सगळ्यांचे वृत्तांत आहेत पुढे पण त्याआधी उपस्थितांचा हा गॄप फोटो, भक्ती-शक्ती शिल्पासमोर झकासरावने काढलेला...
स_सा, सूर्यकिरण, समीर, लिंबुटिंबु, राज्या, आबासाहेब, सौ. झकासराव, सोहम (झकुला), चंपी, निमिष (चंपुकला), मितान, योगुली, जय, चिमुरी... या सगळ्यांच्या मागे भक्ती-शक्ती शिल्प आहे.. ज्यांच्याकडे दोन्ही आहे त्यांनाच शिल्प फोटोमधे दिसु शकेल.. आणि कॅमेर्यामागे झकासराव...
झकासरावने वॄत्तांताचे हायलाईट्स टाकले आहेत प्रतिसादात.. सोयीकरता ते पण इथे घेत आले..
झकासराव | 19 January, 2012 - 12:03
हा वृतांत नव्हे पण थोडेफार हायलाइट्स म्हणुन फारतर. स्मित
१) संयोजकाना हारतुरे अस फक्त बोलाचीच फुले न करता, खरीखुरी छान आणि सुंदर फुले योगुलीने आणलीत. धन्यवाद योगुली. स्मित
२) राज्याला त्याच्या हापिसात फोटो स्पर्धेत बक्षीस मिळालय त्यामुळे गडी लढाईत दांडपट्टा काय जोरात फिरवावा त्या आवेशात दणादण फोटो काढत होता. शेवटी मी त्याला आठवण करुन दिली की कॅमेरा मी चार्ज नाही केलेला तेव्हा ग्रुपफोटोसाठी बॅटरी शिल्लक राहु दे. स्मित
३) रेवडी, तिळाच्या वड्या आणि चॉकलेट दिसायला सुंदर आणि चवीला उत्तम होते. फस्त झाले सगळे.
४) वृंदावन मधला ऑर्डर घेणारा मितानने "दादा, वेळ लावायचा नाही" ज्या भाषेत विनंती केली होती ती ऐकुन
१०-१५ सेकंद हॅन्ग झालेला पाहिलय मी. फिदीफिदी
५) एवढ्या समजेनंतरदेखील हाटेलवाल्यानी फारच वेळ लावला बॉ, पण तेवढ्यात बर्याच गप्पादेखील मा॑रता आल्या हा फायदा झालाच.
६)प्रिन्सेस चिमुरी बाफवर गप्पिष्ट तर प्रत्यक्षात शांत आहे. मी तिला रोजच्या पीएमटीच्या प्रवासाबद्दल गटगमध्ये नमन केलच आहे. परत एकदा _/\_.
७)सम्या सॉरी रे. तुला माहितेय का बोलतोय ते. आपण परत भेटु. बॅचलर्स खाजगे गट्ग फिदीफिदी
८)सुक्याचा व्रुतांत वाचुन हे कळतय की तो तिला (मृ) सगळ्या जीटीजीला घेवुन गेलाय. आम्हाला न भेटवल्याबद्दल त्याचा निषेध. :रागः
९) राज्या फॉर्मात होता. हडपसर (पुण्याच सोलापुर रोडवरच एक टोक) पासुन निगडी (पुण्याच मुंबई-पुणे रोडवरच शेवटच टोक) ते परत कात्रज (पुण्याच कोल्हापुर बाजुच शेवटच टोक) असा प्रवास असुनदेखील तो ज्या उत्साहात होता ते पाहुन त्याला _/\_ नमन. राज्या कधीहि कुठेही यायला जायला तयार असतो बस दोस्त कंपनी चांगली पाहिजे. स्मित
१०) सम्यासुद्धा पुण्यातुन आला. ग्रेट. (माझ्या आळशी शरीरास आणि मनास पुणे ते निगडी जड वाटत हो)
११) योगुलीने मी फार बडबडी आहे हे डिक्लेअर केले होते, ते तसे करायची गरज नव्हती. ते आपोआप कळत होत. फिदीफिदी
१२) मला वाटल होत चम्पी "मी बाइ फोरीन रिटर्न" म्हणुन फार भाव खाइल पण ती तर डाउन टु अर्थ आहे. बिचारीला चम्पुकल्याने फारच पळवल. स्मित
१३) चम्पुकला फारच बिन्धास्त आहे. पटकन मिक्स होतो आणि मग गाडी सुस्स्साट. स्मित
१४) योगुलीचा छोकरा फारच शांत आहे. स्मित
१५) हे पिचिकरांछ पहिलच गटग असल्याने "टांगारुच्या बैलाला भो" अशी आरोळी ठोकली नाही पण पुढच्या वेळेस ही सवलत नाही हे समस्त टांगारुनी लक्षात घ्यावे. फिदीफिदी
१६) आबासाहेब फारच शांत आहेत बॉ. होतील हळुहळु मिक्स. कारण मी देखील पहिल्या गटगला असाच्ग शांत शांत होतो.
१७) मितान तु तुझ्या फिल्डबददल लिहिणार आहे हे लक्षात ठेव. स्मित
१८) स्_सा उर्फ फदीची एन्ट्री अनपेक्षीत पण आनंददायी होती. आता वारंवार भेट होइलच.
१९) जे पिचिकर आले नाहीत त्यांची आठवण काढली गेली. दिप्स, दक्षिणा, चम्पक, नितिन्चंद्र, शुभांगीहेमंत, योगिता (पिलु छोटा) अशी काही नाव मला आता आठवत आहेत. अजुनही असतील पण मला आता लक्षात येत नाहिये/
२०) फदीशी भेट झाल्यावर अर्थातच जीएस, आरती, कूल, सायबरमिहिर अशा त्यांच्या ट्रेक ग्रुपची आठवण निघालीच. कार्यबाहुल्यामुळे जमत नाही असही कळाल. मी ह्यातल्या फक्त आरतीला भेटलोय पण हा ग्रुप मला जवळचा वाटतो त्यामूळे आपोआपच मी ह्यांची आठवण काढली होती.
२१) फक्त चम्पीच्या एका वाक्याने ट्रिगर झालेल्या माझ्या कल्पनेला सगळ्यानी उचलुन धरलं आणि आनंददायी भेट घडवुन आणली ह्या बद्दल सन्योजक आणि इतरजण मी आपला खुप आभारी आहे. स्मित
फोटो येत आहेत खादाडीचे. तयार रहा. स्मित
**********************************************************************************************************************************
**********************************************************************************************************************************
**********************************************************************************************************************************
**********************************************************************************************************************************
सुकिला त्याच्या वृत्तांताचा वेगळा धागा काढायला सांगुनही त्याने आयत्या धाग्यात गटग वृत्तांत (चालः आयत्या बिळात नागोबा) असं केलं आहे.. बर्याच जणांना त्याचा वृत्तांत प्रतिसादात असल्याने कळणार नाही म्हणुन इथे टाकत आहे (त्याची परवानगी न घेता).. त्याने २ भागात वृत्तांत लिहीला आहे.. आत्तापर्यंत पहिला भाग सगळ्यांचा वाचुन झाला असेलच म्हणुन सोयीसाठी २रा भाग वरतीच टाकत आहे.. भाग २ च्या खाली भाग १ आहे.. नवीन वाचकांनी आधी भाग एक वाचावा..
सूर्यकिरण | 18 January, 2012 - 12:54
भाग दोन :-
काय लोकहो .. पहिल्या भागाचा गटग सिनेमा कसा वाटला? सगळेच हिरो आणि हिरविणी होत्या ना?
मग आता करायची का सुरुवात..
वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे.. अरे अरे लगेच वदनी कवळ कुठून आलं? अजून मास्तरांची ओळख आणि सचिन ( फदीची ) एंट्री बाकी आहे ना दोस्तानों. मग थांबा थोडं.. आता मास्तरांच्या ओळखीबद्दल बोलुयात. मास्तर म्हणजे मायबोलीवरचे वाकडे ( जुना आयडी ) आणि लिंबूटिंबू हा आत्ताचा आयडी यापेक्षा अधिक असल्यास माहिती नाही कारण मास्तरांना शंका विचारायच्या असतात प्रश्न नाही. त्यामुळे त्यांनीही ओळख करून देताना आपला मायबोलीवरील आपला इतिहास आणि वैयक्तीत आयुष्यातील चढाओढीचा काळ स्वःताच्या ओळखीतून करून दिला. मग त्यात, झकासला ठाऊक असलेली आणखी एक भर म्हणजे ते उत्तम कलाकारही आहेत. ते एक मुर्तीकार आहेत हे ही सगळ्यांना कळलं. ते कळल्यावर 'चिन्ह' आणि चित्रातील आणि मनातील नग्नता यावर स्पष्टीकरणासहीत ताषेरेही ओढून झाले. राज्या आणि सम्यानं 'राजगड' च्या गटगचा विषयही काढून घेतला आणि ते कधी करायचं याची चर्चाही झालीच. मग सचिनवर बारी आली. त्यानं आपला आयडी स_सा का ह्याची ओळख करून दिली जी बर्याच लोकांना माहितीच आहे. मग त्याने सध्यस्थित नोकरीच्या बदलाचे वारे पण सांगितले.. ते वारे हडपसरवरून थेट पिंपरी-चिंचवड मधे वाहणार आहेत याने पिंचिकरांना आनंदच झाला. तेवढ्यात समोरच्या महिला गोट्यात उशीर उशीर अशी चर्चा सुरू झाली. त्यांना बहुतेक खादाडीचे वेध लागले असावेत असाच प्राथमिक अंदाज काढला. मग सगळे भक्ती-शक्ती भक्त भक्ती शक्ती शिल्पाजवळ फोटो काढण्यासाठी तयार झाले. शिल्पाजवळ पोहचल्यावर ग्रुप मधे उभं राहून फोटो काढून घेतला आणि तोच गटगचा अधिकृत फोटो असं मास्तरांनी शिक्कामोर्तबही केलं. ओळख झाली, गप्पा झाल्या, फोटोसेशन झालं, लहानांसोबत थोडीफार मस्तीही झाली मग आता खादाडी व्हायलाच हवी ना?
