जवा खडूस पाँटींग हा...
मूळ गाणे
आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं
तुझ्या गं बोलण्याला आता मी मानलं
शेजारची ही काळी मैना लागली डोलायला
तवा लागली डोलायला
जवा नविन पोपट हा, लागला मिठू मिठू बोलायला
काय सांगु तुला ह्या दोघांची गोष्ट
..... ...... ..... .... ......... ......
पाहु नको ग मैनेचा झोका
लागतोय झुलायला
आता लागतोय झुलायला
जवा नविन पोपट हा, लागला मिठू मिठू बोलायला
जोवर नव्हती मैनेला जोडी ऽ ऽ
खायाला देताना नाक, तोंड मोडी ऽ ऽ
राघुला पाहून, लाजून गाऊन
डाळींब सोलायला
लागली डाळींब सोलायला
जवा नविन पोपट हा, लागला मिठू मिठू बोलायला
पोपट माझा घालतोय शीळ ऽ ऽ
मैनेची तिकडे होई तळमळ ऽ ऽ
संधी ती साधून, जाते धावून
पिंजरा तोडायला
तो पिंजरा तोडायला
जवा नविन पोपट हा, लागला मिठू मिठू बोलायला
पोपट माझा लै लै गुणी
साऱ्यांच्या तर तो भरलाय मनी
.... ... प्रेमाचा साज
लागतोय फुलायला
बघा लागतोय फुलायला
जवा नविन पोपट हा, लागला मिठू मिठू बोलायला
-------------------------------------------------
(देवा, केदार द्या तो हातोडा... तवा गरम आहे तोवर मी ही हातोडा मारुन घेतो )
विडंबन
कल्चर जे त्याचं, तो त्यालाच जागला
ऑसी जसे वागती, तो तसाच वागला
नंदीबैलावानि बेन्सन बोट वर करायला
लागला बोट वर करायला
जवा खडूस पॉंटींग हा लागला खोटं नाटं खेळायला
काय सांगू तुला मी सिडनीची गोष्ट ऽ ऽ
बकनर नावाचा अंपायर खाष्ट ऽ ऽ
राहून गाफिल, प्रत्येक अपील
उचलून धरायला
लागला उचलून धरायला
जवा खडूस पॉंटींग हा लागला खोटं नाटं खेळायला
सायमंड्सने काढली भज्जीची खोड ऽ ऽ
उत्तरला भज्जीही तोडीस तोड ऽ ऽ
कसा मुजोर तो कांगारू चोर
लागला बोंबलायला
उलटा लागला बोंबलायला
जवा खडूस पॉंटींग हा लागला खोटं नाटं खेळायला
न्यायाचे नाटक प्रॉक्टर करं ऽ ऽ
उंदराला साक्षी मांजर गोरं ऽ ऽ
मद्य जणू प्याला, अशा मर्कटलीला
लागला करायला
गोरा लागला करायला
जवा खडूस पॉंटींग हा लागला खोटं नाटं खेळायला
जवा खडूस पॉंटींग हा लागला खोटं नाटं खेळायला
~मिलिंद छत्रे
आवडलं रे...
मिल्या...
विडंबन आवडलं. गणपतीच्या दिवसांची आठवण झाली. एकदा तुझ्या विडंबनावर गणपतीत नाचायला हवं !
बाय.
संदीप
मस्त विडंबन
मिल्या तुमचे Timing मस्त आहे.....
'परदेसाई' विनय देसाई
मस्त आहे
मस्त झालेय विडंबन.
मिल्या
हातोडा जोरदार मारला आहेस
मस्तच आहे.
मधे मधे मुळ गाण्यात तु ............ अस लिहिल आहेस ते मुद्दाम आहे का??
मला मुळ गाण पुर्ण आठवत नाही पण ह्या गाण्यावर टिका झाली होती अस आठवतय.
मिल्या सहीच रे..:)
मस्तच लिहिलय..:)
अगदी आनंद शिंदेंच्या आवाजाला शोभेल असं लिहिलय..:)
एकदम मस्त!
पाँटींगला मराठी येत नाही नाहीतर आनंद -मिलिंद शिंदे यांच्या आवाजातले हे नविन गाणे ऑस्ट्रोलियाच्या कानाकोपर्यात वाजले असते.
- महागुरु
अगदी मस्तच!
अगदी मस्तच! खरच त्या ***पोपटींग*** ला मराठी समजायला हवे होते.
सणसणीत हातोडा
सहीच मिल्या दादा
सणसणीत हातोडा मारलाय अगदी.
जबरीच.
छान
मिल्या, मस्त लिहिलंय. मी वाचताना माझ्या कानात 'आनंद शिंदे' चा आवाज चालीत विडंबन म्हणतोय असा येत होता. शब्द एकदम चपखल बसलेत.
सहि रे भिडू!!
नेहमी प्रमाणेच पंच बसलाय!!
वा उस्ताद वा!!!
सही रे मित्रा...जबरी जमलं आहे..मजा आ गया....
हाहाहा
मिल्या परफेक्ट!!!! खासच जमलंय....
पाँटिंगला मराठी यायला हवं होतं....
जमलेय छान!!
मिल्या.... too good!! आवडलं!!
मस्तच्
मिल्या, नेहमीप्रमाणे हेही विडंबन सही जमलय. पाँटिंगला मराठी येत नाहि म्हणून काय झालं? पुढच्या वेळेला ब्रेट ली आशा भोसले बरोअब्र गाणं म्हणायला आला की आपण त्यालाच ऐकवू. पुढची प्रसिद्धी तो करेलच. आणि भारतीय खेळाडूना तर नक्की समजतील तुझ्या भावना.
झ्याक
झ्याक झालंय विडंबन. ह ह पु वा.
एकापेक्षा एकमधे परवाच हे गाणं लागलं होतं. त्यामुळं अगदी त्या आवाजात आणि त्या आर्ततेत नीट ऐकू आलं
मेलमधे येईलच आता लगेच.
तुसि ग्रेट हो..!
व्वा मिल्या... नेहमीप्रमाणे एकदम परफेक्ट नि मस्तच जमलय..
मिल्या...
सही रे....
खि खि खिखि
लय भारी रे भॉ ... बेश्ट
परागकण
धन्यवाद
मायबोलीकरांनो खूप सारे धन्स..
विनय : अहो जाहि नको हो... आणि तुमची 'सही' मस्त आहे
झकास : अरे ते ..... शब्द माहित नाहियेत म्हणुन आहेत रे... मुद्दामहून नाही.. मलाही असे वाटायचे की ह्या गाण्याचे बोल अश्लिल आहेत पण नीट ऐकल्यावर तर तसे वाटले नाही का अज्ञानात सुख कुनास ठाउक?
आणि भारतीय खेळाडूना तर नक्की समजतील तुझ्या भावना. >>>नंदिनई तुझी सचिनशी ओळख असेल तर त्याला नक्की ऐकव गं
सन्मे : अगदी अगदी.. एकापेक्षा एक पाहूनच सुचले हे विडंबन
visit http://milindchhatre.blogspot.com
खासच!
मिल्या, त्या पाँटिंगला मेल कर रे!! :):)
मस्तच जमलयं! :):)