घर सावरताना...

Submitted by विभाग्रज on 23 January, 2012 - 11:59

घर सावरताना....
दाद यांच्या ''घर आवरताना''या कवितेच विडंबन,दाद यांची क्षमा मागून.
घर सावरताना....

जाताना घरातला सगळा किमती ऐवज ढापलास ना तू
फार वाईट केलसं,बघ
धक्क्यानं लकवा मारलेला तो तुझा सासरा आहे...हो फक्त तुझाच...
कारण
माझा जावई माझ्या मुलासारखा हा त्यांचा विश्वास...
त्या विश्वासाचा खून केलास तू
...............................................................................................
...............................................................................................
घर आवरताना....(दाद यांची कविता)

स्वत:बरोबर माझ्यातला माझा वावर नेलास ना...
बरं केलस, बघ.
आता आवरतेय तो तुझा पसारा आहे... फक्तं तुझा...
पण...
पुस्तक मिटून ठेवलं म्हणजे गोष्टं संपत नाही....
हे माझं नाही तुझंच वाक्यं

गुलमोहर: