सृजन, मायबोली शीर्षक गीत आणि मी - (भानू)

Submitted by भानू on 20 January, 2012 - 00:30

मी नुकतीच माबो कर झाले आहे. तेही या रोमहर्षक चळवळीत सहभाग घ्यायला मिळाल्यामुळे, मनापासून अभिनन्दन करायचे आहे म्हणून. सुमारे गेल्या तीनेक वर्षांपासून मी मायबोली चं कौतुक मधून मधून ऐकत होते, माबो चे टी शर्टसुद्धा वापरत होते आणि अचानक मायबोली परीवारात चन्चुप्रवेश मिळाला, निमित्त मायबोली शीर्षक गीत. सृजन ला गाणं आतून आवडतं. पण आपल्या गुरुंखेरीज इतर कुठे/कुणासमोर गायला स्वारी तयार नसते. पण योग घरी आले तेव्हा मात्र सुर लगेच जुळले. मी जेव्हा सृजन ला घेउन स्टुडीओ मध्ये गेले तेव्हा एकीकडे प्रचन्ड excitement होती तर दुसरीकडे अनामिक हुरहुर होती (कदाचित अनोळखी वातावरणाचं दडपण). पण तिथे हजर असलेल्या व्यक्तिंमुळे (देवकाका, अनिताताई, रैना, मिलींद आणि योग) सगळं दडपण कुठल्याकुठे पळून गेलं. सृजनही आश्चर्य वाटेल इतक्या चटकन सगळ्यांमध्ये रुळला :-)

माझ्यासाठी हा एकन्दरच नविन प्रकार होता. मी कधीच net savy नव्हते..त्यामुळे केवळ नावांवरून (तेहि बहुतांशी टोपणनावांनी), लिखाणावरुन एकमेकांना ओळखणार्‍या मंडळींमधला इतका जिव्हाळा, निर्मळ मैत्री बघून खरच आश्चर्य वाटलं..आणि मायबोली 'ही स्नेहजाल विणते' हे पटलं.

गाण्याचं रेकॉर्डींग हे प्रकरण खर तर कठिणच होतं. पण सगळ्यांनीच खूप मेहेनत घेतली आणि एका मागुन एक कोरस, एकेकाचं स्वतन्त्र रेकॉर्डींग पूर्ण झालं. सृजन च गाणं रेकॉर्ड होतांना बघणं म्हणजे खूपच सुखद अनुभव होता. सगळ्या कलाकरांना अनेक शुभेच्छा! योग च्या संगीताचं (आणि संयमाचंही) कौतुक! या मोठ्ठ्या शब्द-सुर चित्रातला एक रंग होउ शकल्याचा (किंवा रंगाला चित्रापर्यन्त पोचवल्याचा) अभिमान वाटतो आहे.
.....आणि मी मायबोलीकर झाले आहे !! :-)

IMG_1186.jpg
सृजन त्याचा नंबर यायची वाट पहाताना

Srujan.jpg
सृजन ध्वनिमुद्रणाच्या तयारीत

मायबोली शीर्षकगीताची झलक पहा:

झलक मधील गाय़कः

१. मायबोली आलापः भुंगा (मिलींद पाध्ये)
२. धृवपदः अनिताताई (अनिता आठवले), योग (योगेश जोशी)
३. समूहः मुंबई, पुणे, दुबई येथिल सर्व गायक

संपूर्ण श्रेयनामावली:
मुंबई: रैना (मुग्धा कारंजेकर), अनिताताई, प्रमोद देव, भुंगा, सृजन (सृजन पळसकर- मायबोलीकर युगंधर व भानू यांचा मुलगा)
पुणे: विवेक देसाई, सई (सई कोडोलीकर), पद्मजा_जो (पद्मजा जोशी), स्मिता गद्रे, अंबर (अंबर कर्वे), सायबर मिहीर (मिहीर देशपांडे)
दुबई (सं. अरब अमिराती): देविका आणि कौशल केंभावी (मायबोलीकर श्यामली ची मुले), सारिका (सौ. योग), दीया (योग व सारिका ची मुलगी), वर्षा नायर, योग
कुवेतः जयावी- जयश्री अंबासकर
ईंग्लंडः अगो (अश्विनी गोरे)
अमेरिका: पेशवा, अनिलभाई

ऑडियो व्हिज्युअल टीम - आरती खोपकर (अवल), नंदन कुलकर्णी (नंद्या), हिमांशु कुलकर्णी (हिम्सकूल) आणि आरती रानडे (RAR)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थोडक्यात पण अगदी मनापासून लिहिलंत..... लिखाण आवडलं.

सृजनचा एक अधिक स्पष्ट असलेला फोटो माझ्याकडे आहे.
तो इथे टाकला तर चालेल का ?

सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद!
उल्हासजी, अगदी जरूर टाका फोटो...आवडेल
आता पूर्ण गाणं ऐकायचे वेध लागले आहेत. Happy

मस्त आहे मनोगत Happy
सृजन मुळे तुमचा मायबोलीत प्रवेश झाला म्हणायचा Happy
मायबोली परिवारात तुमचं स्वागत.
सृजन चं मनापासून कौतुक Happy

सरळ चढतो हाँ सृजनचा आवाज. लहान मुलं किती सहज गाऊन जातात.
भावना, तुम्ही दोघं त्याच्या गाण्याकडे ल़क्ष द्यालच. Happy

सृजनला हार्दिक शुभेच्छा!
भानू, मायबोलीवर तुमचं स्वागत.
खुप गोड आवाज लागला आहे त्याचा!

छोटंसं पण सुंदर मनोगत Happy

त्यामुळे केवळ नावांवरून (तेहि बहुतांशी टोपणनावांनी), लिखाणावरुन एकमेकांना ओळखणार्‍या मंडळींमधला इतका जिव्हाळा, निर्मळ मैत्री बघून खरच आश्चर्य वाटलं.. >>> Happy

खूप सुंदर गाणं! मी पहिल्यांदाच ऐकल. कुणाचा आवाज कुठला आहे हे पण लिहायला हवं होत. सर्वांचे अभिनंदन. मी पण गातो पुढल्या वेळी मला पण गायला आवडेल. मी शास्त्रिय संगीत अजून शिकतो आहे. सोबत सतार आणि तबला पण अजून शिकतो आहे. पुढल्या वेळी मला नक्की संधी द्या Happy