खादाडी साठी भक्ती शक्ती जवळच 'वृंदावन' आहे तिथे दाक्षिणात्य अल्पोपहार चांगला मिळतो असं कुणीतरी सुचवलं बहुदा ते हॉटेल शेट्टींपैकीच कुठल्यातरी उडप्याचं असावं. हॉटेलमधे एवढे सगळे एकदम शिरल्यावर गटगकार आमने सामने बसले. मितानने लगेच वेटरला बोलावून ऑर्डर काय द्यायची ते सोडून जे काय आणशील ते लवकर आणायचं असाच दम भरला. मग काय बिचारा वेटर मान डोलवत मेन्युकार्ड टेबलावर ठेवून जवळच उभा राहीला. ज्यानं त्यानं आपल्या सोयीनुसार ऑर्डर दिल्या. मग काय जो तो आपापल्या समोर बसलेल्या लोकांशी गप्पा मारत होता. अधून मधून आम्हीही गप्पांच्या तिरकस जोड्या लावतच होतो. मास्तरांशी विविध गोष्टींवर बरीच चर्चा झाली. मार्गदर्शन मिळालं. नंतर मितानने बेल्जियमच्या खेड्यातल्या शाळकरी मुलांचा आणि भारतीय जेवण पद्धतीतला एक गमतीदार किस्सा हि सांगितला. आता खायचे किस्से सुरु झाल्यावर राज्यानंही ताक कसं वरबाडतात याचं ताकाविनाच प्रात्यक्षिक करून दाखवलं. ज्याच्या त्याच्या समोर डिश आल्या आणि संपवल्या सुद्धा. सगळ्यात उशिरा खुर्चीत बसून सगळ्यात पहिली डिश संपवणारे राज्या आणि सम्या. सॅन्डविच आले आणि विच सॅन्डविच? असे सुद्धा झाले. मास्तरांना बिनदिक्कत उत्ताप्पा खाता आला आणि तो आवडलाही. तिकडे, झकासरावांनी उपवास असल्या कारणाने घरी जाऊन खिचडीच खाण्याला पसंती दिली. खादाडीही उरकली.. गप्पा चालुच होत्या. मग मितानने लगेच 'फिल्टर कॉफी' ची ऑर्डर दिली पहिल्या दोन केव्हा सांगितल्या होत्या त्या सुद्धा आमच्या ऑर्डरीबरोबरच येणार असा आपलाच सोयीचा समज करून कॉफीची वाट बघत बसले. कॉफी विना चालली वेळ .. असं काही तरी मनात आणि कॉफी कॅन्सल करणार तोच वेटर कॉफी घेऊन आला आणि मग सम्याचा एकच प्रश्न वेटरला साखर आधीच विरघळवलीये काय? कॉफीचा एक घोट घेतल्यानंतर कॉफी बनवणार्याच्या नरडीचा घोट घ्यावा असं वाटलं नसलं तरी फिल्टर कुठाय कॉफी ? कैच्याकै कॉफी आहे असं बोलून कॉफीचा मिळमिळीत विषय संपवला. तो पर्यंत राज्याने खादाडीचे खादाड फोटो काढून घेतले. खादाडी उरकली.. आता महत्वाचा विषय म्हणजे कोण कसं घरी जाणार? कोणाला कोण घरी सोडणार? याचं उत्तरं राज्याच्या पोटलीतून आयमीन चारचाकी मुळे लगेच मिळालं. मितान-चिमुरीचा प्रश्न सुटला. चंपी-निमिष आणि योगुली-जयचाही प्रश्न सुटला राज्यामुळे. राज्याच तो त्याला या सगळ्याचं भान आणि तो यासाठीच तत्पर असावा होय ना? झकास, सौ.झकास आणि सोहम सुद्धा राज्याच्याच चारचाकी मधे जमलं .. सचिन, आबासाहेब, मास्तर आणि मी आम्ही दुचाकीस्वार होतो त्यामुळे आम्हाला स्वार व्हायला काहीच हरकत नव्हती. त्याप्रमाणे मास्तर, आबासाहेब , सचिन पुन्हा भेटुयात अशी मनोमन इच्छा करून आपापल्या मुक्कामाला निघाले सुद्धा. समीर रानड्यांचा मात्र काही अंतरापुरता प्रश्न होता तो मी सोडवला. सम्या माझ्या दुचाकीवर कुडकुडत बसले आणि ह्या सगळ्यांना त्यांच्या घरी पोहचेपर्यंत माझ्याबरोबर होतेच. गटग उरकरलं.. हे असं पहिलंच गटग अॅक्टीव्ह मेंबर्सचं.
मित्रांनो, हा सिनेमा कसा वाटला हे विचारणं योग्य नाहीये. पिंचिंगटगचा हा सिनेमा पदार्पणाचा होता. इतका खास नसेलही किंवा खास असेलही. पण यातले कलाकार सगळे यशस्वीच होते. त्यांनी त्यांच्या उपस्थितीच्या भुमिकेला पुरेपुर न्याय दिला. धम्मालही तितकीच होती. बालकलाकारांचा खास अनुभवही होता. कधी कधी सिनेमात घडतं ते खरंही वाटत नाही आणि जे समोरा समोर घडतं ते अगदी सिनेमासारखंच असतं. आम्ही सगळे जमलो होतो तेव्हा या दोन्हीतून वावरलो. निखळ आनंद, ऐकमेकांशी वाढलेलं स्नेह आणि टांगारूसहीत परतभेटीच्या ओढीनेच आम्ही हे गटगं पार पाडलं. संयोजनात काहीश्या त्रुटी राहिल्याही असतील पण प्रत्येक पुढचा अनुभव हा मागच्या अनुभवातून शहाणा झालेला असतो असं म्हणतात ना मग पुढचं गटग असंच जोरदार होणार. नितीन-चिंचवड, चंपक , मी_आर्या , दिप्स , शुभांगी, आशुतोष तुमची अनुप्स्थिती जाणावली. पुढच्यावेळेस नक्की यायचा प्रयत्न करा.
असेच काही स्नेहाचे क्षण आपल्या आयुष्यात येतात आणि काही क्षणांसाठी आपण त्यात रेंगाळत असतो..त्या रेंगाळण्यात एक वेगळाच आनंद असतो. आपण कधी न पाहिलेल्या, भेटलेल्या पण सतत आपल्या संपर्कात असलेल्या अश्या मित्र मैत्रीणींना गटग सारखं दुसरं मोकळं रान नाही. भल्या भल्यांची उनाड जत्रा भरते ना त्यालाच म्हणत असावं गटग.. मायबोलीच्या रुपानं हे बर्याचदा अनुभवायला मिळालंय याचा आनंदच आहे.
लोकहो.. भेटुयात परत.. नक्की .. असेच संपर्कात रहा..
सूर्यकिरण | 16 January, 2012 - 22:08
गटग .. शब्दही नवे नाहीयेत नी संकल्पनाही. मी ९ वीत असतानाच आंतरजालाच्या संपर्कात आहे. तशी आंतरजालाची ओळखही पिंपरी-चिंचवडनेच करून दिलेली. पहिलं संकेतस्थळ असेल तर ते म्हणजे याहू.कॉम. माझ्या वैयक्तिक आयुष्यातले काही खास क्षण सुद्धा याच संकेतस्थळाशी जोडलेले आहेत. त्याचे अनुभव पुन्हा केव्हातरी. गटग बद्दल बोलायचंच झालं तर मी उपस्थित असलेलो पहिलं गटग डेक्कन जवळ रुपाली हॉटेलमधे झालं. तिथे MIRC ( Microsoft Internet Relay Chat ) या चॅटींग वेबसाईच्या पुणे कम्युनिटीचं ! पुणे, गुजरात, मुंबई वरून बरेच जण तिथे एकत्र भेटायला आलेले. तेव्हाचे भारत चॅनलचे अॅडमिन अशोक एमएसएनच्या वेबचॅटवरून हजर होते. अश्या गटगला मला लाभलेला उपस्थितीचा क्षण काही औरच होता. बरीच धम्माल केली. आजही त्यातले काही संपर्कात असतात. अधून मधून आवर्जून चौकशी करतात. खरंतर तेव्हापासूनच गटगतल्या आश्चर्यचकित करणार्या चेहर्यांना भेटण्याची आणि त्यांच्या ओळखपरेडीतल्या गंमती-जमतीची सवय. त्यानंतर डिप्लोमाला गेल्यावर, डिप्लोमा पुर्ण झाल्यावर बर्याचदा बर्याच नविन जुन्या चेहर्यांना नव्यानं भेटणं झालं आणि मैत्रीच्या खातं फक्त भक्कमच होत गेलं... आजही निखळ 'मैत्रीचं' फिक्स्ड डिपॉझिट असल्यानं हलक्या फुलक्या खार्चिक दु:खांचा भार वाटत नाही.
