जहांतक महक है मेरे गेसुओंकी - ऋचा दास

Submitted by बेफ़िकीर on 16 January, 2012 - 08:53

छत्तीसगड हा मध्यप्रदेशचा तुकडा पडण्याआधी रायपूर सेक्सी होतं! नंतर ते कसं झालं ते पाहायला मी गेलेलो नाही.

हल्ली कशालाही सेक्सी म्हणण्याची फॅशन आहे. 'तुझी आजी कूल आहे आणि आजोबा सेक्सी आहेत' असे एखादा किशोरवयीन मुलगा मित्राला म्हणाला तर मला आता काहीही वाटणार नाही.

आजोबा सेक्सी आहेत हे विधान मी व्हिज्युअलाईज करण्याचा प्रयत्नही करणार नाही.

गौरव मायनिंग या नागपूरमधील आमच्या एजंटचा एक उपएजंट रायपूरला होता आणि लार्सन अ‍ॅन्ड टूब्रो या कंपनीच्या हिरमी सिमेंट वर्क्सला अर्थमूव्हिंग इक्विपमेन्ट्सचे स्पेअर्स सप्लाय करण्याच्या आमच्या कंपनीच्या सेक्सी कल्पनेला सत्यात आणायला तो कमिशन मिळाल्यास तयार होणार होता. बातचीत करण्यासाठी मी नागपूरहून तडक रायपूरला पोचलो होतो आणि पहिल्यांदा राधिका, नंतर अप्सरा आणि शेवटी असेच 'सेक्सी' नाव असलेल्या एका हॉटेलमध्ये सेटल झालो होतो. आधीच्या दोन्ही हॉटेल्समध्ये प्रत्येकी दोन दोन दिवस राहिल्यानंतर रायपूर हे एक बंडल गाव आहे या निष्कर्षापर्यंत पोचणार तितक्यात एका बर्‍या हॉटेलमध्ये खोली मिळाली आणि तो निष्कर्ष एकांतातही व्यक्त करू नये असे वाटायला लागले.

दुष्काळग्रस्त विभागात हेलिकॉप्टरमधून अन्नाच्या पुड्या फेकाव्यात आणि त्या कोणालाही कितीही मिळाव्यात तसे नशीब कोणाच्याही वाट्याला कसेही येते साले!

ऋचा दासचा नवरा गोव्याच्या एका हॉटेलात दोघांना उत्तम प्रतीचा जॉब मिळण्याच्या प्रयत्नासाठी काही महिन्यांपासून गोव्याला होता तेव्हा ऋचा दास ते रायपूरमधील हॉटेल झळाळात होती. आणि दोघे होते कलकत्याचे! मी पुण्याचा! नशीब रायपूरला माझ्यासाठी थांबले होते.

ऋचा दास सोने, चांदी व ऑक्सीजन या मूलद्रव्यांपासून बनलेली होती. दुसर्‍याच्या मूलद्रव्यांमध्ये घातक रासायनिक प्रक्रिया घडवून आणणे याशिवाय ती रिसेप्शनिस्टचा साईड बिझिनेसही करत होती.

मला उन्हाळा पावसाळ्यापेक्षा आवडतो. कारण त्यात प्रतीक्षा असते.

पावसाळ्यात चिकचिकाट असतो.

थंडीत शुकशुकाट! उबदारपणाचा!

उन्हाळ्यात प्रतीक्षा! इतर दोन्ही ऋतूंची! प्रतीक्षा हा मानवी जीवनाचा सर्वोत्कृष्ट ऋतू आहे. त्यात आशा ही सोबतीण असते आणि इच्छा ही पत्नी! प्रतीक्षा नसली की संपले सगळे!

मानवी जीवन हा एक विवाहबाह्य संबंध आहे. आपल्याला आपण सर्वात जास्त आवडत असतानाही इतर माणसांशी अणि समाजाशी आपले जबरदस्तीने लग्न होते. मग आपले आपल्याबरोबरचे संबंध हे विवाहबाह्य संबंध ठरतात.

वेगवेगळ्या ग्रहांच्या भ्रमणकक्षा आणि वस्तुमानाचा प्रभाव अंतराच्या व्यस्त व वस्तुमानाच्या सम प्रमाणात इतर सर्व वस्तूंवर म्हणजे ग्रहांवर पडतो हे न्यूटनचे तत्व मान्य होऊनही पब्लिकला दिडशे वर्षे यूरेनस या ग्रहाची भ्रमणकक्षा अशी कशी काय आहे आणि न्यूटन म्हणत होता तशी का येत नाही आहे हे समजत नव्हते. न्यूटनला वेड्यात काढण्यापर्यंत आणि एकमेकांत मारामार्‍या होण्यापर्यंत मजल गेलेली असताना कोणालातरी नेपच्यून या ग्रहाचा शोध लागला आणि नेपच्यूनच्या प्रभावाचा परिणाम एक्वेशनमध्ये घेताच न्यूटनने सांगितलेले इक्वेशन अगदी परफेक्ट बसले आणि दिडशे वर्षांनी शास्त्रज्ञांना पुन्हा समजले की न्यूटन खरच महान होता.

नव्हता तो महान!

ऋचा दासचा प्रभाव आपल्या भ्रमणकक्षेवर अंतराच्या व्यस्त नव्हे तर समच प्रमाणात पडायचा. जितकी लांब तितकी जास्त आठवण आणि जास्त वेडगळपणा आपल्या वागण्यात! जवळ असली तर आपला होतो सुपरनोव्हा अन तिचे कृष्णविवर!

पहिल्या ट्रीपच्या सातव्या म्हणजे शेवटच्या दिवशी माझ्या रूममध्ये किस दिला होता तिने मला! चूळही न भरता की पाणीही न पिता ट्रेनमध्ये बसलो होतो मी! गीतांजली सुपरफास्ट!

वाटत होते की तिच्यायला उतरावे आणि पुन्हा रूम बूक करावी. पण कंपनीत काय समर्थन द्यायचे!

चार्म्स ओढायचो मी तेव्हा चार्म्स! रूपये ०.५० फक्त ला मिळायची हे एकच कारण ती सिगारेट ओढण्याचे!

आयुष्यातला चार्म संपल्यासारखा मागे पडणार्‍या स्टेशनांकडे पाहात होतो मी! आय कान्ट बिलीव्ह टूडे, पण मी तिला पुण्याहून चार कॉल केले होते. पहिले तीन पुण्याला पोचल्यानंतरच्या आठवड्यात आणि शेवटचा दिड महिन्याने, जेव्हा मी पुन्हा रायपूरला निघालो होतो.

ऋचा दास ही मुलगी प्रचंड दिलखुलास, सतत हासणारी आणि अ‍ॅडमीनच्या नावाखाली बिनधास्त रूमवर येणारी होती. आज सांगायला जरा इश्श वगैरेच म्हणावेसे वाटते, पण मला माहीत होते, की तिला मी त्यावेळी आवडलेलो होतो.

पहिल्या ट्रीपच्या पहिल्या दिवशी रजिस्टरमध्ये एन्ट्री करतानाचा डायलॉग आजही आठवतो.

"कहांसे सर?"

"पूना"

"ये कीज है! रूम सर्व्हीस ३०९, हाऊस कीपिंग २०२, रिसेप्शन ९ नंबर! चेक आऊट दोपहर बारा बजे है! कितने दिन रहेंगे सर?"

"जितने दिनकी कॅश जेबमे है"

खळ्ळ!

काउंटरवर चांदणं सांडलं! भर दुपारी!

हासताना डोळ्यात डोळे मिसळायची हरामखोर सवय होती तिला! आपण बावळट व्हायचो त्यामुळे! म्हणजे मी तरी! जे आहोत ते व्हायला मला अडचण येत नाही. जे नाही आहोत ते व्हायला फार कष्ट पडतात.

"मर्जी रहियेगा सर... कॅश ना हो तो बादमे दे दीजियेगा"

कैच्याकै! हिच्या बापाचे हॉटेल आहे काय? कॅश संपल्याचे सांगितले की दर पाच मिनिटाला फोन करायला लागेल की चेक आऊट कधी करताय?

एक आपलं मन जिंकायचं इतकंच!

"आपका नाम?"

"ऋचा दास"

"रूम टेरीफमे कोई डिस्काऊंट नही है?"

"रेग्युलरवालोंको होता है सर.. "

" मै आउंगा ना रेग्युलर"

खळ्ळ!

"देखती हूं सर.. वैसे किसीको ऑफर नही करते डिस्काऊंट... बहोत रिझनेबल रेट्स है"

"देखलीजिये... "

"शुअर सर..."

दुसराही संवाद आठवतो. लगेचच झालेला! मी रूममध्ये पोचल्या पोचल्याच तिला कॉल केला रिसेप्शनमध्ये!

"येस सर?"

"अ‍ॅक्च्युअली... मुझे फिफ्टी परसेंट डिस्काऊंट चाहिये....."

"फिफ्टी परसेन्ट???????????????????????"

"येस.... बाकीका फिफ्टी परसेन्ट आप उस चिपकलीसे रिकव्हर कीजिये जो मेरे रूममे आयी है"

खळ्ळ!

मला रूम बदलून दिली तिने! ऑफिशियली करता येण्यासारखे सगळे आनंदाने करत होती.

'करता न येण्यासारखेही करेलच' असे वाटावे इतपत आनंदाने!

संध्याकाळी हाऊसकीपिंग स्टाफबरोबर रूममध्ये आली होती सहज! मी उडालोच होतो. आली काय, टेरेसमध्ये काय गेली, परत आत आली आणि सोफ्यावर बसून बोलली काय! तो मुलगा साफसफाई करत होता. जुजबी बोलणे झाले त्यातून इतकेच समजले की ती इथेच राहते. तिचा नवरा महिन्याने पुन्हा येथे येणार आहे. खरे तर दोघेही इथेच जॉबला होते. पण नवरा दोन अडीच महिन्यांपासून गोव्याला कोणत्यातरी भारी जॉबचा प्रयत्न करत आहे.

चक्रावलो होतो मी!

असो! त्या ट्रीपमध्ये मी तिला एक नेकलेस आणणे आणि शेवटच्या दिवशी तिने माझ्या विनंतीवरून जवळ येणे व एक किस घेऊ देणे या व्यतिरिक्त काही झाले नाही. हे जे झाले त सहज होणार हे माझ्या अंतर्मनाने मला सांगितलेले होते. तितपत मोकळेपणा सात दिवसांमध्ये निर्माण झालेला होता. सात दिवसांत मी तिला तिच्या सौंदर्यावर अनेक कॉम्प्लिमेन्ट्स दिलेल्या होत्या. त्या सर्व तिने हासत व आनंदाने स्वीकारलेल्या होत्या.

जाताना मी राधिका आणि अप्सरा या दोन्ही आधीच्या हॉटेल्सकडे एक तुच्छ नजर टाकली होती. आता मी तिथे कधीच राहणार नव्हतो.

ऋचा दास सुंदर होती. सर्वार्थाने! सर्व व्याख्यांनी! निदान सर्व भारतीय व्याख्यांनी!

कोथागुडम, रामागुंडम, नागपूर, हैदराबाद , रांची, गोवा!

पुण्याला पोचल्यावर पुढील सर्व कामाच्या ठिकाणांवर फुली मारून माझ्या रायपूरच्या टूर्स निश्चीत झाल्या.

अगदी पुण्यातूनच एक गिफ्ट घेऊन निघालो मी! अती उत्साहात चेक इन करताना मला काहीच माहीत नव्हते. मी सरळ तिला रूममधून फोन केला आणि म्हणालो की मी तिच्यासाठी काहीतरी आणलेले आहे व तिने रूममध्य यावे. आलीसुद्धा ती! मी दिलेली गिफ्ट स्वीकारली. अगदी आनंदाने! आणि नंतर म्हणाली... तिचा नवरा परत आलेला आहे. तो बरेचदा काऊंटरवर असल्याने आता रूममध्ये येता येणार नाही.

विषयच संपला! इथे राहायचेच कशाला या निर्णयापर्यंत आलो होतो मी!

मला आधीच्या ट्रीपमधील किस आठवला.

तिचा रेशमी ड्रेस लाजेल असे रेशमी अंग, माझ्यापेक्षा बर्‍यापैकी कमी असलेली उंची, प्रमाणबद्ध शरीर आणि एकदा ठरवल्यावर मग पूर्ण समर्पीत होण्याची भावना जी तिच्या ओलसर ओठांमधून माझ्या जिभेवर अलगद उतरताना मला जाणवलेली होती!

