मी पाहिलेली ठिकाणे -
मालवण, वेंगूर्ला, शिरोडा, रेडी, तेरेखोल, तारकर्ली, देवबाग, निवती, आचरा, कुणकेश्वर, जैतापुर, पावस, रत्नागिरी, मार्लेश्वर
-----------------------------------------------------------
एकुण ४ दिवसांचा प्लॅन होता (३ रात्री, ४ दिवस). ३ही रात्री मालवणमध्येच मुक्काम केला.
-----------------------------------------------------------
पहिल्या दिवशी सकाळी पुण्याहून निघून कोल्हापूर, गगनबावडा, करुळ घाट, तळेरे, कणकवली, कसाल मार्गे मालवण मुक्कामी सायंकाळी पोहोचलो (एकूण अंतर ४१०कि.मी., एकुण ९ तास).
-----------------------------------------------------------
दुस-या दिवशी सकाळी सिंधुदुर्ग किल्ला व स्नोर्केलिंग केले. दुपारी बाहेर पडून परुळे, वेंगुर्लामार्गे (सागरी महामार्गाने) रेडी व तेरेखोल (६५कि.मी.) पाहुन सूर्यास्ताच्या वेळी शिरोडा बीचला पोहोचलो. तेथे समुद्रस्नानाची मजा लुटून रात्री ८ वा. मालवणला परत आलो.
-----------------------------------------------------------
तिस-या दिवशी सकाळी तारकर्ली, देवबाग, भोगवे बिच (२०कि.मी.) व साळ्गावकर गणपती मंदिर (मालवण गावामध्ये) पाहीले. दुपारी थोडी विश्रांती घेवून बाहेर पडून मालवण येथील चिवला बीच पाहून, मालवण मार्केट्मध्ये फेरफटका मारुन सूर्यास्ताच्या वेळी तारकर्ली बीचला पोहोचलो. तेथे समुद्रस्नानाची मजा लुटून रात्री ८ वा. हॉटेलवर परत आलो.
-----------------------------------------------------------
चवथ्या दिवशी सकाळी लवकर बाहेर पडून आचरा, कुणकेश्वर, जैतापुर, पावस या मार्गे रत्नागिरी येथे सकाळी १०:३० वा. पोहोचलो. (१२०कि.मी., ४ तास, पुन्हा सागरी महामार्ग झींदाबाद). वाटेमध्ये वेळेअभावी फक्त कुणकेश्वर येथे थांबलो. नाहीतर आडिवरेची महाकाली, कशेळी येथील कनकादित्य, पावस येथील स्वामी स्वरुपानंद यांचा आश्रम, देवगड वगॅरे पाहता आले असते. रत्नागिरी येथे जेवण करुन दुपारी १ च्या सुमारास मार्लेश्वर येथे पोहोचलो (७०कि.मी., २ तास). मार्लेश्वर येथे देवदर्शन घेवुन आंबा घाटमार्गे कोल्हापुरला सायंकाळी ५:३० वा. पोहोचलो. (शॉर्टकटने ८५कि.मी., ३ तास). कोल्हापुरला चहाचा ब्रेक घेवून ६ वा. नीघून रात्री १०वा. पुण्यामध्ये पोहोचलो. (या दिवशी गाडीचे रनींग खूपच झाले - ५१०कि.मी.) पण दुस-या दिवशी ऑफीसला सुट्टी असल्यामुळे जास्ती थकवा जाणवला नाही.