मायबोली आणि तीची ओळख तशी जूनीच अगदी ६ वर्षापुर्वीचीच.. जुन्या आयडीचे पासवर्ड गायब त्यांच्या नोंदीसाठी दिलेले ई-मेल गंडल्यामुळे त्यांना फक्त इथे सर्च करून शोधता येतं पण लॉगिन करता येत नाही. असोत. सूर्यकिरण (suryakiran) हे माझे दोन्ही आयडी. ते फार फार तर लॉगीन व्यवस्थेसाठी एकमेकांचे ड्यु आयडी असू शकतात. पुर्वीचा रोमातला मी मध्यंतरी नोकरीत स्थिरावल्यावर कट्ट्यावरचा संदिप झालो आणि जशी संधी मिळेल तसं इतर बाफवर वावरू लागलो. आता मायबोली म्हणजे आपलीच बोली ना मग कशाला कोण काय बोलतंय? कविता लिहायचो, चारोळ्या लिहायचो .. नंतर नंतर अंताक्षरी बाफवर गेलो तिथे बराच काळ घालवल्यानंतर मी_आर्या आणि वर्षू नील ह्या आयडीशी ओळख झाली. कट्ट्यावरही बर्यापैकी बरेच जण ओळखू लागले होते. त्यानंतर काही दिवसातच मायबोली २०१० च्या वर्षाविहाराची यशस्वी आणि सर्वाथाने एक वेगळी मायबोली गटगचा बाफ इथे दिसला. मग काय त्यात नाव नोंदवलं आणि माझंच नाही तर मृ चं सुद्धा नाव नोंदवलं. मग त्याच्या टि शर्ट संयोजनाचं आणि ववि पैसे भरण्याच्या ठिकाणाजवळ मला आणखी मायबोलीकर समोरा समोर भेटले. त्यातली जुनी मायबोलीकर म्हणजे दक्षिणा, परेश लिमये, प्रणव कवळे, समीर रानडे , सचिन (फदी) हे सगळे भेटले. ओळखी होत गेल्या, अधून मधून संभाषणं होत गेली आणि वविचा दिवस म्हणजे मायबोली परीवाराला एकत्र येताना पाहण्याचा तो सुखद अनुभव. तो अनुभव अक्षरक्षः धम्माल असतो हे २०११ चा वविला टांग मारताना बोचत होतं. तिथे विशाल कुलकर्णी, योगेश जगताप, प्रसाद , गणेश , पल्ली आणि यो रॉक्सचा डान्स, आशुतोष सारखं सरप्राईझ आणखी बरेच जण.. आणि आमच्या जिंकलेल्या टिमचा जल्लोष आणि सगळ्यांचा एकत्रित फोटो.. अगदी अगदी न विसरण्यासारखं .. त्यानंतर बरीच छोटी मोठी गटग झाली.
नंतर मायबोलीकरांच्या ट्रेक कडे वळलो. आयुष्यातला पहिलाच ट्रेक म्हणजे कुलंग, त्यानंतर कविता,विश्वेष, अमित देसाई, विनय भिडे,योगेश, इंद्रा, गिरी यांच्याबरोबर केलेला राजमाची ट्रेक ( लहान मुलांबरोबरचा ).. मृ तेव्हापण सोबत होती. डोळा मारा काळ्या कुट्ट अंधारात केलेल्या त्या रात्री दिड वाजेपर्यंतच्या टवाळक्या, घारूअण्णाची चहाची तल्लब .. जिप्स्याची फोटुग्राफी .. सगऴं सगळं फिरूनी परत एकदा अनुभवावं अगदी असंच होतं.
नंतर सुनील गावडे (अंबोलकर) , समीर रानडे हे वेळच्यावेळी भेटणारे मायबोलीकर मैत्रीच्याही पलीकडचे होऊन गेले. दोघेही पिंपरी-चिंचवडमधेच नोकरी वा स्थायिक असल्याने भेटणेही सोपे असायचे. मग ट्रेक .. उगाचचीच भटकंती हे सगळं चालू झालं. तेव्हापासून ते आत्तापर्यंत अगदी कालच्या गटगला पण आम्ही भेटलोच आणि असेच भेटत राहणार. दोस्ती दोस्त बढानेसे बडी नही बनती दोस्ती तो निभानेसे बडी होती है .. ! अश्या काही खास मित्रांमधे हे उमजायला जास्त वेळ लागत नाही म्हणतात ना तेच खरे ! नंतर पिंपरी-चिंचवडच्या बाफवर चिमुरी आणि नितीनचंद्र भेटले. नितीनचंद्र म्हणजे पिंपरी-चिंचवड बाफवरचे बर्यापैकी सिनीयर सभासद. मग आशुतोष आला, गुब्बी (शुभांगी) आली. दिप्स अधून मधून यायचा. योगिता जुनीच पण इनअॅक्टीव मेंबर आणि मग आबासाहेब, योगुली असे सगळे अॅड होतच गेले आणि माझी मायबोलीवरची दिवसाची वारी कमी झाली. ह्यांच्या गप्पा अधून मधून वाचण्यासाठी मोबाईलवर इंग्रजीतून कधी कधी येण्याची खोड असायचीच. झकासला त्याच्या फोटोग्राफीमुळे ओळखतच होतो, मितानला तीच्या बेल्जियमच्या वाडीमुळे आणि नॉर्वेच्या दरीखोर्यांमुळे ओळखून होतो. लिंबूटिंबूना वविमध्ये प्रत्यक्षात पाहिलेच होते त्यामुळे तो काय आहे हे मी मायबोलीकरांना वेगळं का सांगावं? असे सगळे अधून मधून का होईना पण पिंपरी-चिंचवड बाफवर मला भेटले. काही अज्ञात लोकही इथे यायचे.. त्यातले कोणी 'पिंपरी मधे टिव्हीचा अॅन्टीना कुठे मिळतो का?' , हि शाळा कुठे आहे तिच्याबद्दल कोणाला माहीती आहे का हे सुद्धा विचारायचे. हाहा चालायचंच. पाटी दिसली कि आवर्जून चौकशी करायचीच हिच आपली संस्कृतीवजा खोडच म्हणावं लागेल. फिदीफिदी
बरं वरती चिमुरीने लिहिलेल्या वृत्तांतामधे परवा झालेल्या गटग संयोजनाचा प्रवास तर कळला असेलच पण तरीही खास प्वाईंट आहेतच ते म्हणजे -
१.यापुर्वीही गटगच्या बोलाच्या कढीला फक्त उतच आलेला प्रत्यक्ष कढी वरपायला मिळालीच नाही.
२. नितीनचंद्र यांच्या पुढाकाराने हाऊस ऑफ रोल्स, आकुर्डी भेळ चौक अशी बरीच फक्त सुचलेलीच स्थळं आणि गटगचा न पडलेला फडशा.
हे सगळं बाजूला सारून मागच्या आठवड्यात चंपीच्या त्या आकुर्डीला आलोय या पोस्टने आणि लिंबू (नित्सुरे गुरूजी ) यांच्या यशस्वी पुढाकाराने आणि श्री. झकासराव यांच्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर भक्ती शक्तीची पावन भूमी बाराच्या- बारा जणांच्या उपस्थितीमुळे दुमदुमली नसली तरी प्रत्येकाच्या आठवणीत कुठेतरी फिट्ट बसलीच असेल. त्यातही योगुलीचे सारखे सारखे हारतुर्यांचे प्रोत्साहन.. वगेरे वगेरे गोष्टी झाल्याच. नित्सुरे गुरूजींनी फळ्यावर लिहीलं कि यायचंच आहे मग आमच्या सारख्या शिष्यांना ते डावलणं कसं जमेल म्हणून सगळ्यांनी ओळीत नावं नोंदवली. त्यात राज्या, सम्या, सचिन, गुब्बी यांनीही नावे नोंदवून घेतली. संक्रातीच्या पुर्वसंध्येला भक्ती शक्तीला जमायचं असं ठरलं. ठरल्याप्रमाणे ज्याने त्याने आपापल्यापरीने आग्रह वजा ई-मेल्स वगेरे पाठवून आपापली येण्या-जाण्याची सोय आणि त्याबरोबर एका पिंचिकराची वाढणारी उपस्थिती जमवून आणली. :दिवे: अर्थात, पिंचिच्या बाफवर लोकं थोडी नी गप्पा फार असंच चालंत आलंय. डोळा मारा गटगसाठीचा बाफ त्यावरचे नित्सुरे गुरूंजीने डकवलेलं गुललसाभार चित्रं आणि तो पांढरा गोल जो गटगच्या वेळी कुठेच दिसला नाही. बहुदा ती तबकडीच असावी .. परत कधी न दिसणारी हाहा गटगची वेळ जशी-जशी जवळ येत गेली तसे गुळाला काही शेलके मुंगळे हळू हळू येऊन चिटकतात तसे काही महिला सभासद भक्ती शक्ती जवळ येऊन पोहचले फिदीफिदी दिवा घ्या त्यात .. मितान, चिमुरी (राजकुमारी), योगुली (जय सोबत ), चंपी (निमिष) सोबत हजर होते. मी तिथे घाईघाईतल्या मुंगळ्यासारखं पोहचलो तेव्हा वाटलेलं मीच आता शेवटच्या बाकावर बसणार वाटतं पण पहिल्यांदा पोहचूनही शेवटच्या बाकावर बसण्याची सवय जुनी आणि अंगवळणी पडलेलीच... म्हणून तिथे या सगळ्यांना एकदा दुरूनच पाहून मी मागे परत वळालो. तेव्हा तिथे एक सदगृहस्थ अगदी नव्याने बावरलेल्या हरणासारखे इकडे तिकडे टकमक बघत होतं. आता एखादी कस्तुरी मृगाची हरणी असती तर लागलीच संपर्क साधला असता पण काय करणार .. ते करण्याची ती वेळ नव्हती आणि ती वेळ निघून गेल्याचे वेळोवेळी सांगायला धोक्याची घंटा सातवर्षापुर्वीच बांधली होती. रच्याकने, ते हरीण म्हणजे आपले आबासाहेब बरं का. हे त्यांना पुढे चाल चालून दिल्यावर मागे उभा राहून फोन केल्यावर कळवले कि मीच तो सूर्यकिरण उर्फ सुकी. तरीही बिचारे भेदरलेल्या अवस्थेतच. असुदे असुदे .. व्हायचंच असं पहिल्या गटग ला. मग आम्ही महिला मंडळाशी ओळख करून घेतली. मग फोनाफोनी करून गटगचे पाहुणे सभासद समीर आणि राज्या किती वेळचे झकासच्या घरून निघतायेत असेच सांगत होते.. मग भक्ती शक्तीच्या सानिध्यात थंडीला अनुभवत आम्ही सगळे एकत्र जमलो. नित्सुरे गुरुजी मात्र मागेच कुठेतरी राहीले होते. बहुतेक तेच ती तबकडी घेऊन येणार अशी दाट शंका मनात येऊन गेली. डोळा मारा झकास म्हणजे झकासच होता. त्याला उल्हास व्हॅलीच्या फोटोंमधे आणि ट्रेकर मंडळीच्या स्पीड ब्रेकरच्या वर्णनातून ओळख झाली होती. सम्या आणि राज्याची ओळख मी इथे आणि त्यांनी तिथे स्वत्:हून करून द्यावी यासारखे नवल कुठेही घडणार नाही याची खात्री असूनही हे नवल इथेच घडू शकतं हेही नव्यानंच कळलं. नित्सुरे गुरुजी आले. त्यांनतर आम्ही सगळे 'माझ्या आईच्या हरवलेल्या पत्राला' इथे भक्ती शक्ती मधे शोधणार आहोत आणि सोबत ऐकमेकांची ओळखही करून घेणार आहोत असेही कळले. स्मित लोकांची बघण्याची नजरही थोडी तशीच होती. मग काय पहिल्यांदा जरबेराच्या पिवळ्याधमक फुलांनी मनप्रसन्न स्वागतांनी नित्सुरे मास्तरांच्यासकट आम्ही सगळे भारावून गेलो तो भार पेलतो ना पेलतो तोच झकास, नित्सुरे गुरूजी आणि मी यांच्यावर आणखी एका फुलांचा भार .. ते प्रकरण खरोखर वेगळंच होतं आणि आवडलेलंही. मग राजकुमारीने आणलेले चॉकलेटस सगळ्यांना वाटले. त्यात सम्या आणि राज्यांनं मी दोरी लावलेल्या भोवर्याची फिरकी चिमुरी, योगिता, मितान यांच्यासमोर नित्सुरे गुरूजीं येण्याच्या आधी घेतलीच होती. गटगतल्या ओळखपरेडच्या हंगामाचे दोन फिरकी गोलंदाज म्हणजे सम्या नी राज्या हे होतेच आमच्यात. ओळख परेडला झकास कडून सुरवात झाली. झकासनी स्वतःची ओळख करून दिली नंतर सौ. झकास यांनी मग मितानकडे वळलो तेव्हा तिच्या नोकरीबद्दल तिने सांगितलं तेव्हा स्कूल सायक्लॉजी हा नवाच करीअर ऑप्शन कळला. त्यानंतर तीने तीच्या मितान आयडीची कहाणी सांगितली ते ही बेल्जियमच्या वाडीतलं एक रहस्यच म्हणावं लागेल. मग त्यानंतर चिमुरीची ओळख .. मग योगुलीची ओळख थोडी लांबलीच..पण ते लाजमी होतं.. डोळा मारा तेव्हढ्यात राज्या खचाखच फोटो काढून आपल्याला मिळालेल्या फोटोग्राफी बक्षिसाबद्दल सांगितले.. माझी ओळख, मग आबासाहेबांना काही वेळासाठी बोलकं होताना पाहिलेले ते क्षण, नंतर सचिनचं ती एन्ट्री .. आणि नित्सुरे गुरूजींची ओळख यासाठी.. एखादा मध्यांतर हवा ना ? आहो .. मध्यांतरामधे कुठलेही प्रॉडक्ट विकले जाणार नाहीये.. फार फार तर एखादी .. फिल्मी लाईन वगेरे बघायला मिळेल इथे.. वृत्तांताच्या स्क्रिनवर ...
पिंचिगटग पार्टू आणखीच इंट्रेस्टींग आहे.. खादाडीशिवाय कुठलंच गटग यशस्वी होत नाही हा नियम झालाय आणि कितीही प्रयत्न करूनही तो मोडलाच जात नाही हे त्या नियमाचं वैशिष्ट्य.
थांबा.. सिनेमा अजून बाकी आहे दोस्तांनो..
आणि हा मी लिहिलेला वृत्तांत
पुर्वसुचना:
१) वृत्तांत बराच लांबला आहे त्यामुळे वाचताना कुठेही कंटाळा येतोय असं वाटु लागल्यावर त्वरीत वाचन थांबवावे.
२) उपस्थित आणि टांगारु यांना काही माहिती अनावश्यक वाटल्यास आणि ती काढुन टाकावी असं वाटल्यास, न संकोचता सांगावे.. वेळ मिळेल तसे बदल करण्यात येतील.
३) व्याकरण आणि शुद्धलेखनाच्या चुका दाखवुन दिल्यास राग येणार नाही पण त्या लगेचच दुरुस्त करण्यात येतील याची हमी वेळेअभावी देवु शकत नाही.
४) वाचताना आपल्याला हवे तिथे दिवे घ्यावेत, गटगच्या ठिकाणचा अंधार लक्षात घेवुन इथे दिवे लावण्यात आलेले नाहीत.
गटग १:
स्थळ: पिंपरी चिंचवड बाफ, मायबोली
वेळ: दिवसभर, आपापल्या सोयीने ये-जा
काळ: भूतकाळ, ३ जानेवारी २०१२
वृत्तांत १:
कोणे एके काळी (काही दिवसांपूर्वी, म्हणजेच ३ जानेवारी २०१२ रोजी) एकदा चुकुन वाट चुकुन पिंचिं बाफवर आलेल्या झकासरावांनी (यांचा यापुढे झरा असा उल्लेख होइल याची कृपया नोँद घ्यावी) गटगचा विषय काढला. तसा हा विषय यापूर्वी बर्याच जणांनी टाइमपाससाठी चघळला होता पण यावेळेस सगळ्यांनीच या विषयाला जास्तच उचलुन धरले. अनायसे त्यादिवशी लिंबूटिंबू (या यां एल्टी अ उ हो या कृ नों घ्या), योगिता (या यां पिल्लु अ उ हो या कृ नों घ्या) हे पिंचिंकरही बाफवर उपस्थित होते आणि त्यांनीही झराची कल्पना (आयडिया या अर्थी) उचलुन धरली. (स्वगत: हे तिघेही आधीच गटग करायचंच असं ठरवुन तर त्या दिवशी बाफवर आले नव्हते ना अशी आता शँका येण्याचे कारणंच काय?). बाफवर नेहमीचा वापर असलेले नितीनचंद्र (यां या नि३ अ उ हो या कृ नों घ्या), आबासाहेब (यां या आसा अ उ हो या कृ नों घ्या), योगुली (यां या योगुली अ उ हो या कृ नों घ्या) आणि कधीतरी उगवणारे सूर्यकिरण (यां या सुकि अ उ हो या कृ नों घ्या) यांनीही या कल्पनेला पाठीँबा दिला आणि गटग साठी काळ, वेळ, स्थळ ठरविण्यात आपापल्या किबोर्डने जमेल तितकी बाफवरची जागा अडवली.
