बदामाच्या वड्या / बर्फी

Submitted by प्राजक्ता on 28 December, 2011 - 15:23
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

१ कप बदाम
१ कप खवा
१ कप साखर
१/२ कप दुध
केशर्,वेलदोडा पुड (आवडिनुसार)

क्रमवार पाककृती: 

१ कप बदाम रात्रभर पाण्यात भिजत घालावे,सकाळी बदाम सोलुन दुध घालुन मिक्सरवर बारिक वाटावे (फार गुळगुळित वाटायचे नाहिये)एका जाड बुडाच्या भांड्यात बदामाचे मिश्रण घालुन परतायला घ्यावे मध्यम आचेवर अजिबात लागु न देता परतावे दुध जरा आटले कि १ कप खवा जरा मोकळा करुन त्यात घालावा ,साखर घालावी मग सगळे मिश्रण बर्‍याच वेळ हलवावे गोळा जमायला लागला आणी हाताला चिकट लागले नाही की झाले अस समजावे आच बंद करुन एका तुप लावलेल्या खोलगट डिश मधे जाड बर्फी थापावी.
वड्या हव्या असतिल मिश्रण अजुन जास्त कोरडे होवु द्यावे मग ताटात घालुन थापावे आणी सुरिने वड्या पाडाव्या.

वाढणी/प्रमाण: 
मध्यम आकाराच्या२०-२२वड्या होतात.
अधिक टिपा: 

हिवाळ्यात खायला अतिशय उपयुक्त्,मिश्रन गोळा होत आल्यावर केशर वेलदोडा पुड घालता येईल .मला बदामाचा ओरिजिनलच स्वाद आवडल्याने मी घातलेली नाहिये.तयार बदाम पावडर वापरून्ही या वड्या करुन बघितल्या होत्या त्यामानाने पटकन होतात पण्,चवित बराच फरक पडतो.मी नानक ब्रँडचा खवा वापरला.या वड्या हाताला मऊसरच लागतात ईतर वड्यांसार्ख्या कोरड्या होत नाहित्.खवा वापरलेला असल्याने फ्रिजमधेच ठेवाव्या.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.

संपादन मध्ये जाऊन लिखाणाच्या खाली सार्वजनिकचा बॉक्स असेल त्याच्यावर क्लिक करुन सेव्ह कर.

हा प्रकारही छान आहे. पण खव्याच्या ऐवजी काय वापरता येइल हा विचार करतेय. इथे खवा कधी बघितला नाही.

अरे व्वा! छान आहे Happy

ही बघितलीच नव्हती रेस्पी Happy

वत्सला, मिल्क पावडर + क्रिम मिसळुन, थोडे गरम करुन खव्या ऐवजी वापरता येइल.