-----------------------------------------------------------
मालवण समुद्रकिनारा
सिंन्धुदुर्ग किल्ला - मालवण किना-यावरुन
सिंन्धुदुर्ग किल्ला - होडीमधून
सिंन्धुदुर्ग किल्ल्यामधील एक झाड
सिंन्धुदुर्ग किल्ल्यामधील भवानी मातेचे मंदिर
सिंन्धुदुर्ग किल्ल्यामधील जास्वंदीचे फुल
सिंन्धुदुर्ग किल्ल्यामधील तटबंदीच्या एका झरोक्यामधुन दिसणारे द्रुष्य
वाटेमध्ये जाताना लागलेली एक खाडी
रेडीच्या गणपती मंदिराचा कळस
तेरेखोल किल्ल्यामधील येशुंचा उभा पुतळा
शिरोडा बिचवरील सुर्यास्त
शिरोडा बिचवरील सुर्यास्त
शिरोडा बिचवरील सुर्यास्त
तारकर्ली बॅकवॉटरमधून दिसणारा सुर्योदय
तारकर्ली बॅकवॉटरमधून दिसणारा सुर्योदय
निवती किल्ल्याचे भग्नांश
निवती बीच - अतिव सुंदर जागा. तीथे गेल्यावर "कहोना प्यार है" मधील मॉरिशसच्या बीचवरील गाण्याच्या लोकेशनची आठवण आली.
निवती बीच - अतिव सुंदर जागा. Another view
तारकर्ली मधील त्सुनामी आयलंडवरील "सी-गल्स"
देवबागच्या किना-यावरील M.T.D.C.ची हाउस्-बोट
तारकर्ली किनारा
तारकर्ली येथील श्री. गुरुदेव दत्त मंदिर
तारकर्ली किना-यावर जाळे बाहेर खेचताना स्थानीक कोळी बांधव
जाळ्यातील माशांवर झेपावू पहाणा-या सी-गल्सना पहात पहात अस्ताला जाणारे सुर्यबिंब
सुर्यास्तानंतरच्या रंगांच्या उधळणीच्या बॅकग्राउंडवर किना-यावरील होडी
सुर्यास्तानंतरच्या रंगांच्या उधळणीच्या बॅकग्राउंडवर किना-यावरील होडी
मालवणमधील साळगावकर यांचे श्री. गणेश मंदिर
मालवणमधील साळगावकर मंदिरामधील गणेशाची सुंदरशी सुवर्णमूर्ती
कुणकेश्वर समुद्रकिनारा व उजवीकडे दिसणारे मंदिर
कुणकेश्वर मंदिराचा नक्षीदार कळस व गाभा-याची भिंत
कुणकेश्वर मंदिरासमोरील नंदी
वाटेत जाताना लागलेली एक खाडी
जैतापुरची खाडी
अजुन एक खाडी (पावसजव्ळील)
मार्लेश्वर मंदिरामागील खडे पर्वत
मार्लेश्वर मंदिर
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/31825
छान प्रकाशचित्रे...
छान प्रकाशचित्रे...:स्मित:
मस्त!!!
मस्त!!!
खूप मस्त....
खूप मस्त....
सी-गल्सचे दोन्ही फोटो बेस्ट,
सी-गल्सचे दोन्ही फोटो बेस्ट,
(पण अजून छान फोटोंची अपेक्षा आहे.)
छान आलेत फोटो
छान आलेत फोटो
फोटो बेस्ट आलेत एकदम.
फोटो बेस्ट आलेत एकदम.
खूप सुंदर फोटो!!
खूप सुंदर फोटो!!
छान फोटो.
छान फोटो.
लय भारी
लय भारी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूपच छान फोटो आहेत! फार
खूपच छान फोटो आहेत! फार आवडले.
सुर्यास्तानंतरच्या रंगांच्या
सुर्यास्तानंतरच्या रंगांच्या उधळणीच्या बॅकग्राउंडवर किना-यावरील होडी>>>> मस्त...सुंदर
सुंदर कोकणाचे सुंदर प्र.ची.
सुंदर कोकणाचे सुंदर प्र.ची.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तारकर्ली- निवती आमचं 'होम
तारकर्ली- निवती आमचं 'होम पीच' ! खूप बरं वाटलं तिथले व ओळखीच्याच इतर ठीकाणांचे छान फोटो पाहून. धन्यवाद .