पण प्रतीक्षा हा सर्वात उत्तम ऋतू आहे. कारण आता मला निदान तिची प्रतीक्षा तरी करता येत होती. आहे त्या परिस्थितीत तिच्याबरोबर जास्तीतजास्त काय करता येईल यावर विचार तरी करता येत होता. त्यादृष्टीने काही अ‍ॅक्शन्स तरी घेत होतो मी! तिला अधूनमधून फोन तरी करत होतो इन्टरकॉमवरच! तेही नसते तर 'झी टीव्ही' जेमतेम सुरू झालेल्या त्या काळात - जेव्हा तो फक्त संध्याकाळी सात ते रात्री दहा की असा काहीतरी असायचा - मी काय करणार होतो काम झाल्यावर?

एक मात्र आहे! हिरमी सिमेंट वर्क्सच्या गोगलगाय प्रगतीमुळे मला वेळ चिक्कार मिळायचा आणि ऋचा दासबाबत मी स्वतः पूर्णपणे पागल झालेलो होतो. बंगाली बायकांचे त्यात आणखी एक असतेच! स्त्रीसाठी असलेले जमतील तितके अलंकार आणि सुशोभीकरण त्या करतातच! ऋचा दासच्या लांबसडक काळ्या केसांना जे गोरे कपाळ रोखून धरायचे तेथे कुंकवाची एक नाजूक रेषा मस्तकापर्यंत गेलेली असायची.

ऋचा दासच्या केसांवर मी पी एच डी करू शकेन!

आणि तिच्या सुगंधावरही!

आपल्या बापाचं काय जातंय! केस तिचे, सुगंध तिचा, थिसिस आपला!

अर्थातच त्या टूरमधील काम फार फार लवकर म्हणजे तीनच दिवसांत संपलं!

करणार काय!

पावसाळ्यात पाऊस नाही पडला तर आल्याचा चहा कशाला करत बसायचा!

पुण्याचं मला एक आवडतं!

या शहरातून बाहेर पडायला आणि या शहरात परतायला फार मजा येते!

बाहेर पडताना स्वातंत्र्याचे वारे वाहू लागतात. परतताना घरगुतीपणाचे!

आयुष्य कसं जगावं याबद्दल माझं एक तत्व आहे. हे तत्व अतिशय सोपं असून ते केव्हाही, कोणालाही, कोठेही अंगीकारता येण्यासारखे आहे.

आयुष्य कसं जगावं हे ठरवायचंच नाही!

एकदा राजगडावर नेढ्यात बसलेलो असताना तुफान वारा येत होता. मी त्या वार्‍याला नांव दिलं!

आयुष्य!

येईल तसा घ्यायचा, येणार नाही त्यावेळी संपलं आयुष्य!

प्लॅनिंग करणार्‍यांना डायबेटीस किंवा बीपीचा त्रास होतो. यापैकी काहीच झालं नाही तर ते हार्ट अ‍ॅटॅकने मरतात तरी!

मी आहे अविभाज्य अणूंपासून बनलेलो!

माझा सर्वात लहान भाग फोडत नेला तरी त्याचा शेवटी तोच अणू होईल जो मूळच्या भागाचा आहे.

आणि जगात अब्जावधी प्रकारचे अणू आहेत जे मी झेलत आहे. असे असताना माझे कशावर नियंत्रण? कशावरच नाही. मग कसलं प्लॅनिंग? घरातले सगळे चुलत भाऊ इंजिनीयर होत होते म्हणून आमची भरतीही अभियांत्रिकीला झाली. तेवढे झाल्यानंतर 'माझे काय कराव' हा प्रश्न मी इतरांबरोबरच माझ्याहीकडून काढूनच टाकला.

२००७ साली कुठे माहीत होते की मी गझल रचेन?

मरणार मीही आहेच, पण हा काहीही काळजी न घेता मेला हे लेबल मला अधिक महत्वाचे वाटते. त्यात आयुष्याला फाट्यावर मारल्याचा आनंद मिळतो. भेंचोद काळज्या करत शेवटी मरायचंच!

ऋचा दासची ब्रा जितकी स्पष्ट दिसायची तितके आपले विचार स्पष्ट आहेत.

