बॅट आणि बॉल

Submitted by एम.कर्णिक on 1 April, 2009 - 12:01

एक होती बॅट आणि एक होता बॉल
बॅटकडे बघत म्हणाला "हाय् यू क्यूट डॉल"

"येईन तुझ्याकडे तेव्हा देईन तुला किस्"
बॅटने फिरवले तोंड आणि केले त्याला मिस्

विकेटसना मिळाला चान्स त्यानी जवळ त्याला ओढले
दोघीनी घेतला चुम्मा आणि पायापाशीच पाडले

ओरडले सगळे अम्पायरकडे बघून "हाऊज दॅट"
बॅटसमनबरोबर विजेत्याच्या रूबाबात गेली बॅट

गुलमोहर: 

जबरी ईमॅजीनेशन Happy

एकदम छान आहे Happy !!.. पण ही बालकविता ??

०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा

केदार,
मी ही पहिल्यांदा 'कविता' या सदरात पोस्ट केली होती. वाचकांनी 'छान आहे पण जागा चुकली' असा कॉमेंट दिल्याने इथे ट्रान्स्फर केली. 'पिंडे पिंडे मतिर्भिन्नः.
-मुकुंद कर्णिक
मुकुंदगान:- http://mukundgaan.blogspot.com

ओह्ह असे झाले काय?... मग आपले काय मत याबाबत? कारण कवीला स्वतःला काय वाटते ते महत्वाचे

०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा

मोठी माणसे आणि मुले यात ही कविता वाचून कोण बिघडू शकेल याचा विचार करता मुलांच्या निरागस मनावर आणि निखळ आनंद घेण्याच्या वृत्तीवर जास्त विश्वास टाकावा असे वाटले म्हणून बदल मान्य केला.
मुकुंद कर्णिक
मुकुंदगान:- http://mukundgaan.blogspot.com