मनोगत

Submitted by जिप्सी on 11 January, 2012 - 00:39

नुकत्याच झालेल्या रानवाटा प्रस्तुत गृप फोटोग्राफी प्रदर्शनानिमित्त हे मनोगत व्यक्त करण्याचा प्रयत्न. Happy

आज सहजच "माझे सदस्यत्व" मध्ये पाहिले असता "सदस्य झाल्यापासूनचा कालावधी" ४ वर्षे २ दिवस असे दाखवत होता. मायबोलीचे सदस्यत्व कधी घेतले ते आठवतं नाही. पुढे हिच मायबोली दैनंदिन आयुष्याचा एक भाग होणार हे जर आधीच माहित असते तर सदस्यत्व घेतल्याची तारीख, वेळ नक्कीच लिहुन ठेवली असती. असच एकदा आंतरजालावर फिरत असताना, गड किल्ल्यांचे लेख वाचताना मायबोलीकर जीएस यांचे ट्रेकिंगवरचे काहि लेख वाचनात आले आणि ते वाचत असतानाच मी मायबोली कुटुंबात कधी सहभागी झालो ते कळलंच नाही. सदस्यत्व घेतल्यापासुन बराच काळ मी फक्त वाचकच होतो.

खरंतर भटकंतीची आवड असल्याने माझा वावर फक्त "माझे दूर्गभ्रमण, प्रकाशचित्र, प्रवासाचे वर्णन" याच विभागात जास्त होते (फोटोग्राफीची आवड मला "मायबोलीवर" आल्यानंतर लागली :-)). मी माझी पहिली पोस्ट प्रकाशचित्र विभागातच प्रदर्शित केली होती. मायबोलीवर प्रदर्शित केलेला पहिला फोटो होता तो जव्हार येथील "दाभोसा धबधब्याचा" प्रतिसाद "एकच". :-), दुसरा फोटो सरसगड (पाली) प्रतिसाद "शून्य". Happy सुरुवातीला थोडं वाईट वाटत होते कि आपले फोटो आवडत नाही (अर्थात फोटोची क्वालिटीही तशीच होती म्हणा :फिदी:) तरीही अजुन काही फोटो प्रदर्शित करतच राहिलो. ;-). त्याच दरम्यान मायबोलीवर लिहिलेला माझा पहिलाच लेख "पर्यटन, पर्यावरण आणि आपण" हा मुख्यपृष्ठावर झळकला. खुप खुष झालो होतो. Happy

त्यावेळी माझ्या बर्‍याच पोस्टींना १-२ असेच प्रतिसाद मिळत होते. नंतर माझे अजुन एक प्रवासवर्णन गर्द हिरवाईतील श्री केशवराज याला सर्वात जास्त म्हणजे ३३ प्रतिसाद लाभले. तेंव्हा लेखात फोटो पेरून तो सादर करण्याची कल्पना बर्‍याच जणांना आवडली होती. काहि मायबोलीकरांनी त्याबद्दल विपुत येऊन कौतुकही केले होते. Happy नंतर वेगवेगळ्या संकल्पना घेऊन, एखादी थीम घेऊन मी मायबोलीवर येऊ लागलो. त्यात माझ्या पहिल्याच थीम "फरक" ला मायबोलीकरांचा उदंड प्रतिसाद लाभला. नेहमीचेच फोटो एखाद्या वेगळ्या एखाद्या विषयावर घेऊन मी मायबोलीवर येऊ लागलो. तोपर्यंत हे सगळे फोटो मी माझ्या साध्या डिजीकॅमने काढत होती. मायबोलीकरांच्या याच प्रोत्साहनाने प्रेरीत होऊन मी कॅनन एसएलाअर घेतला. या नविन कॅमेर्‍याने काढलेल्या माझ्या काहि मालिकेला उदंड प्रतिसाद मिळत गेला त्यापैकी पहिली "भटकंती जुन्नर-मंचर परिसराची". मग मात्र माझी "फोटो एक्सप्रेस" तूफान धावू लागली. कधी २ तर कधी ५०-६० असे भरघोस फोटो टाकुन मायबोलीकरांच्या सहनशक्तीचा अंत पाहू लागलो. Proud

