Submitted by एम.कर्णिक on 30 March, 2009 - 14:01
डोळयाने तिरळा होता एक बगळा
उंच उंच पाय अन् लांबलचक गळा
एकदा दिला कोणीतरी शर्टपीस निळा
‘शर्ट शीव’ बजावून चारचारदा त्याला
मशीनवर बसलेला शिंपी होता नेक
काळया काळया पाठीचा खेकडा एक
म्हणाला ‘शिवीन फर्स्ट क्लास बिनकॉलरचा शर्ट
दिसशिल तू सेसमी स्ट्रीटवरचा बर्ट ’
बगळयाने देऊ केली शिलाई एक पीस
अन् शिंप्याच्या हवाली केला शर्टपीस
शिंप्याने काढला मग टेप दीड फुटी
वाकवले डोके घेउन छत्रीची काठी
‘अरे अरे काय करतोस’ ओरडला बगळा
शिंप्याने तेव्हढयातच मापून टाकला गळा
गुलमोहर:
शेअर करा
सेसमी
सेसमी स्ट्रीटवरचा बर्ट ’>> ???
शिंप्याने तेव्हढयातच कापून टाकला गळा >> का असं केल?
कर्णिक,
कर्णिक, शर्ट का रक्ताळवलात ???
.........................................................................................................................
http://kautukaachebol.blogspot.com/
??? जयदीप
???
जयदीप ओक
**********
मी दुसर्यांन सारखा होऊ शकत नाही कारण मी माझत्वं घालवु शकत नाही.
खरं आहे.
खरं आहे. शर्ट रक्ताळवायला नको होता. आता 'का' चा 'मा' केला आहे.
सत्यजित, सेसमी स्ट्रीट हा एक मुलांना खूप आवडणारा अमेरिकन टी व्ही प्रोग्राम आहे. त्यात अर्नी आणि बर्ट ही दोन विनोदी पात्रे आहेत. बर्ट हा अंड्यासारखे डोके असणारा आणि बिनकॉलरचा शर्ट वापरणारा कार्टून कॅरॅक्टर (मोपेट)आहे.
-मुकुंद कर्णिक
मुकुंदगान:- http://mukundgaan.blogspot.com
कापून
कापून टाकला म्हटलं तरी काही बिघडत नाही... मुलांना त्यात मजा येते.
कितीतरी इंग्लिश rhymes आहेत ज्याच्यात अशा हिंसक / टाळता येतील अशा गोष्टी असतात
उदा. hush a bye baby on the tree top...
यात शेवटी फांदी तुटते आणि बाळ पाळण्यासकट खाली पडतं...
मिआ..
मिआ..
छानच आहे!
छानच आहे!
मस्तय.
मस्तय. आवडली.