Submitted by दिनेश. on 27 February, 2012 - 00:37
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
झ
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
चार जणांसाठी
अधिक टिपा:
क्ष
माहितीचा स्रोत:
आजीच्या आठवणी.
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तोंपासु दिनेशदा, हा मसाला
तोंपासु
दिनेशदा, हा मसाला आधी करुन ठेवला पाणी न घालता किंवा पाणी घालुन वाटुन ठवला तर चालेल का? की चव उतरेल?
एखादा दिवस आधी करुन ठेवला तर
एखादा दिवस आधी करुन ठेवला तर चालेल. पण शक्यतो बाकिचे जिन्नस घालून उकळून ठेवला तर चांगले. दुसर्या दिवशी परत उकळायचा.
दिनेशदा... तोंपासु...
दिनेशदा... तोंपासु...
आहाहा!!तोंपासु..
आहाहा!!तोंपासु..
मस्तच दिनेशदा! यात मसाला तयार
मस्तच दिनेशदा!
)
यात मसाला तयार करुन टाकण्या एवजी कोल्हापूरी कांदा-लसुन चटनी वापरली तर चालेल का? (सध्या माझ्याकडे ताजी ताजी उपलब्ध आहे आणि मसाला तयार करण्याचा कंटाळा म्हणुन विचारते आहे
विनार्च, त्या मसाल्यात तळलेला
विनार्च, त्या मसाल्यात तळलेला कांदा असतो तर यात भाजलेला. चव खुपच वेगळी लागते. किमान कांदा / खोबरे तरी असे भाजून घेतले पाहिजे.
मस्त आहे आणि दिसतोयही.
मस्त आहे आणि दिसतोयही.
दिनेशदा , किती निगुतीने /
दिनेशदा ,
किती निगुतीने / उत्साहाने तुम्ही करत असता हो.
मला तुमच्या पाककलेचं / हौसेचं कौतुक वाटतं.
माझी आज्जी (बाबांची आत्या) हा रस्सा करते. त्यात बटाट्याच्या फोडी घालते.
खूप सही लागतो.
नाद करायचा न्हाई.... गावाकडची
नाद करायचा न्हाई....
गावाकडची आटवण आली बगा, कोल्हापूरी...जगात भारी.
शमा, हे सगळे आई / आजीकडूनच
शमा, हे सगळे आई / आजीकडूनच आलेय.
विजय, खरेच कोल्हापुरी जेवण आणि आग्रह.. भारीच.
दिनेशदा पदार्थ मस्तच आहे.आज
दिनेशदा पदार्थ मस्तच आहे.आज करून पाहिला चवीला मस्त!खूप आवडला.
दिनेशदा, जुनी आठवण आली. माझी
दिनेशदा, जुनी आठवण आली. माझी आई आणि आजी वेगवेगळ्या पध्दतीने मटणाचे प्रकार करत असत. गावठी मटण करताना कांदा-खोबरं निखार्यावरच भाजलं जायचं. आणि तेलावर लाल तिखट, गरम मसाला/काळं तिखट घालुन (चांगला तवंग येण्यासाठी) त्यावर कांदा-लसुण-खोबर्याचं वाटण परतुन तेल सुटायला लागलं की आलं-लसुण घालून शिजवलेल्या मटणात घातलं जायचं. एक उकळी आल्यावर कोथिंबीर चिरुन घालुन मटण बनवलं जायचं.
दिनेशदा, गावरान रस्सा म्हणजे
दिनेशदा, गावरान रस्सा म्हणजे मला भक्कम तेल असलेला वाटला होता. हा जरा वेगळा प्रकार वाटतो.
मस्त ...आमच्याकडे असाच
मस्त ...आमच्याकडे असाच करतात्...पण सिमला मिरची नसते त्यात आणि बटाटे उकडून घेण्याएवजी साले काढून फोडी आधी तळून घेतात्....ती चव जास्त छान लागते....बाकी चिकन मटण असेल तर प्रश्नच नाही.
वैद्यबुवा, खेडेगावात तेल
वैद्यबुवा, खेडेगावात तेल कुठलं ? बाजाराच्या दिवशी पाव किलोपेक्षाही कमी तेल
नेतात बायका. मग त्यातच आठवडा भागवायचा. खुपच आरोग्यपूर्ण आहार असतो,
त्यांचा शिवाय अंगमेहनही भरपूर. तेलाचा तवंग, लालभडक रंग हे नंतर आले.
