गद्य विडंबनाच्या मागील अंकाला वाचकांनी दिलेल्या भरभरुन प्रतिसादामुळे आम्हाला पुढील अंक काढताना विशेष उत्साह आला. 'नवरा बायको' या सामान्य विषयावर चार ओळी लिहून मागवल्या असता आपल्या काही प्रसिद्ध लेखकांचे विचार इथे सादर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे.
नवरा बायको हे फारच प्रसिद्ध नाते असले तरी याच्या कल्पनेचा उगम नक्की कुणाच्या नादान डोक्यातून झाला याची माहिती आपल्याकडे उपलब्ध नाही. तरी आपल्याला काही फरक पडत नाही. परंपरेच्या अजस्त्र गोंडस नावाखाली आपण हे नाते वापरतो. एकदा हे नाते सुरु झाले की त्याचे पुढे काय करायचे असते हे पहिले काही वर्ष दोघांपैकी एकालाही समजत नाही. म्हणजे आता आणखी एक मेंदू आपल्या मेंदूला जोडला गेला आहे हे पहिल्या मेंदूच्या लक्षात येत नाही. काही वर्षांनी आपल्याला हे समजले नाहीये, हे ही त्यांना समजत नाही. १६ वर्षांनी आपली चूक लक्षात यायला आपण आईनस्टाईन नाही. त्यामुळे पुढे कसे बोलावे, वागावे, भांडावे यावर आपल्याकडे नेमके शास्त्र, नियम लिहीलेले पुस्तक नाही. लग्न करण्यापूर्वी असलेले कुतुहल,चिकाटी, पाठपुरावा करुन संशोधनाने अनुमाने लावणे, निष्कर्ष काढणे अशी प्रयोगशील वृत्ती एकाएकी लोप का पावते यावर संशोधन केले पाहिजे. युरोप, अमेरिकेत तसे झालेही असेल एव्हाना. त्यांची रेफरन्स बुक्स आली की आपण पुढच्या अभ्यासाला सुरुवात करु.
- राम बरोबर
आपल्या लोकांना एक फार वाईट खोड असते. सतत एकमेकांची परीक्षा घ्यायची. सांगा पाहू, ही वीट मी कुठून आणली असेल? असे आयत्या सापडलेल्या मित्राला विचारतात.या प्रकाराला कंटाळूनच कदाचित 'नवरा बायको' हे प्रकरण सुरु झाले असावे. हे प्रकरण एकंदरीतच फसल्यामुळे पुढे अयशस्वी प्रकारांना प्रकरण म्हणणे सुरु झाले असावे. जे काही प्रश्न उत्तरे खेळायचे ते आपापसात खेळा आमच्या डोक्याला कशाला ताप? या वैतागातून या पर्मनंट त्रासाचा उगम झाला असावा. एखादा नवा पदार्थ केला की हमखास बायको विचारणार, 'ओळखा पाहू, आज मी काय केलंय?' लोकलचे, गर्दीचे धक्के खाऊन आलेल्या नवर्याला आणखी एक धक्का. आज काय वाढून ठेवलं आहे कोण जाणे! त्याने बुद्धीला ताण दिल्याचे दाखवून जमेल तितके कौतुक आणि उत्साह चेहर्यावर आणून म्हणावे, ' बंगाली मिठाई घालून केलेला ढोकळा? की रताळ्याचे बटाटेवडे?' 'अहं! नाहीच मुळी. आज मी किनई, झिंबाब्वे पध्दतीच्या आफ्रिकन भुसवड्या केल्यात!' आता बायकोने केलेल्या 'झिंबाब्वे पध्दतीच्या आफ्रिकन भुसवड्या' संध्याकाळी सात वाजून चाळीस मिनिटांच्या गोरज मुहूर्तावर एखाद्या नवर्याने पहिल्या फटक्यात ओळखल्या तर मी टिळक पुतळ्यासमोर त्याचा जाहीर मुका घ्यायला तयार आहे! बाकी बायकांचीही मला जराशी दया येते. भोळ्या असतात बिचार्या. लग्न झाल्यावर एखादा 'वरण्यालायक' नाही हे जगाला 'न वरा, नवरा' असं ओरडून कशाला सांगायचं? तुमची अवस्था पाहून त्याला वरणारी तुमच्याहून महानच म्हटली पाहिजे. हे म्हणजे वेगात चाललेल्या अॅम्ब्युलन्ससमोर जाऊन शांत उभं राहण्यासारखं आहे.