सर्वांच्या सोयीने बराचसा काळ, वेळ खर्ची घालुन शेवटी एकदाची १४ जानेवारी २०१२ भक्ती-शक्ती, निगडी (एक्झॅक्ट लोकेशनसाठी गटग नोंदणीच्या धाग्यावरील एल्टींनी दिलेला नकाशा बघा), संध्याकाळी ६.३० ते ७ वाजता असं काळ, स्थळ, वेळ निश्चीत झालं.. त्यानंतर सर्व पिंचिंकर शोधुन काढुन त्यांना संपर्कातुन मेल पाठवण्यात आले.. ((इतकं सगळं सविस्तर सांगण्याचं प्रयोजन असं की गटग करण्याची SOP – Standard Operating Procedure अशी माबोवर कुठे सापडली नाही, म्हणुन यशस्वी झालेल्या या गटगच्या Procedure ला SOP अशी मान्यता मिळावी या करता हा खटाटोप्). (एक नम्र विनंती: गटगचे आमंत्रण देताना ज्या बाफवर आहात त्याच्या मालकाला बोलवायला विसरु नये, मीपण नव्हते विसरले, म्हणजे आधी लक्षात नव्हता राहिला दीप्स, पण नंतर विसरलेलेही नाही हे महत्वाचं)) त्या मेलांना बाफवर हजर असलेल्यांचाच लगेच रिप्लाय आला हे विशेष. त्यानंतर सगळ्यांनी आपापल्या स्मरणशक्तीला ताण देवुन विसरलेली नावं शोधुन काढली.. पिल्लुने सगळ्यांना एकत्र मेल पाठवुन पुण्याचं (पुणे-पुण्याच या अर्थी नव्हे, पाप-पुण्य मधलं पुण्य्) काम केलं.. खूप जास्त पुण्य एकटीलाच नको मिळायला असा खूपच नि:स्वार्थी विचार करुन ती गटगला आली नाही, हरकत नाही (ही ओळ खरंतर दुसर्या वृत्तांताची आहे पण असो, ट्रेलर समजुन वाचा). तेव्हड्यात नि3ने सगळ्यांना जबरदस्त तंबी दिली की मला न बोलावता जर गटग केलंत तर भूत बनुन गटगच्या दिवशी एकेकाच्या मानगुटीवर बसेन (खरा डायलॉग आठवत नाहिये, पण मतितार्थ हाच होता). आणि त्या तंबीला घाबरुन कुणीतरी (मला वाटतं झराने) भूत लिहिणं बंद करुन बूत लिहिणं चालु केलँ. असो तर दिवसाअखेरीस हे पहिलं गटग न ठरवता पिंचिं बाफवर पार पडलं (सकारात्मक अर्थाने, आपटलं या अर्थी नव्हे).
त.टी. या गटगचे प्रचि अर्थात स्क्रीन्शॉट्स उपलब्ध नाहीत.
गटग २:
स्थळ: पिंपरी चिंचवड बाफ, मायबोली
वेळ: दिवसभर, आपापल्या सोयीने ये-जा
काळ: भूतकाळ, ४ जानेवारी २०१२
वृत्तांत २:
या गटगची सुरुवात आशुतोष०७११ (आतो) यांच्या मला विसरलात ना? अश्या पोस्टने झाली.. खरंतर पाहुण्या पिंचिंकरांना रीतसर आमंत्रणं धाडणार होतोच पण हे तेव्हा लक्षात आलं नाही, आणि आम्ही खरंच विसरलो अशी कबुली आम्ही देवुन बसलो. (विनाशकाले STML – Short Term Memory Loss (अशी आमंत्रणं पाठवणार होतो हे देखील आता आठवलं पण ही STML नव्हे, ही LTML – Long Term Memory Loss)). त्याला विसरल्याबद्दल त्याची बर्याचदा क्षमा (माफ करणे याअर्थी, त्याची क्षमा (असल्यास) आम्हाला काय कामाची) मागुन त्याला रितसर गटगचं आमंत्रण दिलं, पण त्याला जमणार नसल्याच त्याने लगेच सांगुन टाकलं (ऐनवेळी टांगारु होण्यापरीस हे बेश्ट). नंतर पुन्हा बाफवर आदल्या दिवशीच्या गटगच्या उपस्थितांची आगमनं झाली. यादिवशीच्या गटगमधे मुख्य गटगची आमंत्रण पत्रिका छापण्याची जबाबदारी झरा यांनी एल्टींवर ढकलली आणि ती एल्टींनी यशस्वीपणे पेलली. नुस्ती पत्रिका (http://www.maayboli.com/node/31684) छापुनच ते थांबले नाहीत तर त्याची त्यांनी रिक्षाही फिरवली (कुठे ते त्यांनाच माहित, आम्ही नसत्या चौकश्या करीत नाही). पत्रिकेचं (आमंत्रण) मुख्य वैशिष्ठ म्हणजे भेटन्याच्या जागेचा नकाशा. भेटायचा कोपरा अगदी व्यवस्थितपणे सगळ्यांना दाखवला होता (पण तो कोपरा कोणता हे मला शेवटपर्यंत कळलंच नाही, एल्टींना विचारायचं देखील राहुनच गेलं). पण या पत्रिकेवरचे प्रतिसाद हे वाहुन जातील की काय या शंकेने पत्रिका धाग्यावर जास्त चर्चा झाली नाही. कारण जर प्रतिसाद वाहुन जायला लागले असते तर अतिमहत्वाचं असं एल्टींचं पहिलंच पोस्ट वाहुन गेल्यावर कुठे भेटायचं याचं उत्तर कोनालाच देता आलं नसतं. गटग आयोजनाचा मुख्य भर गटगला शक्य तितक्या लोकांनी यावे हा होता म्हणुन भेटल्यावर काय करायचे यावर जास्त चर्चा झाली नाही. भेटल्यावर ठरवु काय करायचे असं ठरलं. उपस्थितांचे हार-तुरे देवुन सत्कार करण्यात येतील असं योगुली यांनी आश्वासन दिलँ. त्यानंतर केवळ संयोजकांनाच हार-तुरे देण्यात येतील असं ठरलं. एकुनच सगळी ठरवाठरवी ठरवुन हे दुसरं गटगही पिंचिं बाफवर पार पडलं. (वाचक हुशार आहे असं समजुन कंसांची पुनरुक्ती टाळत आहे).
त्यानंतर मुख्य गटग होइपर्यंत सगळे जण एकमेकांना गटगची आठवण करुन देत होतेच. होता होता तो दिवस उजाडला. १४ जानेवारी २०१२.
गटग ३ (मुख्य गटग्):
स्थळ: भक्ती-शक्ती, निगडी
वेळ: सायंकाळी ६.३० ते ७ पर्यँत जमायचे
काळ: १४ जानेवारी २०१२
वृत्तांत ३:
या गटगला सुरुवात होण्याच्या थोडावेळ आधी आपण भेटावं म्हणजे बोलणं होइल असं माझं आणि योगुलीचं मत पडल्याने आम्ही गटगची वेळ ६.३० वरुन ५ अशी केली. ४ वाजता योगुलीने ५ वाजता भेटायची आठवण करुन दिल्याने आम्ही (म्हणजे मी) सवयीप्रमाणे वेळेवर पोहोचलो. परंतु योगुलीला हार-तुर्यांची आठवण करुन दिल्याने तिला पोहोचायचा वेळ झाला. तेव्हड्या वेळात मोबाइलवरुन पिंचिं बाफला भेट दिली असता नि३ येणार नसल्याचे कळले. कनक म्हणुन कोणीतरी मी येवु का असँ विचारल्याचं दिसलं, पण कनक आलीच नसावी.. तसंच संजीव म्हणुन कोनीतरी गटगला येणार असं म्हणुनही त्या नावाचं तिथं कोणी आलं नाही. आणि आसा अजुन फक्त दीड तास अशी पोस्ट टाकत असताना मी तिथे योगुलीची वाट बघत होते..
