क्रिकेटला जेन्टलमन्स गेम असे म्हण्टले जाते. क्रिकेट सारख्या 'दे मार' खेळात जेन्टल काय आहे हे ज्याने 'जेन्टलमन्स गेम' म्हण्टले त्यालाच माहित.
भारतासारख्या तिसर्या जगात जिथे दे मार वृत्ती जन्मजात आहे ,तिथे हा खेळ रुजला यात विशेष काही नाही. परंतु खेळ जेव्हा व्यसन बनते तेव्हा ते ईतर व्यसनांप्रमाणे घातकच ठरते. भारतात क्रिकेट हे व्यसन झाले आहे. तीन वर्षांच्या मुलापासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकजन दिसेल ती जागा अडवुन एखाद्या अट्टल बेवड्याप्रमाणे व्यसनाला सुरवात करतात ,कशाचेच भान रहात नाही.. फक्त धुंदी .कुठल्याश्या केनिया देशाचा प्लेअर माहीत असतो पण विश्वनाथन आनंद माहित नसतो, करचुकव्या क्रिकेटरला भारतरत्न देण्याची मागणी होते पण कुष्ठरोग्यांची सेवा करणारे उपेक्षीत राहतात. ईतर खेळांचे नुकसान करणार्या, मुलांच्या शैक्षणिक आयुष्याची दुर्दशा करणार्या या व्यसनाचे गांभिर्य लक्षात यायला हवे. क्रिकेट हा एक राष्ट्रासमोरचा गंभीर प्रश्न आहे अशी जी मानसिकता आहे ती सोडल्याशिवाय हे व्यसन जाणार नाही.
क्रिकेट- एक गंभीर व्यसन
Submitted by सिंथेटीक जिनिअस on 30 January, 2012 - 23:28
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भारतासारख्या तिसर्या जगात
भारतासारख्या तिसर्या जगात जिथे दे मार वृत्ती जन्मजात आहे ,
हे खूपच जनरलाईज्ड वाक्य होतंय. बाकि आशयाबाबत नंतर लिहीता येईल.
एन्टीमॅटर,क्रिकेटचे काय घेऊन
एन्टीमॅटर,क्रिकेटचे काय घेऊन बसलाय राव ,सचिनचे शतक आणि त्याला भारतरत्न द्यावे हाच एक राष्ट्रीय प्रश्न आहे.
ज्याना खेळाची मनापासून आवड
ज्याना खेळाची मनापासून आवड आहे [ व जी आवड जोपासण्यात राष्ट्राचं हित आहे] त्या सर्वांना एकच निकष लावून असं अवमानित करणं योग्य नसावं असं मला प्रामाणिकपणे वाटतं.
अँटीमॅटर भावना पोहोचल्या
अँटीमॅटर भावना पोहोचल्या आणी त्यांच्याशी सहमत आहे.
अँटीमॅटर आपल्या अकलेचे
अँटीमॅटर आपल्या अकलेचे दिवाळे निघाले आहे....
नंथिंग्नेस आणि आपण जो पोरखेळ चालवला आहे ... तो बंद करा..... नको त्या विषयावर धागे काढण्याचे प्रयोजन काय...
काही सिरिअस टॉपिक असेल तर ठिक आहे.......
फुकटचे लिहायला मिळत आहे तर काहीही लिहु नये...
पहिला आणि शेवटचा सल्ला.......
समित,पहिला आणि शेवटचा सल्ला
समित,पहिला आणि शेवटचा सल्ला मागितलाय कुणी?. आपणही क्रिकेटव्यसनी दिसताय. काहितरी सिरीयस म्हणजे काय?
,पहिला आणि शेवटचा सल्ला
,पहिला आणि शेवटचा सल्ला मागितलाय कुणी >>>>>>>>>. तुम्हाला दिला आहे. मागण्याचा प्रश्नच येत नाही.वेड्यांना शॉक द्यावा लागतो .वेडे शॉक मागत नाही !!!!!
