कळसुबाई नळीच्या वाटेने

Submitted by सभा on 7 January, 2012 - 01:42

कळसुबाईला बारी गावाच्या व्यतिरिक्त आणखी दोन वाटांनी जाता येत अशी माहिती होती, बरेच दिवस जाण्याचा विचार देखील होता पण योग काही जुळुन येत न्हवता. शेवटी नाक्य़ाच्या मुलांनी ३१ डिसेंबरला मज्जा करण्यासाठी भंडारद-याला एम.टी.डी.सी.त जाण्याच नक्की केलं, २० जणांच बुकींग सुध्दा झालं, आणि आम्ही सुध्दा एका दगडात दोन पक्शी होतील म्हणुन कळसुबाई नळीच्या वाटेने आणि नंतर भंडारदरा असा बेत नक्की केला. नाक्याची काही मुलं तर ३० तारखेला दुपारीच एम.टी.डी.सी.त थडकले, ऊगीच चांगल्य़ा (?) कामाला ऊशीर नको. असो.

आम्ही मात्र ठाण्याहुन ३१ तारखेला पहाटे ४.३० ला तवेरा घेऊन निघालो, आमचे काही मित्र आम्हाला आंबेवाडी या पायथ्याच्या गावात सोडुन पुढे एम.टी.डी.सी.त जाणार होते, आणि ट्रेक झाल्यावर शुध्दीत असलेले आम्हाला घ्यायला येणार होते. साधारण ७.१५ ला आंबेवाडीच्या अलीकडे ४ कि.मी वर आम्ही गाडी सोड्ली, कारण आमचे लक्श असलेली कळसुबाई (असलेली नव्हे असलेला) आणि त्याबाजुला असलेली नळीची वाट अगदी स्पष्ट दिसत होती.

आंबेवाडीच्या अलीकडे ४ कि.मी वरुन कळसुबाई

आम्हाला आंबेवाडीत सोडायला आलेले काही मित्र

मित्रांचा निरोप घेऊन निघालो आणि अगदी जवळच दिसत असलेल्या आंबेवाडीला कुशीत घेतलेल्या या भिमकाय, अजस्त्र, अबब (काहीही म्हणा हो) दुर्ग त्रिकुटाचा फ़ोटो काढायचा मोह अनावर झाला.

अर्थातच अलंग, मदन, कुलंग

भिमकाय मदन

आम्ही जात असलेली वाट पश्चिमेकडुन असल्याने कळसुबाईच्या मागुन येत असलेली सुर्यकिरणे मजेशीर दिसत होती.

नळीला सुरुवात होते त्या ठिकाणी तासभरात पोहोचु असा अंदाज होता, पण ही वाट आजुबाजुच्या एक-दोन डोंगरांना वळसा घालत, थोडी आंबेवाडीच्या दिशेने, एखाद दोन टेकाडांच्या वरुन जात होती.

शेवटी ९.३० च्या सुमारास नळीपाशी पोहोचलो. नळी म्हणजे काय हो मोठ मोठ्या दगडधोंड्यांनी भरलेली पाण्याची वाट्च ती. या ठिकाणाहुनच पाणी खाली ऊडी घेते (असाच ऊल्लेख श्री. आनंद पाळंदे यांच्या "डोंगरयात्रा" मध्ये आहे)

तिथुन कळसुबाई अगदी अस्पष्ट दिसत होता, लगेच क्लिकून टाकलं कारण एकदा का नळी चढायला सुरुवात केली की वरती पोहोचेपर्यंत कळसुबाई दिसेलस वाट्त न्हवतं.

अस्पष्ट दिसणारा कळसुबाई

नळी प्रवेश - कळसुबाई गायब

या दगडधोंड्यांच्या वाटेत देखील निसर्ग मधुनच आपली किमया दाखवत होता.

एके ठिकाणी तर दगडावरील शेवाळे वाळुन त्याचे छान डिझाईन झाल होत.

वाटेत काही ठिकाणी सोपे कातळ्टप्पे होते तर काही ठिकाणची वाट अजस्त्र शिळांनी बंद झाली होती.

आतापर्यंत केलेली तासभराची चढाई ही साधारण अशा प्रकारे होती.

चालायला सुरुवात करुन तीन तास होऊन गेले, कुठून आलो ती वाट दिसत न्हवती, जिथे जायचय़ ती जागाही दिसत न्हवती, नळी अजुन किती आहे याचा अंदाज येत न्हवता, केवळ दोन्ही बाजूचे डोंगर जवळ जवळ येत आहेत म्हणजे नळी आता संपेल या आशेवर जात होतो.