थोड्याच वेळात् मॅडमला आणि जयला सोडायला श्री. योगुली आले आणि लगेचंच परतले. आणि बर्याच दिवसांनी भेटणार्या मैत्रिणींसारखं बोलणं चालु झालं. याच श्रेय अर्थात् योगुलीला. आपण स्वत:शीदेखील स्वत:बद्दल जितक्या दिलखुलासपणे बोलणार नाही तितक्या दिलखुलासपणे योगुली सगळ्याबद्दलच बोलते. तिचा छोटा जय म्हणजे तर अगदी आदर्श बच्चुच. त्याची नेमबाजी झाल्यावर आम्ही स्थळाची (भक्ती-शक्तीची) पाहणी करुन आलो.. मस्त भरपुर गप्पा झाल्या तिथे. मला बोलतं करायला तिच्याइतका कमी वेळ कोणालाच लागला नाहिये अजुनपर्यंत. त्यानंतर चंपी येत असल्याने कळले, म्हणुन आम्ही परत त्या सुप्रसिद्ध कोपर्यावर जायला निघालो, परंतु पुन्हा मधेच थांबुन गप्पा चालु झाल्या. तितक्यात चंपी आणि तिच्या छोट्या निमिषला घेवुन मितान आली. चंपकला यायला जमलं नाही. पुन्हा एकदा गप्पांना उत आला.. आणि मग स्वारी वळली पुन्हा भक्ती-शक्तीकडे.. योगुलीने सगळ्यांचं जरबेरा देवुन छान स्वागत केलं.. थोडा वेळ वाट बघुन फोनाफोनी चालु झाली असता बाकीचे थोड्याच वेळात येत असल्याचे कळले.. सुकि, आसा आल्यानंतर पुन्हा गप्पा सुरु होत आहेत हे लक्षात आल्यावर तिथे असलेल्या खेळणीवाल्याने तुम्ही लोक इथे उभे असल्याने माझ्याइथे कोणी येत नाहीये असं म्हणुन आम्हाला हुसकुन लावलं.. म्हणुन बाकीच्यांना आतमधेच यायला सांगुन पुन्हा एकदा आम्ही भक्ती-शक्ती मधे प्रवेशलो..
सुकि, आसा बरोबर आलेल्या 2 पाहुण्यांनी आल्या आल्या ओळखा पाहु आम्ही कोण आणि तुम्ही कोण अशी दुहेरी प्रश्नांची सरबत्ती चालु केली.. त्यावर सम्या-राज्या असं उत्तर आल्यावर त्यांनी सुकिला थोडं (मनातल्या मनात कदाचीत भरपुर) झापलं. त्यातील एकाने मग पवित्रा बदलुन मी एल्टी असं सांगुन दुसरा सम्या-राज्या पैकी नक्की कोण असा प्रश्न विचारला. परंतु तो एल्टी आहे यावर कोणाचाच विश्वास बसला नाही.. शेवटी मी एल्टी असं म्हणणारा राज्या आणि दुसरा सम्या (म्हणजे समीर, याला सुकि सारखा सम्या सम्या करत असतो म्हणुन तेच तोँडात बसलं.. सम्या असा समीरचा आय्डी नाही त्यामुळे आपण त्याला सम्या म्हणुन नये हे खूप उशिराने सुचलेलं शहाणपण्) हे निश्चीत झालं.. तोवर झरा सहकुटुंब आले, सौ. झकासराव आणि झकुला सोहम् सहीत. त्यांनी आल्या आल्या तुम्ही कोण असं आगाउपणे न विचारता प्रथम स्वत:ची आणि कुटुंबाची ओळख करुन दिली आणि नंतर मग बाकीच्यांची ओळख करुन घेतली. मग पुन्हा एकदा कोण, कोण आहे याची उजळणी झाली.. झराने आसांची मुलाखत घेतली पण नोकरीच्या प्रश्नानंतर पुढील प्रश्न नक्की छोकरीचाच असेल असं समजुन तो विचारण्यास राज्याने त्याला बंदी केली. आसा शांतपणे बसुन त्यांना जे प्रश्न विचारण्यात येतील त्याची हळु आवाजात उत्तरे देत होते. आणि तेव्हड्यात आले एल्टी..
पुन्हा एकदा चालु झाली ओळखपरेड.. मग परत एकदा आसांची मुलाखत झाली.. त्याआधी जयने सगळ्यांना चॉकलेट्स दिली आणि योगुलीने राहिलेल्यांच फुलं देवुन स्वागत केलं.. ओळखपरेडच्या मधेच मितानने चिंचवडच्या परदेशीकडच्या गुळाच्या रेवड्या आणि चंपीने माबोवरचीच पाकृ वापरुन केलेल्या तिळगुळाच्या वड्या यांचे डबे फिरवण्यात आले आणि छोटी खादाडी चालु झाली.. चंपीचं सारखं वड्यांचा आकार नीट झाला नाही असं चाललं होतं, पण अंधारात एकतर आकार दिसत नव्हता आणि चवीला वड्या मस्त झाल्याने आकाराकडे कोणाचेच लक्ष गेले नाही.. अधे मधे राज्याचं फोटोसेशन चालुच होतं.. तीन पिल्लांचीही मस्त मजा चालु होती.. सौ. झकासराव ही मायबोलीकर नसतानाही तिची ओळखपरेडमधुन सुटका झाली नाही.. एल्टींचीं ओळख चालु असताना राज्याने त्यांना बाकीचे आय्डी सांगायचा आग्रह केला आणि त्याचा मान राखुन त्यांनीही त्यांच्या पहिल्या आय्डीची ओळख सांगितली..मितानला तिच्या फिल्डबद्दल लिहिण्याचा सारखा सारखा आग्रह होत होताच. तिनेही त्यावर लवकरच लिहीन असं आश्वासन दिलेलं आहे. . मधेच योगिता आणि शुहे येणार नसल्याचं कन्फर्म झालं.. चंपकची चंपी, बडबडी योगुली, सध्या अॅक्टीव्ह (माबोवर) नसलेला समीर, गाववाला सुकि यांच्या ओळखी झाल्या. एल्टी मधे मधे सुचक प्रश्न विचारत होतेच आणि त्याशिवाय या आय्डींबद्दल त्यांना असलेली माहितीही पुरवत होते... राज्याने आपण मायबोली कधी जॉइन केली ते अगदी तारखेसहीत सांगितलं आणि नंतर त्याच्या आयडीतल्या ज ला य चं प्रयोजनही सांगितलं.. ओळखपरेड संपत आल्यावर एंट्री झाली सश्याची म्हणजेच स्_सा/सचीन/फदी.. मग त्याची ओळख परेड झाली.. मधेच निमीषच्या जन्मपत्रीका काढण्यात काय काय अडचणी येवु शकतील यावर छोटीशी चर्चा झाली... सरतेशेवटी चर्चा चालु झाली यापुढे काय करायचं याची.. शेवटी शिल्पाजवळ (शिवाजी महाराज आणि तुकोबारायांचं भक्ती-शक्तीचं शिल्प) गृप फोटो झाल्यावर बाहेर पडुन खादाडी करायची ठरलं.. तिथल्याच् उतारावर निमिषने चालत-पळत विविध बाललीला करुन दाखवल्या..
वृंदावन मधे जेवण सर्व्ह करायला बराच वेळ घेतात म्हणुन तिथेच स्नॅक्स खायचे ठरलं. प्रत्येकाची वेगवेगळी ऑर्डर लिहुन घेत असतानाच तिथल्या वेटर दादाला मितानने लवकर आण सगळं असं प्रेमाने साँगितलं. पण त्याने तिच्याकडे चक्क दुर्लक्ष केलं आणि नंतर तर तो गायबच झाला.. ऑर्डर यायची तेव्हाच आली, आणि परत फोटोसेशन चालु झालं.. तत्पूर्वी सगळे जण हॉटेलमधे बसत असताना समीर आणि राज्या ही जोडी कुठेतरी थोड्या वेळाकरता गायब झाली होती.. खादाडी चालु झाल्यावर राज्याच्या फोटोग्राफीला उधान आलं. त्याला खात असतानाचाच फोटो हवा होता प्रत्येकाचा, त्यामुळे तो अगदी प्रत्येकावर नेम धरुन बसत होता.. इतके सगळे फोटो काढत असताना त्याच्या समोरील सँडवीच त्याने नक्की कधी संपवले त्याचे त्यालाच माहित.. इथे मात्र डाव्या बाजुचे आणि उजव्या बाजुचे असे दोन भाग पडुन दोन्हीकडे वेगवेगळ्या गप्पा चालु झाल्या.. मधले आम्ही कधी इकडे कधी तिकडे गप्पा नाहितर गप्प असं चालु होतं.. योगुली बराच वेळ झराला कसलंतरी लेक्चर देत होती.. त्यातुनही वेळ काढुन झरा आजुबाजुला बसल्यांची चौकशी करत होताच.. आणि तितक्या वेळात योगुली सौ. झराशी गप्पा मारत होती.. त्यामुळे सौ. झराला बोर झालं नसेल अशी अपेक्षा आहे.. मधेच "त्याने चुकुन पीएचडी केली" असंही एक वाक्य कानावर पडलं, परंतु त्याचा पुढचा मागचा संदर्भ नसल्याने कुणीही आपल्याला हवा तसा अर्थ काढु नये ही नम्र विनंती.. राज्याने दक्षीण भारतात ताक-भातातील ताक हातात घेवुन कसं पितात याचं सादरीकरण केलं, परंतु ताक मागवलं नसल्याने प्रात्यक्षीक करायचं राहुन गेलं.. पुढच्या गटगला ताक नक्की मागवण्यात येइल याची राज्याने नोंद घ्यावी.. मधेच जुनी मायबोलीवरही चर्चा झाल्याचे आठवते.. खादाडी, कॉफी संपता संपता कोण कसं घरी जाणार, कोण कुणाला कुठे सोडणार याकरता झरा आणि राज्याने काळजीवाहु सरकार स्थापन केले..
झराने पुढचं गटग चिँचवड स्टेशनला करु म्हणजे सगळ्यांना अजुन सोयीचं जाइल असं म्हणुन पुढच्या गटगचं स्थळ निश्चीत करुन टाकलं.. योगुलीनेदेखील तिच्या घरी दाल-बाटी गटग करु असं आमंत्रण दिलं आहे.. याचबरोबर चंपीने आणि सौ. झकासरावने देखील खूप आग्रहाने घरी नक्की या असं बर्याचदा साँगितलेलं आहे.. गटगचं अजुन एक वैशिष्ट म्हणजे आलेली तिनही छोटी पिल्लं प्रचंड गुणी आहेत..त्यांनी अजिबात त्रास न देता खाणं आणि गटग एन्जॉय केलं.. नि3, चंपक, योगिता, शुभांगी, आर्या, दीप्स, आतो यांची अनुपस्थिती जाणवली, पुढच्या गटगला हे सगळे देखील उपस्थित असतील अशी आशा करायला हरकत नाही..
एल्टी, झकास, राज्या, सम्या आणि सुकि यांचे विषेश आभार कारण त्यांनी सगळ्यांची खादाडी स्पॉन्सर केली... सुकिच्या आग्रहाचा मान राखुन समीर आला आणि स_सा देखील गटगला उपस्थित राहिला याकरता त्यांचेही विषेश आभार.. राज्यानेदेखील खूप लांबुन गटगला येवुन भरपुर फोटो काढले याकरिता पिंचिंकर आभारी आहेत.. हार-तुर्यांकरता म्हणजेच फुलांकरता आणि चॉकलेट्स करता धन्स् योगुली आणि जय्.. मला घरी सुखरुप पोहोचवल्याबद्दल आणि छानश्या रेवड्यांकरता मितानचे खास आभार.. चंपीला तिळगुळाच्या वड्या आणि निमिषला घेवुन आल्याबद्दल खूप धन्यवाद.. आसांना कदाचीत चुकीच्या कळपामधे आल्यासारखे वाटले असण्याची दाट शक्यता आहे तरिही ते शेवटपर्यंत थांबल्याबद्दल त्यांनाही धन्यवाद... पुढच्यावेळी आबइला घेवुन यायचं आहे आसा... झराचेही कुटुंबाला घेवुन आल्याबद्दल आभार..
माबोवरील आय्डी हे जेव्हा व्यक्ती म्हणुन भेटतात तेव्हाच खरीखुरी ओळख होते..
त.टी. माझं हे पहिलंच माबोचं गटग, अपेक्षेपेक्षाही जास्त एंजॉय केलं... 3 तासाचं गटग डायरीत लिहिण्यापेक्षा सरळ वृत्तांताच्या रुपातंच लिहावं असं त्यामुळेच वाटलं आणि ऑफिसमधे तितका वेळ मिळणार नाही म्हणुन संक्रांतीच्या संध्याकाळी ३ तासाच्या गटगचा वृत्तांत ३ तासातंच लिहुन काढला.. थोडक्यात लिहीन असं म्हणुन चालु केलेलं लिखाण बरंच लांबलं आहे.. गटग आठवुन आठवुन लिहिण्याच्या भानगडीत जरा जास्तच डिटेल्स लिहिलीले गेले आहेत्.. मलाच लिहुन लिहुन कंटाळा आला असल्याने, आता परत वाचुन काहिही खाडाखोडी करत नाहिये.. तरिही उपस्थितांना काही डिटेल्स काढुन टाकावेत असं वाटल्यास त्वरित सांगावे.. वाचतानाही कंटाळा आला असेलच, पण काय करणार, आलिया भोगासी म्हणुन सोडुन द्या... यात काही उल्लेख राहिले आहेत पण ते चुकुन राहिले नसुन बाकीच्यांना लिहायला काहितरी शिल्लक ठेवावं या उदात्त हेतुने काही उल्लेख टाळले आहेत.. त्यामुळे आता बाकीच्यांचे वृ येवुद्यात.. सुकिचा वॄत्तांताच्या शेवट लिहुन तयार आहे, आता तो कधी टाकतो वृ कोण जाणे..
जाता जाता, गटगला हजर असलेल्या माबोकरांची यादी :
सूर्यकिरण
लिंबुटिंबु
मितान
चिमुरी
योगुली (+जय)
झकासराव (+झकुला (सोहम) आणि सौ.झकासराव)
आबासाहेब
स्_सा
चंपी (+निमिष)
राज्या
समीर
मकरसंक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा..
एल्टी बाळांच्या कमेंटला
एल्टी बाळांच्या कमेंटला अनुमोदन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
यावर तो बिचारा मान खाली घालून म्हणाला, "पहले ऑर्डर तो दो">>>>>>
हे माहितच नव्हतं...
चिमुरे, तुला अजुन बरच काय
चिमुरे, तुला अजुन बरच काय माहित नाही.
म्हणुनच कदाचित आमच्या बाजुकडील कुणि फारस गडबड करीत नव्हते, तो लहानगा निमिष देखिल मधे मधेच त्या छडीकडेच बघत असावा की काय असा दाट संशय आहे मला! ![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझ्या दिव्य दृष्टीला मितानच्या हातातली अदृष्य छडी देखिल दिसत होती!
पण स्कूली की काय त्या चाईल्ड सायकॉलॉजी मधे पन्तोजिन्ची छडी वापरतात का?
एल्टी
एल्टी![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
चिमुरी आणि सुक्या वृत्तांत
चिमुरी आणि सुक्या वृत्तांत एकदम भारी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फोटो मलापण पाठवा jrajesh@suzlon.com या मेल आयडी वर.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझ्याकडचे फोटो वेळ मिळेल तसे मेल करेन.
राज्या धन्यवाद.. तुला मेल
राज्या धन्यवाद.. तुला मेल केले आहेत फोटो.. तुझ्याकडच्या फोटोंची सगळेच वाट बघत आहेत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हा वृतांत नव्हे पण थोडेफार
हा वृतांत नव्हे पण थोडेफार हायलाइट्स म्हणुन फारतर.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
१) संयोजकाना हारतुरे अस फक्त बोलाचीच फुले न करता, खरीखुरी छान आणि सुंदर फुले योगुलीने आणलीत. धन्यवाद योगुली.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
२) राज्याला त्याच्या हापिसात फोटो स्पर्धेत बक्षीस मिळालय त्यामुळे गडी लढाईत दांडपट्टा काय जोरात फिरवावा त्या आवेशात दणादण फोटो काढत होता. शेवटी मी त्याला आठवण करुन दिली की कॅमेरा मी चार्ज नाही केलेला तेव्हा ग्रुपफोटोसाठी बॅटरी शिल्लक राहु दे.
३) रेवडी, तिळाच्या वड्या आणि चॉकलेट दिसायला सुंदर आणि चवीला उत्तम होते. फस्त झाले सगळे.
४) वृंदावन मधला ऑर्डर घेणारा मितानने "दादा, वेळ लावायचा नाही" ज्या भाषेत विनंती केली होती ती ऐकुन
१०-१५ सेकंद हॅन्ग झालेला पाहिलय मी.
५) एवढ्या समजेनंतरदेखील हाटेलवाल्यानी फारच वेळ लावला बॉ, पण तेवढ्यात बर्याच गप्पादेखील मा॑रता आल्या हा फायदा झालाच.
६)प्रिन्सेस चिमुरी बाफवर गप्पिष्ट तर प्रत्यक्षात शांत आहे. मी तिला रोजच्या पीएमटीच्या प्रवासाबद्दल गटगमध्ये नमन केलच आहे. परत एकदा _/\_.
७)सम्या सॉरी रे. तुला माहितेय का बोलतोय ते. आपण परत भेटु. बॅचलर्स खाजगे गट्ग
८)सुक्याचा व्रुतांत वाचुन हे कळतय की तो तिला (मृ) सगळ्या जीटीजीला घेवुन गेलाय. आम्हाला न भेटवल्याबद्दल त्याचा निषेध. :रागः
९) राज्या फॉर्मात होता. हडपसर (पुण्याच सोलापुर रोडवरच एक टोक) पासुन निगडी (पुण्याच मुंबई-पुणे रोडवरच शेवटच टोक) ते परत कात्रज (पुण्याच कोल्हापुर बाजुच शेवटच टोक) असा प्रवास असुनदेखील तो ज्या उत्साहात होता ते पाहुन त्याला _/\_ नमन. राज्या कधीहि कुठेही यायला जायला तयार असतो बस दोस्त कंपनी चांगली पाहिजे.
१०) सम्यासुद्धा पुण्यातुन आला. ग्रेट. (माझ्या आळशी शरीरास आणि मनास पुणे ते निगडी जड वाटत हो)
११) योगुलीने मी फार बडबडी आहे हे डिक्लेअर केले होते, ते तसे करायची गरज नव्हती. ते आपोआप कळत होत.
१२) मला वाटल होत चम्पी "मी बाइ फोरीन रिटर्न" म्हणुन फार भाव खाइल पण ती तर डाउन टु अर्थ आहे. बिचारीला चम्पुकल्याने फारच पळवल.
१३) चम्पुकला फारच बिन्धास्त आहे. पटकन मिक्स होतो आणि मग गाडी सुस्स्साट.
१४) योगुलीचा छोकरा फारच शांत आहे.
१५) हे पिचिकरांछ पहिलच गटग असल्याने "टांगारुच्या बैलाला भो" अशी आरोळी ठोकली नाही पण पुढच्या वेळेस ही सवलत नाही हे समस्त टांगारुनी लक्षात घ्यावे.
१६) आबासाहेब फारच शांत आहेत बॉ. होतील हळुहळु मिक्स. कारण मी देखील पहिल्या गटगला असाच्ग शांत शांत होतो.
१७) मितान तु तुझ्या फिल्डबददल लिहिणार आहे हे लक्षात ठेव.
१८) स्_सा उर्फ फदीची एन्ट्री अनपेक्षीत पण आनंददायी होती. आता वारंवार भेट होइलच.
१९) जे पिचिकर आले नाहीत त्यांची आठवण काढली गेली. दिप्स, दक्षिणा, चम्पक, नितिन्चंद्र, शुभांगीहेमंत, योगिता (पिलु छोटा) अशी काही नाव मला आता आठवत आहेत. अजुनही असतील पण मला आता लक्षात येत नाहिये/
२०) फदीशी भेट झाल्यावर अर्थातच जीएस, आरती, कूल, सायबरमिहिर अशा त्यांच्या ट्रेक ग्रुपची आठवण निघालीच. कार्यबाहुल्यामुळे जमत नाही असही कळाल. मी ह्यातल्या फक्त आरतीला भेटलोय पण हा ग्रुप मला जवळचा वाटतो त्यामूळे आपोआपच मी ह्यांची आठवण काढली होती.
२१) फक्त चम्पीच्या एका वाक्याने ट्रिगर झालेल्या माझ्या कल्पनेला सगळ्यानी उचलुन धरलं आणि आनंददायी भेट घडवुन आणली ह्या बद्दल सन्योजक आणि इतरजण मी आपला खुप आभारी आहे.
फोटो येत आहेत खादाडीचे. तयार रहा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हा वृतांत नव्हे पण थोडेफार
हा वृतांत नव्हे पण थोडेफार हायलाइट्स म्हणुन फारतर.>>> म्हणजे वृत्तांत लिहिणार आहेस का अजुन?
... मस्त, मजा आली.. भारी लिहिलं आहेस ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
८, ९, १० भन्नाट![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
४ ची मी पण साक्षीदार आहे.. त्यावर तो दादा आधी ऑर्डर तर द्या असं म्हटलेलं आसाने ऐकलेलं आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
म्हणजे वृत्तांत लिहिणार आहेस
म्हणजे वृत्तांत लिहिणार आहेस का अजुन?>>>![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छे छे हे हायलाइटस लिहिता लिहिताच हात दुखले माझे.
आम्ही ट्वेन्टी-ट्वेन्टी वाले, लिम्बु आणि तुझ्यासारखे टेस्ट प्लेयर नाही टायपींग मध्ये.
झकास, मस्त लिहिलेस सगळ्या
झकास, मस्त लिहिलेस
सगळ्या पॉईन्ट्स ना अनुमोदन
सगळ्या पॉईन्ट्स ना
सगळ्या पॉईन्ट्स ना अनुमोदन>>>>>>> हो, हे राहिलंच की![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
झर्या २०-२० तच जास्त मजा येते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अबब....... फक्त २१ आणि
अबब....... फक्त २१ आणि हायलाईट्स........![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
असो पण छान लिहिले आहे.....
८, ९, १० खरेच मस्त.......
११ भनभन भन्नाट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
हे आहे पिम्परि चिन्चवडच्या
हे आहे पिम्परि चिन्चवडच्या ऐतिहासिक अशा प्रथमच झालेल्या गटगच ठिकाण. (फोटो ससा उर्फ फदीने काढलाय)
सुस्वागतम....
खादाडी सुरु![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![]()
From GTG khadadi" alt="" />
१)
२)![]()
From GTG khadadi" alt="" />
३)![]()
From GTG khadadi" alt="" />
४)![]()
From GTG khadadi" alt="" />
५)![]()
From GTG khadadi" alt="" />
६)![]()
From GTG khadadi" alt="" />
७)![]()
From GTG khadadi" alt="" />
८)![]()
From GTG khadadi" alt="" />
अजुन फोटो पहायचे असतील तर खालील लिन्क वर जा. तिकडे माझे अजुन काही अल्बम आहेत ते पाहिले तरी चालतील.
(जाहिरात जाहिरात)
https://picasaweb.google.com/113685262669821816210/GTGKhadadi#
झकासा मला फोटु दिसत नाहीत, अन
झकासा मला फोटु दिसत नाहीत, अन ती लिन्कही आमच्यात चालत नाही, सबब मेल मधुन पाठव!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
झकोबा...........एकदम
झकोबा...........एकदम झक्कास..........![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
झक्कास फोटो झकास
झक्कास फोटो झकास![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लिम्बु तुमच्यात पिकासा बॅन
लिम्बु तुमच्यात पिकासा बॅन हाय काय??
पाठवतो मेल.
झकोबा, आमच्यात बरच काय ब्यान
झकोबा, आमच्यात बरच काय ब्यान आहे
मध्यन्तरी माबो देखिल ब्यान केली होती मागल्यावर्षी.
कोणत्या इमेल पत्यावर पाठवतोहेस? लौकर पाठव.
आम्ही ट्वेन्टी-ट्वेन्टी वाले
आम्ही ट्वेन्टी-ट्वेन्टी वाले << वाढव वाढव स्टॅमिना वाढव रे झकास.. टायपिंगचा.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
झकास, खाजगे गटगचं काय झेंगाट आहे रे? ![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
झक्या,हायटाईडच्या गटगच्या हायलाईटस मस्तच लिहिल्या आहेस रे.
कॉफी फोटोतच कसली भारी दिसतेय.
राज्याला आता बक्षिस द्यायलाच हवं. फोटो मस्तच काढलेत त्याने.
खाजगे गटगचं काय झेंगाट आहे
खाजगे गटगचं काय झेंगाट आहे रे? डोळा मारा![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
राज्याला आता बक्षिस द्यायलाच हवं. फोटो मस्तच काढलेत त्याने.>>>
ते बक्षीस त्या जीटीजीतच देवुया.
बाकी एक हायलाइट राहिलेच लिहायच.
भक्ति शक्ती इथे बसल्यावर थंडी वाजत होती म्हणुन मायबोलीकर थोडे थंडावलेच होते, हाटेलात गेल्यावर मात्र फॉर्मातच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खाजगी गटगची चर्चा करण्यासाठी
खाजगी गटगची चर्चा करण्यासाठी वेगळा बाफ काढा![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
अजुन एक राहिलं झकासने आल्या आल्या समीरला केसांबद्दल कॉम्प्लिमेंट दिली ते...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ये मी नाय काय... ती फदीने
ये मी नाय काय... ती फदीने दिली होती.
नेरुळ रहीवासिंचे गटग कधी
नेरुळ रहीवासिंचे गटग कधी करुया? आहे का कोणी
हो का.. बरं झालं सांगितलंस..
हो का.. बरं झालं सांगितलंस.. मला तुच दिली होतीस, तुच आल्या आल्या बोलायला सुरुवात केली म्हणुन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
झक्या, हायलाईट्स भारीच बाकी,
झक्या, हायलाईट्स भारीच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
बाकी, खाजगी गटगची वाट मी पण बघतोय
हायला! मी आताच पाहतोय झकासचे
हायला! मी आताच पाहतोय झकासचे हायलाइट्स आणि खादाडीचे फोटो.
बादवे, आपला गृप फोटो कुणी पाठवला कि नाही अॅडमीनला?
सुकिने पाठवला होता गॄप फोटो
सुकिने पाठवला होता गॄप फोटो पण त्याचं पुढे काय झालं माहित नाही...
ग्रूप फोटो आधी इथेच अपलोड करा
ग्रूप फोटो आधी इथेच अपलोड करा म्हणजे सगळ्यांना आधि इथेच पाहता येईल. मग आम्ही इथून घेऊन फेसबुकवर टाकू.
घ्या चिमुरीने हे काम चांगल
घ्या चिमुरीने हे काम चांगल केल. फोटो इथेच टाकला.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आता जाउद्या फोटो फेसबुकात.
Pages