शेवग्याच्या शेंगाच लोणचे

Submitted by आरती. on 29 January, 2012 - 09:37
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

P22-01-12_10.22.jpg
१. शेवग्याच्या शेंगा - ५
२. चिंच - १ टेबल स्पून
३. मोहरीची डाळ किंवा मोहरी मिक्सरला भरड काढून - २ टेबल स्पून
४. मीठ - १ टि. स्पून
५. तेल - १५० ग्राम
६. मिरची पावडर - १ टे. स्पून

क्रमवार पाककृती: 

१. प्रथम शेवग्याच्या शेंगा स्वछ धुवून पुसून घ्या. सुरीने ह्लके साल काढा. पूर्ण साल काढू नका. दोन ईंचाचे तुकडे करा.
२. चिंच १ कप पाण्यामध्ये भिजत ठेवा.
३. कढईत १५० ग्राम तेल ओतून चांगल तापवून घ्या, त्यात शेवग्याच्या शेंगाचे तुकडे लालसर रंग येई पर्यत तळून बाजूला काढून ठेवा. उरलेल तेल लोणच्यात वापरावे.
४. चिंचेचा रस काढून गॅसवर ५ मिनट गरम करावा.
५. एका पातेल्यात उरलेल तेल, शेवग्याच्या शेंगाचे तळ्लेले तुकडे, मोहरीची डाळ, मिरची पावडर, मीठ, चिंचेचा रस सर्व एकत्र मिक्स करा.
६. मिश्रण पूर्ण थंड झाल्यावर काचेच्या बरणीमध्ये भ्र्रून ठेवा.

अधिक टिपा: 

टिपः शेंगाच्यावरपर्यत तेल हव. बरणीच्या आतून लोणचे भरल्यावर साईड्ने कोरड्या कपड्याने पूसुन घ्या. हे लोणचे वर्षभ्रर टिकत.

माहितीचा स्रोत: 
अम्मा / विजया अक्का
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद आर. पहिल्यांदाच पाहिले हे लोणचे.
तळलेल्या शेवग्याची शेंग कशी लागेल? चवीचा अंदाज येत नाहीये.

मस्त, अगदी वेगळा प्रकार आहे लोणच्याचा. नक्की ट्राय करेन.

दक्षे किसलेला गूळ घालू शकतेस की, किंवा पीठी साखर पण वापरू शकतेस.