मेथीची १ जुडी..
१ मोठा टोमॅटो..
१ हिरवी मिरची..
२ मोठे चमचे भरुन बेसन..
२ वाटया पाणी..
२ मोठे चमचे तेल..
फोडणी साठी--हिंग-जिरे-मोहोरी..व हळद
१/२ लहान चमचा भरुन तिखट..
१ लहान चमचा मीठ..
धनेपुड १ चमचा..
१/२ चमचा गरम मसाला..
गुळाचा लहान खडा-चवीपुरता..[ऐच्छीक...मी घातलेला नाही..]
लसुण ६-७ कळ्या ठेचुन..
मेथीची पाने कोवळ्या दांड्यासकट खुडुन ,धुवुन चिरुन घ्यावी..
२ वाटी पाण्यात बेसन कालवुन घ्यावे..
हिरवी मिरची बारीक चिरावी..टोमॅटो चिरुन घ्यावा..
कढईत १ चमचा तेलाची फोडणी करुन त्यात हिंग्,मोहोरी,जिरे व हळद घालुन टोमॅटो च्या फोडी व लगेचच मेथीची भाजी घालुन परतावे..त्यावर पाण्यात कालवलेले बेसन घालुन पुन्हा ढवळावे..त्यात मीठ्,धनेपुड्,गरम मसाला ,मीठ [गुळ]घालुन एकदा ढवळुन मंद गॅसवर,कढईवर झाकण ठेवुन एक वाफ आणावी..२ मिनिटांनी पुन्हा एकदा ढवळावे..
इथे पाण्याचे प्रमाण पहावे..भाजी फार घट्ट होईलसे वाटले तर अर्धी वाटी अजुन घालावे..
सर्विंग बाऊल मधे ही भाजी काढुन घ्यावी..
आता उरलेल्या १ चमचा तेलाची पुन्हा फोडणी करावी..तेल तापले कि त्यात जिरे,लसुण घालुन गॅस बंद करावा व लगेचच त्यात लाल तिखट घालुन ही फोडणी सर्विंग बाऊल मधल्या भाजीवर ओतावी..
ही भाजी पळीवाढ पण पातळ भाजीपेक्षा घटट असते..
भाजीत बेसन शिजल्यावर खुप घटट वाटल्यास अर्धी वाटी पाणी घालावे..
मेथी जाडसर च चिरायची आहे..
बेसन अजुन जास्त घेतले तरी चालते..[मग फोडणीचे तेल ही वाढवावे]
सोबत मक्याची रोटी व कांदा तोंडी लावायला घेतात..
तिखट व हिरवी मिरची आवडीनुसार घ्यावी..
http://www.maayboli.com/user/
http://www.maayboli.com/user/30320/imce#
छान आहे पाकृ. आणि सध्या मेथी
छान आहे पाकृ. आणि सध्या मेथी चांगली मिळतिये बाजारात. नक्की करून बघीन.
मुम्बइ ला बारीक पानान्ची मेथी
मुम्बइ ला बारीक पानान्ची मेथी मिळते त्याचयाभाजी कशी करायची
मी टोमॅटो आणि गरम मसाला नाही
मी टोमॅटो आणि गरम मसाला नाही घालत कधीच. अशीच पालक आणि करडईची पण छान लागते भाजी. तोंपासु