आई, बाबा, शाळेत तुम्ही घालणार केव्हा मला
आत्ताच सांगा नाय्तर मी करीन हल्लागुल्ला
कुठली शाळा तिचे आधी नाव मी विचारिन
दाखवा नेउन शाळा पैले, आवडते का पाहिन
टीचर दिस्ल्या चांग्ल्या आणि बिल्डिंग अस्ली चांग्ली
ग्राउंड अस्ला खेळाय्ला नि वर्गात चित्रं टांग्ली
स्विंग आणि स्लाईडसकट चांग्ले अस्तिल गेम
तरच त्या शाळेत माझे घालायचे नेम
बसनी नाई जाणार मी सांगुन ठेव्तो पैले
शाळेत सोडाय्ला नि न्यायला आबा पायजेत आले
बाबा तुम्ही येऊ नका, आबा असतील ड्राय्व्हर
आरामात मी गाडीत त्यांच्या बसेन मागच्या सीटवर
आई, टिफिनमध्दे पाय्जेत मफ़िन आणि चॉक्लेट
शाळेत अलाउड नस्णार नं सुर्मई, बोंबिल, पाप्लेट?
आणि अध्नंमध्नं दे चकली खमंग ताजी
कधीतरीच चालेल तुझी चपाती नि भाजी
शाळा सुट्ल्यानंतर मी घरी येईन जेव्हा
गरम गोड शिरा तय्यार अस्ला पाय्जे तेव्हा
दूध बीध प्याय्ची मला सक्ती नाई चाल्णार
आधीच सांगून ठेव्तो, नाय्तर शाळेत नाइ जाणार
वा मज्जा आहे
वा मज्जा आहे बंटीबाबाची.....
आता शाळेतल्या गंमतीजमतीही ऐकायला मिळतील आम्हाला.......
खूप गोड कविता.
मस्त!
मस्त!
टीचर दिस्ल्या चांग्ल्या आणि
टीचर दिस्ल्या चांग्ल्या आणि बिल्डिंग अस्ली चांग्ली
ग्राउंड अस्ला खेळाय्ला नि वर्गात चित्रं टांग्ली
कालांतराने चित्रांच्या जागी टीचर दिसणार नाहीत ना? बंटीबाबा फारच अग्रेसिव होत चाललेत.
मस्त मलईदार कविता.
मस्त आहे. जोरदार अटी आहेत.
मस्त आहे. जोरदार अटी आहेत.
मस्तच (नेहमीप्रमाणे) आता
मस्तच (नेहमीप्रमाणे)
आता शाळेतल्या गंमतीजमतीही ऐकायला मिळतील आम्हाला.......
खूप गोड कविता.>>>>>+१
भारी आहेत सगळ्या अटी.
भारी आहेत सगळ्या अटी.
मस्त!
मस्त!
मस्त आहे. आवडली
मस्त आहे. आवडली
व्वा! बंटीबाबापण आता एव्हढे
व्वा! बंटीबाबापण आता एव्हढे मोठ्ठे झाले! कळलंपण नाही. मस्त!! स्वतःचे शाळेतले दिवस आठवले.आता बंटीबाबांचे पण पुस्तक येवू द्या.
अतिशय गोड गोड अटी आहेत.
अतिशय गोड गोड अटी आहेत.
बालकवि-ता उत्त्म आहे
बालकवि-ता
उत्त्म आहे
छान आहे .
छान आहे .
छान आहे पण 'आबा' कोण ते कळलं
छान आहे पण 'आबा' कोण ते कळलं नाही. आबा आजोबा असतील तर ते गाडी चालवणार आणि नातू मागे बसणार हे थोडं खटकलंच.
मज्जा आली...
मज्जा आली...
प्रतिसादाबद्दल सर्वाना
प्रतिसादाबद्दल सर्वाना मनापासून धन्यवाद.
स्वप्ना राज,
बंटीबाबा आजोबानाच आबा म्हणतात. लहान मुलाना कारमधे फ्रंट सीटवर बसवणे हा इथे कायद्याने गुन्हा आहे.
मस्त!
मस्त!
किती गोड!
किती गोड!
मस्त मस्त
मस्त मस्त
मस्त आहेत अटी
मस्त आहेत अटी
छान
छान
बनुताईचे काय चाललय सध्या?
बनुताईचे काय चाललय सध्या?
बंटीबाबाचे अगदी जोरदार
बंटीबाबाचे अगदी जोरदार पुनरागमन...
पण बनुताई कुठे गेल्या?? ताई म्हणुन प्रमोशन मिळाल्यानंतर त्या दिसेनाशा झाल्या..
अरे,एवढ्यात बंटीबाबा शाळेत
अरे,एवढ्यात बंटीबाबा शाळेत जाण्याइतके मोठेही झाले का?
मस्तच.
आमच्या टिल्ल्याबरोबरच वाढतोय बंटीबाबा.
मस्त
मस्त
वाह ! खूपच आवडली कविता
वाह !
खूपच आवडली कविता
लहान मुलाचं विश्व रेखाटणं अवघड आहे..
कित्ती गोड आहे तुमचा बंटी !!
कित्ती गोड आहे तुमचा बंटी !! त्याला शाळेत सोडायला आणि घरी आणायला मी आलो तर चालेल का त्याला ? प्लीज विचारा नं त्याला.... .
वैभवरावः तुम्हाला आबा म्हटलं
वैभवरावः तुम्हाला आबा म्हटलं तर चालेल का? त्याला आबा हवेत शाळेत सोडायला.
मस्त .. त्या विश्वात नेऊन
मस्त .. त्या विश्वात नेऊन सोडलंत कर्णिकसर
कुठली शाळा तिचे आधी नाव मी विचारिन
दाखवा नेउन शाळा पैले, आवडते का पाहिन
काश... ऐसा हो पाता
खूप गोड कविता... खुप
खूप गोड कविता... खुप दिवसान्नी बंटीबाबा भेटला
बंटीबाबा थँक्स रे!
बंटीबाबा थँक्स रे!
Pages