सुजी ढोकळा (झटपट)

Submitted by sas on 26 November, 2008 - 13:03
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

सुजी ढोकळा (Instant Dhokala):

सुजी: २ Cup
तेल: २ Tbsp
अजवाईन: १/४ tsp
अद्रक पेस्ट: १ tsp
हिरवी मिरची: १ बारिक चिरलेली
पाणी: १ कप
दही: १ कप
हळद: १/४ tsp
मीठ: चवी नुसार
ENO Fruit Salt: २ tsp

क्रमवार पाककृती: 

सुजी, अजवाईन , तेल मिक्स करायच त्यात दही, हळद, मिरची, अद्रक, मिठ एकत्र करुन घायायच पाणी टाकुन batter तयार करायच. १५-२० मि. हे batter झाकुन ठेवायच.

कुकर मध्ये पाणी घालुन मध्यम आचेवर ठेवायच. पाणि उकळु लागल कि batter ताटलित ठेवुन (असल्यास ढोकला stand मध्ये भरुन) मध्यम आचेवर १५ वाफवायच ***शिट्टि न लावता***

****खुप महत्वाच batter कुकर मध्ये ठेवण्या अगोदर त्यात ENO Fruit Salt घालायच आणी मिक्स करायच.**** आधि नाहि***

ढोकळा कुकर मधुन काढला कि कापण्या अगोदर:
तेल, मोहरी, तिळाची फोडणी करुन ढोकळ्या च्या केक वर घालायची व ढोकळे कापायचे.

वरुन Dry Coconut Powder, कोथिंबीर भुरभुरायच. (हव असल्यास १ कप पाण्यात साखर विरघळुन हे पाणी ही घालायच गोडसर चवी साठी)

Serve with चटणी/केचप..

गरम, फोडणी घातलेला ढोकळा चटणी/केचप शिवाय हि चांगला लागतो.

Cook Eat n Enjoy Happy

वाढणी/प्रमाण: 
१२-१५ कापु त्याप्रमाणे
अधिक टिपा: 

मी आधी ENO च्या एवजी सोडा वापरुन ढोकळा करायचे, सोडा batter तयार करताना घतला तरी चालतो पण ENO मुळे जे Quality Output मिळत ते सोड्याने मिळत नाही. जाळी व स्पोन्गीनेस तेव्हा ENO च वापरला पाहीजे आणी तोही शेवटी ढोकळा कुकर मध्ये लावण्याच्या वेळी.

सोडा वापरुन हा ढोकळा मी कैकवेळा केला पण खास जमला नाही कधिच , रेसिपित सोड्या एवजी ENO Fruit Salt इतकाच बदल केला आणी noe every time I get Yummy result.

माहितीचा स्रोत: 
स्वतः, इंटरणेट
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users