घट्ट रुतून बसलेले, फक्त अगदी जवळच्याच माणसांसमोर थोडेसे सैल पडले तर पडतात, अन्यथा नाही! तेही स्वेच्छेनेच!

आणि माझ्या जवळची माणसे फार फार कमी आहेत. त्यांच्यापैकी एक मी स्वतःच आहे, दुसरा मी आहे आणि तिसरा तर चक्क मी आहे!

गोंदवलेकर महाराजांची प्रवचने वाचून जगता येत नाही आणि जगायला शिकता आले तर अध्यात्मिक होता येत नाही.

महान जीवन आहे!

असण्याच्या नशेचे परिमाण नसण्याच्या नशेइतके मोठे होते तेव्हा मोक्ष मिळतो.

नशाहीन माणसे असतात. त्यांना नशा नसण्याची नशा असते.

आकाश पहाटे लाल दिसते , सकाळी तेजाळ दिसते, दुपारी कसे दिसते हे पाहण्याची आपल्या डोळ्यात हिम्मतच नसते, संध्याकाळी केशरी दिसते आणि रात्री चमचमीत किंवा काळे!

बदलण्याची मजाच और!

ऋचा दासच्या विभ्रमांसारखे बदलायला मला आवडते, कोणालाच ठरवता नाही आले पाहिजे की हा आता कसा वागेल!

कशात काही नाही आणि फॅन्टसाइझिंग अस्मानाला!

पुन्हा रायपूर! यावेळेस फोन न करता! मग रूम नाही. मग दोन दिवस इतरत्र! मग परत तिथे! आणि यावेळेस ती एकटीच!

मात्र या वेळेस एकदाही रूमवर आली नाही. हनीमूनच्या रात्री पाळी यावी तसला प्रकार!

रायपूरमधला संपूर्ण इन्टरेस्टच संपला!

उगाच काय इथे राहायच? ती एकदम पूर्णपणे प्रोफेशनलच आहे, एकदा आली असेल चुकून! पण दॅट्स इट! मालक कुठेतरी अतिशय लांब असल्याने येऊ शकलीही असेल! तसलीच अपेक्षा पुन्हा करणे हा मूर्खपणा!

त्या दिवशी रात्री मी रुग्वानीला भेटून जेवून रूमवर आलो तेव्हा अर्थातच काउंटरवर ती नव्हतीच . ती तिच्या रूमवर असणार होती. तिच्या रूमचा नंबर अर्थातच माझ्याजवळ नव्हता आणि तो कोणाला विचारणे हा वेडेपणाच ठरला असता हे माहीत होते. मागच्याच वेळेस तिला विचारले असते तर बरे झाले असते असेही वाटत असतानाच टेरेसवर गेलो हॉटेलच्या! का कुणास ठाऊक, पण मनावर उगीचच फार परिणाम वगैरे झाल्यासारखे वाटत असावे! कारण मला खरच त्या कॉरिडॉरमध्ये अगदी तिच्या केसांच्या सुगंधाची जाणीव झाली. पिसाटलो क्षणभर! नंतर सावरलो, कारण एक तर हा भास आहे किंवा असणार हे जाणवले आणि समजा ते खरे असले आणि याच कॉरिडॉरमध्ये कोणतीतरी रूम तिची असली तरीही आपण आत्ता काय करू शकणार हेही मनात आले.

वेडाच झालो मी! ती टेरेसमध्ये होती.

अशा वेळेस माझ्या मनात कोणता विचार येऊ शकणार?

अर्थातच तोच, जो पहिल्यांदा झालेल्या भेटीत केलेल्या कृत्याचा होता.

पराकोटीची डिस्टर्ब्ड वाटत होती ती! मी मात्र ते नीटसे न जाणवून प्रपोझ केले. मला तिच्या डोळ्यांमध्ये अती संतापल्यामुळे येणारी चक्रमपणासारखी झाक दिसत होती कोणत्यातरी दिव्याच्या प्रकाशात! एक शब्द न बोलता ती माझ्याकडे एकटक बघत होती. तिच्या मनातील विचार मला समजत नव्हते. मात्र ती माझ्याशी बोलायलाही तयार नाही आहे इतके लक्षात येत होते. तरीही मी पुढे झालो. ती एक पाऊलही मागे न सरकता म्हणाली.

