१. सुक्या खोबर्याचा कीस
२. लसूण पाकळ्या सोलून
३. लाल तिखट
४. मीठ
५. जिरेपूड (ही आयत्या वेळी जिरं भाजून ताजी दळलेली असली तर उत्तमच. नाहीतर तयार चालेल.)
सुक्या खोबर्याचा कीस मंदाग्नीवर भाजून घ्या. जे काय कौशल्य आहे ते इथेच आहे. आच जास्त झाली किंवा लक्ष राहिलं नाही तर खोबरं एकदम करपायला लागतं. सगळं छान एकसारखं गुलबट भाजून घ्या.
खोबरं ताटात पसरून गार करायला ठेवा.
जिर्याची पूड करणार असाल तर जिरं मंद आचेवर थोडं भाजून घ्या.
हे दोन्ही गार होतंय तोवर लसूण सोलून चिरून घ्या. मिक्सर असेल तर मोठे तुकडेही वाटले जातात. नसेल तर बारीक चिरलेली बरी.
आता आधी जिरं बारीक दळून घ्या. मग त्यात खोबर्याचा कीस, तिखट, मीठ आणि लसणीचे तुकडे घालून वाटा.
१. अगदी सोपी आणि पारंपारिक कृती आहे. लोलाच्या बटाटेवड्यांवर विचारलेली दिसली म्हणून देत आहे, यात माझं स्पेशल काही नाही.
२. सगळे घटक पदार्थ मी अंदाजाने घालते.
३. खोबर्याच्या जोडीला किंवा ऐवजीही दाण्याचं कूट, तिळाचं कूट वापरता येतं.
४. बटाटेवड्यांबरोबर करायची तर आधी पिठाची 'बाळं' कुरकुरीत तळून घेते आणि खोबर्याऐवजी ती घालून करते चटणी. झक्कास लागते. बाळांऐवजी विकतची बुंदी ट्राय करायला हरकत नाही.
खोबरे आणि लसुन अंदाजे कीतीस
खोबरे आणि लसुन अंदाजे कीतीस कीती घ्यावा ? १ कप खोबरे घेतले तर लसुण कीती घ्यावा?
"पिठाची 'बाळं' " कीती गोंडस नाव आहे हे
रेसिपीसाठी खुप खुप धन्यवाद!
ही चटणी घरी मायबोली चटणी
ही चटणी घरी मायबोली चटणी नावाने प्रसिद्ध आहे . मस्त होते एकदम .
१ कप किसाला लसणीच्या दोन
१ कप किसाला लसणीच्या दोन मोठ्या पाकळ्या (इथल्या अमेरिकेतल्या लसणीच्या) पुरे होतील.
लसूण उग्र असेल तर एकदम सगळी घालू नका. थोडी वगळून, चटणीची चव बघून त्यानुसार मग अॅड करा.
छानं आहे कृती. धन्यवाद.
छानं आहे कृती. धन्यवाद.
>>पिठाची बाळं कुरकुरीत तळून
>>पिठाची बाळं कुरकुरीत तळून घेते?<<
कुठला हा वाक्यप्रचार... काहीही..कायच्याकाय मराठी. शुद्धलेखनाचा सुद्धा बोर्या वाजलाय आणि म्हणे...
बाळं तळून घेते वाचायला विचित्र वाटते.
पीठाची बुंदी नाही का लिहिता येत त्यापेक्षा?
.
.
हे सगळे मिक्सर मधे करायचे का
हे सगळे मिक्सर मधे करायचे का मिक्स ? का कुटुन घ्यायाचे ? मिक्सर मधे नीट नाही होत माझे
गचका होतो सगळा..
माझी आई खलबत्त्याने कुटून
माझी आई खलबत्त्याने कुटून करायची.
मी मिक्सरमधे करते. कीस विकतचा असतो, त्यामुळे कोरडं होतं जरा.
तुम्ही लसणीचं प्रमाण अॅडजस्ट करून बघा. आणि खोबरं पूर्ण गार झाल्याशिवाय वाटू नका.
ह्म्म्म प्रयत्नांती परमेश्वर
ह्म्म्म प्रयत्नांती परमेश्वर
करुन बघते आजच...
चटणीची रेसिपी नवीन नाही, पण
चटणीची रेसिपी नवीन नाही, पण चांगली आहे. क्रमवार कृती छान लिहिली आहे.
झंपीबाईंच्या पोटात दुखायला लागलं वाटतं पुन्हा!
आलात का विळीबाई, तुम्हाला
आलात का विळीबाई, तुम्हाला सुद्धा कळ लागली वाटतं... जा पाहू तिकडे...
झंपी उगाचच चुका काढु नका.
झंपी उगाचच चुका काढु नका. झंपी कुणाच नाव असतं का? पण तुमचा आय डी आहे ना? अगदी तस्संच आहे हे "पिठाची 'बाळं' "
स्वाती, बरं झालं रेसिपी
स्वाती, बरं झालं रेसिपी टाकलीस ते.