एकेठिकाणी विश्रांतीसाठी थांबलो, जवळ्चे तहान लाडु-भूक लाडु खाल्ले, पाणी प्यायले आणि निघालो.

नळी संपायची चिन्ह दिसायला लागली, सुर्यप्रकाश वाढायला लागला आणि थोड्याच वेळात आम्ही नळी पार करुन वरती आलो.

डावीकडे असलेल्या कळसुबाईचे सुखद दर्शन झाले.

कळसुबाईच्या अत्युच्च्य टोकावर जायला अजुन अर्धा तास तरी लागणारच होता. पण बरेच दिवसांनी ट्रेकला जात असल्याने सवय मोडलेली, त्यात पहाटे लवकर निघालेलो, दिवसभरात खाणही तसं विशेष झालं न्हवत, या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणुन की काय पायात क्र्यम्प यायला लागले, आणि अर्धा तासाच्या अंतराला पाऊणतास लागला. शेवट्च्या शिडीपाशी आलो,

आणखी पाच मिनीटातचं कळसुबाईच्या देवळापाशी पोचलो.

आजुबाजुच्या परिसराचे फोटो काढले

आमच्या बरोबर पुर्वी काही ट्रेक केलेले जुने मित्र ऐन देवळातच भेटले, मग काय जुन्या आठवणी, गमती-जमती यात थोडा वेळ घालवला.

त्यांचा निरोप घेऊन निघालो कारण ते बारी गावात ऊतरणार होते, आणि कळसुबाई सगळ्या वाटांनी करायचा अस ठरवलं असल्याने आम्ही ईंदोरे नावाच्या एका लांबच्या वाटेने परतणार होतो. जवळच असलेल्या विहीरीतुन पाणी भरुन घेतलं, तिथेच एका मामाने आता खोपटी वजा दुकान टाकलं आहे, मामाकडेच गरमागरम खेकडा भजी खाल्ली, चहा प्यायला, त्यामधे खाण्यापेक्षा ईंदोरे गावची वाट विचारुन घेण हाही एक ऊद्देश होता. "बारीची जवळची वाट सोडुन लांबच्या वाटेने कशापायी जाता" इती मामा. आम्ही अर्थातच त्याकडे दुर्लक्ष केल आणि निघालो.

ईंदोरे गावच्या वाटेवरुन

साधारण पाऊण तासाच्या चालीनंतर एके ठिकाणी एकदम तुटलेला कडाच आला, पण त्याच्या बाजुनेच खाली ऊतरायला दगडी पाय-या देखील होत्या. साधारण १०० एक पाय-या असाव्यात.

एके ठिकाणी तर लोखंडी साखळी सुध्दा लावलेली होती, पण ती मधेच तुटली असल्याने आम्ही अर्थातच पाय-यांवरुन गेलो.

दगडात कोरलेल्या पार-या

तीन तास ऊतरुन पायथ्याच्या ईंदोरे गावात पोहोचलो तेव्हा पाय मी म्हणायला लागले होते, वाटेत मोबाईलला रेंज मिळाल्यामुळे मित्रांना निरोप पाठवला होता ते सुध्दा वेळेत आले आणि ५ च्या सुमारास भंडारदरा एम.टी.डी.सी.त पोचलो, आणि दोन्ही उद्दीष्ट साध्य झाल्याने समाधान पावलो.

भंडारदरा, मागील रांगेत रतनगड आणि खुटा

गुलमोहर: 

अफलातून!!!

आम्ही 'ऑफबीट'बरोबर पावसात इंदोरेकडून चढलो होतो आणि बारीला उतरलो होतो...

ही वाट जबरी आहे...

भटकेहो, कधी?
Happy

थरारक वाट आहे. पण फार कठीण दिसत नाही.
अशा वाटेला नळीची वाट म्हणतात ते माहित नव्हतं. अजाणतेपणी अशाच वाटेने प्रबळगडावर चढलो होतो आम्ही.

सुंदर.

प्रती
सेनापती

"फक्त ते मदन नाही मंडण... तेवढे बघा जरा.."

अलंग-कुलंग-मदन या दुर्ग त्रिकुटातील मदन हेच नाव प्रचलीत आहे. आपण मंडणगड म्हणत असाल तर ते तळकोकणात आहे असे वाटते. मदन या नावाविषयी आपणास अधिक माहिती असल्यास जरुर द्यावी म्हणजे संभ्रम होणार नाही.