विडंबन __तरिहि गझल !!

Submitted by वैवकु on 22 December, 2011 - 07:59

-----------------------------------------------------------------------------------
या गाझालेची फक्त चालच चोरलेली आहे .तरी इतर गोष्टींचे इतरत्र असलेल्या गोष्टींशी साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा
चाल : तू पुन्हा येशील या भीतीमुळे येते अता
यायची केव्हातरी विरहामुळेही कळ इथे
---------------------------------------------------------------------------

तू टिका करशील या भीतीमुळे आहे अता
या आधी काढायचो मी शार्यतीतच पळ इथे

"या इथे पाणी असावे" ......"बेवड्या"....वाटे तुझा...
-आरधा भरला टकीला, आरधा पोकळ इथे

माग तू पाऊस वेड्या हुंदका आला तुला
मी खुला करणार नाही गच्च माझा नळ इथे

टांग तू वेशीवरी नवख्या कवींची लक्तरे
मी तुला बधणार नाही छळ वा तू जळ इथे

निन्दूनी रे बापुड्या गझलेस 'तरिहि' माझिया
गझलवीरा पुरव तू तुझिया टिकांचे बळ इथे

जिंकतो आम्ही! 'लव्हाळी'__ रोवुनी पाळीमुळी__
__विठ्ठलाची वीट तळि ; ये वादळा रेंगळ इथे !!!!

मतला : ज्या टिकांचे युद्ध तू हे छेडले तुंबळ इथे
त्या टीकांचा गोंधळी मी वाजवी संबळ इथे

गुलमोहर: 

'विद्या विनयेन् शोभते':रसग्रहण-ईथे भल्याभल्यांचे 'विनोद कांबळी'होतात.

आम्ही आधी म्हणलेच आहे कि आम्ही 'टिकांचे गोंधळी' आहोत (मताला पहावा -सर्वात खाली दिलाय) विनोद कांबळी नाही!!
आणि हे विडंबनच तर आहे गोंधळ घातला तर सहजिक आहे ते......आपण वाईट वाटून घेउ नये ही विनंती