दीपा, प्रत्येक गृहीणीच्या हातची चव वेगळी लागते, ती यामूळेच.
फुलराणी, मी पण बटाटे शॅलो फ्रायच केले आहेत.
आभार सुचरिता, मी तीन दिवस पुरवून पुरवून खातोय हा रस्सा !
नॉनव्हेजसाठीसुद्धा हा रस्सा
नॉनव्हेजसाठीसुद्धा हा रस्सा चालतो का?
अप्रतीम दिसतोय
दिनेश, गावरान रश्श्याचा रंग
दिनेश,
गावरान रश्श्याचा रंग लालभडक हवा बै... हा रस्सा नाही वाटत.
दक्षी+१. माझीसुद्धा थोडी
दक्षी+१.
, मला वाटलेलं मस्त लाल लाल भडक, भुरका मारता येण्यासारखा पातळ रस्सा असेल हा. पण हा खुप जाड आणि ऑरेंजी दिसतोय. गावरान म्हणजे झणझणीत लाल रसा पायजे ब्वा 
माझीसुद्धा थोडी निराशा झाली
माझी व्याख्या : गावरान >>
माझी व्याख्या : गावरान >> झणझणीत काळा
कोल्हापुरी : झणझणीत लाल रसा
नाही, असाच रंग असतो. आता
नाही, असाच रंग असतो. आता होटेलवाल्यांनी तेलाचा भरपूर तवंग असलेला, लालभडक रस्सा बाजारात आणलाय तो ऑथेंटिक नाही. हॉटेलवाले मालवणी / कोल्हापुरी नावाखाली जे पदार्थ विकतात ते अजिबात अस्सल नसतात.
मस्तच!!!! तोंपासु फोटो
मस्तच!!!!
तोंपासु फोटो
बरोबर दिनेशदा. तेलाच्या
बरोबर दिनेशदा. तेलाच्या किमतीचा मला अंदाज नाही पण मला वाटलं की गोडं तेल तस बर्यापैकी स्वस्त असेल गावात.
हे भलतच काहीतरी दिसतंय ....
हे भलतच काहीतरी दिसतंय .... रस्सा कुठे आहे साहेब ? तांबडा रसाचा पत्ताच नाही ...
मी टिपेत लिहिलेय कि, फोटोसाठी
मी टिपेत लिहिलेय कि, फोटोसाठी घट्ट ठेवलाय म्हणून !!
हो बेफि, नॉन व्हेज प्रकारे पण करता येतो हा.
गगनबावडा, मलकापूर, राधानगरी अशी जी घाटांच्या टोकावरची गावे आहेत, तिथे कांदा खोबर्याचा
असा रस्सा करतात. (म्हणजे पुर्वी करत असत.) कोकणातील राजापूर हून तिथे सुके खोबर यायचे.
कांदे असायचेच.
आता सर्रास हॉटेलमधे तिखटजाळ पदार्थ कोल्हापुरी / मालवणी म्हणून खपवतात. मी दोन्ही गावचा पाहुणचार गेली ४५ वर्षे तरी घेतोय. घराघरातून असे तेलकट तिखट पदार्थ अजिबातच केले जात नाहीत.
रेसीपी छान आहे पण , दिनेशदा ,
रेसीपी छान आहे पण ,
दिनेशदा , हॉटेल मध्ये लाल तवंग वगैरे खपवितात तेही अगदी खरे. तरीही माझ्या माहितीप्रमाणे गावरान रस्सा म्हणजे खरेतर चुलीवर, बुक्कीने कांदा फोडुन , तो चुलीत भाजून,मसाला पाट्यावर वाटुन करायचा प्रकार होता.
दाजीपुर अभयारण्यात ,पन्हाळ्यावर लोक तिथेच चुल मांडुन करतात सहसा. वरती दिपामानेनी लिहिलाय तो गावरान रस्सा अस मी तरी समजत होते. असो. परत केलात तर पातळ रस्सा करुन बाउल मध्ये ठेवून फोटो काढा प्लिज. म्हणजे मग माझ्या लक्षात येईल.