मासे ३७) घोळ

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 7 December, 2011 - 04:40
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

घोळ माश्याच्या ५-६ तुकड्या
ओल खोबर, आल, लसुण, मिरची, कोथींबीर वाटण
हिंग चिमुटभर
हळद पाव चमचा
मसाला २ चमचे
लींबाएवढ्या चिंचेचा कोळ
चवीपुरते मिठ
४-५ लसुण पाकळ्या ठेचून
१ किंवा २ छोटी पळी तेल

क्रमवार पाककृती: 

१) घोळीच्या तुकड्या तिन पाण्यातून स्वच्छ धुवून घ्याव्यात.
मी वरच्या पेक्षा जास्त प्रमाणात घेतल्या आहेत.

२) भांड्यात तेल गरम करून त्यावर लसुणाची फोडणी द्यायची.
३) त्यातच लगेच हिंग, हळद, मसाला घालून पटकन ढवळून लगेच वाटण घालायचे. जर पटापट जमत नसेल तर वाटण घातल्यावर मसाला घाला त्यामुळे मसाला करपणार नाही. पण जर तेलातच घातलात तर कालवणाला चांगला लाल रंग येतो.
४) आता त्यात चिंचेचा कोळ, घोळिच्या तुकड्या, मिठ, गरज असेल तेवढेच पाणी घालून ढवळून उकळवत ठेवा
५) उकळी आल्यावर साधारण ७-८ मिनीटांत गॅस बंद करा.
झाले घोळीचे कालवण.हाकानाका?

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी १ ते २ तुकड्या.
अधिक टिपा: 

घोळात घोळ नव्हे घोळ म्हणजे मासा Happy
घोळीचे सर्वच भाग खाण्यासाठी वापरतात.
मोठी घोळ चविष्ट असते. वरील फोटोपेक्षाही घोळीचा मोठा मासा असतो. घोळ माश्याला मोठी खवले असतात.
ह्याच्या डोक्याला घबाड म्हणतात. हे डोकेही चविष्ट म्हणून खास कालवणासाठी डोके मासेखाऊ नेतात.
घोळीचा मधला काटाही कालवणासाठी वापरतात. (माझा फेव्हरेट लहानपणापासुन) हा काटा उखळीप्रमाणे असतो. ह्याच्या मधले जॉइंट काढले की त्यात रस मिळतो तो प्यायचा हा पुर्वीपासूनचा छंद. काट्याच्या म्हणजे मणक्याच्या बाजूला थोडे मांस असते.
घोळीचा पिसारा म्हणजे प्रराकडचा मांसल भाग. ह्याचे कालवण करतात.
घोळीच्या मधल्या भागाच्या तुकड्या तळण्यासाठी व कालवणासाठीही वापरतात.
चविला हा मासा मध्यम, म्हणजे कोणालाही आवडेल असाच. अती चविष्ट नाही व मुळमुळीतही नाही.

घोळीच्या कालवणात शेवग्याच्या शेंगा, टोमॅटोही चांगला लाग्तो. शेंगा घालायच्या असतील तर चिंचेचा कोळ व तुकड्या घालण्याआधी शिजवून घ्याव्यात.
हे कालवण जास्त दाट न करता पातळच करावे म्हणजे वाटणाची चव न येता खरी माश्याची चव त्यात उतरते. काहीजण वाटण न घालताही हे कालवण करतात.
तुकड्या तळण्यासाठी नेहमीसारखेच हळद, मसाला, मिठ लावून तळाव्यात.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुणाला याचं ईंग्रजी नाव माहिताय का? जागू, हा बाहेरून जाम ओबड धोबड दिसतोय, साफ तू घरी कर्तेस का काय?

माझ्या घरी एकवेळ मीठ, भात किंवा भाकरी मिळणार नाही. पण घोळीचा काटा आणि तुकड्या नक्कीच मिळतील. आमचा सगळ्यांचा फेव्हरीट आणि लाड्का मासा. ह्याला तळुन, कालवण करुन, सुकं-ओलं कसही खाल्ल जात. कधीही. ह्याचा फ्रीझ मध्ये स्टोर करुनच ठेवतो आम्ही..................
पु.ले.शु.

तृष्णा अग घोळीच्या कालवणात शेवग्याच्या शेंगा छान लागतात. माझाही घोळ फेव्हरेट मासा आहे. घोळीच्या तुकड्या, काटा आणि पिसाराही छान लागतो. त्याचे डोकेही खातात पण मला ते जास्त वईसट वाटते. काहीजण खुप आवडीने डोक्याचे कालवण करुन खातात.

घोळीचा आतुड खाल्ल आहेस का गं कधी.
मुव्हहाहा. कसं नुसतं मटणाची कलेजी खाण्याचा फील येतो माहीती आहे. एकदम झक्कास.............

दक्शी तू मासे खायला सुरुवात केलिय्स ़का? नेहमीप्रमाणेच युनिक क्वेच्शन Wink
वईसट म्हणजेच ओशट

मला वाटतं सगळ्या माशांच्या उसातल्या नावाचा एक वेगळा धागा सुरु करावा...कसें Happy

घोळीला वास येतो ना ग, त्यामुळे कधी खाल्ला नाही. तो वास येऊ नये म्हणून काय करायचं. नवरा वेजिटेरियन आहे ग.

माशांना वास येऊ नये म्हणून कोकम, चिंचेचे पाणी वापरतात. पण धुतलेल्या माशांना हिंग चोळून ठेवल्यावर वास येत नाही.चिकन्,मासे यांना मी हिंग लावते. त्यामुळे हातालाही वास येत नाही.

वल्लरी लसुण आणि चिंच घालतोच ना आपण कालवणात ती वास जाण्यासाठी उपयुक्त ठरते. फोडणी आणि वाटण दोन्हीत लसुण घालायचा.
तळलेल्या तुकड्यांना तसा वास नाही येत. पण तू फोडणीला लसुण घालू शकतेस किंवा आल-लसुण पेस्ट लावू शकतेस. अजुन हवे तर लिंबू पिळ.

Pages