ळ्या, मीठ, साखर, तिखट
लसणीच तिखट मी २ आठवड्यांपूर्वीच करून ठेवलं आहे. चिवा ला ते फार आवडलं.(मलापण)
मी त्यात तीळ आणि दाण्याचं कूट पण घातलं आणि चवीपुरती साखर पण.
माझं प्रमाण होतं : १ वाटी सुकं खोबरं, १ टेबलस्पून तीळ, १ वाटी दाणे, ६-७ लसूण पाक
गेल्या आठवड्यात परत केलं आणि फोटो पण काढला.
स्वाती, एक कप किसाला फक्त दोन
स्वाती, एक कप किसाला फक्त दोन पाकळ्या पुरेत?
कुठला हा वाक्यप्रचार...
कुठला हा वाक्यप्रचार... काहीही..कायच्याकाय मराठी. शुद्धलेखनाचा सुद्धा बोर्या वाजलाय आणि म्हणे... डोळा मारा >>
वाक्प्रचार म्हणायचं होतं का ?
पीठाची बुंदी नाही का लिहिता येत त्यापेक्षा? >>
पिठाची हवंय.
रागारागात लिहिलं म्हणून टायपो वाटतं
मस्त !
मस्त !
तेच मला वाटले मेधाबाई कश्या
तेच मला वाटले मेधाबाई कश्या आल्या नाहीत शुद्धलेखनाचे धडे द्यायला.

काय आहे ना माझही तुमच्यासारखेच आहे, दुसर्याला 'फक्त' शिकवायचे असे करा, तसे बोलू नये पण स्वतः करायचे नाही.
काय आहे ना, मी दुसर्याच्या चुका काढल्यात व्याकरणाच्या त्याचा अर्थ असा थोडीच आहे मला व्याकरणाचा विचार केला पाहिजे लिहिताना.
बाकी तुम्ही अश्या गैरसमाजात राहू नका की तुम्ही जे बोलता तेच करता.. जसे की सदा सर्वकाळ शुद्ध, व्याकरणाच्या चुका न करता लिहिता.. आठवतय ना...
---------------------------------------------------------
सतरांदा पोस्ट बदलणे हे चांगल्या संपादकाची खूण आहे.
मी कुटुन करणार... बाळांऐवजी
मी कुटुन करणार... बाळांऐवजी विकतची बुंदी....
(नुसतच हे वाचल तर फेफरं येईल)
स्वाती, आज बटाटेवड्यांबरोबर
स्वाती, आज बटाटेवड्यांबरोबर पिठाची बाळं करुनच चटणी केली. मस्त लागली एकदम. बरोबर तळलेल्या मिरच्याही होत्याच.
(वड्यांबरोबर खायला बारीक चिरलेल्या कांद्यात लसणीची चटणी मिक्स करुनही सुंदर लागते)
स्वाती सेम रेसिपी , मी कधी
स्वाती सेम रेसिपी , मी कधी कधी चेंज म्हणून थोडीशी चिंच पण घालते वाटताना छान लागते ती पण.
जिरेपूड हे नवीन
जिरेपूड हे नवीन आहे.
साक्षी१+१
मी खोबरे भाजुन नाही घेत. आज
मी खोबरे भाजुन नाही घेत. आज या पद्धतीने करते.
स्वाती, माझीही सेम रेसिपी.
स्वाती, माझीही सेम रेसिपी. हे तिखट खलबत्त्यात परफेक्ट भरड होते.
हे तिखट मऊसर हवं असेल तर दोन वाट्या तिखटाला एक कांदा गॅसवर भाजून घेऊन तिखटाबरोबर कुटावा / मिक्सरमध्ये वाटावा. फक्त कांदा घातलेलं तिखट लवकर संपवावं लागतं.
मस्त आहे पाककृती ! नक्की करुन
मस्त आहे पाककृती ! नक्की करुन बघणार.
आमच्यात ह्याला खोबर्याची
आमच्यात ह्याला खोबर्याची चटणी म्हणतात. त्या मेथीच्या पिठल्यासारखीच गत झाली. खूप उत्सुकता होती म्हणून रेसिपी वाचायला गेले तर पीठ पेरुन मेथीची भाजी निघाली.
स्वाती.. छान,खमंग रेसिपी
स्वाती.. छान,खमंग रेसिपी आहे.. जिर्याची पूड घालून ही ट्राय करायला हवी ..
लाकडी खलबत्त्यात कुटणार..
मी शूम्पीच्या रेसिपीप्रमाणे
मी शूम्पीच्या रेसिपीप्रमाणे करून पाहिली.. त्यात थोडे तीळ भाजून आणि आमचूर पावडर २ चिमूट टाकली. चांगली झाली आहे.
भारी, बरे झाले फोटो दिले
भारी, बरे झाले फोटो दिले नाहीत, आज महाशिवरात्र असल्याने मोह न झालेला बरा