"गेट लॉस्ट... आय विल कॉल समवन "

विजेचा धक्का बसावा तसा मी खाडकन तीन पावले मागे झालो. हादरलेला चेहरा करून तिच्याकडे पाहू लागलो. एकेक पाऊल उचलत मी दाराकडे निघालो. मात्र एक वाक्य तेवढं बोललो:

"व्हाय डिड यू कम टू माय रूम दॅट टाईम?"

तिच्या नजरेत काय होते हे मला अजिबात समजलेले नव्हते इतकेच मला आठवते.

तिने हाक मारली:

"चौधरी?????"

सर्रकन काटा आला अंगावर! माझ्यातला छक्का जागृत झाला.

"गोईन्ग... आय अ‍ॅम गोईन्ग... "

ताड ताड चालत रूमवर आलो.

दहा साडे दहाला लगेज पॅक केले.

खाली फोन केला. चेक आऊट करत आहे म्हणून सांगितलं!

बिल पे करून बाहेर आलो. मागे वळून वर पाहिले. टेरेसमध्ये ती दिसत वगैरे नव्हती. खरे तर मी नखशिखांत घाबरलो होतो. कुठल्याकुठे ते रायपूर! काही झाले असते आणि मला धरल असते चार पाचजणांनी तर मी काय केले असते? मुळात बदनामीचे काय ? आज लिहिताना बेदरकारपणे लिहीत असलो तरी तेव्हा कशी अवस्था झाली होती ते आठवते आणि शहाराच येतो.

पण हेही नीट समजत नाही की पहिल्या भेटीत आणि या वेळच्या भेटीत मी कोणता फरक न कळून चुकलो?

मागच्यावेळी ज्या राधिका आणि अप्सरा हॉटेल्सकडे तुच्छ नजर टाकली होती त्यांच्याकडे धावलो. अप्सराला रूम नव्हती. राधिकाला मिळाली. दोन दिवसांनंतरचे रिझर्व्हेशन होते ट्रेनचे! त्यात कोणाला समजू नये की मी राधिकाला आहे असेही वाटू लागले होते. भीती जी वाटत होती ती खरी होती की उगीचच हे त्या क्षणीमात्र समजत नव्हते. आता विचार केल्यावर समजते की तिने कोणालाच काहीच सांगितले नसते मी निघून जात आहे हे पाहिल्यानंतर! पण तेव्हा हादरलेलो होतो.

खूप विचार केला पुण्याला परतताना! काय झाले असेल्? असे का वागली असेल? आपण मुळातच चुकीचे वागलो हे खरेच, पण पहिल्यांदा ती चूक तिला चालली आणि दुसर्‍यांदा नाही असे का? शोध घ्यावा की नाही? पण शोधून समजायला तर हवेच!

पुण्याला परतल्यावर वेगवेगळ्या दोन तीन एस टी डी बूथ वरून तीन चार वेळा फोन केले. एक फोन तर तिने स्वतःच घेतला होता. तो मी ठेवूनच दिला.

आज येथे लिहिण्याचा प्रामाणिकपणा तेव्हा दाखवू शकलो असतो का? की बेफिकीर होण्याची प्रक्रिया जस्ट सुरू झाली होती तेव्हा? आणि आज जेव्हा ती पूर्ण भरात आहे तेव्हा स्त्रीकडे पाहावेसेही वाटत नाही आहे? एक बायको आणि एक चालू विबासं या व्यतिरिक्त कशातही लक्ष द्यावेसे वाटत नाही. असे का? सकाळचे आकाश रात्री काळे होते. मी कोणत्या परिस्थितीतले आकाश आहे? आणि एक चालू विबासं ही संज्ञाही मी कोण सहजगत्या उच्चारतोय?

त्या दिवशी तिच्या लांबसडक केसांचा सुगंध जाणवला नसता तर? तरी टेरेसवर गेलोच असतो की? पण मग...

... असो! अनुत्तरीत प्रश्न! ती पहिल्यांदा असे का वागली आणि दुसर्‍यांदा तसे का!

ठरशीलही निष्पाप तू, म्हणतीलही पापी मला
पण कृत्य जे केलेस... मी त्यालाच शोषण मानतो

-'बेफिकीर'!

(नांवे काल्पनिक)

===================================

नाहीच कोणीही उथळ, ही एक अडचण मानतो
गंभीर लोकांच्या जगाला मी रणांगण मानतो - http://www.maayboli.com/node/24826

जे रोज होते त्यामधे कर्तव्य मोठे वाटते
झालेच नाही जे कधी त्याला समर्पण मानतो - http://www.maayboli.com/node/24871

घसरायला मी लागलो की वाटते सुटलो बुवा
साधाच रस्ता लागणे याला विलक्षण मानतो - http://www.maayboli.com/node/25000

नाहीस माझी तू कुणी, मीही कुणी नाही तुझा
मग का तुला मी सोडणे माझी भलावण मानतो? - http://www.maayboli.com/node/25088

मी सारखा सार्‍या ऋतूंची चौकशी नाही करत
जो त्याक्षणी धुंदावतो त्यालाच श्रावण मानतो - http://www.maayboli.com/node/25230

दसरा दिवाळी पाडवा करते कुणीही साजरे
आलीस आयुष्यात त्या घटिकेस मी सण मानतो - http://www.maayboli.com/node/26898

त्याच्यासवे सीमा तुझ्या ओलांडण्या गेलीस तू
की जो नपुंसक सभ्यतेला फक्त भूषण मानतो - http://www.maayboli.com/node/27193

म्हणतीलही निर्लज्ज दोघांना समाजाच्या रुढी
हा प्रश्न आहे की कशाला काय आपण मानतो - http://www.maayboli.com/node/28432

माझ्या चुकांचा ग्रंथ हा भौतीक दलदल पण तरी
मी हा तुझा अध्याय वैचारीक प्रकरण मानतो - http://www.maayboli.com/node/30217

एका त्सुनामीने पुरे उद्ध्वस्त होणे यास मी
ही बेगडी वस्ती वसवण्याचे निवारण मानतो - http://www.maayboli.com/node/30399

मी जाणले नाही कधी तू पौर्णिमा आहेस हे
कोजागिरीच्या सिद्धतेचे फक्त कारण मानतो - http://www.maayboli.com/node/30963

जगलो किती ते जाउदे, आयुष्य म्हणजे फक्त मी...
जगलो तुझ्यासमवेत जितके तेवढे क्षण मानतो - http://www.maayboli.com/node/31177

====================================

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

काळज्या करत शेवटी मरायचंच! >> मग काळीज लावुन मरणे कसं वाटतं.....?

या लेखातला तुमचा स्पष्टपणा फार भावला भुषणराव.....

शब्दांतुन भावना जशीच्यातशी वाचका पर्यंत पोहचण्याची तुमची हतोटी आपण एक उत्तम लेखक असल्याची ग्वाही देते.

असेच लिहत रहा

धन्यवाद!!*

की बेफिकीर होण्याची प्रक्रिया जस्ट सुरू झाली होती तेव्हा? आणि आज जेव्हा ती पूर्ण भरात आहे तेव्हा स्त्रीकडे पाहावेसेही वाटत नाही आहे? एक बायको आणि एक चालू विबासं या व्यतिरिक्त कशातही लक्ष द्यावेसे वाटत नाही.

हम्म..

ओघवती आहे कथा

उन्हाळ्यात प्रतीक्षा! इतर दोन्ही ऋतूंची! प्रतीक्षा हा मानवी जीवनाचा सर्वोत्कृष्ट ऋतू आहे. त्यात आशा ही सोबतीण असते आणि इच्छा ही पत्नी! प्रतीक्षा नसली की संपले सगळे!

मानवी जीवन हा एक विवाहबाह्य संबंध आहे. आपल्याला आपण सर्वात जास्त आवडत असतानाही इतर माणसांशी अणि समाजाशी आपले जबरदस्तीने लग्न होते. मग आपले आपल्याबरोबरचे संबंध हे विवाहबाह्य संबंध ठरतात.>>>>>>>>>>>>>>>

पुनश्च स्टन झालोय. Happy

उन्हाळ्यात प्रतीक्षा! इतर दोन्ही ऋतूंची! प्रतीक्षा हा मानवी जीवनाचा सर्वोत्कृष्ट ऋतू आहे. त्यात आशा ही सोबतीण असते आणि इच्छा ही पत्नी! प्रतीक्षा नसली की संपले सगळे!