- फु.ल. देतसांडे
" माझ्यात आणि दमयंतीमध्ये नेमकं काय चालू आहे ते तिच्या किंवा माझ्या आईला कसं समजतं?"
"The more you keep it personal it becomes universal! नवरा बायको या नात्याबद्दल जितका विचार करु तितकं ते जास्तच गुंतागुंतीचं वाटतं. सुखदु:खात सदैव सोबत राहण्याच्या आणाभाका घेऊन स्वतंत्र अस्तित्वासाठी केलेली रस्सीखेच म्हणजे नवरा बायको. "
"पार्टनर, स्वतंत्र अस्तित्व प्रत्येकालाच हवं असतं. अगदी साखरेच्या दाण्यामागे लागलेली मुंग्यांची रांग जरी पाहिलीस तरी तुला प्रत्येक मुंगी, तिचे चारी पाय वेगवेगळे दिसून येतील. मग तरी ही एकत्र आहोत असं जगाला भासवण्याची गरज का? "
"इथेच तर मेख आहे. परि तू जागा चुकलासी! मुंग्यांच्या स्वतंत्र अस्तित्वापेक्षा डोळ्यांना पहिल्यांदा दिसते ती रांग. झुंडीची ताकद फार मोठी असते."
"पार्टनर, मग तू का नाही घेत नवरा बायको च्या नात्याचा अनुभव?"
"अत्तर असो वा फिनाईल वास लांबूनही येतो त्यासाठी चव चाखून बघायची गरज नसते."
- ब.घू. गाळे
आजोबा सांगत होते लंप्या, काहीही कर पण लग्न करु नको. आजीची भांड्यांसोबत स्वयंपाकघरात जुगलबंदी चालू होती. म्हणजे आमच्या गाण्याच्या क्लासमधे कसं गुरुजींनी 'सा' लावला की सगळे आपपाल्या मनाने हवा तेवढा सा लावतात तशीच. आजीनं स्वयंपाकघराच्या दरवाजात येऊन एक वाक्य बोलायचं, मग पातेली, डाव,ताटांनी आपापले सूर लावायचे. आज काहीतरी महत्त्वाचं झालेलं असणार. सुमी तिच्या मैत्रिणींशी कानात बोलताना भुवया वर करुन आणि मान हलवून बोलते तसलं काहीतरी. मी एकदा विचारणार आहे सुमीला, तू कानात बोलताना भुवया वर केलेल्या आणि मान हलवलेली दिसते का चंपीला? एरवी ती बोलत असताना मला मात्र डोळे मोठे करुन सांगणार, माझ्याकडे बघ! हे म्हणजे बेश्टंच. आजी आता आजोबांच्या मावसबहिणीच्या लग्नापर्यंत आलेली आहे. म्हणजे अजून किटप्पाच्या नातवाचं बारसं होणार, मग परळ्याच्या बहिणीचं डोहाळजेवण, म्हणजे आता एक तास जेवायला मिळत नाही. आजीला इतिहासात पैकीत पैकी मारकं असणार, खात्रीच.पण आजोबांनी नक्की काहीतरी विस्तृत का काय म्हणतात तसाला घोळ घातला असणार. आजोबांचं एक वाक्य आणि आजीची एवढी वाक्य ऐकली म्हणजे मला दिवाळीच आठवते. आजोबांचं वाक्य म्हणजे गंप्याचा सुतळी बॉम्बच असणार आणि त्याला उत्तर म्हणून कणबर्गी गंग्याच्या वाडीत लावलेली लवंगीची माळ म्हणजे आजीची इतिहास- कविता. आजोबा म्हणतात, आजीकडे जादूची लवंगी माळ आहे. त्यांच्या लग्नापासून प्रत्येक लग्नाकार्यात त्यात एकेक लवंगी वाढत गेली आणि एकदा आजीनं ही माळ लावली की शेवटाला जाऊनच थांबते. तरी ती माळ संपत नाही, दरवेळीस तेवढ्याच जोरात वाजते. आजोबा असं बोलायला लागले की मला मी खूपच लहान असल्यासारखं वाटतं.मग घरातून पळत सुटून मारुतीच्या देवळापर्यंत धावत जावसं वाटतं. शेवटपर्यंत न थांबता, आजीकडच्या लवंगी माळेसारखं.
