"तू गातोस हे माहीत नव्हतं! " "मलाही नव्हतं! तू आहेस म्हणून धाडस करतोय" स्काईपवर हा माझा आणि योगेशचा संवाद... स्टेजवर लहानपणी कधीतरी गायलेलं गाणं आणि चार मित्रात केलेला घसा साफ ह्या पलीकडे गाणं "गायची" कधी वेळ आली नाही . ह्या वेळी 'य' धाडस करून योगेश ला इ-पत्र टाकलं होत. माझ्या साठी गाणं हे त्या कॉलेज मधील हव्याहव्याश्या वाटणाऱ्या पण (कायम) दुसऱ्याला वश (काय झकास शब्द आहे) होणाऱ्या काळिज-दुःख मुली सारखच. त्यामुळे योगेशला ह्याची कल्पना आधीच देऊन टाकली होती. म्हणजे सुर सापडतील ह्याची खात्री नाही आणि सापडलेच तर तालात येतील ह्याची हमी नाही. तू सांग मी गातो (त्याला ज्ञानेश्वर व्ह्यायची संधी. कुणाच्या नशिबात कुठे आणि कुठला रेडा लिहिलेला असेल काही सांगता येत नाही) पण जात्याच योगेश सुशील, विनम्र वगैरे असल्याने त्याने हे सगळं सुहास्य वदनाने ऐकून घेतले व स्केल 'फ' मध्ये सूर लावून जे काय गायलो ते ऐकून घेतले. सी किंवा सी-शार्प ह्यांच्यात सुर ढकलताना अस्मादिकांची दाणादाण उडते. हे गाणे 'फ' मध्ये गायचे होते. ट्रॅक तयार होता. पहिल्यांदा रियाज छे! छे! प्रॅक्टिस करताना ताल पकडताना भंबेरी उडत होती. ताल पकडला तर सूर मांडी घालून बसत होते. एक दोंन वेळा म्हणून झाल्यावर माझा पार्टनर चिंतायुक्त चेहऱ्याने बाहेर आला. "काय झाले? तब्येत बरी नाही का? " असा काळजी युक्त प्रश्न माझ्याकडे भिरकावला. त्यानंतर उसका एक सवाल मेरे दो दो जवाब अशा रितीने मायबोलीवरील जागतीक गाण्याची माहिती दिली व मी त्यात गाणार आहे हे ही सांगितले त्यानंतर... लंबी खामोशी!
पण गाण्याचा हा सगळाच प्रवास खूप रंजक होता. जमतील तशा प्रॅक्टिस रेकॉर्ड करून त्या योगेशला पाठवत होईतो. तो त्यावर करेक्शन सुचवत होता. ह्या सगळ्या शेवटी एकदाचा एक फाईनल ट्रॅक रेकॉर्ड करून पाठवला. माझ्या कुठल्या ओळी असतील ह्याची उत्सुकता आहेच पण पाठवताना जरी काही निवडले गेले नसते तरी काही दुःख नव्हते. गाण्यासाठी मेहनत घ्यावी लागते ती मेहनत कशी घ्यायची ह्याची झलक मिळाली. दिलेल्या पट्टीत, ट्रॅकवर सुरात भाव समजून घेत व तो गाण्यात ओतत कस गायच ह्याचा मुंगी-पावलाचा अनुभव मिळाला. हेही नसे थोडके.
योगेश बद्दल सगळ्यांनी जे भरभरून लिहिले आहे ते योग्यच आहे. त्याच्या संगीत उपक्रमांना माझ्या शुभकामना. भीडे ह्यांनी रचलेल्या उत्तम गीताने बहार आली. इतरांचे अनुभव वाचताना जाणवले की इतरांनी किती कष्ट घेतले आहेत. ह्यात सहभागी झालेल्या सर्वांचे अभिनंदन !