मानवी जीवन हा एक विवाहबाह्य संबंध आहे. आपल्याला आपण सर्वात जास्त आवडत असतानाही इतर माणसांशी अणि समाजाशी आपले जबरदस्तीने लग्न होते. मग आपले आपल्याबरोबरचे संबंध हे विवाहबाह्य संबंध ठरतात.
>>>>>>>>>>>>>>>
सुटलायतं आपण एकदम......पुढ्चं वाचतोय...

आपल्या बापाचं काय जातंय! केस तिचे, सुगंध तिचा, थिसिस आपला!

ऋचा दासची ब्रा जितकी स्पष्ट दिसायची तितके आपले विचार स्पष्ट आहेत.

असण्याच्या नशेचे परिमाण नसण्याच्या नशेइतके मोठे होते तेव्हा मोक्ष मिळतो.

मानवी जीवन हा एक विवाहबाह्य संबंध आहे. आपल्याला आपण सर्वात जास्त आवडत असतानाही इतर माणसांशी अणि समाजाशी आपले जबरदस्तीने लग्न होते. मग आपले आपल्याबरोबरचे संबंध हे विवाहबाह्य संबंध ठरतात.
>>>

____________/\____________

जबरदस्त !!

(अवांतरः एक दोन वाक्ये अंगावर येणारी वाटली ... कथा २४ च्या सीरीजच्या बिलो अ‍ॅव्हरेज वाटली ....माफी )

कथा म्हणून अत्यंत सुमार............. ऑट ऑफ २४ कराच.........

मानवी जीवन हा एक विवाहबाह्य संबंध आहे. आपल्याला आपण सर्वात जास्त आवडत असतानाही इतर माणसांशी अणि समाजाशी आपले जबरदस्तीने लग्न होते. मग आपले आपल्याबरोबरचे संबंध हे विवाहबाह्य संबंध ठरतात.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

पण कथेच्या अनुषंगाने काही वाक्यं परिच्छेद लिहिलेत ते नेहमीसारखेच अफाट आहेत...... !!!!

ऋचा दास फ्लॉप.......... Sad पण तुमचं लिखाण नेहमीसारखंच... जबरी....!!!! Happy

एक बायको आणि एक चालू विबासं या व्यतिरिक्त कशातही लक्ष द्यावेसे वाटत नाही.
>>
चालु विबासं मायबोली का?
Happy
ऋचा फ्लॉप वाटली नाही. सर्व स्त्रिया हव्या तेंव्हा तर जेम्स बॉन्ड्ला पण मिळत नाहित.

बेफीजी

शक्यतो पटलं नाही तर अभिप्राय देण्याचं टाळावं हे धोरण बाजूला ठेवून म्हणावंसं वाटतं.. कथा पटली नाही. मात्र कथेच्या ओघात येणारे काही पंचेस जोरदार झालेत.

( मामा, गदा घेऊन येऊ नका Proud )

भुंगा +१

कथा अजिबात आवडली नाही. तुटक तुटक वाक्य छान आहेत. पण कथा म्हणुन नाही. खरेतर कथेमध्ये आणि ह्या जर्म मध्ये जास्त दम नसल्याने मधे मधे छान छान वाक्य पेरायची खुबी केलेली वाटते. ही वाक्य नुसती लिहीली तर जास्त परीणाम देतील.

कथेत काहीच मजा नाही आली. तोच तोच पणा येत आहे असे वाटते. बेफी टच नाही आला.

राग मानु नका, हे.मा.वै.म. आहे.

मानवी जीवन हा एक विवाहबाह्य संबंध आहे. आपल्याला आपण सर्वात जास्त आवडत असतानाही इतर माणसांशी अणि समाजाशी आपले जबरदस्तीने लग्न होते. मग आपले आपल्याबरोबरचे संबंध हे विवाहबाह्य संबंध ठरतात..

____________/\____________

मोगॅम्बो | 31 August, 2012 - 00:45 नवीन
रोज तुमचा कुठला ना कुठला धागा वर आणण्याचा प्रयत्न <<<<<<

ही 'आतली गोष्ट' वाटते मोगँबो Lol

____________/\____________

<< बेफिजी, हा कोपरापासुन नमस्कार आहे..:)