-हताश परायण खंत
पती-पत्नी! सृष्टीच्या निर्मात्याला ग्रीष्मातल्या उष्ण दुपारी वामकुक्षी घेताना पडलेले एक लखलखीत स्वप्न! ते स्वप्न पाहून त्याच्या विशाल भाळावर टपटप जमलेले घर्मबिंदू तप्त धरेवर सांडले आणि तिच्या रोमारोमातून हुंकार फुटले, वळीव! वळीव!! सभोवार दरवळलेला मृद् गंध हा स्वप्नातूनच सांडला असावा..! आणि सुरु झाली मानव जातीतील एक धीरोदात्त परंपरा! कुणी म्हणतात पती पत्नी हे दीप-ज्योती सारखे असतात. मला मात्र ते मुळीच मान्य नाही! पती पत्नी हे उदबत्ती सारखे असतात! उदबत्तीची शलाका आणि सुगंधी धूप जसे एकमेकांना अलग केल्यावर निरर्थक होतात तसेच पती पत्नी! सबंध आयुष्य एकमेकांसोबत झिजून स्वतःला त्या सुगंधाची जाणीवही न होणारे पती पत्नी म्हणजे मला पहाटेच्या मंगलसमयी सुगंधित पुष्पमाळांनी सुशोभित केलेल्या देवघरासमोरच्या नक्षीदार रांगोळीशेजारी जळणारी उदबत्ती वाटतात!! सुगंध वर जाऊन अवघ्या सृष्टीला हर्षोल्हासित करतो, पण काडीला मान टाकावी लागते ती खाली सांडलेल्या राखेवर! शोणा, विवाहाशिवाय मनुष्य, म्हणजे प्रत्यंचेशिवाय धनुष्य!
- कितीजी रवंथ
*आमचा मागील अंक तुम्हाला इथे वाचायला उपलब्ध आहे. - http://www.maayboli.com/node/20826
*मागील अंकाशी साधर्म्य ठेवण्यासाठी आम्ही 'नवरा बायको...'त्यांचे' ' असे शीर्षक सुचवले होते परंतु अनर्थाने होणारा गहजब टाळण्यासाठी संपादकांनी त्यात बदल केले.
मला हा भाग जास्त आवडला.
मला हा भाग जास्त आवडला.
भन्नाट
भन्नाट
माझा झब्बू! .....पण माझ्या
माझा झब्बू!
.....पण माझ्या पत्नीला काय वाटेल? पांथस्थाने व्याकुळपणे विचारले. आपली जड्शीळ नजर रोखून महंत बोलू लागला. 'पत्नीला काय वाटेल या विवंचनेत तू आयुष्याची इतकी वर्षे व्यर्थ घालवलीस. त्यातून तुला काय लाभले? या नात्याच्या फसव्या रमलात अडकून तुझ्यासारखे कित्येक जीव खर्या सुखाला पारखे झाले आहेत. सुंदर रमणींचा भार वाहण्यासाठीच जन्मास आलेल्या वृषस्कंधाने पखालीचे ओझे वहावे असा हा प्रकार आहे. अरे, पती-पत्नीच्या नात्याइतके वृथा आणि कृत्रीम बंधन जगात नसेल. कालपर्यंत ज्या कमलदलाचे अस्तित्वही ज्ञान नव्हते त्याच्याशी एखाद्या भ्रमराने जन्माची गाठ बांधावी असाच हा खुळचट प्रकार आहे. तुझ्यासारख्या आडाण्यांचे आतडे गुंतावे म्हणून जबाबदारी पार पाडण्याचा अहंकारही यात मिसळला आहे. मी तुला या बंधनातून तात्काळ मुक्त करु शकतो'. असे म्हणून तो महंत भिंतींनाही मोड येतील अशा आवाजात हसू लागला. पांथस्थाने आपले अंग अजूनच आकसून घेतले. मधूनच येणार्या अत्तराच्या वासासारखी पत्नीची प्रतिमा त्याच्या मनात तीव्रपणे उमटून गेली. त्या झगझगीत शलाकेसारख्या स्मरणाने तो जास्तच अस्वस्थ झाला.