>>समित,पहिला आणि शेवटचा सल्ला
>>समित,पहिला आणि शेवटचा सल्ला मागितलाय कुणी?.
तुम्ही जेव्हा पब्लिक फोरम वर लिहीता तेव्हा असे सल्ले आणि प्रतिसाद मिळणारच. असा सल्ला समित किंवा इतर कुणी देऊ नये असे वाटत असेल तर तुमच्या खाजगी ब्लॉगवर लिहा म्हणजे तिथे दिलाच तर तो उडवता येईल किंवा त्यापेक्षा बेस म्हणजे डायरीत लिहा.
>>वेड्यांना शॉक द्यावा लागतो
>>वेड्यांना शॉक द्यावा लागतो ..........वेडे शॉक मागत नाही ...>> :-p
पहिल्यांदाच दिसले की
पहिल्यांदाच दिसले की हिंदुत्ववाद्यांनी सेक्युलरवाद्यांना पाठींबा दिला आहे.
मंदारजी, हे सुमीत टगेगीरी
मंदारजी, हे सुमीत टगेगीरी करण्यात पटाईट आहेत, limbutimbuना विचारा हवेतर. वैयक्तीक आरोप, धमक्या त्यांच्या चालूच असतात. म्हणुन त्यांना समज दिली.
ह्म्म्म्म. अँटीमॅटर, प्रतिवाद
ह्म्म्म्म. अँटीमॅटर, प्रतिवाद जरूर करा, पण असा नको. इथे प्रतिसाद तर येणारच ना? असो. बाकी चालुद्या.
अँटीमॅटर तुम्ही खुप
अँटीमॅटर तुम्ही खुप महत्वाच्या विषयाला हात लावला आहे. प्रवाहाच्या विरुद्ध पोहोणार्याला (तत्कालीन) जनसामान्यांकडुन वेडे ठरवले जाते असा इतिहास आहे. तुम्हाला अशा सामान्य जनांच्या रोषाला सामोरे जाण्याचे बळ मिळ्ण्यासाठी शुभेच्छा.
या खेळाला पैसा आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही पद्धतशीर प्रयत्न झालेले होते (१९८३ चा विश्वचषक सुरवात होती असे म्ह णेल). तसे प्रयत्न हॉकी किंवा इतर खेळांबाबत का नाही झाले? या मधे क्रिकेटचा काय दोष?
तेच म्हणतोय मी या खेळाला
तेच म्हणतोय मी या खेळाला अर्थकारणाची जोड मिळते, तर ईतर खेळांना का नाही? कस्टम ड्युटी बुडवणार्या, वाढीव एफेसाय मागणार्याला भारतरत्न आणि बुद्धीबळातला सम्राट उपेक्षीत राहतो, याला हे व्यसनच कारणीभूत आहे.
एवढासाच जन्म आहे पण काय एकेक
एवढासाच जन्म आहे पण
काय एकेक चालले आहे
-'बेफिकीर'!
बुद्धीबळातला सम्राट उपेक्षीत
बुद्धीबळातला सम्राट उपेक्षीत राहतो, याला हे व्यसनच कारणीभूत आहे.>>> उपेक्षित राहतो??? कोण? विश्वनाथन आनंद??? कोण म्हणाले की तो उपेक्षित आहे?
पैश्याच्या भाषेतच बोलायचे झाले तर त्याचा अॅड रेट सचिनपेक्षा जास्त आहे. आणि त्याला स्वतःला कायक्रमाना येणे फारसे आवडत नाही म्हणून तो येत नाही. आधी पूर्ण माहिती मिळवा आणि मग बोला.
http://www.lastcombat.com/Sac
http://www.lastcombat.com/Sachin_Tendulkar_vs_Viswanathan_Anand.html
चालु द्या.
अँटीमॅटर आपणच नथिंगनेस आहात
अँटीमॅटर आपणच नथिंगनेस आहात असे परवाच कुठेतरी निदर्शनास आले होते. बाकी चालु द्या!