बंटीबाबा – ऑस्कर नॉमिनी

Submitted by एम.कर्णिक on 2 January, 2012 - 14:13

ताई, आता चेंज कर भांडायचा मूड.
नाय्तर सग्ळे म्हण्तिल, "ही जोडी नाई गुड"

ताई ग ताई, मोठ्ठी तू, चिड्णं नाई बरं
धाक्ट्या भावाला म्हणावं, ”तुझं म्हण्णं खरं”

म्हणशील तसं तर मीही भांडाय्चा नाई
फक्त म्हणेन, ”थँक्यू, आय टोल्ड यू सो ताई”

आई बाजू तुझी घेते; बाबा माझी घेतात.
आबा नेहमी मध्यस्ती कराय्ला पुढे येतात.

माझ्या चुग्ल्या तू कर्तेस नि तुझ्या कर्तो मी;
पण, अग, खरं ठर्तं माझंच नेहमी.

म्हट्लं तर नेहमीच अस्तो माझा कांगावा.
खरं ठर्वून घ्याय्ला अ‍ॅक्टर तयारीचाच हवा.

मग सांग, तुझा पाड कस्सा गं लाग्णार?
ऑस्करसाठी यावर्षी, बघ, माझंच नाव जाणार.

गुलमोहर: 

माझ्या घरी हेच चाललंय सध्या. असं वाटलं ते दोघंच समोर आहेत Happy
कर्णिक सर... तुम्ही मस्त निरागस विश्व निवडलंय कवितांसाठी. धन्यवाद या कवितेसाठी.

कविता छानच आहे ! पण टाईपींग (जोडाक्षरं) आणि काही ठिकाणी आलेले चौकोन डोळ्यांना आणि पर्यायाने वाचायच्या एकसंधपणाला त्रास देतात. (हे तुमच्या सर्वच कवितांबाबत होतंय म्हणून आज ईथे सांगीतलं.) Happy
बंटीबाबा रॉक्स!

सर्वांचे खूप खूप आभार, अगदी मनापासून.
शेरलॉक याना येत असलेला प्रॉब्लेम तुमच्यापैकी आणखी कुणाला येतोय का? असल्यास काय उपाय करायला पाहिजे ते सुचवल्यास मला मोलाची मदत होईल.

बनुताईशी मवाळपणे बोलताना लब्बाड बंटीबाबा डोळ्यासमोर दिसतोय. बनुताईंनी मात्र गाल फुगवलेले दिसतायत.

वा रे लब्बाड बंटीबाबा. Happy खूप मस्त,, ऑस्कर तुम्हालाच Happy

टाईप करताना बॅकस्पेस अन स्पेस की(key) वापरलीत तर प्रॉब्लेम नाही येणार. चौकोन ४-५ च आहेत ते काढून अन जोडाक्षरांच्या जागी स्पेस दिलाय. Happy तुम्हाला योग्य वाटल्यास कॉपी पेस्ट करा. Happy

ताई, आता चेंज कर भांडायचा मूड.
नायतर सगळे म्हणतील, "ही जोडी नाई गुड"

ताई ग ताई, मोठ्ठी तू, चिडण नाई बरं
धाकट्या भावाला म्हणावं, तुझं म्हणण खरं

म्हणशील तसं तर मीही भांडायचा नाई
फक्त म्हणेन, थँक्यू, आय टोल्ड यू सो ताई

आई बाजू तुझी घेते; बाबा माझी घेतात.
आबा नेहमी मध्यस्ती करायला पुढे येतात.

माझ्या चुगल्या तू करतेस नि तुझ्या करतो मी;
पण, अग, खरं ठरतं माझंच नेहमी.

म्हट्लं तर नेहमीच असतो माझा कांगावा.
खरं ठरवून घ्यायला अ‍ॅक्टर तयारीचाच हवा.

मग सांग, तुझा पाड कस्सा गं लाग्णार?
ऑस्करसाठी यावर्षी, बघ, माझंच नाव जाणार.