Submitted by सत्यजित on 11 January, 2008 - 00:36
हे चिमुकल्या पिल्लांसाठी...
हनुवटीवर हात ठेवुन
चांदोमामा बसला
माझ्याही मनात विचार आला
हा विचार करत असेल कसला?
हा करत असेल का विचार
त्याच्या बदलणार्या रुपाचा?
की समोर मांडुन ठेवल्या,
लाह्या भरल्या सुपाचा?
त्यालाही वाटत असेल
जेंव्हा खावासा पॉपकॉन
हळुच एक चांदणी उचलुन
तोंडात टाकत असेल गपकन.
सत्यजित.
गुलमोहर:
शेअर करा
किती छान!
सत्यजीत
एकदमच गोड गोडुली कविता आहे! अजून लिही.
मी माझ्या मुलीला पण तुझी कविता वाचून दा़खवणार आहे.
आवडली
सुंदर कविता. २रे आणि ३रे कडवे उत्तम.. चांदण्यांचे पॉपकॉर्न तर फारच ग्रेट!
एक सुचवणी:
फक्त मुलांसाठी आहे म्हणून सांगावसं वाटतय की पहिलं कडवं बाकी कडव्यांसारखं बांधता नाहि का येणार, लहान मुलांच्या एकाच चालीतील गाणी तोंडात बसतात. पण पहिलं कडवं अपवाद वाटतंय.. सुचवणी निरस करण्यासाठी नाहि हे तुम्ही लक्षात घ्याल ही अपेक्षा
पुढील बालकवितेच्या प्रतिक्षेत
-ऋषिकेश
पॉपकॉर्न
सत्यजित, खुद्कन हसू आलं. मस्तच कल्पना.
मस्त
छान छोतुली..... गोदुली......
मस्तच कविता.... माझी लेक एकदम खुश झाली.
खूप छान
मस्तच जमलीय बालकविता. कल्पना अतिशय गोड आहे.
फक्त हृषिकेश म्हणतो तशी पहिल्या कडव्यात लय थोडी वेगळी झालीय.
तिथं
एवढा गुंग होऊन
विचार करत असेल कसला?
(हेच असं नाही पण) असं काहीतरी बदलून बघ ना.
वाह रे
सत्त्याभाय ... एकदम फर्मास ....!
परागकण
आभार
प्रतिक्रीया बद्दल सर्वांचे आभार,
ॠशीकेश आणि संघमित्रा तुमच म्हणण पटल. मित्रा तू सुचवलेली ओळ अगदी चपखल आहे. thanks...
सत्या मस्त रे...
माझ्या पिलुला श्रावणीला मी तुझ्या कविता वाचुन दाखवणार आहे...:-) थँक्स
मस्तच आहे
सत्यजित,
खुप गोडगोडुली कविता आहे. छोटुला वाचुन दाखवली आज.
-प्रिन्सेस...
पिल्लांना कश्या वाटली?
पुन्हा एकदा आभार...
तुमच्या पिल्लांना कविता आवडली तर एक गोड पापा उधार त्यांच्यावर...
की समोर
की समोर मांडुन ठेवल्या,
लाह्या भरल्या सुपाचा?
....................सुंदर
इथे वरती
इथे वरती 'Shuma' या नावानी कुणाची तरी एक प्रतिक्रीया आहे. ही Shuma 'तीच' का 'ती'?
परागकण
हो रे
हो रे पीक्या हि तिच असावी... बरेच वर्षानी प्रकट झाली होती पण पुन्हा गायब झाली आहे..
फळांची
फळांची सभा
एकदा फळ भाज्यांची सभा भरली
प्रत्येकाने आप-आपली स्तुती गायली
काकडी म्हणाली,
मी कधी सरळ कधी वाकडी
सगळ्यांत थंड आहे मी एकटी
गाजर म्हणाला,
रंग माझा सगळ्यांत सुंदर
माझ्यामुळे स्वच्छ होते नजर
बीट म्हणाला,
भोवर्याच्या आकाराचा मी बीट
माझ्यामुळे राहतात सगळे फिट
टोमॅटो म्हणाले,
माझा रंग आहे लालेलाल
माझ्यामुळे होतात गुलाबी गाल
कांदा म्हणाला,
मी आहे जरासा तिखट
खवून मला चव जाते फिकट
मुळा म्हणाला,
माझा रंग स्वच्छ, सफेद
मला खाताना कसला खेद?
सगळ्यांची मग गट्टी झाली
कोशिंबीर नावाची टीम त्यांनी केली.
प्राजक्ता