Submitted by अमृता on 12 December, 2011 - 00:17
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
१ कप गव्हाची कणिक, १ कांदा बारीक कापलेला, थोडी कोथींबीर बारीक चिरलेली, २,३ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, १ चमाचा अनारदाना पावडर किंवा चाट मसाला, १ चमाचा तिखट, मीठ चवीनूसार, तेल, तूप आवश्यकतेनूसार
क्रमवार पाककृती:
१. तूप सोडुन बाकी सगळे साहित्य एकत्र करुन त्याचे पिठ मळून घ्या.
२. थोडी जाडसर पोळी लाटा.
३. तव्यावर तूप सोडुन खमंग भाजुन घ्या
४. लगेच सॉस किंवा लोणच्या सोबत खाउन टाका.
वरील पोळी लेकीसाठी केल्याकारणाने त्यात मिरच्या आणि तिखट कमी टाकले आहे.
वाढणी/प्रमाण:
जसे खाउ तसे
अधिक टिपा:
१. मी मिरच्यां सोबत भोपळी मिरच्या पण बारीक चिरुन घातल्या होत्या.
२. भाजी पोळी करायचा कंटाळा आला असेल तर हा रामबाण उपाय आहे.
माहितीचा स्रोत:
मेरी सहेली - १५० टेस्टी स्नॅक्स
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ह्याला पराठा म्हणता येईल
ह्याला पराठा म्हणता येईल का???
बाकी नाश्ता म्हनून ट्राय करायला हरकत नाही.....मस्त आयडीया वेगळा नाश्ता
ह्म्म, पराठाही चालेलच.
ह्म्म, पराठाही चालेलच.
पुस्तकात 'मसाला कोकी' असे नाव आहे.
मस्त !!! हा सिंधी पदार्थ आहे.
मस्त !!! हा सिंधी पदार्थ आहे. ह्याला ते लोक खोकी म्हणतात. थोडक्यात कांद्याचा परोठा. पण खुप छान लागतो. मी डब्या साठी बरेचदा करते.
माझा एक मित्र सिंधी होता. तो नेहेमी डब्यात आणायचा. त्याच्या आईने ही क्रुती सांगीतली होती. कधी कधी कांदा परतुन पण ते लोक ही खोकी करतात. खुप छान लागते.
कांद्याचा पराठा आहे
कांद्याचा पराठा आहे हा..त्याला सिंधी लोक कोकी म्हणतात..
मस्त आहे पाकृ. कांद्याचं
मस्त आहे पाकृ. कांद्याचं माहिती नव्हतं, मी नुसतीच तिखट-मीठाचा पराठा करते. आता कांदा चिरून घालून बघेन. याबरोबर छुंदा एकदम भारी लागतो
सहीये! कांदा घालुन करुन बघते.
सहीये! कांदा घालुन करुन बघते. मी लेकीच्या डब्यासाठी गाजर किसुन असा पराठा/पोळी करते. म्हणजे पोळी करतांना छोटा गोळा करुन त्यात पुरण भरतो त्याप्रमाणे गाजराचा किस आणि चवीपुरता मीठ असे घालुन पराठ्यासारखे तुप/तेल घालुन भजुन घेते.
माझी सिंधी मैत्रीण कोकी
माझी सिंधी मैत्रीण कोकी म्हणते. कोकी बर्यापैकी जाड असते. पराठ्यापेक्षा थालिपीठाला जास्त जवळ.
छान आयडीया वत्सला. मी पण
छान आयडीया वत्सला. मी पण देईन तुझा गाजर पराठा लेकीला डब्यात.
भरत, पुढच्यावेळी अजुन जाड लाटेन.
वन डिश मिल म्हणून एकदम हिट्ट
वन डिश मिल म्हणून एकदम हिट्ट आहे.
भरत +१ कोकी बरीच जाडुली
भरत +१
कोकी बरीच जाडुली असते(आपल्या थालीपिठापेक्षाही),भरपूर तेल,मीठ आणी कोथिंबीर्,हिरव्या मिर्च्या,कांदा बारीक चिरून घालतात कणकेत.
याबरोबर ऑम्लेट किंवा मसाला दही म्हंजे पर्वणी.. ब्रंच!!!!
माझ्यापण आवडीचा प्रकार हा. मी
माझ्यापण आवडीचा प्रकार हा. मी यात थोडे चीज घालतो. मस्त चव येते.
हे असं पराठ्यासारखं किंवा
हे असं पराठ्यासारखं किंवा पोळीसारखं लाटल्यावर मावेत भाजता येतं का?
भाजता येइल कदनाही, केलं
भाजता येइल कदनाही, केलं नाहीये कधी. पण दक्षिणा तव्यावर खरपूर भाजुन चव छान येतेच शिवाय वेळही कमी लागतो.
दिनेश, चीज छान लगेलंच, प्रश्नच नाही. पुढच्यावेळी घालुन पाहिन.
छान
छान
मी मीठाएवजी लोणचे घालते आणी
मी मीठाएवजी लोणचे घालते आणी थोडे बेसन पण
मस्त लागते गरम गरम
माझा सिंधी मित्र रोज नाश्ता
माझा सिंधी मित्र रोज नाश्ता म्हणुन खायचा कोकी. पण त्याचे बहुतेक डाएट वर्जन होते, कमी तेल-तुप घातलेल्या कोकी. कोरड्या कोरड्या दिसायच्या आणि जाड असायच्या बर्याच.
या फोटोतल्या कोकी छान दिसताहेत.
माझी मैत्रीण कांदा,टोमॅटो,
माझी मैत्रीण कांदा,टोमॅटो, मिरची, कोथिंबीर वैगरे सगळ मिक्सर मधुन काढून त्या मिश्रणात कणिक मळते खूप छान लागतात त्या पण कोकी.
डब्यातला सिंधी पोरांचा फेव
डब्यातला सिंधी पोरांचा फेव पदार्थ आहे तळलेला पापड व पुरी नंतर.