मायबोलीवरच्या सर्वच नावाजलेल्या छायाचित्रकारांकडुन मोलाची मदत मिळत गेली. त्यातले पहिले नाव म्हणजे "सावली". यांच्या लेखातुन भरपूर माहिती अगदी सोप्या शब्दात समजली. कधी कौतुक तर कधी कानपिचक्या यातुनच फोटोग्राफीची आवड कधी निर्माण झाली ते माझेही मला कळले नाही. भटकंतीची आवड असल्याने फक्त भटकलो त्या जागेची आठवण म्हणुन फोटो काढायचो आणि स्वतःकडेच साठवून ठेवायचो. पूर्वी भटकायचो म्हणुन फोटो काढायचो आणि आता मात्र फोटो काढायचे म्हणुन भटकायला लागलो आहे. माझ्यातील या बदलाचे श्रेय "मायबोली"कडे जाते. कित्येक मायबोलीकरांचे "तुझ्या फोटोंमुळे आम्हाला जुने दिवस आठवले, Nostalgic झालो, जुने दिवस पुन्हा जगलो" यासारखे प्रतिसाद वाचताना ती पोस्ट टाकल्याचे सार्थक वाटत होते. आपल्या कलाकृतीमुळे कुणालातरी आनंद मिळतोय हे वाचुनच खुप समाधान लाभत होते. मग मात्र मी माझ्या पोस्ट्वर "किती" प्रतिसाद येतात ते पहायच्या ऐवजी "काय" प्रतिसाद येतात ते पाहू लागलो. Happy

वरील हे सर्व लिहिण्याचे कारण कि नुकत्याच झालेल्या रानवाटाच्या प्रदर्शनात माझे काहि फोटो प्रदर्शित झाले होते. मी काढलेले फोटो फोटो कुठल्या प्रदर्शनात प्रदर्शित होतील हे कधी स्वप्नातही वाटलेले नव्हते ते सत्यात उतरले आणि याचे सारे श्रेय मी "रानवाटा","मायबोली आणि मायबोलीकरांना" देऊ इच्छितो. इथे जर मला प्रोत्साहन मिळाले नसते तर कदाचित माझे फोटो माझ्या संगणकावरील कुठल्याशा ड्राईव्हवरच राहिले असते.

मायबोलीकरांनी दिलेले प्रोत्साहन आणि रानवाटाच्या स्वप्निल पवार सरांनी दिलेल्या शिकवणीमुळेच हे साध्य होऊ शकले. मायबोली आणि मायबोलीकरांचे मी आभार मानणार नाही कारण आभार परक्यांचे मानले जाते. Happy

रानवाटा प्रदर्शनाची एक झलक

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११
प्रदर्शनाला उपस्थित मायबोलीकर
प्रचि १२

(प्रकाशचित्रे — योगेश जगताप आणि रूपेश बांदकर)

मायबोलीकरांनी उदंड प्रतिसाद देत प्रदर्शनाला भेट देऊन माझा हुरूप वाढवल्याबद्दल मी चिक्कार खुश आहे. Happy
आत्ताशी मी कुठे पहिली यत्ता पास झालोय अजुन भरपूर शिकायचो आहे. Happy तुमच्या शुभेच्छा माझ्यासोबत तर आहेतच. तुमचे आशिर्वादही असु द्या. Happy

तळटिप : "प्रकाशचित्र" या विभागानेच मायबोलीवर "जिप्सीची" एक वेगळी ओळख निर्माण केल्यामुळे सदर लिखाण याच विभागात प्रदर्शित करत आहे. Happy

गुलमोहर: 

सुंदर लिहिलंयंस जिप्सी..
भावना पोचल्या...

भरपूर शुभेच्छा!
Happy

Happy पुढच्या प्रवासाला खूप शुभेच्छा.

