Submitted by satish_choudhari on 2 April, 2009 - 01:49
बाई मी गेली पाण्याला
घागर घेऊन विहिरीला
विहिरीच्या बाजुला दिसली बाटली
भुंगा डसला नी पळत सुटली….
बाई मी गेली शेतात
घेऊन शिदोरी हातात
कमीन्या दिवानजीची नजर फुटली
फेकलं काम नी पळत सुटली….
बाई मी गेली बाजारा
आली घेऊन मोगरा
रस्त्यात पोट्ट्यांनी गर्दी कुटली
मारली एकाच्या नी पळत सुटली…..
बाई मी गेली सिनेमाला
तिकिट काढून थिएटरला
चुकिचा सिनेमा मी डोळे मिटली
सोडला सिनेमा नी पळत सुटली…..
बाई मी गेली जत्रेला
सोबत घेऊन कुत्र्याला
रस्त्यात त्याला कुत्री भेटली
डोकं धरलं नी पळत सुटली……
डोकं धरलं नी पळत सुटली……
कवि - सतिश चौधरी
गुलमोहर:
शेअर करा
बाई मी
बाई मी गेली मॉलला
कार्ड घेऊन खरेदीला
मॉलच्या बाजुला ऑफर दिसली
भुंगा डसल्यासारखी पळत सुटली….
बाई मी गेली ड्रायव्हींग्गला
घेऊन पीयुसी हातात
कमीन्या गाडीची काचच फुटली
सोडली गाडी नी पळत सुटली….
बाई मी गेली डीस्कोला
पास नाय मिळाला पबचा
रस्त्यात श्रीरामसेनेची गर्दी दिसली
डीस्कोला न जाता पळत सुटली…..
बाई मी गेली मल्टीप्लेक्स्ला
तिकिट काढून थिएटरला
रामूच्या सिनेमानी नजर विटली
सोडला सिनेमा नी पळत सुटली…..
बाई मी गेली पार्टीला
सोबत घेऊन नवर्याला
वाटेत त्याला खबर भेटली
इन्कम टॅक्स ची रेड पडली……
डोकं धरलं नी पळत सुटली……
चू भू द्या घ्या
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो
सतीश आणी
सतीश आणी केदार...

सतिश,
सतिश,
केदार,

बाई मी
बाई मी गेली जत्रेला
सोबत घेऊन कुत्र्याला
रस्त्यात त्याला कुत्री भेटली >>>>
रस्त्यात त्याला कुत्री भेटली...
कुत्र पिसाळल..पळत सुटली ...//?? (बाई का कुत्री ?? )
जबरी आहे..हे हे हे हे

केदार
०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा
************ निजरु
************
निजरुप दाखवा हो, हरि दर्शनास द्या हो |
जयदीप
जयदीप ओक
**********
मी दुसर्यांन सारखा होऊ शकत नाही कारण मी माझत्वं घालवु शकत नाही.
आता काय
आता काय भोंड्ल्याची गाणी की काय खरं नाही...
विहिरीच्य
विहिरीच्या बाजुला दिसली बाटली
भुंगा डसला नी पळत सुटली….
भुंगे का बाटलीसे क्या वास्ता?
भुंगा
भुंगा बहुदा पिदाडा असावा..
केदार ..... लई
केदार ..... लई भारी....

****************
ठेविले अनंते तैसेची रहावे
चित्ती असू द्यावे समाधान!
प्रो.
प्रो. रिमिक्सेस जास्त भारी आहेत हं ओरिजनल पेक्षा
केदार
(No subject)
*******************
प्रा.सतिश चौधरी
काव्यातुन ...हे जिवन फुले....
----------------------------------->>
सतीश,
***
तुका म्हणे नाही | आमुची मिरासी | असावेसी एसी | दुर्बळेची ||
वा
वा केदारदा...पुन्हा ..! ....:हहगलो:
! धन्यवाद सर्वांचे..!......:हहगलो:
*************************
प्रा.सतिश चौधरी
काव्यातुन ...हे जिवन फुले....
----------------------------------->>
(No subject)
सतीश,
सतीश, केदार
छान आहेत दोघांच्याही रचना.
मुकुंद कर्णिक
मुकुंदगान:- http://mukundgaan.blogspot.com
प्रोफेसरा
प्रोफेसरांनी गावातल्या स्त्रीची व्यथा मांडलीये आणि मी शहरातल्या स्त्रीची व्यथा

------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो
सहीच
सहीच सुटलायत!:)
केदार, तू
केदार, तू माबोवरच्या स्त्रियांची व्यथा पण मांडू शकतोस की !
त्या कधी पळू लागतात वगैरे वगैरे
************
निजरुप दाखवा हो, हरि दर्शनास द्या हो |
काय भारी
काय भारी आहे पळापळी!!
स्त्रियांना पळायला लावताय म्हणून खटले दाखल होतील तुमच्यावर, तेवढे फक्त सांभाळा..!!
--
कवितांनो, ललितांनो, आता बस! एक या दो, बस्स बस्स!!
केदार
केदार १२३...

विडंबन लईच झक्कास.
--------------------------------------------------------
जापानचे केदार...
कुत्र पिसाळल..पळत सुटली ...//?? (बाई का कुत्री ?? )

--------------------------------------------------------
केदार१२३ प
केदार१२३
प्रोफेसरांनी गावातल्या स्त्रीची व्यथा मांडलीये आणि मी शहरातल्या स्त्रीची व्यथा

-------------------------------------------------------------------
अता त्या भुंग्याची, पीसाळलेल्या कुत्र्याची , कुत्रीची, व्यथा ही येऊ देत प्रोफेसर साहेब.
हायला काय
प्रो आणि केदार
प्रकाश
प्रकाश

****************
प्रा.सतिश चौधरी
काव्यातुन ...हे जिवन फुले....
----------------------------------->>