- पी.ए. कुलकर्णी.
झब्बू
झब्बू
असे म्हणून तो महंत भिंतींनाही
असे म्हणून तो महंत भिंतींनाही मोड येतील अशा आवाजात हसू लागला. >>>
(No subject)
झिंबाब्वे पध्दतीच्या आफ्रिकन
झिंबाब्वे पध्दतीच्या आफ्रिकन भुसवड्या...
सुप्पर्ब!!!! मस्तच
सुप्पर्ब!!!! मस्तच
मस्तच आशूडी..खंतांचं तर एक
मस्तच आशूडी..खंतांचं तर एक नंबर
आगावा, सह्ही!
आगावा, सह्ही!
(No subject)
भारीच्चे ! आगाऊ
भारीच्चे !
आगाऊ
भन्नाट! रवंथ, आगाउचा झब्बु
भन्नाट!
रवंथ, आगाउचा झब्बु भारी!
पुन्हा एकदा सर्वांना
पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद.
आगाऊ, झब्बू सही रे! रमल, पखाल अगदीच!
(No subject)
भारी आगाऊंचा झब्बूही बेस्ट!
भारी
आगाऊंचा झब्बूही बेस्ट!
झब्बू पण लै भारी आहे
झब्बू पण लै भारी आहे
झब्बूही धमाल आहे!
झब्बूही धमाल आहे!
आशुडी, नितीनचंद्र, बदलून
आशुडी,
नितीनचंद्र, बदलून लिहिण्यासाठी म्हणजे? मला कळले नाही.
काही वेळा आपलेच लेखन अनेक लोक सुधारुन ( बदलुन ) लिहतात. तुम्ही सहसा बदल करत नाही हे मला माहित आहे.
मस्त
मस्त
रवंथ >>> झब्बू>> धम्माल
रवंथ >>> झब्बू>> धम्माल
मस्त म्हणजे मस्तच
मस्त म्हणजे मस्तच विडंबन........एक रिक्वेस्ट आहे...........सध्या बर्याच वर्षांत जुने मराठी लेखन फार वाचले नाहिये....कृपा करुन मूळ लेखक / लेखिकांची नावे सांगितलीस तर पुन्हा एकदा वाचेन तेव्हा आणखी मजा येईल............कितीजी रवंथ क्लिअर होत नाहियेत..........तेव्हा......
बाकी तुझी शैली एकदम मस्त जमलिये हे पुन्हा एकदा सांगतो...
धमाल आहे हे आणि आगाऊचा
धमाल आहे हे आणि आगाऊचा झब्बूही.
आशूडी आणि आगावा
आशूडी आणि आगावा
भ आणि न्ना आणि ट! लंपनचं एक
भ आणि न्ना आणि ट!
लंपनचं एक नंबरंय!
अरे, हे कसं काय राहिलं
अरे, हे कसं काय राहिलं वाचायचं इतके दिवस ?
मस्त जमलंय ! आगाऊ - झब्बू भारीये .
दमले हसुन हसुन झब्बु पण जबरी
दमले हसुन हसुन
झब्बु पण जबरी एकदम
(No subject)
मस्त आशुडी
मस्त आशुडी
आशूडी फारच मस्त राम बरोबर,
आशूडी फारच मस्त राम बरोबर, फु.ल.देतसांडे, ब.घू.गाळे, हताश परायण खंत, कितीजी रवंथ ..... एक से एक भारी आहेत
आगावा, पी.ए.कुलकर्णी पण एक नंबर
Pages