हो पण माझ्या बघण्यात मायबोलीवरची पहिली थीम फोटोग्राफी 'मोरपंखी' आयडीने सादर केली होती. रंगांवर आधारीत त्याच्या थीम होत्या.

मस्त रे योगेश. खुप सुंदर चित्र आहेत. बर्‍याच माबोकरांनी हजेरी लावल्याने उत्साह दुणावला असेल ना?
tulaa khup khup shubhechcha

मनोगत थेट पोहोचलं, योगेश!
पुढच्या प्रवासासाठी पण भरघोस शुभेच्छा!

"किती" प्रतिसाद येतात ते पहायच्या ऐवजी "काय" प्रतिसाद येतात ते पाहू लागलो.>> बडे पते की बात, दोस्त! Happy

पुढील प्रवासासाठी अनेक शुभेच्छा !!!! Happy
किती" प्रतिसाद येतात ते पहायच्या ऐवजी "काय" प्रतिसाद येतात ते पाहू लागलो.>> बडे पते की बात, दोस्त>>>>>>> अनुमोदन .

मनोगत***** मस्त रे योगेश,
पुढील प्रवासासाठी अनेक शुभेच्छा!!!

मनापासून मांडलेलं मनमोकळं मनोगत ........त्यामुळेच थेट मा बो करांच्या मनात पोहोचणारं.....
वा, मस्तच योगेश..... लगे रहो......

खूप छान मनोगत..... आवडलं. तुम्ही काढलेले फोटो तर मला नेहमीच आवडतात. Happy
पुढील प्रवासासाठी अनेक शुभेच्छा!!! +१

खुपच छान मनोगत. आमच्या सदिच्छा नेहमीच तुझ्या पाठीशी आहेत. अजुन तुझी प्रगती होवो. Happy

मस्तच ! फोटो आणि वॄत्तांत सुद्धा Happy . बायदवे , तू काढलेले ( आणि माझे वर्च्युअल धपाटे खाल्लेले ) खाण्यापिण्याचे फोटो नव्हते वाटतं Wink Proud

जिप्स्या मस्त लिहिल आहेस रे.
प्रदर्शनाबद्दल अभिनंदन रे भाउ.
तु पुण्यात का जॉब बघत नाहिस रे?? तेवढेच तुझ्यासोबत राहुन आमचीबी फोटु सुधारतील. Happy

"किती" प्रतिसाद येतात ते पहायच्या ऐवजी "काय" प्रतिसाद येतात ते पाहू लागलो.>> अगदी Happy
खुप आवड्ले तुझे मनोगत , जिओ जिप्सि Happy

योग्या, अभिनंदन २४ चा 'जिप्सी' झालास आणि कुठे पोहचलास रे.
खूप खूप शुभेच्छा. कॅनन, निकॉन असली कसली रे बायकांची नावे. Proud विचार करा.

पूर्वी भटकायचो म्हणुन फोटो काढायचो आणि आता मात्र फोटो काढायचे म्हणुन भटकायला लागलो आहे>>>> हाडाचा फोटोग्राफर झालास की Wink
पुढिल वाटचालीस खुप खुप शुभेच्छा!!!

खरोखर काहि दिवसांनि प्रकाशचित्रांबरोबरच गुलमोहोर मधे एक जिप्सि चित्र म्हणुन नविन सबटायट्ल असेल.

"किती" प्रतिसाद येतात ते पहायच्या ऐवजी "काय" प्रतिसाद येतात ते पाहू लागलो.>> ईनमीन तीन यांना मनापासुन अनुमोदन. आयुष्यामध्ये Quantity पेक्षा Qualityला जास्ती महत्व देण्या-या व्यक्ती सुरवातीस भलेही मागे पडल्यासारखे वाटतात पण लाँग रनमध्ये अत्यंत यशस्वी होतात हे त्रिकालाबाधीत सत्य आहे.

अरे वाSSSSSSSSSS!!!!!
मस्तच की!! Happy

पुढच्या वाटचालीसाठी माझ्या तुला खूप शुभेच्छा!!

Pages