चिऊताई चिऊताई

Submitted by विदेश on 25 December, 2011 - 00:38

चिऊताई चिऊताई
नकोस फिरकू अंगणात ग -
मम्मी-डॅडीचा गुडबॉय
कधीच तुला विसरला ग !

बोकेभाऊ बोकेभाऊ
टपून बसला ना तुम्ही -
मोठ्ठा गोळा लोण्याचा
कधीच मटकावला आम्ही !

बोकडदादा बोकडदादा
किती अजागळ दिसता हो -
तुमची दाढी पाहुन बायको
भांडत नाही का हो ?

हत्तीराव हत्तीराव
ब्रश कसा हो वापरला -
दोन दात दोन दिशांना
नीट का नाही धरला ?

कावळोबा कावळोबा
उगाच करता काव काव -
संतूर लक्स टाईड रिन
वापरून तरी बघा राव !

गुलमोहर: 

Back to top