आई, बाबा, शाळेत तुम्ही घालणार केव्हा मला
आत्ताच सांगा नाय्तर मी करीन हल्लागुल्ला
कुठली शाळा तिचे आधी नाव मी विचारिन
दाखवा नेउन शाळा पैले, आवडते का पाहिन
टीचर दिस्ल्या चांग्ल्या आणि बिल्डिंग अस्ली चांग्ली
ग्राउंड अस्ला खेळाय्ला नि वर्गात चित्रं टांग्ली
स्विंग आणि स्लाईडसकट चांग्ले अस्तिल गेम
तरच त्या शाळेत माझे घालायचे नेम
बसनी नाई जाणार मी सांगुन ठेव्तो पैले
शाळेत सोडाय्ला नि न्यायला आबा पायजेत आले
बाबा तुम्ही येऊ नका, आबा असतील ड्राय्व्हर
आरामात मी गाडीत त्यांच्या बसेन मागच्या सीटवर
आई, टिफिनमध्दे पाय्जेत मफ़िन आणि चॉक्लेट
शाळेत अलाउड नस्णार नं सुर्मई, बोंबिल, पाप्लेट?
आणि अध्नंमध्नं दे चकली खमंग ताजी
कधीतरीच चालेल तुझी चपाती नि भाजी
शाळा सुट्ल्यानंतर मी घरी येईन जेव्हा
गरम गोड शिरा तय्यार अस्ला पाय्जे तेव्हा
दूध बीध प्याय्ची मला सक्ती नाई चाल्णार
आधीच सांगून ठेव्तो, नाय्तर शाळेत नाइ जाणार
मस्तच आहे !!!
मस्तच आहे !!!
गोssssssssssड!
गोssssssssssड!
आयला, पोरगं लईच अटी घालून
आयला, पोरगं लईच अटी घालून रायलय रावं. अशानं डोक्यावर चढायचं. जपा आतापास्न.
ग्रेट आहेत हे बंटीबाबा आणि
ग्रेट आहेत हे बंटीबाबा आणि त्यांच्या अटीही आवडल्या.
(एवढ्या अटी पूर्ण करायच्या म्हणजे अटीतटीचा सामनाच आहे की !)
>>बंटीबाबा आजोबानाच आबा
>>बंटीबाबा आजोबानाच आबा म्हणतात. लहान मुलाना कारमधे फ्रंट सीटवर बसवणे हा इथे कायद्याने गुन्हा आहे.
ओह, मी बंटीबाबा भारतात आहेत असं समजत होते. म्हणून कायद्याचा मुद्दा लक्षात आला नाही
::०) गोड आहेत अटी
::०) गोड आहेत अटी
खूप गोड
खूप गोड
मित्रानो, तुमच्या प्रेमाने
मित्रानो, तुमच्या प्रेमाने मला अवाक् करून सोडलंत. कितीही आभार मी मानले तरी ते थोडेच ठरतील.
शतशः धन्यवाद.
डेंजर
डेंजर
जबरी अटीयेत बंटी बाबा च्या !
जबरी अटीयेत बंटी बाबा च्या !
खूपच गोड कविता....
खूपच गोड कविता....
भारी आहेत बण्टीबाबाच्या
भारी आहेत बण्टीबाबाच्या अटी.
चला, यानिमित्ताने आबांना पुन्हा एक नवा जॉब मिळाला म्हणायचा.
आवडली कविता माझ्या बाल-मनाला
आवडली कविता माझ्या बाल-मनाला !
सुंदर आहे.
सुंदर आहे.
मस्तंचय कविता.
मस्तंचय कविता.
Pages