मायबोली शीर्षकगीताची झलक पहा:
झलक मधील गाय़कः
१. मायबोली आलापः भुंगा (मिलींद पाध्ये)
२. धृवपदः अनिताताई (अनिता आठवले), योग (योगेश जोशी)
३. समूहः मुंबई, पुणे, दुबई येथिल सर्व गायक
संपूर्ण श्रेयनामावली:
मुंबई: रैना (मुग्धा कारंजेकर), अनिताताई, प्रमोद देव, भुंगा, सृजन (सृजन पळसकर- मायबोलीकर युगंधर व भानू यांचा मुलगा)
पुणे: विवेक देसाई, सई (सई कोडोलीकर), पद्मजा_जो (पद्मजा जोशी), स्मिता गद्रे, अंबर (अंबर कर्वे), सायबर मिहीर (मिहीर देशपांडे)
दुबई (सं. अरब अमिराती): देविका आणि कौशल केंभावी (मायबोलीकर श्यामली ची मुले), सारिका (सौ. योग), दीया (योग व सारिका ची मुलगी), वर्षा नायर, योग
कुवेतः जयावी- जयश्री अंबासकर
ईंग्लंडः अगो (अश्विनी गोरे)
अमेरिका: पेशवा, अनिलभाई
ऑडियो व्हिज्युअल टीम - आरती खोपकर (अवल), नंदन कुलकर्णी (नंद्या), हिमांशु कुलकर्णी (हिम्सकूल) आणि आरती रानडे (RAR)
>> दिलेल्या पट्टीत, ट्रॅकवर
>> दिलेल्या पट्टीत, ट्रॅकवर सुरात भाव समजून घेत व तो गाण्यात ओतत कस गायच ह्याचा मुंगी-पावलाचा अनुभव मिळाला. हेही नसे थोडके.
पेशव्या तुझ्या आवाजातील ओळी ऐकल्यावर यापूढे तुझी मायबोली-कारकीर्द निव्वळ शब्दांच्या जादूवर न थांबता सुरांच्या वाटेवर अधिक चालेल अशी मला खात्री आहे!
लगे रहो दोस्त!
मनोगत आवडलं. अनेक शूभेच्छा
मनोगत आवडलं. अनेक शूभेच्छा !
>>त्याला ज्ञानेश्वर व्ह्यायची संधी << आणि >>उसका एक सवाल मेरे दो दो जवाब <<
लाजवाब
थोडक्यात... पण महत्वाचं
थोडक्यात... पण महत्वाचं लिहिलंत...
'स्काईप' वरुन गाण्याचा 'सराव' आणि 'रेकॉर्डींग' हा प्रकार, अजून पचनी पडत नाही आहे... कारण 'स्टूडीओ' मधे रेकॉर्डींग करताना माझीच उडालेली 'दाणा-दाण' पूर्णपणे लक्षात आहे... असो... या पुढिल प्रयत्नांस 'हार्दीक शुभेच्छा...'
पेशवा...... अगदी थोडक्यात पण
पेशवा...... अगदी थोडक्यात पण खूप काही सांगितलस ...... !!

योग म्हणाला होता ते वाक्य आठवलं ...... पेशवा जबरी गातो...... इतके दिवस कसा काय गप्प होता
उद्या सगळ्यांसमोर अवतीर्ण होणार आता तू
माझ्या साठी गाणं हे त्या
माझ्या साठी गाणं हे त्या कॉलेज मधील हव्याहव्याश्या वाटणाऱ्या पण (कायम) दुसऱ्याला वश (काय झकास शब्द आहे) होणाऱ्या काळिज-दुःख मुली सारखच.>>>>>
आता आवडती मुलगी वश झालीय.....प्रेमाने सहवास करा बघू तिचा!!!:डोमा:
छान लिहिलंय. उद्या छान गायलंय असं लिहिन!!:स्मित:
मस्त
पहिल्यांदा रियाज छे! छे!
पहिल्यांदा रियाज छे! छे! प्रॅक्टिस करताना ताल पकडताना भंबेरी उडत होती. ताल पकडला तर सूर मांडी घालून बसत होते. एक दोंन वेळा म्हणून झाल्यावर माझा पार्टनर चिंतायुक्त चेहऱ्याने बाहेर आला.>>>
एकंदरीत सगळ्यांचे अनुभव, मजेशीर, प्रेरणादायी, काहीतरी नवीन देऊन जाणारे असेच आहेत.
सा-या कला गुणांना दे वाव मायबोली
सा-या नवोदितांची ही माय मायबोली..... भिडे तुमच शब्द वापरणारच इथे आता
थोडक्यात, खुसखुशीत शब्दात
थोडक्यात, खुसखुशीत शब्दात लिहिलेले अनुभव आवडले.
पेशवा, जबरा रे..
पेशवा, जबरा रे..
छानच लिहिलंय
छानच लिहिलंय
सहीच लिहिलय! सुरवातीला
सहीच लिहिलय! सुरवातीला 'मायबोलि मायबोलि कुणी म्हंटलं? खूप गहिवरुन यायला हव इतकी आर्तता आहे फक्त हा एक शब्द उच्चारताना...गाताना.
आवाजही छान आणि गायलंयही छान!
आवाजही छान आणि गायलंयही छान!:स्मित: