कृष्ण व अर्जुन यांचे ते चित्र

Submitted by जागोमोहनप्यारे on 29 May, 2011 - 02:59

महाभारतामधील कृष्ण व अर्जुन यांचे ते चित्र घरात लावू नये असे म्हणतात. त्याने घरात वाद निर्माण होतात, असे काही लोकांचे मत आहे. आपणास काय वाटते? ते चित्र घरात असावे की असू नये? वास्तुशास्त्रवाले तर असे सांगतात, पण वास्तुवर विश्वास नसणारेही बरेच लोक असेच मत मांडतात. याबाबत कुणाला काही अनुभव आहे का?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिवसभर ते दृश्य पाहून आमच्या आजीबाईंना रात्री स्वप्नात घोडे दिसू लागले व एकदातर म्हणे त्यांनी सांगितले की आमचा श्वास कोंडतो आहे तेव्हा आम्हाला मोकळे करा

ही हकिकत त्र्यंबकेश्वर च्या चतुर ब्राम्हणांना कळाली तर ते 'काल अश्व योग' नावाचा पत्रिकेतला बोगस योग शोधून काढतील. मग त्याच्या शांतीसाठी 'नारायण अश्व बळी' नावाचा विधी. त्र्यंबकेश्वराला जा, तीन दिवस राहून 'नारायण अश्व बळी' करा, सोन्याचा घोडा करा आणी येताना तो ब्राह्मणाला दान द्या !

सनातनवाल्यांचे असेच पांढरट पार्शवभूमी असलेले चित्र आहे. ही दोन्ही चित्रे जरा सातिव्क वाटतात.. कारण कृष्ण, अर्जुन, घोडे या गोष्टी जास्ती रेखीव, ठळक आहेत.. पाठीमागे शस्त्रास्त्रे घेऊन राहिलेले सैन्य, मोडलेले रथ इ. दाखवलेले नाही किंवा अगदीच धूसर आहे. या चित्रातील सर्वसाधारण वातावरणही केशरी, पिवळसर, आकाशात ढग काळवंदलेले असे असते. तेही सनातनच्या चित्रात दिसत नाही. झेंड्याभोवती असणारी फिकट प्रभावळ जी इतर चित्रात दिसत नाही. . त्यामुळे चित्र सात्विक वाटत असणार.

सादरीकरणात सनातनचा हात कुणी धरु शकत नाही. Happy

महाभारत पुस्तक माझ्याही घरी आहे, काहीही भांडणे , कलह वगैरे होत नाहीत.
मामांच्याघरी ते चित्र लावलेले आहे, हे मी लहान पणापासून पाहतेय. पण तिथेही तसे काहीच नाही.

मूळ प्रश्नापेक्षा हा धागा आणी त्यावरचे प्रतीसाद भयंकर विनोदी आहेत्.:हाहा:

आणी रामायण हे महाभारताच्या आधी घडले होते, मग दशरथ राजा हे चित्र त्याच्या महालात कसा लावील बरें?:हहगलो:

आणी रामायण हे महाभारताच्या आधी घडले होते, मग दशरथ राजा हे चित्र त्याच्या महालात कसा लावील बरें?<<

ही तुमची चुकीची गैरसमजूत आहे.
रामायणाचे संहिता लिखाण हे महाभारतानंतर झाले आहे असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. सबब, महाभारताचे चित्र रामायणात दिसू शकते Wink

Pages