्णार्या ऑरेंज फ्लेवर्ड चॉकलेट्स चे नाव आहे. ही चॉकलेट्स म्हणजे आत मिल्क चॉकलेट बॉल आणि त्यावर ऑरेंज फ्लेवर्ड कुरकुरीत कोटींग. मी डेकोरेशनला वरती लावलेत ते बॉल्स
या चॉकलेट्स मुळे ऑरेंज्+चॉकलेट अश्या फ्लेवरला 'जाफ्फा' फ्लेवर म्हणतात आणि म्हणुन या मिनी केकांचे 'जाफ्फा मिनी केक' असे नामकरण करण्यात आले आहे
यम्मी मस्त केक. लगेच उचलुन
यम्मी
मस्त केक. लगेच उचलुन खावासा वाटतोय.>>>>>+१
Pages