वेताळ_२५, शापित गंधर्व,
वेताळ_२५, शापित गंधर्व, आशुचँप, ललिता-प्रीति, udayone, दक्षिणा, वर्षू नील, नन्ना, रोमा, प्रज्ञा१२३, DeepSea, दादाश्री - सर्वांना प्रतिसादबद्दल धन्यवाद. खरे म्हणजे मी मा.बो.वर फक्त वाचक म्हणुन मुशाफिरी करत असतो. मला टायपायची सवय नाही, तसेच त्याचा कंटाळाही आहे. तरीसुध्धा हे धाड्स करतो आहे. यावेळी प्रवासवर्णन आता बदलून अॅड केले आहे.
भाऊ नमसकर - तुमच्या गावाला जावुन तुम्हालाच त्याचे फोटो दाखवले. तरीही काही तपशील चुकले असतील तर क्षमा असावी व त्या चुकांची दुरुस्ती आपण जरुर सुचवावी.
सुदंर लोकेशन्स आणि छान
सुदंर लोकेशन्स आणि छान फोटोग्राफी![smileyvault-cute-big-smiley-animated-023.gif](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u5620/smileyvault-cute-big-smiley-animated-023.gif)
<< तरीही काही तपशील चुकले
<< तरीही काही तपशील चुकले असतील तर क्षमा असावी >> अहो, मीच तुम्हाला धन्यवाद दिले आहेत, अगदीं मनापासून !! [ आणि हो, मीं प्रेमाने 'माझा गांव' म्हणतो; 'सात-बारा'वर अख्खं गांव माझ्या नांवावर आहे असं समजून कृपया मला नका उगीच भाव देऊं.
]
छानेय
छानेय
सुंदर फोटो
सुंदर फोटो
वॉव! मस्त फोटो!
वॉव! मस्त फोटो!
मस्तच
मस्तच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
@जिप्सी, तुझ्या@
@जिप्सी, तुझ्या@ प्रतिसादाबद्दल मनापासुन धन्यवाद. तुझ्यासारखे फोटो काढण्याचा मी एक प्रयत्न केला आहे. मी दिवाळीमध्ये CANON make 60D with 18-135mm EF-IS lens हा कॅमेरा घेतला आहे. सध्या काँपोझीशन व्यवस्थीत कसे येइल ते पहातो आहे. तरीही कही सुचना / सजेशन्स असतील तर जरुर कळवणे. They will be highly welcomed.
- अतुल पटवर्धन
सुंदर फोटो आहेत.
सुंदर फोटो आहेत.
अप्रतिम फोटो आलेत.. नवीन
अप्रतिम फोटो आलेत.. नवीन कॅमेरावरचे प्रयोग भारी आहेत.. जास्वंदीचे फूल सुंदरच आणि समुद्रकिनार्यांबद्दल तर काय बोलायचं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
काहीकाही फोटो अप्रतिम
काहीकाही फोटो अप्रतिम आहेत.
निवतीचा किल्ला आणि भोगव्याचा किनारा खलास आहे.
आम्ही शूट केलं होतं तिथे. सही आठवणी आहेत तिथल्या.
छान..
छान..:)
सहीच फोटो!! काल दिसतच नव्हते
सहीच फोटो!! काल दिसतच नव्हते आज दिसले नी डोळे निवले
मस्त!!
मी माझ्या पोष्टमध्ये चुकून
मी माझ्या पोष्टमध्ये चुकून निवती बिच असे लिहीले होते. पण नीधपच्या सौजन्यामुळे ते "भोगवे बिच" असे दुरुस्त केले आहे. @ नीधप - धन्यवाद. - अतुल पटवर्धन
मस्त फोटो
मस्त फोटो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे वा मालवण, तारकर्ली नि इतर
अरे वा मालवण, तारकर्ली नि इतर ठिकाणं.. मस्त फिरस्ती.. छान फोटो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages