मिश्र भाज्यांचे लोणचे.

Submitted by सुलेखा on 27 February, 2012 - 06:03
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ फ्लॉवरचे तुरे.
१ मध्यम गाजर.
८ ते १० फरस बी च्या कोवळ्या शेंगा.
१/२ वाटी मटार चे दाणे.
फोडणी साठी-
३/४ वाटी तेल.
२ टेबलस्पुन मोहोरीची डाळ्,
२ टेबलस्पुन काश्मीरी लाल तिखट.
१ टेबल स्पुन मीठ.
१/२ टी स्पुन हळद.
१/२ टी स्पुन मेथीदाणा.
१/४ टी स्पुन मोहोरी.
१/८ चमचा खास लोणच्यासाठी असतो तो स्ट्राँग हिंग

क्रमवार पाककृती: 

फ्लॉवर ,गाजर चे लहान-लहान तुकडे चिरुन घ्या.फरसबी बारीक्-बारीक चिरुन घ्या.
या सर्व भाज्या बुडतील इतके पाणी एका पातेलीत उकळायला ठेवावे.
पाणी उकळले कि त्यात वर चिरलेल्या भाज्या व मटार चे दाणे घालुन १ मिनिट उलळवावे..
चाळणीत उपसुन एका स्वच्छ फडक्यावर उरलेला पाण्याचा अंश टिपण्या साठी १०मिनिटे पसरुन ठेवावे..
एका पसरट बाऊल मधे या भाज्या घेवुन त्यावर ति़खट-मिठ-मोहोरीची डाळ टाकुन चमच्याने मिक्स करुन घ्यावे.
लहान कढईत तेलाची फोडणी करुन त्यात मोहोरी तडतडली कि गॅस बंद करा .लगेच त्यात मेथीदाणा,हिंग पुड,हळद घालुन ही फोडणी भाज्यांच्या मिश्रणावर घालावी..
सगळे मिश्रण ढवळावे.
मिश्र भाज्यांचे लोणचे तयार आहे..

अधिक टिपा: 

यात हरभरा ,शलगम ,हिरव्या मिरचीचे तुकडे घालता येईल..
मेथीदाणा सबंध घातला आहे त्याची चव वेगळी येते.
हे लोणचे फ्रिज बाहेर जास्त टिकणार नाही.तेव्हा फ्रिज मधे ठेवल्यास २ दिवसापुरतेच थोडेसे बाहेर काढुन ठेवावे म्हणजे ताज्याचा स्वाद येत राहील.
मोहोरीच्या डाळीचा आंबटपणा या लोणच्याला पुरेसा आहे..त्यामुळे लिंबु/विनेगर घालायचे नाही..
काश्मीरी तिखटाने रंग सुंदर येतो.

माहितीचा स्रोत: 
माझी वहिनी.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही दिनेशदा, ते तर विनेगर व गुळ घालुन करतात्..त्या लोणच्याला अगदी थोडीशीच गोडसर चव व अगदी कमी विनेगर चा वास येतो..ते लोणचे प्लास्टीक बरण्यात भरुन ठेवले तरी टिकते.पंजाबी-सरदार लो़कांत गोभी-गाजर्-मुली-मटर और शलजम घालुन बनवतात्..भोपाळला असताना या लोणच्याची "रेलचेल"होती. कारण शेजारी-पाजारी तेच होतें.चव पहायला बाऊलभर तरी द्यायचे.प्रत्येकाची चव निराळी..भरपुर तेलाची फोडणी करुन त्यात बारीक चिरलेला कांदा,लसुण्,आले परतायचे.त्यात विनेगर व गुळ घालुन उकळायचे ही फोडणी भाज्या+मसाल्यावर ओतायची कि लोणचे तयार..
तरीपण तुमच्या या पोस्ट मुळे त्या दिवसांची अन त्या लोणच्याची आठवण करुन दिली त्याबद्दल धन्यवाद.

नका हो फोटोबिटो देत जाऊ, माणसाने काही वेळा काही खाल्लेले वगैरे नसते, उगाच तडफड होते जीभेची

नमस्कार,
फोटो काढेपर्यंत लोणचे संपले आहे, पण धन्यवाद देण्यासाठी आणि भाज्यांची लोणच्याची करकरित चव अनुभवली हे सांगण्यां साठी लिहित आहे,
Lonchyachaतयार मसाला वापरला, उकळत्या पाण्यात फ्लावर, मटार दाणे, तोंडली घालून 1 मिनिटाने गॅस बंद करून साधारण 5 मिनिटांनी पाणी काढून निथळत ठेवले, गाजर फक्त स्वच्छ धुवून गरम पाण्याच्या ठेवले होते, साधारण सर्व कामे आटोपल्यावर लोणचे केले, उत्तम चव, इथे खास नमूद करावेसे वाटते कि व्हिनेगर किंवा लिंबाच्या पाण्यात न ठेवता देखील भाज्यांची खास करकरीत चव आली,
सर्वांच्या प्रोत्साहित लिखाण, फोटो, अभिप्राय बद्धल त्रिवार धन्यवाद,

Back to top