उचलून शटर वर मी...

Submitted by कौतुक शिरोडकर on 28 December, 2011 - 01:33

(प्राजुची मनःपुर्वक माफी मागून...http://www.maayboli.com/node/31531)

उचलून शटर वर मी, उघडे खानावळ
आहे भयाण गर्दी, गल्ल्यास या भुरळ

घासून काढले बघ, पेल्या, कपास मी
पाण्यात बुचकळूनी, त्यांना जरा विसळ

शेवेत या जराशी, घालूनिया तरी
ताटात कालची तू, फक्कड जमव मिसळ

सोडून सर्व कामे, कर्तव्यही तुझे हे
कस्टमरशी नकोरे, बोलू अघळपघळ

चल मार फास्ट फडका, चमकवच टेबले
दे आत चार टोस्ट, बाहेर दे उसळ..

घेऊ नकोस आढे-वेढे उगाच तू
ताजे असो वा शिळे, देऊन जा सरळ

जे बैसलेत फुकटे, आधी तया फुटव
बाहेर बघ किती ते, घे आत तू सकळ

पोटे भरून जावो, येईल जो कुणी
घंदा असा फळावा, ऐश्वर्य ये सुफळ

गुलमोहर: 

Lol

कौतुकराव, अगदी वृत्तभंगासकट विडंबन झाले Lol सोडून सर्व कामे, कर्तव्यही तुझे हे Lol

चल मार फास्ट फडका, चमकवच टेबले
दे आत चार टोस्ट, बाहेर दे उसळ..>>> Biggrin

Rofl

अगदी वृत्तभंगासकट विडंबन झाले>>> त्याने एका एका शेरात (सो कॉल्ड) दोनच ओळी ठेवल्यात हे ही नसे थोडके Wink Biggrin

अवांतर : कौतुक, सही- धम्माल, लईच हसले!!!
दे आत चार टोस्ट, बाहेर दे उसळ,
ताजे असो वा शिळे, देऊन जा सरळ>> अरे काये हे.... Rofl

फुकटात मिसळ खाउन गेला तुझ्यामुळे तो
दिसले कसे तुला ना चिवड्यातले झुरळ?

त्या कालच्या चहाला दे दूध आजचे हे
वाह ताज! म्हण मुखाने हलवून मग उकळ

आवडले Lol

हबा तुझे पण लै भारी Happy

संपता दुध नेमके आला कॉलेज गृप
कोर्‍या चहाने म्हणा होते त्वचा नितळ

तिखट जास्त जाहले तरी नकोच चिंता
पोट साफ होउनी, आनंदी होइल सकाळ

गल्ला आज भरुदे, प्रार्थना मी करीतो
आजच सांजच्याला, वाहिन तुज नारळ

:कैच्याकै:

कौतूक...
Lol

अरे, गोष्ट कधी लिवतं?, आणी ह्यां विडंबन कधी करतं?... की, गोष्टीत येणारो ताण हलको करुच्या साठी विडंबन लिवतं?... कायय आणी कसांय असो, आपणाक आवाडलां...
मस्त.. मस्त... मस्त....